Maharashtra Breaking Marathi News Live | मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा

| Updated on: Oct 31, 2023 | 6:59 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : आज सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा

मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहाव्या दिवशी सुरु आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.  मराठा आरक्षणावर अजून  कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे राज्यभरात आंदोलन पेटले आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. तसेच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळमध्ये कार्यक्रम असून त्यानंतर ते जालनाकडे जाण्याची शक्यता आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने गाजावर  बॉम्ब हल्ले सुरुच ठेवले आहेत. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Oct 2023 04:27 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांचा राजीनामा

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पहिला राजीनामा पडला आहे. लक्ष्मण पवार हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याती आमदार आहेत.

  • 30 Oct 2023 04:12 PM (IST)

    यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी यवतमाळमध्ये दाखल आहेत. यावेळी कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

  • 30 Oct 2023 04:02 PM (IST)

    भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड

    भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. प्रशांत बंब हे छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर भागातील आमदार आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी हे ऑफिस फोडलं.

  • 30 Oct 2023 03:52 PM (IST)

    शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यवतमाळमध्ये

    शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत.

  • 30 Oct 2023 03:49 PM (IST)

    मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण

    मूळ मराठा आरक्षण रद्द झालं त्यावर सरकार काम करत आहे. आरक्षणातील त्रूटी दूर करण्यासाठी शिंदे, गायकवाड आणि भोसले समिती काम करत आहे. 11 हजार 530 मराठा कुणबी असल्याचं नोंदी सापडल्या आहेत. आणखी नोंदीसाठी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न आहे.

  • 30 Oct 2023 03:30 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे निवडणूक आयोगात दाखल

    खासदार सुप्रिया सुळे निवडणूक आयोगात दाखल झाल्या आहेत. आम्ही सत्याच्या बाजूने जात आहोत असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचाच आहे. आम्ही काही प्रतिज्ञापत्र पुस्तक निवडणूक आयोगाकडे सादर करत आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

  • 30 Oct 2023 03:24 PM (IST)

    सोलापुरात मराठा समाज आक्रमक

    मराठा समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासले आहे. पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला काळे फासल्याची घटना घडलीये. सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ एसटी बसेस थांबवत , नेत्यांच्या प्रतिमेला फासले काळे.

  • 30 Oct 2023 03:20 PM (IST)

    निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुप्रिया सुळे होतील दाखल

    थोड्याच वेळात सुप्रिया सुळे या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल होतील. कागदपत्र सादर करण्यासाठी सुप्रिया सुळे पोहचल्या आहेत.

  • 30 Oct 2023 03:07 PM (IST)

    पंढरपुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी बस सेवा बंद

    मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आलीये. मराठा समाजाचे आंदोलन तीव्र होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतलाय. पंढरपूर मार्गे जाणाऱ्या लातूर नांदेड, परभणी, जालना गाड्याच्या फेऱ्या रद्द.   मराठवाड्याकडे जाणारी एसटी वाहतूक बंद केल्याने लाखो रुपयांचे एसटी महामंडळाचे होणार नुकसान…..

  • 30 Oct 2023 03:01 PM (IST)

    नाशिकच्या चांदवडमध्ये मराठा समाज आक्रमक

    चांदवडचे आमदार राहुल आहेर यांची गाडी आडवत मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.  सर्व नेत्यांना गाव बंदी असताना पहिल्यांदा आमदार राहुल आहेर चांदवडमध्ये आले.  आमदार राहुल आहेर यांची गाडी आडवत दिल्या घोषणा.

  • 30 Oct 2023 02:50 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केलीये. माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षांची मागणी लक्षात ठेवून इतर कुठल्याही गटातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 30 Oct 2023 02:37 PM (IST)

    आमदार रत्नाकर गुट्टे यांचे अन्न त्याग आंदोलन सुरू

    मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीला समर्थन देण्यासाठी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन. आमदार गुट्टे आरक्षणाच्या मागणीसाठी करत आहेत. एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन.

