Maharashtra Breaking Marathi News Live : मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत काय घेतले निर्णय? शंभूराज देसाई यांनी दिली माहिती
Maharashtra Breaking and Marathi News Live : राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : भाजपची आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची बैठक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार. समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास आता ,सायरन वाजणार. नंतर वाहन चालकाचे 30 मिनिट होणार समुपदेशन. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात. परभणीत सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस. कोकणातील परशुराम घाट 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत बंद राहणार. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
पेन्शनसाठी 70 वर्षीय आजीबाईची ससेहोलपट
वृद्ध महिलेला घ्यावा लागला खूर्चीचा आधार
खूर्चीच्या सहाय्याने कापावे लागले बँकेपर्यंतचे अंतर
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बँकेले घेतले फैलावर
खडबडून जागी झाली सर्व यंत्रणा
निर्मला सीतारमण यांनी दखल घेताच झाला असा चमत्कार, वाचा सविस्तर
-
गृहकर्ज घेताना अशी होते फसवणूक
ग्राहकांना गृहकर्ज घेताना बसतो फटका
गरजवंताला कुठे असते अक्कल
गृहकर्ज घेताना बँका करतात अशी चालाखी
नियमांच्या आडून असा घालतात ग्राहकांना गंडा, वाचा सविस्तर
-
-
नवी दिल्ली : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना नोटीस
सीबीआयकडून सत्यपाल मलिक यांना नोटीस
कथित विमा घोटाळ्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याची सीबीआयकडून नोटीस
काही दिवसांपूर्वीच मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि पुलवामा हल्याबाबत केलं होतं वक्तव्य
-
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे हंडा नाद आंदोलन
सोलापूर महापालिकेच्या आवारात हंडा नाद आंदोलन
अशुद्ध आणि विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक
आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना विचारणार जाब
शेकडो महिलांनी हंडा नाद करत महापालिका आयुक्तांच्या दालनात बाहेर मांडला ठिय्या
-
धुळे : शेतातील कुडाच्या घराला आग
हिंगोनी येथे घरात ठेवलेला कापूस जळून खाक
गोपाल पाटील यांच्या शेतातील घराला आग
हरभरा विक्रीतून आलेली ६० हजारांची रोकड जळाली
-
-
सिगारेट द्या फेकून व्हा करोडपती
सिगारेटच्या खर्चात होता येईल मालामाल
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत व्हा श्रीमंत
सिगारेट चुरगाळून द्या फेकून
रोज वाचा काही रुपये आणि करा गुंतवणूक, वाचा सविस्तर
-
मुंबई : बाळासाहेब चांदेरे यांचा शिवसेनेत प्रवेश
ठाकरे गटाचे नेते बाळासाहेब चांदेरे यांचा आज शिवसेनेत प्रवेश
थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश
पुण्याहून मुंबईला जाताना चांदेरे यांचे शक्तीप्रदर्शन
मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल
-
रत्नागिरी : राज ठाकरे यांची सभा सहा मे रोजी
मनसे नेते नितीन सरदेसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सहा मे रोजी रत्नागिरीत सभा
पाच, सहा आणि सात मे रोजी राज ठाकरे रत्नागिरीत असतील
प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये राज यांची रत्नागिरीतील पहिली सभा होणार
-
ओबीसी नेते, माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार
व्हीजेएनटीसह हे आरक्षण सध्याच अपुरे असल्याने गरीब ओबीसी पोटजातींना भिकेला लावून असे आरक्षण देऊ नका असा आग्रह
मराठा समाजाकडे भीमगर्जना करणारे नेते असून, त्यांनी स्वतंत्र आरक्षण मागावे अशी व्यक्त केली भावना
महाविकास आघाडीला याच मुद्द्यावरून बदनाम करणारे भाजप नेते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तोंडाला कुलूप लावून का बसले?
