Maharashtra Marathi News Live | शिवाजी पार्कसाठी दोन्ही गट मैदानात

| Updated on: Sep 29, 2023 | 9:42 PM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi News Live |  शिवाजी पार्कसाठी दोन्ही गट मैदानात
Follow us on

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : मुंबईतील लालबागच्या राजासह अनेक गणपतींच थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. गेल्या 20 तासांपासून पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूच. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचं घर पेटवण्याचा जमावाचा प्रयत्न. नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचया उत्साहाला गालबोट. नाशिकच्या गोदावरी नदीत विसर्जन करताना दोघे तर वालदेवी धरणात विसर्जन करताना तिघे बुडाले. या मुलांना शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Sep 2023 06:58 PM (IST)

    अनिल महाजन यांनी दिली अत्यंत मोठी माहिती

    ओबीसी समाजाच्या आरक्षणासंधर्भातील बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. ह्या बैठकीत छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नकोय व तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वतः आरक्षण ठिकाणी जातील, आजची बैठकी सकारात्मक झाली आहे, असे अनिल महाजन यांनी म्हटले.

  • 29 Sep 2023 06:51 PM (IST)

    Navi Mumbai | हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक

    मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज देखील काही ठिकाणी कामे सुरू असल्याने नवी मुंबईत पनवेल रेल्वे स्थानकात रेल्वे ही 15 ते 20 मिनिटे उशिरांने धावत आहेत.


  • 29 Sep 2023 06:34 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी केले मोठे भाष्य

    मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र न देण्यावर ओबीसी आणि सरकारमध्ये एकमत झाल्याच्या चर्चांवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारकडून अजून या बैठकीबाबत अधिकृत कोणी अजून बोललेले नाही, त्यामुळे त्यावर आम्ही सध्या बोलणार नाही आणि काही निर्णय झाला असेल तर कायद्याला मान्य होतो असे होत नाही.

  • 29 Sep 2023 06:24 PM (IST)

    भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली सुरू

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी भाजप किसान मोर्चाची कार्यकारिणी केली जाहीर केलीये. प्रदेशाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आलीये.  सरचिटणीस ,सचिव संपर्क प्रमुख ,कार्यकारिणी सदस्यांचीही नावे जाहिर करण्यात आली.

     

  • 29 Sep 2023 06:13 PM (IST)

    Buldhana News : पोलिसांनी दिले मोठे आश्वासन

    संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील वाद अखेर मिटला आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यावर विसर्जन मिरवणूक सुरू झाली. गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना झाली होती दगडफेक

  • 29 Sep 2023 05:55 PM (IST)

    लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल- केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह

    “पाकिस्तानमध्ये ज्याप्रकारे घडामोडी सुरू आहेत, पाकिस्तानमधील विविध शक्ती ज्या प्रकारे त्यांच्याच लोकांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रचंड अस्वस्थता आहे. मला असे वाटते की, हा भाग आपोआप आमच्याकडे परत येईल.”, असं केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी सांगितलं.

  • 29 Sep 2023 05:45 PM (IST)

    हनुमान मंदिरांबाबत एक कार्यक्रम आखला आहे- अनुपम खेर

    “गेल्या वर्षी मी विविध धार्मिक स्थळांना आणि देशाच्या सीमावर्ती भागांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही एक कार्यक्रम तयार केला आहे. हा कार्यक्रम हनुमान मंदिरांबद्दल आहे, म्हणून हनुमान गढीला भेट देणे खूप महत्वाचे होते”, असं अभिनेता अनुपम खेर यांनी अयोध्येत सांगितलं.

  • 29 Sep 2023 05:30 PM (IST)

    अरुणाचल पूर्व भागातील खासदार तापिर गाओने यांनी चीनला स्पष्टच सांगितलं की…

    अरुणाचल पूर्वे भागातील भाजप खासदार तापीर गाओ यांनी सांगितलं की, “चीनने नेहमीच अरुणाचल प्रदेशचा मुद्दा मांडला आहे. पण अरुणाचल प्रदेश चीनचा भाग कधीच नव्हता. चीन काहीही म्हणो, अरुणाचल प्रदेश नेहमीच भारताचा भाग आहे. भारत कधीच झुकणार नाहीत.चीन स्वप्न पाहू शकतो पण प्रत्यक्षात ते शक्य होणार नाही.”