  • 30 Oct 2023 02:28 PM (IST)

    manoj jarange patil | अर्धवट आरक्षण घेणार नाही

    आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण नाही. समितीचा अहवाल स्वीकारुन समितीचे कामकाज थांबवा. यापुढे कोणत्याही तरुणाने आत्महत्या करायची नाही.

  • 30 Oct 2023 02:25 PM (IST)

    manoj jarange patil | पुढचा टप्पा अजून जड

    आमच्या वाटेला येणाऱ्यांना सोडणार नाही. सरकारने त्यांच्या लोकांना आवरावे. सर्व मराठ्यांना सरकट आरक्षण द्यावे. आता दुसरा टप्पा सुरु आहे. पुढचा टप्पा अजून जड आहे. क्रूरेटिव्ह पिटीशनवर आमचा विश्वास नाही.

  • 30 Oct 2023 02:17 PM (IST)

    manoj jarange patil | आमचे आंदोलन शांततेत

    आमच्या आंदोलनाला कोणीतरी गालबोट लावले आहे. आमचे आंदोलन भरकटत चालले नाही. आमचे आंदोलन शांततेत सुरु आहे. आम्हाला फक्त कुणबी प्रमाणपत्र हवे आहे.

  • 30 Oct 2023 02:08 PM (IST)

    manoj jarange patil | १ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा

    मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच १ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

  • 30 Oct 2023 02:01 PM (IST)

    सुपरमॅक्स कंपनीचे कामगार पुन्हा एकदा उपसणार आंदोलनाचे हत्यार

    ठाणे : ठाण्यातील सुप्रसिद्ध अशी सुपरमॅक्स कंपनी गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे . कामगारांना योग्य तो न्याय न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा कामगार एकत्र आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत असाच लढा सुरू राहणार असल्याचा देखील कामगारांनी सांगितलेला आहे. कामगारांचा रखडलेला पगार आणि विविध समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या. कामगारांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरण्याची भूमिका या ठिकाणी कामगारांनी दर्शवली आहे .मागे देखील या कामगारांनी एकत्र येत रास्ता रोको करण्यात आला होता…

  • 30 Oct 2023 01:55 PM (IST)

    धनगर समाजाचा मोर्चा, पारंपारिक वाद्य, शेळ्या-मेंढ्यासह हजारो धनगर सहभागी

    सांगली : शासनाने दिलेल्या मुदतीत आरक्षण मिळाले नाही, तर धनगर समाजाचा उद्रेक होईल, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा समस्त धनगर समाजाच्या वतीने सांगलीमध्ये देण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यासाठी सांगलीच्या तासगावमध्ये धनगर समाजाचा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या भिलवडी नाका इथून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पारंपारिक वाद्य, शेळ्या मेंढ्यासह हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.

  • 30 Oct 2023 01:50 PM (IST)

    जालन्यातील मंठा शहरात मराठा आंदोलकांनी शासकीय कार्यालयांना ठोकले टाळे

    जालना : जालन्यातील मंठा शहरात मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले असून आंदोलकांनी शासकीय कार्यालयांना टाळे ठोकले आहे.आंदोलक सर्वच कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर आहेत.जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून कार्यालये बंद करण्यात आले आहेत.तहसिल, पंचायत समिती, नगर पंचायत, भूमी अभिलेख कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आलं आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

  • 30 Oct 2023 01:49 PM (IST)

    जरांगे यांची प्रकृती अधिक खालवल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगे यांची प्रकृती अधिक खालवल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त

  • 30 Oct 2023 01:45 PM (IST)

    सरकार, विधानसभा अध्यक्ष काय करतात हे कोर्टासमोर आलं – सुप्रिया सुळे

    मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानते सत्यमेव जयते…. राज्य सरकार आणि अध्यक्ष काय करतात हे कोर्टासमोर आलं सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

  • 30 Oct 2023 01:40 PM (IST)

    कोल्हापुरात सकल मराठा समाजाचे दसरा चौकात साखळी उपोषण सुरू

    कोल्हापुरात सकल मराठा समाजाचे दसरा चौकात साखळी उपोषण सुरू आहे, आंदोलनस्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफांनी भेट दिली. मराठा आरक्षणासाठी दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्याची मराठा समाजाने मागणी केली आहे.  कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर उद्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी चर्चा करण्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिलं आहे.

