Maharashtra Marathi News Live | नकळतपणे मला टार्गेट केलं जातंय- पंकजा मुंडे
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : धनगर समाजाला आरक्षणासाठी सुरु असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले. तामिळनाडू आणि कर्नाटकातील कावेरी जल विवाद पेटला. आज बंगळुरू बंदची हाक. मुंबईत सातव्या दिवशी 5147 गणेश मूर्त्यांचे विसर्जन. तामिळनाडूत एनडीएत फूट. एआयएडीएमके भाजपपासून वेगळा. गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खडकवासला पोलिसांनी काढला रूटमार्च. मंत्री गिरीश महाजन चौंडीत जाऊन धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्यांची भेट घेणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाऊन घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये काढली यात्रा
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये यात्रा काढली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असल्याची यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितलं. पाच हजार प्रमाणपत्र मिळणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पुराव्यासाठी पाच हजार प्रमाणपत्र पुष्कळ असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
-
मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना
मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्याचे प्रयत्न व सुरक्षा जाळीवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना यापुढे प्रवेश पास बंधनकारक असणार आहे.
-
-
मनोज जरांगेंच्या मागणीनंतर कुणबी नोंदींच्या तपासणीला वेग
मनोज जरांगेंच्या मागणीनंतर कुणबी नोंदींच्या तपासणीला वेग आला आहे. मराठवाड्यात दीड महिन्यात 65 लाख अभिलेखांची तपासणी करण्यात आली आहे. 65 लाख अभिलेखांमध्ये केवळ 5 हजार कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. दिवसाला साधारण 1 लाख 44 हजार 444 अभिलेखांची तपासणी केली जात आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने तपासणीच्या कामाला वेग आला आहे. -
संघप्रमुख मोहन भागवत 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गुजरातचा दौरा करणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमध्ये संघाच्या संघटनात्मक बैठकींसह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. मंगळवारपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
-
2024च्या आधी भाजप फुटलेला असेल- संजय राऊत
2024च्या आधी भाजपा पक्ष फुटलेला असेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दुसरीकडे, भाजपच्या नेतृत्वातील एनडीए म्हणजे फक्त नौटंकी असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
-
-
पुणे शहरात गणेशोत्सव काळात ड्रोन उडवण्याला बंदी
पुणे शहरात गणेशोत्सव काळात ड्रोन उडवण्याला बंदी घालण्यात आली आहे. ड्रोनद्वारे व्हिडीओ काढल्यास एअरक्राफ्ट अॅक्टनुसार कारवाई केली जाणार आहे. पुण्यात ड्रोन बंदीचे पुणे पोलिसांनी आदेश दिले आहेत.
-
Pune News | गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुणे | 28 तारखेला होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बीडीडीएस पथके, आरसीपी, क्युआरी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. 28 तारखेला जवळपास 2 हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल. विसर्जन मिरवणुकीसाठी 9 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे.
-
Ramesh Bais | लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी रमेश बैस रांगेतून आले
मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रमेश बैस हे रांगेतून आले आहेत. पण राज्यपाल आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व रांग मोकळी केली आहे.
-
जे पी नड्डा यांच्याकडे अमृत कलश सोपवला जाणार
पुणे | पुण्यात मेरी माटी मेरा देश उपक्रमातील अमृत कलश प्रदान सोहळा आयोजित करण्यात आलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना राज्यभरातून गोळा केलेले अमृत कलश दिले जाणार आहेत. मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत एकत्रित केलेल कलश आज नड्डा यांना सोपवण्यात येणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नड्डा यांना कलश दिले जाणार आहेत. एकूण २८ कलश आज नड्डा यांना सोपवण्यात येणार आहेत.
-
Pankaja Munde News : मी पक्षाला इशारा देत नाही-पंकजा मुंडे
मी पक्षाला इशारा देत नाही. माझा पक्ष आणि मी संयमी असल्याची मिश्किल टिप्पणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. भाजपातच नाही तर एकूणच मी अस्वस्थ आहे. त्यामुळे सभा, संघर्षयात्रा यामाध्यमातून मी पक्षाला इशारा देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
-
Pankaja Munde News : पराभूत झाले म्हणजे संपले असे नाही -पंकजा मुंडे
पराभूत झाले म्हणजे सर्व संपले असे नाही. इंदिरा गांधी या पण पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्या निवडून आल्या. त्यामुळे पराभूत झाले म्हणजे सर्व संपले असे होत नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. त्यामुळे बीड, परळीत तिकीट कोणाला देणार हे मला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मी सर्वाधिक सभा घेतल्या आहे, असं मला वाटतं.