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून नको अशी स्पष्ट भूमिका मांडली
-
डोंबिवलीत चेंबरची तुटलेली झाकण नागरिकांसाठी डोकेदुखी
डोंबिवली पूर्वेकडील 90 फिट रोड वर फुटपाथवरील उघड्या चेंबरमध्ये पडून 50 वर्षीय नागरिक गंभीर जखमी
नागरिकाच्या पायाला 17 टाके पडले
दुर्घटना ठिकाणी शाळा असून, दररोज शेकडो विद्यार्थी रस्ता ओलांडून जातात
प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी
-
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दोन दिवसात कोरोनाचे दोन बळी
काल 83 वर्षीय रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू
आज 63 वर्षीय इतर व्याधींनी ग्रस्त रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू
गेल्या 24 तासात कोरोनाचे 9 नवे रुग्ण आढळले असून 39 रुग्ण उपचाराधीन
-
शरद पवार
मलिक पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडत होते म्हणून कारवाई
दर 15 दिवसांनी बातमी येते मलिकांची तारीख बदलली
अनिल देशमुखांवर ईडीने खटला दाखल केला
संजय राऊतांनाही काही काळ तुरुंगात ठेवण्यात आलं
निकाल लवकर लागला नाही तर खडसेंचा जावई आत्महत्या करेल
अन्याय झालेल्यांच्या पाठिमागे ताकदीनं उभं रहावं लागेल
राज्य सरकारनं खबरदारी न घेतल्यामुळे खारघरमधील मृत्यू
देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न
देशात सध्या महागाई, बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न
लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे
प्रत्येक बूथवर माणसे ठेवली पाहिजे
-
नागपूरमध्ये लकव्याचा उपचार घेणाऱ्या 77 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार
युवकाने हॉस्पिटलमधील खोलीत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना
धंतोली पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक
दीपक विजय ठाकरे असे आरोपी तरुणाचे नाव
आरोपी हा वृद्धेच्या मुलाचा मित्र
-
मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर छत्रपती संभाजीराजे ट्टीटद्वारे मांडणार भूमिका
छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष
छत्रपती संभाजीराजे आज ट्टीटद्वारे पुढील दिशा करणार स्पष्ट
छत्रपतींच्या भूमिकेकडे मराठा समन्वयकांचं लक्ष
-
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची मुलाखत
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पिंपरीत अजित पवारांच्या मुलाखतीच आयोजन
पिंपरीतील रामकृष्ण मोरे सभागृहात होत आहे अजित दादांची प्रकट मुलाखत
“दिलखुलास दादा” या मुलाखतीत उघडले जाणार अजित पवारांच्या आयुष्यातले अनेक पैलू
-
फिजिकल गोल्ड की डिजटिल गोल्ड?
अक्षय तृतीयेला कोणते सोने खरेदी कराल
प्रत्यक्ष बाजारातील दागिने ठरतील फायदेशीर
ईटीएफ, सार्वभौम सुवर्ण रोखे, डिजिटल सोने किफायतशीर
जास्त रिटर्न आणि कर बचतीचा काय आहे फंडा, वाचा बातमी
-
मराठा समाज आरक्षणावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही सरकार स्वस्त बसणार नाही आज सर्व बाबीवर चर्चा झाली
क्युरेटिव्ह सरकारतर्फे दाखल होणार आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळणार आहे काही लोक गोंधळ करण्याच्या प्रयत्न करत आहे मराठा तरुण-तरुणी स्वस्त आहेत
जोपर्यंत मराठा समाजावर आरक्षण मिळत नाही सरकार स्वस्त बसणार नाही
-
दिलीप पाटील समन्वयक समिती मराठा समाज
क्युरेटिव्ह पेटिशन आमचा विरोध आहे ते वेळ काढू प्रकार आहे
जे मेगा भरती सुरू आहे त्याला थांबवा जोपर्यंत मला आरक्षण मिळत नाही
अध्यादेश लागू करा आणि आम्हाला आरक्षण द्या
दिलीप पाटील समन्वयक समिती मराठा समाज
-
आरबीआयची मोठी कारवाई
या 8 बँकांना दिला दणका
या बँकांचा परवाना केला रद्द
आता कोणताही व्यवहार करता येणार नाही
तुमचे तर खाते नाही ना या बँकांमध्ये, वाचा बातमी
-
मराठा आरक्षण याचिकेवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व्हे करणार
आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार- शंभूराज देसाई
प्रत्येक कॅबिनेट बैठकीआधी मराठा उपसमितीची बैठक होणार
मराठा आरक्षण याचिकेवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे
माविआ सरकारकडून राहिलेल्या त्रुटी यावेळी राहू देणार नाही
-
मराठा समाजाचा सर्व्हे करणार
मराठा समाजास पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी सर्व्हे करणार
प्रत्येक कॅबिनेट बैठकीआधी मराठा आरक्षण समितीची बैठक होणार
सरकार मराठा समाजाच्या पाठिशी ठाम उभे- शंभूराजे देसाई
क्यूरेटीव्ह पिटीशन दाखल करणार
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे शक्य ते ते करणार
महाविकास आघाडी सरकारकडून राहिलेल्या त्रुटी यावेळी राहू देणार नाही
-
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर
आज सकाळी पुण्यातल्या बारामती हॉस्टेल येथे कार्यकर्ते भेटीगाठी केल्या.
