मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहेत. तर राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यातील तुळापूर येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन 14 दिवसांचे होणार असून अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या 7 ते 20 डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे. हमास आणि इस्रायल युद्धाला 18 दिवस पूर्ण झाले आहेत. या दोन्ही देशातील युद्ध अजूनही थांबलेलं नाही. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
पुणे | मराठा आरक्षणासाठी रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहित पवार एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. युवा संघर्ष यात्रा सुरूच असणार, उद्या 18 किमी चालणार, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. रोहित यांचे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन उद्या असणार आहे. पवार उद्या सणसवाडी ते पाडोळी असे यात्रेत 18 किमी पायी चालणार आहेत.
पुणे | डेक्कन क्विन रेल्वेत उंदरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. डेक्कन क्विनच्या C2 कोचमध्ये चक्क ट्यूब लाईटमध्येच उंदरांचा वावर असल्याचं उघड झालंय. या प्रकरणातून रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस आलाय.
अकोला | अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्याला सुरुवात झालीय. भव्य धम्म मेळाव्याला हजारोंची गर्दी बघायला मिळत आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मेळाव्याच्या पूर्वी अकोला शहरातून वंचित बहुजन आघाडीची हजारोंच्या संख्येने मोठी रॅली निघाली. या रॅलीत सुजात आंबेडकर हे देखील सहभागी झाले. प्रकाश आंबेडकर मेळाव्यातून काय बोलणार याकडे कडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मोबाईलचं टॉर्च लावून प्रकाश आंबेडकरांच जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
पुणे : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील कातवी गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी असणार आहे. तसं पत्र ग्रामस्थांकडून मावळ तहसीलदार आणि तळेगांव पोलीस ठाण्यात देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदी या दौऱ्यात विविध विकास कामाचं उद्धाटन करणार आहेत. तसेच शिर्डीत साई बाबा यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार आहेत. तसेच 86 लाखांहुन अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील. निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.
नवी दिल्ली | राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं अल्टीमेटम संपल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत हालचालींना वेग आलं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. शिंदे-फडणवीस हे मराठा आरक्षणासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.
शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’च्या जागी ‘भारत’ लिहिण्याच्या NCERT पॅनेलच्या शिफारशीवर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले, “हा राजकीय निर्णय आहे कारण सर्व राजकीय पक्षांनी मिळून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. तेव्हापासून ते या नावाचा तिरस्कार करू लागले आहेत. इंडियाच्या जागी भारत नाव घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यावर चर्चा करण्याची जबाबदारी तुमची नाही का? इंडिया असो की भारत, आम्हीच आहोत. लवकरच तुम्हाला कळेल की 2024 मध्ये इंडिया जिंकेल आणि भारतही जिंकेल.
#WATCH दिल्ली: पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविन्द की अध्यक्षता में 'एक राष्ट्र, एक चुनाव' समिति की बैठक संपन्न हुई। pic.twitter.com/n2qm08fj9s
— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2023
तेलंगणा: कोमातिरेड्डी राजगोपाल यांनी भाजपा पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. “माझा निर्णय जनतेसाठी आहे.” असे ट्विट त्यांनी केले.
तेलंगाना: भाजपा पार्टी छोड़ने के बाद कोमाटिरेड्डी राजगोपाल कांग्रेस पार्टी में शामिल हुए।
उन्होंने ट्वीट किया, "मेरा फैसला लोगों के लिए है…।"
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/gTgggF6vQf
— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2023
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सरकारने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सरकारने सर्व मंत्र्यांकडून कामांचा तपशील मागवला आहे.
मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हंटलं आहे. दुसरीकडे, जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
आता NCERT च्या 12वीच्या पुस्तकात इंडिया लिहिलं जाणार नाही. एनसीईआरटी पॅनलने त्यास मान्यता दिली आहे.