  • 29 Sep 2023 05:23 PM (IST)

    पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील मशिदीत स्फोट, तीन ठार

    पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी हल्ला झाला. खैबर पख्तूनख्वामधील मशिदीतही स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • 29 Sep 2023 05:01 PM (IST)

    Dasara Permission : दसरा मेळाव्यासाठी यंदा पण वेटिंग

    दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करावा यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. त्यांनी महापालिकेला अर्ज दिला आहे. दोन्ही गटांनी एक महिन्यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. तर यंदा मैदानासाठी परवानगी देताना महापालिका प्रशासन सावध झाले आहे.

  • 29 Sep 2023 04:38 PM (IST)

    OBC News : ओबीसी संघटनांची सरकारसोबत बैठक

    मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. या मागणीसाठी ओबसी संघटनांची सरकारसोबत बैठक सुरु आहे. ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्यावर एकमत झाले आहे.

  • 29 Sep 2023 04:16 PM (IST)

    Nandurbar News : शहादामध्ये दोन गटात दगडफेक

    नंदुरबार जिल्ह्यातील शहादामध्ये दोन गटात दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत दोन्ही गटातील काही नागरिक जखमी झाल्याचे समोर येत आहे. सध्या परिस्थितीत आटोक्यात आहे. घटनास्थळी आणि परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 29 Sep 2023 04:05 PM (IST)

    Rohit Pawar News : रोहित पवार यांना हायकोर्टाचा दिलासा

    मनात द्वेष ठेऊन बारामती ॲग्रोवर कारवाई करण्यात आल्याचे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पुढील सुनावणीपर्यंत बारामती ॲग्रोवर कारवाई नको, असे आदेश हायकोर्टाने दिले. 6 ऑक्टोबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल.

  • 29 Sep 2023 03:53 PM (IST)

    Pune News | पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव खासगी बसच्या डिक्कीत रिक्षा अडकली

    पिंपरी चिंचवड | पिंपरी- चिंचवडमधील निगडीत भरधाव खासगी बसच्या प्रवाशी साहित्य ठेवण्याच्या डिक्कीत रिक्षा अडकली.  सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी नाही. खासगी बस चालकाने मद्यपान करून बस चालवत असल्याचा आरोप रिक्षा चालकाने केला आहे. बसच्या डिक्कीला रिक्षा अडकल्याने काही फूट रिक्षा घेऊन गेली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच बसच्या पाठीमागे पळत बस चालकाला थांबवण्याचा प्रयत्न नागरिक करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

  • 29 Sep 2023 03:18 PM (IST)

    Pune News | पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास 40 मिनिटांनी संपली

    पुणे | पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास 40 मिनिटांनी संपली.  काल सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. आज दुपारी 3:10 वाजता मिरवणूक संपली.

    मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला वेळ :

    2016 : 28 तास 30 मिनिट
    2017 : 28 तास 05 मिनिट
    2018 : 27 तास 15 मिनिट
    2019 : 24 तास
    2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
    2022 : 31 तास
    2023 : 28 तास 40 मि.

  • 29 Sep 2023 03:11 PM (IST)

    Pune News | पुण्यात विसर्जन मिरवणूक संपली

    पुणे | पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती थोड्या वेळापूर्वी अलका टॉकीज चौकात आला होता. महाराष्ट्र तरुण मंडळाचा हा गणपती होता. आता विसर्जन मिरवणूक संपल्याची माहिती समोर आली आहे. शेवटच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून नारळ देऊन विसर्जन मिरवणूक संपली.

  • 29 Sep 2023 02:44 PM (IST)

    LIVE UPDATE | दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे गट यंदाही प्रतीक्षेत

    दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे गट यंदाही प्रतीक्षेत आहेत. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे पार्क मैदानासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. महिन्याभरापूर्वी मुंबई महापालिकेकडे ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून देखील महिन्याभरापूर्वी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

  • 29 Sep 2023 02:34 PM (IST)

    LIVE UPDATE | जरांगे पाटील यांची मागणी कायद्याला धरुन नाही – आशिष देशमुख

    खरंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जाहीर केले होते की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आम्हाला सरकारने बोलवलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही आजही आमची मागणी लावून धरु. जरांगे पाटील यांची मागणी कायद्याला धरुन नाही. त्यांनी आर्थिक मागास घटकांतून आरक्षण मागावे. आम्ही आमच्या हिस्स्यात कुठलाही वाटेकरु होवू देणार नाही… असं वक्तव्य माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे.

