Maharashtra Marathi Live News | राज्य सरकारच्या त्या मोठ्या घोषणेचा अखेर शासन निर्णय जारी
Maharashtra Breaking News : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर.
मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी बीड येथील सभेत बोलताना तब्बल 20 वर्षानंतर तेलगी प्रकरणावर भाष्य केलं. भुजबळांनी थेट शरद पवार यांना सवाल केला होता. त्याचे पडसाद काल उमटले. नाराज शरद पवार समर्थकांनी आंदोलन केलं. आजही त्याचे पडसाद उमटू शकतात. दरम्यान काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज बैठक होऊ शकते. विशेषाधिकार समितीची आज बैठक होईल. चौधरी यांनी सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले होते.
राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होऊ शकते. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Bmc Hospitals | मुंबईतील रुग्णालयांमध्ये महापालिका प्रशासनाकडून ‘या’ सुविधेची घोषणा
मुंबई | मुंबई आणि मुंबई उपनगरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णमित्र हेल्प डेस्क सुरु करण्याची घोषणा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णालयांच् मेन गेटजवळ किंवा नोंदणी कक्षाजवळ हेल्प डेस्क केबिन असेल. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबतच्या सूचना मुंबई महापालिकेला केल्या आहेत.
मुंबई पालिका रुग्णालयात लवकरच रुग्णमित्र हेल्प डेस्क
प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये #रुग्णमित्र हेल्प डेस्क सुरु करण्याची घोषणा @mybmc तर्फे आज करण्यात आली. रुग्णालयांच्या प्रमुख द्वारापाशी अथवा नोंदणी कक्षाच्या ठिकाणी हेल्प डेस्क केबिन स्थापन करण्यात येईल. मंत्री @MPLodha यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या.#HelpDesk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 29, 2023
-
Sanjay Bansode | राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन उभारणार, क्रीडा मंत्र्यांची माहिती
मुंबई | राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केली. क्रीडा मंत्र्याच्या हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षकांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलं. या दरम्यान क्रीडा मंत्र्यांनी ही घोषणा केली.
क्रीडामंत्र्यांचं ट्विट
#क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान. रोख १० हजार रुपये सन्मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच #ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.#NationalSportsDay pic.twitter.com/eBoqlHFSqo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 29, 2023
-
-
Rohit Pawar On Teachers Professor Recruitment | तात्काळ शिक्षक-प्राध्यापक भरती करावी, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती
मुंबई | राज्य सरकारने तात्काळ शिक्षक आणि प्राध्यापक भरती करावी, अशी विनंती कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली. रोहित पवार यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
रोहित पवार यांचं ट्विट
२०२२च्या संच मान्यतेनुसार सध्या राज्यात ६७ हजार शिक्षक पदे रिक्त असून १५व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के म्हणजे जवळपास ५५ हजार शिक्षकांची भरती अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षक आणि प्राध्यापक भरतीच्या केवळ पोकळ घोषणा होत असून कोणत्याही… pic.twitter.com/eVHVX3PtBU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2023
-
Vijaykumar Gavit | आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावितांचा माफीनामा
आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावितांनी मागितली महिला आयोगाची माफी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं गावितांचे स्पष्टीकरण, महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य यापुढे माझ्याकडून केलं जाणार नाही, गावितांचा माफीनामा. धुळ्यात एका कार्यक्रमादरम्यान गावितांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.
-
Mahadev Jankar | महादेव जानकर हा शेवटचा राजकारणात असणार
भाजप आणि काँग्रेस यांची नियत एकसारखी आहे. तुमची मोठी पार्टी आहे मग इतर पक्ष का फोडता, भाजपला टोला. या चार पक्षांपासून सावध रहा. महादेव जानकर हा शेवटचा राजकारणात असणार, माझा पुतण्या किंवा इतर कुणी नसणार – महादेव जानकर
-
-
Mahadev Jankar | भाजप सर्वच घटक पक्षाना त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगत होते
आमदार रत्नाकर गुट्टे तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कारभार करायचा आहे. गोपीनाथ मुंडे यांचा आशीर्वाद मिळाला आणि मी मंत्री झालो. भाजपने आमच्याशी दगाबाजी केली, आम्ही केली नाही. भाजपने ठरवलं होतं महादेव जानकरचा एकही आमदार निवडून येऊ द्यायचा नाही, आम्ही नसतो तर तुमचा मुख्यमंत्री झाला नसता. या देशात आपल्या विचाराचं सरकार आणायचं आहे. भाजप सर्वच घटक पक्षाना त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगत होते, मी स्वाभिमानी आहे मी रासपच्या चिन्हावर निवडणूक लढलो. आम्ही जर दोस्ती करत आहोत तर दोस्तांसारखं वागा, भाजपला इशारा.