#WATCH दिल्ली: स्कूली पाठ्यपुस्तकों में 'इंडिया' की जगह 'भारत' करने की NCERT पैनल की सिफारिश पर कांग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल ने कहा, "वे पाठ्यपुस्तक और पाठ्यक्रम के माध्यम से भारत के इतिहास को विकृत कर रहे हैं। हमारे लिए भारत और इंडिया दोनों बराबर है।….ये चुनावी रणनीति और… https://t.co/h3hT96oPmn pic.twitter.com/SHYi5u2koq
— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2023
आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. नांदेडच्या उमरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ही घटना घडली. आंदोलकाकडून ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी शिर्डीतील साईबाबा मंदिरात पूजा करणार आहेत. मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करतील. यासोबतच गोव्यात पहिल्यांदाच होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय हे उद्या सीतापूरला जाऊन तुरुंगात असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत आपली पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेस अल्पसंख्याक नेत्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर उद्या आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात नाराजी व्यक्त केली होती.आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व 34 याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून गेल्यावेळी करण्यात आली होती. राहुल नार्वेकर यांनी 34 याचिका सहा गटांमध्ये विभागल्या. आता 26 ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होईल.
आमदार रमेश बोरणारे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कन्नडमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडवला. बोरनारे हे मराठा आंदोलनाच्या बाजूने का बोलत नाहीत, ते पाठिंबा का देत नाहीत, असा जाब आंदोलकांनी त्यांना विचारला.
मराठा आरक्षणासंदर्भातील हालचालींना आता वेग आला आहे. राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिल्यानंतर त्याची मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पु्न्हा शांतेत युद्धाची सुरुवात केली. त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला रवाना झाले. यावेळी दिल्लीला गेला तर आरक्षण घेऊनच या. दिल्लीतून खाली हात आला तर एक तासही देणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता या अटीतटीच्या लढाईत कोण बाजी मारतं आणि काय तोडगा निघतो याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
मुंबई : संजय राऊत काहीही म्हणाले तरी देखील सत्य बदलता येत नाही. ते पवारांचे जवळचे आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. निलेश राणे हे कोकणातले मोठे नेते आहेत. त्या दोघांची समजूत फडणवीस यांनी काढली आहे. मला वाटत नाही की त्यांच्यात काही मतभेद काही अंतर्गत वाद असेल, असे दीपक केसरकर म्हणाले.
मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांची माजी आमदार प्रमोद जठार यांनी अंधेरी येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. आम्ही खुश आहोत. आमचा तडफदार नेता पुन्हा एकदा मैदानात आलाय अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलीय. आजच्या भेटीच्या चर्चेमुळे माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा आनंदी आहेत असेही ते म्हणाले.
बारामती : आरक्षणाच्या मागणीसाठी बारामती येथील मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतली आहे. आमदार, मंत्री यांच्या कार्यक्रमांना विरोधानंतर आता बारामतीत अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीबाहेर हे आंदोलन केलं जाणार आहे. २९, ३०, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी विविध गावातील मराठा समाज अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेणार आहेत.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. एकनाथ पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेता म्हणून काम पाहिले आहे. एकनाथ पवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाले यासाठी एक तरुण टॉवरवर चढला. संतोष साबळे अस टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव आहे. टॉवरवर चढून त्याने मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी केलीय. पोलीस टॉवरजवळ पोहोचले असून त्याने खाली उतरावे अशी विनंती करत आहेत.
राज्यात ऊस दर आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. २०२३ -२४ गाळप हंगामात ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये भाव द्या, अशी मागणी शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे. साखर आयुक्तांची भेट घेवून उसाला दर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर शहराला पुरवठा करणारा भाजीपाला दूध रोखून धरणार असल्याचा इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे.
चांदनी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. एनएचएआय’ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटलं नाही. तोवर ही स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. ही अतिशय गंभीर आणि खेदजनक बाब आहे, असं ट्विट करत सुप्रिया सुळेंनी फोटो नितीन गडकरींना टॅग केलं आहे.