  • 30 Oct 2023 01:35 PM (IST)

    आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक अन् गाड्याही फोडल्या

    बीड: माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आक्रमक कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर संतप्त जमावाने बंगल्या समोरील गाड्याही फोडल्या आहे. माजलगाव मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

  • 30 Oct 2023 01:27 PM (IST)

    अधिवक्ता तुषार मेहता यांचा युक्तीवाद काय?

    सुप्रीम कोर्टाने आजवर स्वायत्त संस्थेला मुदत दिली नाही, म्हणून ३१ डिसेंबरची मुदत देऊ शकत नाही, असे अधिवक्ता तुषार मेहता यांनी म्हणत युक्तीवाद केला

  • 30 Oct 2023 01:23 PM (IST)

    दोन्ही बाजूने वेळ मागितल्याने सुनावणीला विलंब – तुषार मेहता

    २० ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली पण दोन्ही बाजूने वेळ मागितला. त्यामुळे सुनावणीला विलंब झाल्याचे अधिवक्ता तुषार मेहता यांनी म्हटले आहे.

  • 30 Oct 2023 01:21 PM (IST)

    वेळोवेळी संधी देऊनही विधानसभा अध्यक्षांकडून ठोस तारीख नाही – कोर्ट

    आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणीकरता वेळोवेळी संधी देऊनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कोणतीही ठोस तारीख नाही – सर्वोच्च न्यायालय

  • 30 Oct 2023 01:19 PM (IST)

    आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात विधानसभाध्यक्ष निर्णय घेत नसल्याने नाराजी

    आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीये.

  • 30 Oct 2023 01:17 PM (IST)

    आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या – सर्वोच्च न्यायालय

    आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजवर स्वायत्त संस्थेला मुदत दिली नाही, तर या प्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश सरन्यायाधिशांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.

  • 30 Oct 2023 01:08 PM (IST)

    Eknath Shinde | आंदोलन भरकटत चाललं आहे – मुख्यमंत्री शिंदे

    हे आंदोलन भरकटत चाललं आहे. आंदोलनाला हिंसक वळण का लागतय याचा विचार करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना केलं.

  • 30 Oct 2023 12:57 PM (IST)

    Eknath Shinde | पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र वाटप करायला उद्यापासून सुरूवात – मुख्यमंत्री शिंदे

    पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र वाटप करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटानुसार सरकार तत्काळ प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

  • 30 Oct 2023 12:54 PM (IST)

    Eknath Shinde | टिकणारं आरक्षण समाजाला मिळालं पाहिजे, सरकारची भूमिका – मुख्यमंत्री शिंदे

    टिकणारं आरक्षण समाजाला मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.

    मराठा समाजाच्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले शांततेचे आवाहन.

  • 30 Oct 2023 12:50 PM (IST)

    Eknath Shinde | जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे

    आरक्षणासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. कोणालाही फसवणार नाही.

    थोडा वेळ सरकारला द्यावा. जरांगे पाटील यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

  • 30 Oct 2023 12:46 PM (IST)

    Eknath Shinde | कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका – मुख्यमंत्री शिंदे यांचं आवाहन

    कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका, असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठा समाजानं सजग रहावं, जाळपोळ करू नये.

    सरकारकडून प्रामाणिकपणे काम सुरू, कोणालाही फसवणार नाही असंही आश्वासन त्यांनी दिलं.

  • 30 Oct 2023 12:41 PM (IST)

    Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्याला चालना दिली – मुख्यमंत्री शिंदे

    मराठा आरक्षणाचा मुद्दा 1980 पासूनचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्याला चालना दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • 30 Oct 2023 12:36 PM (IST)

    Eknath Shinde | क्युरेटिव्ह पिटीशनसाठी 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती – मुख्यमंत्री शिंदे

    क्युरेटिव्ह पिटीशनसाठी 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती सरकारला मदत करणार. आरक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे, गायकवाड, भोसलेंची समिती.