     

  • 29 Sep 2023 02:11 PM (IST)

    LIVE UPDATE | सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक सुरू

    सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. बैठकीमध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी ओबीसीत समावेश करू नये, अशी सर्व ओबीसी नेत्यांची मागणी आहे. सरकारने ओबीसींना आश्वासन देणार परिपत्रक आजच काढावं ही मागणी देखील करण्यात आली आहे.

  • 29 Sep 2023 02:02 PM (IST)

    तुरुंगात असताना भुजबळांनी पवारांना ब्लॅकमेल केले – रमेश कदम

    तुरुंगात असताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांना ब्लॅक मेल केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.

  • 29 Sep 2023 01:15 PM (IST)

    पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही लांबणार

    यंदा पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे विसर्जन लवकर होऊन देखील पुण्यातील गणपतींची विसर्जन मिरवणूक लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अजूनही साधारण 80 पेक्षा जास्त गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन शिल्लक आहे. गेल्यावर्षी तब्बल 31 तास विसर्जन मिरवणूक सुरू होती.

  • 29 Sep 2023 12:56 PM (IST)

    Mumbai News : मराठी असल्यानं घर न मिळाल्याचा अनुभव मलाही आला- पंकजा मुंडे

    सरकारी निवास्थान सोडल्यानंतर घर मिळवताना मराठी असल्यानं घर न मिळाल्याचा अनुभव मलाही आला अशी प्रतिक्रीया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्या मुंबईच्या मुलूंड येथील प्रकरणावर बोलत होत्या.
  • 29 Sep 2023 12:50 PM (IST)

    Sanjay Raut : मराठी माणसाला तोडण्याचा सरकारचा प्रयत्न

    मुलूंडमध्ये तृप्ती देवरूखकर यांना मराठी असल्याचे कारण देत जागा नाकारण्यात आली होती. या प्रकरणात आता संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. मराठी माणसाला तोडण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सध्याच्या परिस्थितीला शिंदे भाजप जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

  • 29 Sep 2023 12:44 PM (IST)

    Mumbai News : गणपती विर्जनानंतर चाकरमान्यांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू

    गणपती विर्जनानंतर चाकरमान्यांची मुंबई गाठण्यासाठी गर्दी होत आहे. साताऱ्याच्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. कोकणातून अनेक जण मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 29 Sep 2023 12:37 PM (IST)

    Maharashtra News : तृप्ती देवरूखकर यांनी मानले मनसेचे आभार

    मराठी असल्याचे कारण देत तृप्ती देवरूखकर यांना मुलूंडमध्ये ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. या प्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याने तृप्ती देवरूखकर यांना न्याय मिळाला. यासाठी तृप्ती देवरूखकर यांनी मानले मनसेचे आभार मानले आहे.

  • 29 Sep 2023 12:30 PM (IST)

    Ganesh Visarjan : लालबागच्या राजाला मुंबईकरांकडून अखेरचा निरोप

    काल सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली होती. आज दूपारी 12 वाजताच्या सुमारास लालबागचा राजाचे समुद्रात विसर्जन झाले.
  • 29 Sep 2023 12:24 PM (IST)

    Maharashtra News : उदयनराजे कॉलर उडवतात, भाजपच्या नियमात बसतं का?

    उदयनराजे कॉलर उडवतात, भाजपच्या नियमात बसतं का? साताऱ्यात पत्रकाराने केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना विचारला. यावर व्यक्तीगत टिका करू नये असे मंत्री मिश्रा म्हणाले.

  • 29 Sep 2023 12:13 PM (IST)

    Maharashtra News : तृप्ती देवरूखकर शिवतीर्थावर दाखल

    तृप्ती देवरूखकर या शर्मिला ठाकरे यांची भेट घएण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाल्या आहेत. तृप्ती देवरूखकर यांना मराठी असल्यानं मुलूंडमध्ये ऑफिससाठी जागा नाकारली होती. या प्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता.

  • 29 Sep 2023 12:00 PM (IST)

    Pune : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही लांबणार

    पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही लांबणार असण्याची चिन्हे आहेत. कारण अजूनही साधारणपणे 100 पेक्षा जास्त गणेश मंडळाच्या गणपतींचं विसर्जन बाकी आहे. दगडूशेठ गणपतीचं विसर्जन लवकर होऊनही विसर्जन मिरवणूक लांबली आहे. गेल्या वर्षी 31 तास विसर्जन मिरवणूक सुरू होती.

