Maharashtra Marathi News Live | नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख, प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधानांवर निशाणा
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : मनसे लोकसभेच्या मैदानात उतरणार. नऊ मतदारसंघातील संभाव्य उमदेवारांच्या नावाची चर्चा सुरू. 200 हजाराच्या नोटा बदलण्याचा आज शेवटचा दिवस. मेक्सिकोत भीषण अपघात. बस पलटल्याने 18 प्रवाशांचा मृत्यू. इंधन दरवाढीमुळे विमान प्रवास महागणार. आजपासून दरवाढ लागू. एशियन गेम्समध्ये तिरंदाजीत भारताल सूवर्ण आणि कांस्यपदक. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Prakash Ambedkar On Narendra Modi | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरसोबत तुलना
मुंबई | वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरसोबत तुलना केली.
-
Maharashtra Cabinet Expansion | राज्यात 16 ऑक्टोबरनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा
मुंबई | राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात 16 ऑक्टोबरनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आहे. घटस्थपनेनंतर हा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मंत्र्यांची यादी तयार असल्याचीही माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि भाजपमधील मागच्या मंत्र्यांपैकी प्रत्येकी 2 मंत्री हटवण्यात येतील. तसेच त्याजागी आणखी 2 नवीन मंत्री त्यांची जागा घेतील. तसेच खात्यांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
-
-
Bmc Dengue | मुंबईत डेंग्युचा धोका, महापालिका एक्शन मोडवर
मुंबई | मुंबईत डेंग्युचा वाढता धोका पाहता पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत मलेरिया आणि डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष शोध मोहिम राबवली. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 1 लाख 6 हजार 898 डासांची उत्पत्ती स्थळं नष्ट करण्यात आली. तसेच पालिकेने घरात आणि सोसायटी परिसर नियमित स्तरावर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन नागरिकांना केलंय.
-
Congress Varsha Gaikwad On Maharashtra Government | आरोग्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबई काँग्रेस आक्रमक
मुंबई | राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी फक्त आरोग्य विभाग नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. त्यानंतर आता मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.गेल्या वर्षभराच्या खोटारड्या कारभारानंतर आरोग्यमंत्री पहिल्यांदा खरं बोलत असून या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत शिंदे-फडणवीस-पवार यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
-
सुषमा अंधारे यांची नितेश राणे याच्यावर मोठी टिका
नितेश राणे सारख्या शेम्बड्या पोरांवर मी बोलत नाही, असे थेट सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. यावेळी मोठी टिका करताना सुषमा अंधारे या दिसल्या आहेत.
-
-
शिवसेना भवनवर महत्वाची बैठक सुरू
ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाच्या संलग्न विविध समित्यांची आज तातडीची बैठक शिवसेना भवनवर सुरू आहे. या बैठकीला खासदार अनिल देसाई व विलास पोतनीस उपस्थित आहेत.
-
सुषमा अंधारे यांनी केली राहुल नार्वेकर यांच्यावर टीका
16 आमदार अपात्र होतील नाही होतील, राष्ट्रवादीला पक्ष चिन्ह मिळेल की नाही मिळेल याच्यापेक्षा आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अध्यक्ष राहण्यास पात्र आहेत का याचा आधी खटला चालला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
-
मुळात कोण आहेत या शालिनी ठाकरे- सुषमा अंधारे
मुळात कोण आहेत या शालिनी ठाकरे, मला माहिती नाही. असल्या बीनमहत्वाच्या नेत्यांबद्दल मी काहीही बोलत नाही, असे थेट सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
-
इस्रायली हवाई दलाचा गाझा पट्टीत दहशतवादी स्थानांवर हल्ले
इस्रायली हवाई दलाच्या डझनभर लढाऊ विमानांनी आता गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हमास या दहशतवादी संघटनेच्या स्थानांवर हल्ले केले आहेत.