एका कार्यकर्त्यांनी दादांना दाखवण्यासाठी चक्क जावा बुलेट आणली त्यावर दादांना राईड मारण्याची व बसण्याची विनंती केली.
दादांनी चावी लावत जावा बुलेटची माहिती घेतली व या गाडीला एक सिट कसं मग मैत्रीण कुठे बसणार? असा मिश्किल प्रश्न विचारला
अजितदादांनी प्रश्न विचारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला
-
राज ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांची राऊतांवर टीका
पुणे : उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं तर संजय राऊत यांचा आनंद गगनात मावेना होतो
राज ठाकरे यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलतात! असे बोलणे योग्य आहे का?
राज ठाकरे यांची टीका प्रॅक्टिकल असते हवेत गोळीबार नसतो. ते आमच्यावर सुद्धा टीका करतात
राऊत यांना सत्तेची सवय झाली होती मात्र ती गेली आणि आता संघटना वाढत नाही
संजय राऊत यांच्या बद्दल फारसे बोलायला नको – चंद्रशेखर बावनकुळे
-
भाजपकडून पुणे शहरात कुठला ही सर्वे सुरू झालेला नाही – बावनकुळे
पुणे : ज्याने पोस्टर लावले असतील त्यांना विनंती आहे की पोस्टर लावू नका
उत्साही कार्यकर्त्यांना विनंती आहे की असं काही करु नका
आज कुठल्या ही पक्षाने निवडणूक लागत नाही तो पर्यंत चर्चा करू नये
निवडणूक लागेल का नाही हे पाहावं लागेल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
-
उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाने चक्क सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीवर बसूनच अंघोळ केली
सोलापूर : सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
मागील काही दिवसांपासून सोलापूरचे तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
शहरातील तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सीयसच्या पुढे गेला आहे.
शहरातील सरस्वती चौकात चक्क सिग्नलवर थांबलेल्या तरुणाने गाडीवरच थांबून आंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झालाय.
हा तरुणाने स्वतःबरोबरच गाडी चालवणाऱ्या मित्राच्याही अंगावर पाणी ओतत असतानाचा व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
-
भाजप कडून पुण्यात घर चलो अभियान
पुणे : शहराच्या भाजप मतदान केंद्रावर घर चलो अभियान
७ लक्ष लोकांपर्यंत आम्ही पोहचणार – बावनकुळे
१५ मे पर्यंत हे अभियान पूर्ण करणार आहोत
या संदर्भात आज पुण्यात बैठक होती,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती.
-
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला सुरुवात करा
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी
गा हस्तांतरणाला उशिरा का होईना मंजुरी – छगन भुजबळ
प्रत्यक्षात कामाला लवकरात लवकर सुरवात करण्याची गरज
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी
-
खारघर दुर्घटनेत किती जणांवर सद्यस्थितीत उपचार सुरू
मुंबई : खारघर दुर्घटनेतील सद्यस्थितीला फक्त दोनच रुग्णांवर उपचार सुरू,
वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे,
त्या श्री सदस्यांना आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता.