खेड तालुक्यात अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीनंतर खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाची पुढची दिशा ठरली. एमआयडीसी परिसरात जाणाऱ्या सर्व मार्गांवरील बसेस रोखण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षण दिलं नाही तर २५ तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चा कडून औद्योगीक वसाहतीकडे जाणाऱ्या बस रोखल्या गेल्या. मोशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सकाळपासून चाकण एमआयडीसी परिसरातील 50% कंपन्या कामगारांच्या कमतरतेमुळे बंद आहेत.
मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. मराठा आरक्षणासाठी आपण देखील प्रयत्नशील आहोत असे संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतल्यानंतर वक्तव्य केले आहे. जरांगे यांनी उपोषण करावे, परंतू पाणी तरी घ्यावे अशी विनंती त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 1 नंतर शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात पोहचणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार पाद्यपूजा व शिर्डी माझे पंढरपूर आरती होणार आहे. साईबाबा संस्थानच्या 2024 च्या डायरीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकारशन होणार आहे. यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने होणार पंतप्रधान मोदींचा सत्कार आहे. पंतप्रधान मोदी दर्शनाला पोहचल्यावर सामान्य भाविकांना साईबाबा समाधी दर्शन अर्धा तास राहणार बंद आहे. मात्र दर्शन रांगेत भक्तांना अर्धा तास बसण्याची व्यवस्था केली आहे.
मराठा आंदालेनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन प्रामाणिकपणे सुरु आहे. परंतू काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
ऑक्टोबर संपत आला आहे आणि रब्बी हंगामाची कामे सुरू झाली आहेत. मात्र यंदा पाऊसच कमी झाल्याने रब्बी पिकांवर मोठे संकट आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणीही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
अमरावतील शोभा भागातील मणिपूर लेआऊटमध्ये बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या मागच्या भागात हा बिबटया शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्याला कैद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस दाखल झाले असून गेल्या 3 तासापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. बिबट्याला पाहण्यासाठी या भागात नागरिकांची गर्दी झाली आहे.
अहमदनगर : भाजप आमदार राम शिंदे आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप झाले. राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्यासोबत एकत्रित प्रवास केल्यावरून सुजय विखेंनी टोला लगावला आहे. खऱ्या अर्थाने महायुती ही अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी झाली, असं ते म्हणाले. राम शिंदे यांनीदेखील पुन्हा एकदा सुजय विखे यांच्यावर पलटवार केला. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या आणि वेगवेगळ्या पक्षातील आमदारांनी एकत्र प्रवास केल्याने एवढी चर्चा होण्याची गरज नाही, असं शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्यापूर्वीच भाजप खासदार हे राष्ट्रवादीचे शहर आमदार संग्राम जगताप यांच्या हातात हात घालून फिरत होते, असंदेखील राम शिंदेंनी बोलून दाखवलं.
नवी दिल्लीत आज दुपारी काँग्रेस CEC ची बैठक होणार आहे. तेलंगणा विधानसभेसाठी बाकी उमेदवारांच्या नावांची बैठकीनंतर घोषणा होणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने 55 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज उर्वरित सर्वच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तेलंगणात येत्या 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
“आमच्या वेदना लक्षात येऊनही सरकारने आरक्षण दिलं नाही. काल संध्याकाळपर्यंत आरक्षण मिळेल अशी आशा होती. 41 दिवस झाले तरी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणार. आरक्षण घेतल्याशिवाय आता उपोषणातून माघार घेणार नाही. कोणीही उग्र आंदोलन करू नये, आत्महत्या करू नये,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“41 व्या दिवशीही सरकारकडून आरक्षणावर कोणताच निर्णय नाही. आजपासून सुरू झालेलं उपोषण अत्यंत कडक असेल. मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही,” असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय.
“तुम्ही काय मार्ग काढलाय ते सांगा? उपोषण सुरु झाल्यावर नेत्यांसोबत बोलणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
उदयनिधी स्टालिनबद्दल उद्धव ठाकरे गप्प का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल. उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या मुलाच्या भविष्याची चिंता. दसरा मेळाव्यात ठाकरेंची काँग्रेस धार्जिणी भूमिका अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
निलेश राणे आणि रविंद्र चव्हाण दोघे एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना. दोघे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. निलेश राणे रविंद्र चव्हाण यांच्यावर नाराज होते.
भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलीस आज पुन्हा पुणे न्यायालयात हजर करणार. ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा अभिषेक आणि भूषणवर पोलिसांचा आरोप. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये दोघांनाही पुणे पोलीस करणार आरोपी.
भाजपसोबत गेल्यापासून एकनाथ शिंदे खोटं बोलू लागले आहेत. ते भाजपच्या सांगण्यावरून काम करतात अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षण न देण्याचं कारण काय ? असा सवाल त्यांनी विचारला
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं. जरांगे पाटील यांचा आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या शपथेचा आदर पण आंदोलनावर ठाम आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी पंढरपूरमधील अजनसोंडे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. नेत्यांना प्रवेशबंदी असल्याचे बोर्डही गावात लावण्यात आले आहेत.
मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
मराठा आरक्षण देणं आम्ही का टाळू ? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरक्षण देताना कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे, उद्या आरक्षणावरून कोणी कोर्टात गेलं तर काय करणार ? असा सवालही त्यांनी विचारला.
चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेला रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ड्रग पकडले म्हणजे मोठा तीर मारला असं होत नाही, मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आलेच कसे ? हे गृह खात्याचे अपयश नाही का ? असा सवाल त्यांनी विचारला.
ललित पाटीलला पकडून आणलं तर गवगवा करता, मात्र तो गृहखात्याच्या नाकावर टिच्चून पळून गेला. तेव्हा तुमचे प्रशासन काय झोपले होते का ? अशी टीकाही त्यांनी केली.
कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे पुण्यामध्ये ओला, उबर, स्विगी , झोमॅटोची सेवा आज बंद राहणार आहे. रिक्षाचालक आणि बाईक डिलीव्हरी करणारे तरूण-तरूणी बंद पाळणार.
मराठा आरक्षणावरून धाराशिवमधील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे. रोष व्यक्त करण्यासाठी सदावर्ते यांच्या पुतळ्याला जोडे देखील मारण्यात आले.
आजपासून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेला सुरूवात होणार आहे. पुण्याच्या तुळजापूर येथून रोहित पवार आपल्या पदयात्रेला सुरूवात करणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी उपोषणावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची संभाजीराजे छत्रपती आज भेट घेणार आहेत. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीराजे जरांगे पाटलांना भेटतील. भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. आजपासून के पुन्हा आमरण उपोषणावर बसणार आहेत. त्याआधी ते सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सामध्ये ते आंदोलनाची भुमिका मांडणार आहेत.
नवी मुंबई मेट्रोच्या उद्धघाटनाचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. पंतप्रधानांचा 30 ऑक्टोबरचा नियोजीत दौरा रद्द झाल्यानं चौथ्यांदा उद्धघाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मेट्रोचे उद्धघाटन पुन्हा समोर ढकलेले गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढची तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या बसला अपघात झाला. नाशिक महामार्गावर शहापूरजवळ शिंदे गटाची बस मेळाव्यानंतर मुंबई ते सिल्लोड परतीचा प्रवास करत होती. मात्र रात्रीच्या सुमारास शहापूरजवळ बसला मागून ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस डिव्हायडरवर आदळल्याने अपघात झाला. या अपघातात 25 जण जखमी झाले.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रोहित पवार यांनी तुळापूरमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. 14 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे. त्यात चार दिवस सुट्ट्या आल्याने हे अधिवेशन 10 दिवस चालणार आहे.
नागपूर करारानुसार किमान तीन आठवडे अधिवेशन घेण्याची विरोधकांनी मागणी केली होती. या अधिवेशनात अधिवेशनात ड्रग्ज प्रकरण, कंत्राटी भरती, आरक्षणाचा मुद्दा, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था हे मुद्दे गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भिवंडी येथी एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आजपासून जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहेत. तर मराठा समाज गावागावात सर्कलवर जमून साखळी उपोषण करणार आहेत. याशिवाय मराठा समाजाकडून कँडलमार्चही काढला जाणार असून राजकीय नेत्यांना गावबंदी केली जाणार आहे.