#WATCH गाज़ा सिटी: इजरायली वायुसेना के दर्जनों लड़ाकू विमान अब गाजा पट्टी में कई स्थानों पर आतंकवादी संगठन हमास के ठिकानों पर हमला किया गया है।
वीडियो में तेल अवीव के पास आने वाले रॉकेटों की चेतावनी देने वाले सायरन की आवाज़े सुनाईं दे रही हैं।
(सोर्स: रॉयटर्स) pic.twitter.com/LhrgDhO0aE
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2023
-
Asian Games : सुवर्ण पदक पटकावल्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की…
“खूप छान वाटतंय. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे आणि खेळाशी संबंधित प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो”, असं भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने सुवर्ण पदक पटकावलं आहे.
#WATCH बहुत अच्छा लग रहा है। मुझ पर भरोसा जताने के लिए भारतीय टीम प्रबंधन और चयनकर्ताओं को और इस खेल से जुड़े सभी लोगों को धन्यवाद देना चाहता हूं: एशियाई खेलों में भारतीय पुरुष क्रिकेट टीम के स्वर्ण पदक जीतने पर टीम के कप्तान रुतुराज गायकवाड़, हांग्जो, चीन pic.twitter.com/urMUbRdcKc
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2023
-
जबलपूरमध्ये बांधकाम सुरु असलेला उड्डाणपूलाचा भाग कोसळला, कामगार जखमी
मध्य प्रदेश: जबलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH मध्य प्रदेश: जबलपुर में एक निर्माणाधीन फ्लाईओवर गिर गया। घायल मजदूरों को अस्पताल पहुंचाया गया है। pic.twitter.com/ZpFHtb3ibm
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2023
-
पंजाबी सिंगर जस्मिनला भारतात जीवे मारण्याची धमकी
भारतीय वंशाची आणि अमेरिकेत राहणारी आंतरराष्ट्रीय पंजाबी गायिका जस्मिन सेडलास हिला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याच्या धमकी मिळाली आहे. जस्मिन दिल्ली विमानतळावर पोहोचताच तिला परदेशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर लेडी सिंगरचा लाईव्ह कार्यक्रम आहे.
-
Mumbai | ठाकरे गटाची शिवसेना भवनवर तातडीची बैठक
मुंबई | ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाच्या संलग्न विविध समित्यांची आज तातडीची बैठक शिवसेना भवनवर होणार आहे. काही वेळात या बैठकीला सचिव खासदार अनिल देसाई, कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर उपस्थित राहणार आहेत.
-
NCP | शरद पवार गटाचं कांदिवलीत आंदोलन, फडणवीसांवर टीका
मुंबई | नांदेड, नागपूर आणि संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली स्थानकाजवळ सरकारविरोधात आंदोलन केले. देवेंद्र फडणवीस मोठमोठी आश्वासने देत असतात आणि एवढी मोठी घटना घडली असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, असे कार्यकर्ते यावेळी म्हणाले.
-
Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांना समज दिली जाणार
मुंबई | शिवसेना नेते संजय शिरसाट यांना समज दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं असं विधान केलं होतं. याच वक्तव्यावरुन त्यांना आता समज दिलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
-
Rahul Kul | आमदार राहुल कुल यांचा संजय राऊतांवर निशाणा
पुणे | दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषदेत दौंड तालुक्यास स्वतंत्र प्रांत कार्यालयास मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. प्रांत कार्यालय 2013-14 मध्ये दुसऱ्या आमदारांच्या मतदारसंघात का गेले याचे उत्तर विरोधकांनी द्यावे, असं राहुल कुल म्हणाले. संजय राऊत यांना सध्या काहीच काम नसल्यामुळे ते काही बोलत असतात. मनोरंजना व्यतिरिक्त संजय राऊत यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
-
PM Narendra Modi : भारत इस्त्राईलसोबत उभा
इस्त्राईलवरील दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. या हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियासोबत आमच्या प्रार्थना आहेत. या कठीण प्रसंगात आम्ही इस्त्राईलसोबत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. हमास या संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्त्राईलने युद्धाची घोषणा केली आहे.