  • 30 Oct 2023 12:32 PM (IST)

    Eknath Shinde | सुप्रीम कोर्टात रद्द झालेल्या मूळ मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे – मुख्यमंत्री शिंदे

    मूळ मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे. इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीही काम सुरू होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 30 Oct 2023 12:28 PM (IST)

    Eknath Shinde | 11 हजार 530 कुणबी नोंदी सापडल्या – मुख्यमंत्री शिंदे

    बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. 11 हजार 530 कुणबी नोंदी सापडल्या. आणखी कुणबी नोंदी शोधण्यासाठी समितीने मुदतवाढ मागितली.

  • 30 Oct 2023 12:24 PM (IST)

    Eknath Shinde | शिंदे समितीने पहिला अहवाल सादर केला – मुख्यमंत्री शिंदे

    शिंदे समितीने पहिला अहवाल सादर केला , १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी केली, असे मुख्यमंत्री एकनाथ यांनी नमूद केले.

  • 30 Oct 2023 11:59 AM (IST)

    बीडमधील माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक

    बीडमधील माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त जमावाने बंगल्यासमोरील गाड्याही फोडल्या आहेत. यामुळे माजलगावमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

  • 30 Oct 2023 11:50 AM (IST)

    लासलगाव : कांदा निर्यातीवरील 40 टक्के निर्यात शुल्क रद्द

    लासलगाव : कांदा निर्यातीवरील 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आला आहे. यामुळे कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या किंमतीत 500 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे. जास्तीत जास्त 5200 रुपये, कमीतकमी 2000 रुपये तर सरासरी 4500 रुपये बाजार भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. कांद्यावरील सर्व निर्बंध रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे.

  • 30 Oct 2023 11:46 AM (IST)

    कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र

    कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे समितीच्या अहवालावरून हे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय निर्णय घेण्यात आला आहे.

  • 30 Oct 2023 11:40 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसावं लागणं हे दुर्दैवी- राजेश टोपे

    “मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसावं लागणं हे दुर्दैवी आहे. सरकारने 40 दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं. मात्र 50 दिवस उलटूनही प्रश्न सुटला नाही. सरकारने तातडीने आणि गांभीर्याने पाऊलं उचलणे गरजेचं आहे. मी आवर्जून सरकारला सांगतो की विशेष अधिवेशन घेऊन राज्यपालांना विनंती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. जरांगे पाटलांच्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे. आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आमदारांना घेऊन दुपारी एक वाजता मराठा आरक्षण संदर्भात राज्यपाल यांची भेट घेणार आहोत आणि या प्रश्नाचे गंभीर्य आणि तातडी समजून सांगणार आहोत, ” असं राजेश टोपे म्हणाले.

  • 30 Oct 2023 11:30 AM (IST)

    सकल मराठा समाजाच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा ठाण्यात विरोध

    सकल मराठा समाजाच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा ठाण्यात विरोध केला जाणार आहे. ठाण्यात आयोजित ज्वेलर्स असोसिएशनच्या व्यापार वृद्धीसाठी मार्गदर्शन शिबिरास अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी नेत्यांना आणि मंत्र्यांना गावबंदी असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातदेखील नेत्यांना विरोध केला जातोय. काल ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात आला होता.

  • 30 Oct 2023 11:20 AM (IST)

    परभणी जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ठप्प

    परभणी जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी एसटी जाळपोळ आणि एसटी फोडण्याच्या घटना घडल्यानंतर परभणी जिल्ह्यात एसटीची चाके थांबली आहेत. सणासुदीच्या काळात अचानक एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

  • 30 Oct 2023 11:10 AM (IST)

    मुंबईतील आझाद मैदानावर धनगर समाजाचं आंदोलन

    मुंबईतील आझाद मैदानावर धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

  • 30 Oct 2023 11:00 AM (IST)

    Live Update : प्रकृती खालावल्याने सकाळपासून जरांगे पाटील झोपूनच

    प्रकृती खालावल्याने सकाळपासूव जरांगे पाटील झोपूनच आहेत. जरांगे पाटील यांना उठून बसण्यासाठी देखील त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे.