-
नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका ऑटो चालकाची हत्या
नागपूर : पहाटेच्या सुमारास ची घटना गुजरात हॉटेल समोर एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला
एका अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती
राजकुमार यादव असे मृत ऑटो चालकाचे नाव वय 50 वर्षे
सीताबर्डी येथील हनुमान गल्लीच्या गुजरात हॉटेलच्या जवळ
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल
पुढील तपास करीत आहे
-
‘त्या’ कारणावरून अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील
अमरावती : संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत हे अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढतील
भाजप खासदार अनिल बोंडें यांचे मोठे विधान
शिवसेनेतील 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले
अजितदादा पवार हे संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील
महाविकास आघाडी फोडायला संजय राऊतच जबाबदार राहतील त्यांची थोरवी मोठी आहे
शिवसेना फोडण्यातही मोठा वाटा आहे, 40 आमदारांना घराच्या बाहेर काढलं
-
मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या बैठकीत सचिव आणि वकिलांना निमंत्रण
मुंबई : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना हजर राहण्याच्या सूचना
आजच्या बैठकीत मुख्यमंत्री कायदेशीर बाजू समजून घेणार
संबंधित खात्याचे सचिव आणि वकिलांना हजर राहण्याच्या सूचना
-
सिरम इन्स्टिट्यूटच्या विरोधात याचिका दाखल
नागपूर : सिरम इन्स्टिट्यूट च्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर फौजदारी न्यायालयाने पाठवली नोटीस,
कोवीशिल्ड लसीने आजारपण होत असल्याबाबत माहिती लपून ठेवल्याचा गंभीर आरोप करत दाखल केली याचिका,
लस घेतल्या नंतर अनेकांना विविध प्रकारचे आजार बळावल्याने दाखल केली याचिका,
10 हजार कोटींचा सिरम इन्स्टिट्यूट वर दाखल केला दावा.
-
संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर पुण्यात गुन्हा दाखल
खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीएचे अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर प्रकरणात निविदा प्रक्रियेत निवड होण्यासाठी बनावट भागीदारीचे डीड तयार केले आणि निविदा मंजूर केली. ही निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केली, अशी तक्रार राजू ठाणगे यांनी नोंदवली.
या प्रकरणी पोलिसांनी डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
-
सुप्रिया सुळे यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार, कारण काय ?
राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली होती.
या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.
राज्य शासनाने या मागणीचा विचार करून विद्यार्थ्यांना पुन्हा ही शिष्यवृत्ती बहाल केली आहे. यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आभार मानले आहेत.
-
आता येणार 100 रुपयांचे नवीन नाणे, निमित्त ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 30 एप्रिल रोजी 100 वा भाग प्रसारित होणार आहे.
यानिमित्त ‘मन की बात’ कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शंभर रुपयांचे नाणे जारी करणार आहेत.
या नाण्यावर एका बाजूला ‘मन की बात 100’ असे लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला ‘मायक्रोफोन 2023’ असे चिन्ह असणार आहे.
-
जालनामध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
अनेक ठिकाणी झाडांची पडझड
वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकांचे हाल
-
मोठी बातमी : रमजान निमित्त गर्दी उसळली, चेंगराचेंगरी 85 जणांचा मृत्यू
रमजान निमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 85 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
येमेनची राजधानी सना येथे धर्मादाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरिबांना आर्थिक मदत दिली जाणार होती.
मात्र, या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक लोकांची गर्दी उसळली. ही गर्दी रोखणे सुरक्षा व्यवस्थेला रोखता आली नाही.