Deeply shocked by the news of terrorist attacks in Israel. Our thoughts and prayers are with the innocent victims and their families. We stand in solidarity with Israel at this difficult hour.
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
-
Congress : निवडणुकीसाठी काँग्रेसची धोरण काय
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष रणनीती, धोरण आखत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु आहे. यापूर्वी भाजपने मोठे फेरबदल केल्याने काँग्रेस कोणते कार्ड खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर सदस्य उपस्थितीत आहेत.
#WATCH मध्य प्रदेश विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारों को अंतिम रूप देने के लिए दिल्ली में कांग्रेस की केंद्रीय चुनाव समिति की बैठक चल रही है।
बैठक में कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, कांग्रेस सांसद सोनिया गांधी और राहुल गांधी शामिल मौजूद हैं। pic.twitter.com/Tbv1NzQ2RC
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2023
-
दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी ताकद द्या- छगन भुजबळ
अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ताकद द्यावी लागेल असे छगन भुजबळ यांनी आवाहन केले. जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, ते निवडून येतील यासाठी तयारी करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे शिंदे गट एकनाथ शिंदे यांनाच पुढेचा मुख्यमंत्री म्हणून समोर आणत आहे, त्याचवेळी आता अजित पवार यांनी पण मुख्यमंत्री करावं यासाठी पवार गट सक्रिय झाला आहे.
-
कामगारांनी एक महिना कुटुंबासोबत सुट्टीवर गेलेच पाहिजे- जयंत पाटील
कामगारचे प्रश्न सुटावेत आणि नवीन निर्णय होतात त्याची अंमलबजावणी झाली पहिजेत. कामगार सुट्टीचा एक महिना पगार घेतात मग त्यांनी एक महिना कुटुंबा सोबत सुट्टीवर गेलेच पाहिजे कारखान्यांनी ते अरेजमेंट केले पाहिजे. भाषण कामगार शिबीर पन्हाळा येथे ते बोलत होते.
-
तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेशन कमिटीची मागणी
नांदेड व इतर शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू संदर्भात योग्य ती चौकशी करून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेशन कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यासोबतच या सगळ्या प्रकरणी राज्य सरकारने योग्य ती चौकशी करावी त्यासोबतच याबाबत योग्य ती समिती स्थापन करावी अशी मागणी देखिल महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेशन कमिटीकडून करण्यात आली आहे.
-
सातारा पुसेसावळीत घडलेल्या घटनेचा तपास NIA कडे द्यावा
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे झालेल्या घटनेत पोलीसांनी गुन्हा नोंद करण्यास विलंब केल्याचा आरोप करत या सगळ्या प्रकरणाचा तपास CBI किंवा NIA कडे सोपवावा अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेने पुण्यात पत्रकार परिषद घेत केली आहे.
-
मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरचं होणार, चर्चा सुरु आहे – फडणवीस
संजय राऊत हे उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. राऊत काहीही बोलतात असं टीका फडणवीसांनी केली. मंत्रीमंडळाचा लवकरचं विस्तार होणार आहे. त्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली.
-
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या वतीने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि विभागप्रमुख संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली.
-
Dengue | डेंगूच्या आजारामुळे यवतमाळमध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू
यवतमाळ- महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे डेंगूच्या आजारामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू. शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन 20 ऑक्टोबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा घेतला निर्णय.
-
Kolhapur Jayant Patil | महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ तीन दिवसीय शिबीर, प्रमुख पाहुणे म्हणून जयंत पाटील
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांचे तीन दिवसीय शिबिर पन्हाळा येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हजर.