  • 30 Oct 2023 10:55 AM (IST)

    Live Update : मराठा आरक्षणास पाठींबा देत शिर्डीत साखळी उपोषण

    मराठा आरक्षणास पाठींबा देत शिर्डीत साखळी उपोषण सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज सात जणांचा उपोषणात सहभाग, आज शिर्डीमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

  • 30 Oct 2023 10:45 AM (IST)

    Live Update : मालेगावात मराठा आंदोलकांनी रोखला मालेगाव पुणे महामार्ग

    मालेगावात मराठा आंदोलकांनी मालेगाव पुणे महामार्ग रोखला आहे. नांदगाव फाट्यावर कौळाने येथे महामार्ग रोखला आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महामार्ग रोखला आहे. आंदोलनात परिसरातील गावांचा सहभाग.. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केला रस्ता रोको.. पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात..

  • 30 Oct 2023 10:25 AM (IST)

    Live Update : ललित पाटील प्रकरणी ससूनच्या एका अधिकाऱ्याचा राजीनामा

    ललित पाटील प्रकरणी ससूनच्या एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. पुण्यातील ससूनच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. ललित पाटील प्रकरणात संशयाच्या बोहऱ्यात आढळल्याने राजीनामा दिला आहे. डॉक्टर सुधीर धीवारे यांनी राजीनामा दिला आहे..

  • 30 Oct 2023 10:23 AM (IST)

    Live Update : हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये राजीनाम्यावरुन शाब्दिक चकमक

    हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये राजीनाम्यावरुन शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. ‘मी आता राजीनामा देतोय, सर्वांनी शांत बसायचं..’ राजीनाम्याच्या मागणीनंतर हेमंत पाटील यांचं चढ्या आवाजात उत्तर… ‘राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का?’ असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला…

  • 30 Oct 2023 10:10 AM (IST)

    Live Update : मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगर समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू

    राज्यघटनेप्रमाणे धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र द्या , ओबीसींची जात निहाय जनगणना करा , अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा, मेंढ्यांसाठी राखीव चारही क्षेत्र आणि मेंढ्यांचा विमा करा, चौंडी येथे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अहिल्यानगर नामांतरणाच्या घोषणाची पूर्तता करा, आरक्षण आंदोलनातील युवकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अशी मागणी सकल ओबीसी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. जर एसटीचे प्रमाणपत्र मिळाले नाही तर, पुढचं आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतरला करणार असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.

  • 30 Oct 2023 09:57 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत आंदोलन

    राजधानी दिल्लीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे.  सकल मराठा समाजाच्या वतीने जंतर-मंतरवर आजपासून उपोषण करण्यात येणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतही आंदोलन करण्यात येतंय.  दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची झाडाझडती घेण्यात आली.  जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी असतानाही पोलिसांकडून त्रास दिला जातोय, असा आरोप गंगाधर पाटील यांनी केला आहे.

  • 30 Oct 2023 09:46 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून 6 बसवर दगडफेक

    मराठा आरक्षण आंदोलन पेटलं आहे. धाराशिव जिल्ह्यात आंदोलकांनी 6 बसवर दगडफेक करत काचा फोडल्या गेल्या. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे. मराठवाडा विभागात आंदोलन पेटलंय. या 8 जिल्ह्यात धाराशिव येथून जाणाऱ्या बस बंद केल्यात.  इतर भागात स्थिती पाहून एखादी बसेस सोडल्या जात आहेत. मात्र धाराशिव आगारातून एकाही फेरी बस सुरु नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.

  • 30 Oct 2023 09:30 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीची पत्रकार परिषद घेणार

    जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.  मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर त्यांच्या प्रकृतीनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राला करणार आवाहन आहेत.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 30 Oct 2023 09:15 AM (IST)

    ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

    धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील बोरी क्षेत्रातील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे.  वनविभागाचे आणि पुणे येथील संस्थेच्या पथकाने केले. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद झालाय. पहाटे साडेपाच वाजेला बेशुद्ध करत बिबट्याला करण्यात जेरबंद आलं.  त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.  मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिबट्याला अन्य ठिकाणी हलवल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम आहे.