-
Pankaja Munde News : मी लोकनेता आहे, हे सर्वच मान्य करतील
मी संघाच्या मुशीतून भाजपची कार्यकर्ता असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. संघर्ष कन्यासोबतच मी सहनशील कन्या असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मी लोकनेता आहे, हे सर्वच जण मान्य करतील, असा दावा त्यांनी केला.
-
Dhangar Reservation : चौंडीतील उपोषण मागे
धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी चौंडी येथील उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले. सरकारचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वी तोडगा काढला. त्यांची शिष्टाई कामी आली. चर्चेनंतर हे उपोषण मागे घेतले. सरकार आरक्षणाविषयी सकारात्मक असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
-
Teacher News : शिक्षक भरतीसाठी पुन्हा आंदोलन
शिक्षक भरतीची मागणी करत मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेण्यात आली. मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा हा तरुण असल्याचे समोर येत आहे. शिक्षक भरतीसाठी त्याने हे आंदोलन केले.
-
दुर्दैवाने पंतप्रधानांना कुणी हे सांगितले नाही- शरद पवार
चौथ्या बैठकीत मी सांगितले मंत्री म्हणून माझा अधिकार आहे, मी निर्णय घेतो, हे सगळे निर्णय काँग्रेस काळात झाले मात्र दुर्दैवाने पंतप्रधानांना कुणी हे सांगितले नाही, असं शरद पवार म्हणाले.
-
भोर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी
पुण्याच्या भोर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं परिसरात पाणीच पाणी झालं आहे. पावसाचा भोरच्या आठवडे बाजाराला मोठा फटका बसलाय. पावसामुळे भाजीविक्रेते आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
-
कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्यावा- शरद पवार
कांद्यावरील 40 % निर्यात शुल्क मागे घ्यावा, कांदा निर्यात शुल्कवाढीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
-
मी मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण- शरद पवार
मी मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं. लष्करात महिलांना संधी द्यावी हा प्रस्ताव मी मांडला. संरक्षण दलातही आम्ही महिलांना संधी दिली. देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला आरक्षणाचं धोरण आणल्याचं सांगत पवरांनी मोदींवर निशाणा साधला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली टीका चुकीची- शरद पवार
महिला आरक्षण विधेयकाला कोणाचाही विरोध नाही. काही पक्षांनी नाईलाजाने विधेयकाला पाठिंबा दिला ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चुकीची टीका केल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
-
Dadasaheb Falke Award 2023 : जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पूरस्कार देण्यात येत आहे.
-
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मागणीनंतर कुणबी नोंदनीच्या तपासणीला वेग
मनोज जरांगेंच्या मागणीनंतर कुणबी नोंदनीच्या तपासणीला वेग आलेला आहे. मराठवाड्यात दिड महिन्यात 65 लाख अभिलेखांची तपासणी करण्यात येणार आहे. 65 लाख अभिलेखांमध्ये केवळ 5 हजार कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. दिवसाला जवळपास 1 लाख 44 हजार 444 अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे.
-
Election 2024 : सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही
सिंधुदुर्गात भाजपनंच लढावं यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचे नितेश राणे म्हणाले. उदय सामंतचे भाऊ सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छूक असल्याची माहिती आहे.
-
Dhangar Reservation : धनगर उपोषणकर्ते उपोषणावर ठाम
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरेश बंडगर आणि अन्नासाहेब रूपनवर यांच्या उपोषणाचा आजचा 21 वा दिवस आहे. उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहे. मंत्री गिरीष महाजन उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी जळगावातून रवाना झाले आहेत. -
LIVE UPDATE | कल्याण डोंबिवलीसह कल्याण ग्रामीणमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक
कल्याण डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण मध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नेवाळी, काटई , पलावा सह इतर ग्रामीण पट्ट्यात स्वखर्चाने खड्डे बुजवत मनसे सैनिकांनी आंदोलन केलं आहे. रस्त्यावरील खड्ड्यात आयुक्त केडीएमसी लिहिलेले दगड टाकून आंदोलन केलं आहे. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील देण्यात आली. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्याना खड्डे बुजविण्याचे आवाहन केले होते…
-
LIVE UPDATE | मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवा – सुप्रीम कोर्टाचे आदेश
दसरा, दिवाळी पर्यंत दुकाना बाहेर मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढावा… असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दिले आहेत. तर मराठी पाट्यांवरील कोर्टाच्या निकालाचं राज ठाकरे यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे.