  • 29 Sep 2023 11:50 AM (IST)

    बारामतीसह 5 विमानतळांचा ताबा एमआयडीसीकडे

    बारामतीसह 5 विमानतळांचा ताबा एमआयडीसीकडे देण्यात येणार आहे. राज्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा त्यात समावेश आहे. विमानसेवा सुरू होण्याच्या द़ृष्टीने ही पाचही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालविण्यास देण्यात आली होती. मात्र गेल्या 14 वर्षांत या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकली नसल्याने त्यांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घ्यावा, यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या विमानतळांबाबत मंत्रालयात बैठक पार पडली.

  • 29 Sep 2023 11:35 AM (IST)

    Delhi : कांदा प्रश्नावर आज बैठक; अब्दुल सत्तार दिल्लीत दाखल

    कांदा प्रश्नावर आज दिल्लीत बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी पणन मंत्री अब्दुल सत्तार दिल्लीत दाखल झाले आहेत. तर कृषिमंत्री धनंजय मुंडे मात्र बैठकीला गैरहजर आहेत. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे कांदा प्रश्न निर्माण झाला आहे. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अब्दुल सत्तार दिल्लीत दाखल झाले आहेत.

  • 29 Sep 2023 11:20 AM (IST)

    Pune : पुण्यातील नवीन टर्मिनलचं उद्घाटन ऑक्टोबर महिन्यात

    पुण्यातील नवीन टर्मिनलचं उद्घाटन ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरच्या दरम्यान नवीन टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये पुन्हा पुणे दौऱ्यावर येतील. मोदींच्या हस्ते या टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे. पुणे विमानतळावरील विस्तारीत नवीन टर्मिनल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

  • 29 Sep 2023 11:05 AM (IST)

    कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गोंधळात सुरुवात

    कोल्हापूरमध्ये राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक सभेच्या ठिकाणी दाखल झाले असून कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मात्र गोंधळातच या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली.

  • 29 Sep 2023 10:40 AM (IST)

    गुजरातमधून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

    गुजरातमधील गांधीधाम परिसरातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. कोकेन,एमडी अशा मालाचा समावेश असलेली ८० पॅकेट्स पोलीसांना सापडली. गुजरात पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

  • 29 Sep 2023 10:25 AM (IST)

    संविधानाच्या विरोधात कारभार सुरू – संजय राऊत

    सध्या संविधानाच्या विरोधात कारभार सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

    मणिपूरमधील परिस्थितीवरूनही त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

  • 29 Sep 2023 10:22 AM (IST)

    ओबीसी नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

    ओबीसी नेत्यांसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी २ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असतील.

    मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याच मुद्यावर आज चर्चा होणार आहे.

  • 29 Sep 2023 10:10 AM (IST)

    व्यापारी प्रतिनिधींची आज दिल्लीत बैठक, कांदा लिलाव सुरू होणार का याकडे लक्ष

    कांदा लिलाव बंदचा आजचा आठवा दिवस आहे. आज व्यापारी प्रतिनिधींची राजनाधी दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत काय होणार, कांदा लिलाव सुरू होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी ११ वाजता ही बैठक पार पडणार आहे.

  • 29 Sep 2023 10:05 AM (IST)

    मुंबईत मराठी लोकांना घर मिळत नाही, मलाही अनुभव – पंकजा मुंडे

    मुंबईमध्ये मराठी लोकांना घर मिळत नाही याचा मलाही अनुभव आला आहे, असं भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी म्हटलं. सरकारी घर सोडलं तेव्हा मलाही घर शोधताना बराच त्रास झाला, असं त्यांनी नमूद केलं.

  • 29 Sep 2023 09:53 AM (IST)

    Sharad Pawar | जागा वाटपावरुन वाद नाही – शरद पवार

    जागा वाटपावरुन इंडिया आघाडीत वाद होणार नाही. यासंदर्भात काळजी घेतली जाईल. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध घातले आहे. हे चुकीचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 29 Sep 2023 09:44 AM (IST)

    Shard Pawar | बारामती ॲग्रोवरील कारवाईवर उत्तर देणे शरद पवार यांनी टाळले

    रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता  त्यांनी उत्तर देणे टाळले.

  • 29 Sep 2023 09:32 AM (IST)

    Pune Ganpati Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणूक अजून चार तास चालणार

    पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला संपायला अजून चार तास लागण्याची शक्यता आहे. पुण्यातील अजून २०० मंडळांचे गणेश मंडळांच्या गणरायाचे विसर्जन बाकी आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या मंडळांचे विसर्जन अजून बाकी आहे.