    पकडला गेलेला बिबट्या हा नरभक्षकच आहे का? याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम…

    वन विभागाने पकडलेला बिबट्याला तात्काळ अन्य ठिकाणी नेल्यामुळे वाढला संभ्रम..

    गेला एक आठवडा मध्ये तीन लहान बालकांचा घेतला या बिबट्याने जीव…

  • 30 Oct 2023 08:59 AM (IST)

    Shivsena | शिवसेनेच्या खासदार-आमदारामध्ये मतभेद ?

    भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील मतभेद कायम का?. गवळीच्या पोस्टरवरुन पालकमंत्री संजय राठोड गायब, तर राठोड यांच्या बॅनरवरून खासदार भावना गवळी गायब. ताई-भाऊमधील बॅनरवरून पुन्हा एकदा चर्चा.

  • 30 Oct 2023 08:45 AM (IST)

    Maratha Reservation | आज शिर्डी बंद

    मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक. शिर्डी शहरासह, राहाता तालुक्यात आज कडकडीत बंद. मराठा आरक्षणासाठी शिर्डी शहर बंद. साई मंदिरातील दर्शन व्यवस्था मात्र नियमितपणे सुरू. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थानच्या आस्थापना देखील सुरू. साई भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी साई प्रसादालाय देखील राहणार सुरू.

  • 30 Oct 2023 08:30 AM (IST)

    Maratha Reservation | मराठावाड्यात जाणाऱ्या एस टी बसेस रद्द

    पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या एस टी बसेस रद्द. राज्यात आरक्षण मागणीवरून ठीकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मराठवाड्यात बीड, लातूर जिल्ह्यात आक्रमक आंदोलन सुरू असल्यानं शिवाजीनगरहून त्या भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द कऱण्यात आल्या आहेत. कालपासून बीड,लातूर एसटी बस सेवा रद्द. बीड आणि धाराशिवमध्ये तोडफोड झाल्याने हा निर्णय घेतलाय.

  • 30 Oct 2023 08:15 AM (IST)

    Drug case | ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक

    वडाळा गावातील झोपडीतून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठी साखळी कार्यरत. नाशिकच्या एनडीपीएस पथकाने मुंब्रा येथून संशयित शब्बीरला केली अटक. न्यायालयाने दिली 1 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी. वडाळा गावातील ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक. शब्बीरला कुणी ड्रग्ज दिले, याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू

  • 30 Oct 2023 07:58 AM (IST)

    Maharashtra News : नागपुरात तापमानाचा पारा घसरला

    नागपुरात तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे हुडहुडी वाढली आहे. ऑक्टोबर हिट ऐवजी आता गुलाबी थंडी वाढली आहे. दिवसाचा आणि रात्रीचा पारा सुद्धा आता खाली गेला आहे.

  • 30 Oct 2023 07:48 AM (IST)

    Maharashtra News : यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम

    यवतमाळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमला मराठा आंदोलकांचा विरोध होण्याची शक्यता आहे. शिवाय विविध संघटना देखील आंदोलनाच्या तयारीत आहे.

  • 30 Oct 2023 07:35 AM (IST)

    Maharashtra News : अमन परदेशी यांची सुषमा अंधारे यांना नोटीस

    अमन परदेशी यांनी सुषमा अंधारे यांना काढली नोटीस काढली आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुरावे न मिळाल्यास आंधारे यांच्या विरोधात मानहानी दाखल करणार असल्याचे अमन परदेशी यांनी म्हटले आहे.

  • 30 Oct 2023 07:21 AM (IST)

    Maharashtra News : मराठा आरक्षण आंदोलनात लहान मुलेही

    धाराशिव तालुक्यातील रुईभर येथे लहान शालेय मुलांनी मराठा आरक्षण आंदोलनात उडी घेतली आहे. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी साखळी आंदोलनात सहभाग नोंदविला. गावातील लहान मुलांनी आंदोलनस्थळी येऊन घोषणाबाजी केली.

  • 30 Oct 2023 07:12 AM (IST)

    Maharashtra News : आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमधील आमदारांबाबत एकत्रित सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सकाळी 11 नंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीस खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे.

Published On - Oct 30,2023 7:06 AM

Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.