-
LIVE UPDATE | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. खर्डी आणि उंबरमाळी स्थानका दरम्यान मालागडीचे इंजिन फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अर्ध्या तासापासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
LIVE UPDATE | माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासात शिंदेंचा परदेश दौरा रद्द – आदित्य ठाकरे
माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासात शिंदेंचा परदेश दौरा रद्द केला… असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फक्त सुट्टीसाठी परदेश दौरा होता. शिंदे यांना इग्लंड, जर्मनी दौरा दावोसच्या दौऱ्याप्रमाणे होता..’ असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
-
कल्याणमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक
कल्याण डोंगरीसह कल्याण ग्रामीणमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नेवाळी, काटई , पलावा सह इतर ग्रामीण पट्ट्यात स्वखर्चाने खड्डे बुजवत मनसे सैनिकांनी आंदोलन केलंय. रस्त्यावरील खड्ड्यात आयुक्त केडीएमसी लिहिलेले दगड टाकून खड्डे बुजवले जात आहेत. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याना खड्डे बुजवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेत.
-
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून तयारीला सुरुवात
भाजपनं लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक व्यवस्थापन समिती बनवली आहे. त्या अंतर्गत विधानसभा संयोजकांची निवड केली गेली आहे. विधानसभा संयोजक मतदारसंघात नियोजन करणार आहेत. पुणे जिल्ह्यात विधानसभा संजोयक नेमायला सुरुवात झाली आहे. लवकरच भाजपकडून निवडणूक कार्यक्रम दिला जाणार आहे.
-
अमरावतीत धनगर समाजाचं उपोषण
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषण केलं जात आहे. चौंडी इथं धनगर आरक्षणसाठी सुरू असलेल्या उपोषणाला अमरावतीतूनही पाठिंबा दिला जात आहे. धनगर समाजाची सरकार विरोधात आक्रमक घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळतेय. निवडणूकीपूर्वी धनगर आरक्षण देण्याची मागणी यावेळी केली जात आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सात दिवस हे उपोषण केलं जात आहे. 2 ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्हातील हजारो धनगर बांधव चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी जाण्यासाठी निघणार आहेत.
-
सोलापुरात टोमॅटोचे भाव घसरले
सोलापुरात टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. टोमॅटोला अवघा 4 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झालाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने भाव घसरले आहेत. बाजार समितीत आज 50 टन टोमॅटोची आवक झाली आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने दर चार रुपये ते सहा रुपये प्रति किलो मिळत आहेत.
-
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत दाखल
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे.त्यानंतर ते भाजप नेत्यांच्या घरीही गणपती दर्शनासाठी जाणार आहेत.
-
Maharashtra News | पहिल्या इयत्तेतील मुलगी सात तास शाळेतच अडकली
संभाजीनगर येथे महानगरपालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या इयत्तेत शिकणारी एक मुलगी तब्बल सात तास वर्गातच होती. वॉचमनच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
-
Maharashtra News | नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित
गेल्या चार दिवसांपासून नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीवरच्या सहस्त्रकुंड इथला धबधब्याने रौद्र रूप धारण केलं आहे. आज सकाळपासून सहस्त्रकुंड धबधबा हा अक्राळविक्राळ स्वरूपात प्रवाहित झाला
-
एनडीए म्हणजे फक्त नौटंकी आहे – संजय राऊतांचे टीकास्त्र
2024 च्या आधी भाजप हा पक्षही फुटलेला असेल. 2024च्या निवडणुकीत भाजपाचं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
-
राज्यात घटनेची आणि कायद्याची हत्या होत आहे – संजय राऊत
कोणीतरी म्हणतंय की आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत आहोत. अध्यक्षांवर आमचा नाही कोर्टाचा दबाव आहे, असे संजय राऊत म्हणाले.
-
Maharashtra News | जिल्हा परिषद शाळेला कुलूप
वाशीमच्या बोरी बु. येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांकडून शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत शाळेला एक शिक्षक मिळत नाही, तो पर्यंत ही शाळा बंद रहाणार आहे असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
-
Maharashtra News | रत्नागिरीत तीन दिवसाआड पाणीपुरवठा
रत्नागिरीमधील शीळ धरणातील जॅकवेल कोसळले आहे. यामुळे १२ एमएलडी पाण्याची तुट निर्माण झाली असल्याने शहराला दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. एमआयडीसीकडून ५ एमएलडी आणि पानवल धरणातून १ एमएलडी शहराला सध्या मिळत आहे.