परिणामी प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि यात 85 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 350 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
-
विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये बिघाड
एसी लोकलमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल
प्रवाशांच्या गोंधळामुळे गाडी मधेच थांबली
ही गाडी वारंवार थांबल्याने इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
पश्चिम रेल्वेच्या सात लोकल रद्द करण्यात आल्या
-
उद्या होणार भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी होते भेंडवळची भविष्यवाणी
दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी निष्कर्ष जाहीर होणार
चंद्रभान महाराचांचे वंशज पुंजाजी महाराज अणि सारंधर महाराज निष्कर्ष जाहीर करतील
-
उष्माघाताच्या मृत्यूचे होणार डेथ ऑडीट
नागपूरात 53 प्राथमीक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष
वातानुकूलीत कक्षात पाणी, प्राथमीक कीट, थंडावा निर्माण करणारी फळे यांचा समावेश असणार
केंद्र सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सुचना
उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूला आळा घालण्यासाठी उपाय योजना
-
एलॉन मस्क यांना बसला मोठा फटका
एकाच दिवशी गमावले अब्जावधी
गुरुवारी श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर
मस्क यांच्या कंपनीचे रॉकेट हवेतच विरले
ब्लू टिक काढण्यापूर्वी असा बसला झटका, वाचा सविस्तर
-
मराठा आरक्षणात कुठे कमी पडले हे लोकांना सांगा- संजय राऊत
मराठा आरक्षणात कुठे कमी पडले हे लोकांना सांगा- संजय राऊत
इतर सर्व निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात, निवडणूक आयोगात मॅनेज करतात, मग मराठा आरक्षण का नाही
सीमावादाचा निकाल का लागत नाही
खारघर दुर्घटना कशी घडली हिंमत असेल तर महाराष्ट्राला सांगा
-
नागपुरात अवकाळी पाऊस
नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस शेतात उभे असलेल्या भाजीपाल्याच्या पिकासाठी घातक ठरला. पावसामुळे संत्र्याला आलेला बहर पडून गेला.
-
पुणे बँक पहिल्या क्रमांकावर- अजित पवार
देशाच्या 53 बँका पैकी पुणे जिल्हा बँक भागभांडवलमध्ये पहिला क्रमांक लागतो
ठेवी विचारात घेता देशात आपला पाचवा क्रमांक लागतो
बँकेची मालमत्ता विचारात घेता जिल्हा बँकेचा चौथा क्रमांक लागतो
-
पुणे बँकेचा नफा 351 कोटी 49 लाख
पुणे जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे
पुणे जिल्हा बँक सर्व बाबतीत अग्रेसर आहे
378 कोटी बँकेचे भागभांडवल आहे
बँकेने सर्व प्रकारची कर्ज दिली आहेत
बँकेचा नफा 351 कोटी 49 लाख नफा झाला आहे
-
अजित पवार यांनी मांडला पुणे जिल्हा बँकेचा आढावा
पुणे जिल्हा बँकेचा एकूण निधी २ हजार कोटींपेक्षा जास्त
पुणे जिल्हा बँकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ
बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के
पुणे जिल्हा बँकेचे खेळते भांडवाल मागील वर्षांपेक्षा वाढले
बँकेेचा नफाही वाढला
-
आंब्याची आवक घटली
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील व तसेच महाराष्ट्रातील आंब्याची आवक ही घटली आहे
काल फक्त 18000 पेट्या आंब्यांची आवक झाली होती
गेल्या वर्षी अक्षय तृतीयाला 54 हजार आंब्याच्या पेटीची आवक झाली होती
मात्र अक्षय तृतीयेला महाराष्ट्रातून येणारा आंब्याची आवक 15 ते 16 हजार असणार आहे
-
सोने-चांदीची मोठी घसरगुंडी
ग्राहकांना मिळाला दिलासा
अक्षय तृतीयेपूर्वीच भावात पडझड
खरेदीचा आनंद लुटता येणार
इतकी झाली दोन्ही धातूंत घसरण
शुद्ध सोन्याची अशी पटवा ओळख, वाचा बातमी एका क्लिकवर
-
ऐरोली टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
ऐरोली टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
नवी मुंबईतून कल्याणला जाण्यासाठी तसेच ठाण्याला जाण्यासाठी ऐरोली टोलनाका पार करावा लागतो’
वाहनांच्या लांबच्या लांब लागल्या रांगा
-
छत्रपती संभाजी नगरात पाऊण लाख बाळांच जन्म
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एका वर्षात पाऊण लाख बाळांच जन्म
गेल्या चार वर्षांपासून वर्षभरात जन्मणाऱ्या बालकांची संख्या साडेतीन हजारांनी वाढली
चीनला ही मागे टाकल्यानंतर भारतात लोकसंख्येची वाढली तेजी
दररोज 200 आणि महिन्याकाठी पाच ते सहा हजार मुलांचा छत्रपती संभाजी नगरात होतो जन्म
लोकसंख्येत भारताला एक नंबर वर आणण्यामध्ये छत्रपती संभाजी नगरचा सुद्धा मोठा वाटा
गेल्या चार वर्षांपासून वर्षभरात जन्मणाऱ्या बालकांची संख्या साडेतीन हजारांनी वाढली
चीनला ही मागे टाकल्यानंतर भारतात लोकसंख्येची वाढली तेजी
दररोज 200 आणि महिन्याकाठी पाच ते सहा हजार मुलांचा छत्रपती संभाजी नगरात होतो जन्म
-
महाविकास आघाडीत बिघाडी
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
राष्ट्रवादी चे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याविरुद्ध सर्व पक्षीय एकत्र
भाजपा, शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस सर्वपक्षीय पॅनलमुळे निवडणुकीत रंगत
सध्या बाजार समितीवर राष्ट्रवादीचे अर्थात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व
दोन पॅनल आणि पॅनल विरहित असे 38 जण निवडणूक रिंगणात.