-
रासप पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सुुरुवात, महादेव जानकर काय बोलणार?
पुणे : महादेव जानकरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 व्या वर्धापनदिन सोहळ्याला सुरुवात झालीय. या कार्यक्रमाला राज्यभरातील रासपचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. महायुतीतुन बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर आजच्या मेळाव्यातून काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
-
Rupali Chakankar | मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडून ‘त्या’ वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त
मुंबई | “धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना महिलांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाने मंत्री विजयकुमार गावित यांना खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मंत्री गावित यांनी आपला खुलासा सादर करत आपण उपस्थित स्थानिक आदिवासी बांधवांना अहिराणी आणि त्यांच्या स्थानिक भाषेत संबोधन करत होतो, मात्र माझ्या वक्तव्याचा वृत्तवाहिन्यांकडून विपर्यास करण्यात आला. माझा उद्देश महिलांचा अपमान करणे नव्हता. माझ्याकडून या आधी सुध्दा कधीही महिलांचा अपमान होईल असे शब्द प्रयोग केले गेलेले नाहीत व यापुढेही केले जाणार नाहीत. मी समाजातील सर्व महिलांचा आदरच करत आलेलो आहे असे म्हटले आहे. तरी आपल्या वक्तव्यामुळे समाजातील कोणत्याही महिला वर्गास त्यांचा अपमान केला असे त्यांना वाटत असेल तर आपण त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी म्हटले आहे”, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
-
शिंदे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या जवळचे पदाधिकारी शिंदे गटात जाणार
मुंबई : विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत आज शिंदे गटात जाहीर प्रेवश करणार आहेत. आमदार सुनील राऊत यांच्यावर ते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेवक उपेंद्र सावंत हे आमदार सुनील राऊत यांच्यासोबत सकाळी विभागातील कार्यक्रमात ते सहभागी झाले होते आणि आता ते संध्यकाळी शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.
-
कर्नाटकातील हावेरी येथे फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू
कर्नाटकातील हावेरी येथील अलादाकट्टी गावात फटाक्यांच्या दुकानाला आग लागली. घटनास्थळावरून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हवेरीचे एसपी शिवकुमार यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
China Map : अरुणाचलला चीननं स्वत:च्या नकाशात दाखवलं
अरुणाचल प्रदेशला चीननं स्वत:च्या नव्या नकाशात दाखवलं आहे. अक्साई चीन, तैवानलाही चीननं आपलाच प्रदेश असल्याचं या नकाशातून सांगितलं आहे. स्टँडर्ड मॅप सर्व्हिस या वेबसाईटवर हा नवा नकाशा दाखवण्यात आला आहे. भारताचा प्रदेश असूनही चीनने दोन्ही प्रदेशांवर दावा केला आहे.
-
Pune Guardian Minister : चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांची एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?
पुण्याच्या कारभारात अजित पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाने चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे. पुण्याचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे मात्र अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याचं बोललं जात आहे.
-
गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे माझ्या कुटुंबातील बहिणींना दिलासा मिळेल : पंतप्रधान मोदी
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. “रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंदाचा दिवस आहे. गॅसच्या किमती कमी केल्याने माझ्या कुटुंबातील बहिणींना दिलासा मिळेल. त्यांचे जीवन सुसह्य होईल. माझी प्रत्येक बहीण सुखी, निरोगी, आनंदी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
रक्षाबंधन का पर्व अपने परिवार में खुशियां बढ़ाने का दिन होता है। गैस की कीमतों में कटौती होने से मेरे परिवार की बहनों की सहूलियत बढ़ेगी और उनका जीवन और आसान होगा। मेरी हर बहन खुश रहे, स्वस्थ रहे, सुखी रहे, ईश्वर से यही कामना है। https://t.co/RwM1a1GIKd
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2023
-
Rohini Khadse News : रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी
रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादीत महत्वाच्या पदावर नियुक्त्यांचे सत्र सुरु आहे.