-
Maharashtra News | यवतमाळमध्ये पाऊस
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात सकाळी 6 वाजेपासून मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. यामुळे दिग्रस तालुक्यातील सर्व शाळा मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
-
Maharashtra News | वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण
चिखली शहरातील मागासवर्गीय मुलींचे व आर्थिक मागासवर्गीय मुलींसाठीच्या वस्तीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मुलींना देण्यात येत होते. या जेवणात अळ्या मिळाल्या. यामुळे सहा मुलींना विषबाधा झाली होती. या प्रकरणी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
-
Mumbai News | पश्चिम रेल्वेच्या लोकल उशिराने
पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आठ ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत.ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली.
-
Nashik News | नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड
नाशिकमध्ये ऐन सणासुदीच्या काळात तोडफोडीची घटना घडली आहे. विहितगाव-वडनेर रोडवर वाहनांच्य काचा फोडण्यात आल्या. याआधी सुद्धा नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आलीय.
-
PM Modi | पंतप्रधानांच्या हस्ते नोकऱ्यांच्या नियुक्तीपत्रांचे वाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज 51 हजार नियुक्तीपत्राचे वितरण होणार. सरकारी नोकरीमध्ये नव्याने भरती झालेल्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात येईल. रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम होणार आहे.
Prime Minister Narendra Modi to distribute about 51,000 appointment letters to newly inducted recruits in Government departments and organisations, under Rozgar Mela through video conferencing today. Prime Minister will also address these appointees on the occasion: PMO
(file… pic.twitter.com/3DJdCIkybV
— ANI (@ANI) September 26, 2023
-
Nagpur News | अंबादास दानवे नागपुरात
अंबादास दानवे यांच्याकडून नागपुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्त नागरिकांसोबत अंबादास दानवे यांचा संवाद. शनिवारी मुसळधार पावसामुळे नागपुरात गंभीर पूरसंकटाची स्थिती निर्माण झाली होती.
-
Maratha Reservation | कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाज लढा देणार
कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाज लढा देणार. पुणे येथे मराठा आरक्षणाबाबत निमंत्रित तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न झाली. यामध्ये मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ व अभ्यासकांची तज्ञ समिती स्थापन झाली. आठवडाभरात पत्रकार परिषद घेऊन समितीतील तज्ञांची नावं जाहीर करणार. राज्यभरातून 125 हुन अधिक जण सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी,तज्ञ, अभ्यासक परिषदेला उपस्थित होते.
-
dhangar reservation : धनगर समाजातील आंदोलकांचं आज उपोषण सुटणार?; गिरीश महाजन घेणार भेट
धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांचं उपोषण सुटण्याची आज शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना फोन करून प्रकृतीची केली विचारपूस. तसेच उपोषण सोडण्याची केली विनंती. तर, मंत्री गिरीश महाजन हे आज चौंडीत जाऊन उपोषणकर्त्यांची चर्चा करणार आहे.
-
water dispute : कावेरी जल विवादावरून दोन राज्यात संघर्ष, बंगळुरू बंदची हाक
तामिळनाडू आणि कर्नाटकातील कावेरी जल विवादावरून संघर्ष निर्माण झाला आहे. तामिळनाडूचा निषेध म्हणून शेतकरी संघटनांनी आज बंगळुरू बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
-
supreme court : दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालायने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना आदेश दिले आहेत. दसरा आणि दिवाळीपूर्वी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवा असे आदेशच कोर्टाने दिले आहेत.
-
onion traders : जेपी नड्डा आज मुंबई, पुण्यात, गणपती बाप्पांचं दर्शन घेणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई आणि पुण्यात येणार आहेत. ते मुंबईत लालबागचा राजाचं दर्शन घेणार आहेत. तर पुण्यात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. यावेळी ते भाजप नेत्यांच्या घरीही गणपती दर्शनासाठी जाणार आहेत.
-
onion traders : सातव्या दिवशीही कांदा लिलाव बंदच, अजित पवार यांनी बोलावली बैठक
सातव्या दिवशीही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच कांदा व्यापारीही आक्रमक झाले असून त्यांनी थेट दिल्लीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Published On - Sep 26,2023 7:07 AM