-
Vikhroli | कचरा डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात स्थानिक नागरिक आणि शिंदे गट आक्रमक
विक्रोळी कांजूरमार्ग ठिकाणी असणाऱ्या कचरा डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात स्थानिक नागरिक आणि शिंदे गट आक्रमक. डम्पिंग ग्राउंड मुळे होणारा त्रास आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण परेशान. डम्पिंगच्या आत जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्यात आल्या. पूर्व द्रुतगती मार्ग हायवे अडवण्यात आला
-
Bachhu Kadu | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार बच्चू कडू यांचं कौतुक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून आमदार बच्चू कडु यांचं कौतुक. अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने अकोला मध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आले त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. देशाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूरवीर यांना अभिवादन करतो. शहिदांच्या परिवाराचे मी आभार मानतो; तुम्ही देशासाठी तुमचा सुपुत्र दिला. अशा सुपुत्रामुळे लोकशाही अबाधित राहत आहे. आपले जवान उन्हात देखील काम करतात.अकोला हा पहिला जिल्हा असेल की सर्व शहिदाचे पुतळे एका ठिकाणी संग्रहीत केले.
-
छ. संभाजीनगरचे 8 जण सिक्कीमच्या पुरात अडकले
सिक्कीममध्ये आलेल्या पुरात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील 8 पर्यटक अडकले. या पर्यटकांना वाचवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी सिक्कीमच्या आयुक्तांना पत्र पाठवलं.
-
अजित पवारांनी केली सप्तश्रृंगी देवीची पूजा
सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी वणी येथे जाऊन सप्तश्रृंगी देवीची पूजा केली. छगन भुजबळ, सुनील तटकरेही देवीच्या चरणी झाले लीन.
-
नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र कांदा आणि टोमॅटो उत्पादकांनी अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. ताफ्यासमोर कांदे, टोमॅटो फेकत शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप.
-
दु्ष्काळाच्या झळा तीव्र, छ.संभाजीनगरमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यात ६३ टँकरने तर संपूर्ण मराठवाड्यात ७०० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
-
‘ती’ नावं काँग्रेस वरिष्ठांनी नाकारली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत दिलेली नावं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची परवानगी न घेता पटोले नाव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पटोले यांनी कळवलेली यादी अंतिम नसल्याचं मित्रपक्षांना कळवलं. के सी वेणूगोपाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून यादीवर केंद्रीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाल नसल्याचं कळवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
-
पुण्यात अवैध दारूचा साठा जप्त
पुण्यात परराज्यातून आलेल्या अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. कात्रज परिसरातून एका लगझरी बसमधून दारूचा मोठा साठा जप्त केला गेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत दारूचे 15 बॉक्स जप्त केलेत. एकुण 42 लाख 90हजार रूपयांचा दारूचा साठा करण्यात जप्त आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
-
दीड वर्षे झोपले होते का? चंद्रकांत पाटलांवर कुणी केला गंभीर आरोप?
बातमी छत्रपती संभाजीनगरमधून… मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केलेत. चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाला गाजर दाखवण्याचे काम करत आहेत. दीड वर्षे झाले उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील झोपले होते का? आंदोलन पेटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना का जाग आली? चंद्रकांत पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप रमेश केरे यांनी केला आहे.
-
अजित पवार नाशकात, ठिकठिकाणी जंगी स्वागत
अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. अवनखेड ग्रामपंचायतींच्या जगदंबा माता भक्तनिवासाचं अजित दादांकडून भूमिपूजन करण्यात आलं. दिंडोरीच्या लखमापूर फाट्यावर क्रेनने हार घालून स्वागत केलं जातंय.
-
Maharashtra News | अमरावतीत विसर्जन मिरवणुकीत चोरांचा डल्ला
अमरावतीत विदर्भाचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरांनी मोबाईल आणि सोनसाखळीवर डल्ला मारला आहे. मिरवणुकीत 3 सोनसाखळी आणि तबल 20 मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
-
Maharashtra News | नाशिकमध्ये होणार थीम पार्क
आता नाशिकच्या गोदापार्कवर थिम पार्कसह रोपवेही असणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळे निर्मिती आणि विकसित करण्यासाठी 65 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.