  • 29 Sep 2023 09:17 AM (IST)

    Lalbaugcha Raja Ganpati Visarjan | लालबागच्या राजाचे विसर्जन

    गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आली. कोळी बांधवाकडून खोल समुद्रात लालबागच्या राजाला नेण्यात येईल आणि या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. २३ तास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. ९ वाजून १५ मिनटांनी गणरायाचे विसर्जन झाले.

  • 29 Sep 2023 09:09 AM (IST)

    Ganpati Visarjan | पुणे शहरातील २०० मंडळांचे विसर्जन बाकी

    पुणे गणेश विसर्जन मिरवणूक गेल्या २२ तासांपासून सुरु आहे. अजूनही पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन बाकी आहे. २०० पेक्षा जास्त मंडळांचे विसर्जन बाकी आहे. पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अलका टॉकीजमध्ये दाखल झाले असून मंडळांना विसर्जन करण्यासाठी घाई करत आहेत.

  • 29 Sep 2023 08:47 AM (IST)

    Lalbaugcha Raja Ganpati Visarjan | तराफ्यावरुन लालबागचा राजा समुद्राच्या दिशेने

    तराफ्यावरुन लालबागचा राजा समुद्राच्या दिशेने निघाला आहे. लाखो भाविक राजाच भव्य रुप डोळ्यात साठवण्यासाठी चौपाटीवर उपस्थित आहेत.

  • 29 Sep 2023 08:30 AM (IST)

    Lalbaugcha Raja Ganpati Visarjan | गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती

    गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची आरती सुरु झाली आहे. थोड्याचवेळात तराफ्यावरुन लालबागच्या राजाची मुर्ती खोल समुद्रात नेण्यात येईल.

  • 29 Sep 2023 08:28 AM (IST)

    Harbour Railway | हार्बर रेल्वे मार्गावर लोकल विलंबाने

    पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकल का विलंबाने धावतायत? त्याच कारण मात्र स्पष्ट नाहीय.

  • 29 Sep 2023 08:13 AM (IST)

    Ganpati Visarjan | डॉल्बीच्या दणदणाटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू?

    मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर एका व्यक्तीचा रात्री मृत्यू. मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट. मृतदेहाची ओळखही अद्याप पटली नाही. हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. डॉल्बीच्या दणदणाटामध्येच मिरजमधील विसर्जन मिरवणुका पार पडल्या. यातच इसमाचा मृत्यू झाल्याची शक्यता. मिरज पोलिसांकडून तपास सुरू

  • 29 Sep 2023 08:00 AM (IST)

    OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर तोडगा निघणार?, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला ओबीसी नेते बबनराव तायवाडे, आशिष देशमुख, अशोक जीवतोडे, नरेश बरडे, परिणय फुकेंसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, या लेखी आश्वासनाची ओबीसी नेत्यांनी मागणी केली आहे. आजच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यास ओबीसी नेते राज्यभरातील आंदोलन मागे घेणार आहेत.

  • 29 Sep 2023 07:45 AM (IST)

    Election 2024 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2001च्या जनगणनेनुसारच

    देशातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2001च्या जनगणनेनुसारच होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती. नागपूरातील माजी नगरसेवक प्रमोद तभाने यांनी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान आयोगाने ही माहिती सादर केली आहे.

  • 29 Sep 2023 07:37 AM (IST)

    Ganpati Visarjan : पुण्यात 20 तासांपासून गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरूच, पहाटे पहाटेच डीजेचा दणदणाट

    पुण्यात गेल्या 20 तासांपासून सार्वजनिक गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. पुण्यात पहाटेच वाजता डीजेचा दणदणाट सुरू झाला. या मिरवणुकीत तरुणाईंनी सकाळपासूनच ठेका धरला होता. तर काल सकाळी 10 वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन पूर्ण झाले आहे.

     

  • 29 Sep 2023 07:26 AM (IST)

    Lalbaugcha Raja Ganpati Visarjan : गणपती बाप्पा मोरया… लालबागचा राजाचे थोड्याच वेळात विसर्जन; मिरवणूक सुरूच

    लालबागचा राजाची मिरवणूक गेल्या 18 तासांपासून सुरूच आहे. गुलालाची उधळण करत भक्त या मिरवणुकीत तल्लीन झाले आहेत. थोड्याच वेळात बाप्पाचं भक्तीभावाने विसर्जन केलं जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.