-
CM Eknath Shine News : शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात काही भागात पावसाने ओढ दिली आहे. काही भागात अजूनही पाऊस नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. पण येत्या काही दिवसांत पाऊस पडेल, तसा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
-
CM Eknath Shine News : मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पाबाबत महत्वाची बैठक
मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाबाबत महत्वाची बैठक झाली. निती आयोगाची बैठक झाली. मुंबई आणि एमएमआर एक ट्रिलियनचे उद्दिष्ट्य गाठू शकतं, असा निती आयोगाचा दावा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईची, महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
-
Gas Cylinder News : घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त
उद्यापासून देशात घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. केंद्र सरकराने देशातील लाखो गॅसधारकांना ही भेट दिली आहे. ऐन सणासुदीत गॅस सिलेंडरचे दर उतरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उज्ज्वल योजनेतील सिलेंडर 400 रुपयांनी स्वस्त होणार आहे. या योजनेतील ग्राहकांना 75 लाख कनेक्शन मोफत मिळणार आहेत.
-
Kishori Pednekar News : किशोरी पेडणेकरांचा जामीन अर्ज फेटाळला
किशोरी पेडणेकरांना दिलासा मिळाला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची विनंती केली होती.
-
जी जबाबदारी पक्ष माझ्यावर देईल ती पार पाडेल- प्रणिती शिंदे
सोलापूर लोकसभा लढवणार का या प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे यांनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली. जी जबाबदारी पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी लोकांसाठी आणि पक्षासाठी पार पाडेल. सीडब्ल्यूसीवर निवड होणे ही काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. याचे संपूर्ण श्रेय हे सोलापूरकरांचे आहे.
-
अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात आंदोलन
मंत्रालयामध्ये अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रलयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. .यावेळी मंत्री दादा भुसे तिथे पोहोचत आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
-
विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होणार, सुरू होणार शिवशक्ती यात्रा
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होणार. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांची महाराष्ट्रात 11 दिवसांची शिवशक्ती यात्रा सुरू होणार आहे.
-
LIVE UPDATE | पुलवामा हल्ल्यामु़ळे कलम ३७० हटवलं, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती…
पुलवामा हल्ल्यामु़ळे कलम ३७० हटवलं, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती देण्यात आली आहे. भारताचे सॉलिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे. ३७० कलम हटवल्यानंतर त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकेच्या सुनावणी दरम्यान तुषार मेहता यांनी माहिती दिली आहे.
-
LIVE UPDATE | नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून आणखी एक दिलासा
नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून आणखी एक दिलासा मिळाला आहे. हमीदार सादर करण्यासाठी नवाब मलिक यांना वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मलिक यांची १४ ऑगस्टला जामिनावर सुटका झाली आहे.
-
शर्मिला ठाकरे यांचे रायगडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र
शर्मिला ठाकरे यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहीले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
जागर यात्रेवरून परत येताना माझी गाडी खड्ड्यात बद पडली होती, कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. मग सामान्यांना किती त्रास होत असेल, असा जाब त्यांनी विचारला आहे.
-
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची कन्या सना मलीक मंत्रालयात दाखल
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची कन्या सना मलीक या मंत्रालयात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी सना यांनी वेळ मागितली होती. नवाब मलिक यांची ईडी कोठडीतून नुकतीच जामिनावर सुटका झाली होती.
-
केईएम रुग्णालयाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा
मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा. परळच्या शाखेपासून ते केईएम रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.
अपुरा औषध पुरवठा , डॉक्टर्स आणि मशीनची कमतरता असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला. मात्र आपल्या मागण्यांकडे, तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत हा मोर्चा काढला जात आहे.
-
पुणे पालकमंत्री पदावरून पुन्हा वादाची शक्यता, अजित दादांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज ?
पुण्याच्या कारभारामध्ये अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रकात पाटील नाराज असल्याची चर्चा. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
दुष्काळ परिस्थितीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर साधला निशाणा
दुष्काळ आपल्या दारी येऊन ठेपला आहे, याची पुसटशी तरी जाणीव आहे का ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विचारला आहे. दुष्काळ परिस्थितीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
-
पुण्यात 10 लाख रुपयांचं बनावट पनीर जप्त
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 10 लाख रुपयांचं बनावट पनीर जप्त केलं आहे. एकूण 4 हजार 970 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
-
शिवसेनेचे आमदार आपल्याच सरकारविरोधात काढणार मोर्चा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नरेंद्र बोंडेकर हे सरकारविरोधात मोर्चा काढणार आहेत. बहुजन समाजातील 58 जातींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
-
Maharashtra News : जेजुरीत खंडेरायाच्या गाभारा दुरुस्तीचे काम
जेजुरीत खंडेरायाच्या गाभारा दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. गाभाऱ्याचं काम ५ ऑक्टोबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यामुळे गाभाऱ्यातील मूर्ती भंडार गृहात दर्शनासाठी ठेवणार आहे.