-
Maharashtra News | अजित पवार यांना समर्थन वाढणार – चंद्रशेखर बावनकुळे
निवडणुका जवळ येतील तेव्हा अजित पवार यांना समर्थन वाढणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन वाढत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
-
Maharashtra News | राजकारणात काही होऊ शकते – चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परिस्थिती आज अशी का झाली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. याचा विचार करायला हवा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असे भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News | गोंडवाना विद्यापीठ भरती प्रकरणी तक्रार
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या रिक्त ३० जागांसाठी भरती प्रक्रियेत अंतिम निवड यादी प्रकाशित केली नाही. त्यामुळे अधिसभा सदस्यांनी भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित केले आहे.
-
Maharashtra News | सोलापुरात एपीआयने जीवन संपवले
सोलापुरात API आनंद मळाळे या पोलीस अधिकाऱ्याने जीवन संपवले. त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घातली. API मळाळे हे मूळचे सोलापूरचे असून सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.
-
LIVE UPDATE | राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पितृपक्षामुळे रखडला
घटस्थापनेच्या दिवशी आता मंत्रिमंडळ विस्तार मुहूर्त पाहून करावा असे इच्छुक मंत्र्यांचा सूर… 8 ते 14 तारखेच्या दरम्यान होणार होता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार परंतू आता हा विस्तार 15 तारखेनंतर होईल अशी सुत्रांची माहिती..
-
LIVE UPDATE | पुण्यातील झेड ब्रिजजवळ मोठा अपघात
पुण्यातील झेड ब्रिजजवळ मोठा अपघात झाला आहे. चारचाकी वाहनाने ३-४ वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिली आहे. अपघातात एकाचा जागीत मृत्यू झाला असून ३-४ जण जखमी आहे.
-
LIVE UPDATE | सुषमा अंधारेंची पुन्हा शालिनी ठाकरेंवर ट्विट करत टीका
सुषमा अंधारे यांनी पुन्हा शालिनी ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. मी कधीही आणि कुठेही यायला तयार आहे.. असं ट्विटमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. लोकांचे मृत्यू पाहून तुमच्या आतड्याला पीळ पडत नाही का? असा प्रश्न देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
-
LIVE UPDATE | नाशिकच्या स्मार्ट घोटाळ्याची थेट पंतप्रधानांकडे तक्रार…
नाशिकच्या स्मार्ट घोटाळ्याची तक्रार थेट पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. 800 कॅमेराचे एम्र्जन्सी ऑपरेशन सेंटर चर्चेत आहेत. 60 कोटींच्या ठेक्याची खिरापत वाटल्याची चर्चा सध्या होत आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून होणारी अनेक कामे वादात अडकली आहेत.
-
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांची फसवणूक; कोर्टाचं निरीक्षण
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या विशेष कोर्टाने हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
-
Rs 2000 notes : आजच 2 हजारांची नोट बदलून घ्या, नाही तर उद्यापासून…
2000 रुपयांची नोट बदलून घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून या नोटा बदलता येणार नाही. तसेच या नोटांची काहीच व्हॅल्यू राहणार नाही. यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची डेडलाईन देण्यात आली होती. पण आरबीआयने ही मुदत वाढवून 7 ऑक्टोबर केली होती.
-
Accident : पुण्यात झेड ब्रिजजवळ भीषण अपघात, एक ठार
पुण्यातील झेड ब्रिजजवळ मोठा अपघात झाला आहे. नारायण पेठ परिसरात झालेला हा अपघात अत्यंत विचित्र होता. चारचाकी वाहनाने 3-4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
-
Asian Games : एशियन गेम्समध्ये भारताने लुटलं सोनं, खात्यात आणखी दोन मेडल
आशियाई गेम्समध्ये भारताने आज सूवर्ण कामगिरी केली आहे. भारताने आज सूवर्ण आणि कांस्य पदक पटकावलं आहे. तिरंदाजीत ज्योती वेन्नम हिने सूर्वण तर कंपाऊंड तिरंदाजीत अदिती स्वामीने कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 23 सूवर्ण, 34 रजत, 40 कांस्य मिळून एकूण 97 पदकं पटकावली आहेत.
Published On - Oct 07,2023 7:33 AM