-
Maharashtra News : पुणे शहरात बनावट पनीर जप्त
पुण्यात 4 हजार 970किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. ऐन सणसुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात बनावट पनीरचा साठा जप्त झाला आहे.
-
Sanjay Raut : भाजपकडे 2024 साठी कुठलाही अजेंडा नाही- संजय राऊत
भाजपकडे 2024 साठी कुठलाही अजेंडा नाही. देशात बेरोजगारी, महागाई आहे. चीनची घुसखोरी आहे. या प्रश्नाकडे लक्ष न देता धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
Maharashtra News : औरंगाबादमधील महिलेचा पाकिस्तानी तरुणाशी विवाह
औरंगाबाद शहरातील एका महिलेने पाकिस्तानी तरुणासोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला देश विघातक कृत्यांमध्ये समावेश असल्याचा ई-मेल औरंगाबाद पोलिसांना मिळाला आहे. या ईमेल नंतर औरंगाबाद एटीएसकडून महिलेची कसून तपासणी सुरू केली आहे.
-
Narendra Modi : मोदी सोलापूर दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 15 हजार घरकुलांचे वाटप यावेळी होणार आहे. सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून उभारण्यात आलेल्या 15 हजार घरांचा चावी लाभार्थींना दिली जाणार आहे.
-
Sanjay Raut : देशातीव वातावरम बदलतंय – संजय राऊत
इंडियाला कुणी काऊंटर करु शकत नाही. उद्या दुपारी 4 वाजात इंडियाची बैठक. बैठकीला सर्व मोठे नेते उपस्थित राहणार.
-
Sanjay Raut : 2024 ची निवडणुकीवेळी हल्ल्याची भीती
2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी हल्ला घडवण्याची भीती. इंडियाच्या बैठकीवेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा होणार. भारताच्या जमिनीवर चीनचा ताबा. हिंमत असेल चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा.
-
Pune MNS News : पुण्यात उड्डाण पुलाच्या कामावरून मनसेच आंदोलन
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरु आहे. या कामाची नुकतीच चाचणी करण्यात आली, त्यामध्ये दहा पोल तपासण्यात आले होते. त्यापैकी एका पोलचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पालिकेकडून बांधलेला पोल जमीनदोस्त करण्यात आला. यामुळे या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
-
Bhusawal News : भुसावळमध्ये पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
भुसावळमध्ये एकनाथ खडसेंना धक्का. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. भुसावळ शहरातील राष्ट्रवादीच्या खडसे गटाला मोठे खिंडार.
-
Santosh Bangar News : आमदार संतोष बांगर यांच्या वर गुन्हे दाखल
कावड यात्रेतील लोकांना तलवार दाखवल्याप्रकरणी आणि परवानगी नसतानाही डीजे लावल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हे दाखल. कळमनुरी पोलिसात गुन्हे दाखल. काल हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आमदार बांगर यांनी कावड यात्रा काढली होती.
-
Central Railway Train update : मध्य रेल्वे विस्कळीत
कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन्स अर्धातास उशिराने धावत आहेत.
-
Rain update : महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 60 टक्के कमी पाऊस
देशभरात पावसाच्या कमतरतेचे संकट. केंद्र सरकारने घेतला देशातल्या अनेक राज्यांचा आढावा. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही केंद्र सरकारकडून दखल. कमी पाऊस झालेल्या भागात जिल्हाधिकाऱ्यांना पीक सर्वेक्षणाचे आदेश. विमा कंपन्यांनाही शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत 60 टक्के कमी पाऊस
-
Rahul Gandhi : राहुल गांधी जाणार युरोप दौऱ्यावर
काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राहुल यांचा युरोप दौरा आहे. युरोपमधल्या विद्यापीठात राहुल गांधी यांचे व्याख्यान आहे. बेल्जियममधील खासदारांना राहुल गांधी भेटणार आहेत. भारतात G 20 बैठक होत असतानाच राहुल गांधी युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
-
Raksha Bandhan : ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्री अमिताभ बच्चन यांना बांधणार रात्री
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. ममता बॅनर्जी बिग बी अमिताभ बच्चन यांना राखी बांधणार आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ आणि ममता यांची भेट महत्त्वपूर्ण आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
-
Rain update : पुणे वेधशाळेने पावसाबद्दल काय अंदाज वर्तवलाय?
राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Published On - Aug 29,2023 7:57 AM