18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात असल्याने नेत्यांची प्रतिष्ठापणाला
-
पुणे जिल्ह्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची 18 उमेदवारांची यादी जाहीर
यामध्ये उद्धव ठाकरे गटाला एकही जागा देण्यात आली नाही
उद्धव ठाकरे गटाला एकही जागा न दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
-
कच्चा तेलाची घसरगुंडी
दरवाढीला लागला ब्रेक
भावात झाली मोठी कपात
पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा
सकाळीच कंपन्यांनी जाहीर केले भाव
आज पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त, बातमी एका क्लिकवर
-
अमरावती | जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका
धारणीमध्ये वादळी वारासह गारपीट आणि पाऊस
धारणी तालुक्यातील अनेक घरांवरील छप्पर उडाले
अंजनगाव तालुक्यात कांदा आणि केळीच्या पिकांचे नुकसान
वरुड तालुक्यातील लोणी हिवरखेड परिसरात पावसामुळे पिकांचे नुकसान
पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
-
नाशिक | अर्ध्या तिकीट दरात प्रवास योजनेला महिलांचा प्रतिसाद
महिनाभरात तब्बल 21 महिलांचा अर्ध्या तिकीट दरात प्रवास
जिल्ह्यातील कळवण डेपोतून सर्वाधिक पावणे तीन लाख महिलांचा प्रवास
पेठ डेपोतून सर्वात कमी 95 हजार महिलांचा प्रवास
-
नाशिक | नाशिक बाजार समिती निवडणुकीत तीन जागा बिनविरोध
15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात
एकूण 97 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
पुढील दोन दिवसांत पॅनल निश्चित होण्याची शक्यता
-
नाशिक | नाशिककरांसाठी आनंदाची बातमी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा झाली हस्तांतरित
नाशिकच्या म्हसरूळ येथे 14 हेक्टर जागा शासनाने करून दिली उपलब्ध
100 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार
430 खाटांचे भव्य रुग्णालय देखील उभारले जाणार
-
कोल्हापूर | राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
आज शेवटच्या दिवशी सतेज पाटील यांची कसबा बावड्यात
तर महाडिक यांची शिरोलीत जाहीर सभा
शेवटच्या सभेतून दोघांकडून घेतला जाणार टिकेचा समाचार
गेल्या पंधरा दिवसापासून सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यात सुरु आहेत आरोपांच्या फैरी
-
उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून 59 जादा गाड्या
सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत, एसटीच्या पुणे विभागाचा निर्णय,
पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड डेपोमधून 16 जादा गाड्या धावत आहेत
शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, बारामती या डेपोंमधून एकूण 59 ज्यादा गाड्या सोडल्या गेल्यात
-
पाचोरा येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर
आज रात्री 8 वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर संजय राऊत यांचे होणार आगमन
उद्या 22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद व दुपारी पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा स्थळाची करणार पाहणी
तर 23 एप्रिल रोजी पाचोरा येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी राहणार उपस्थित
जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटलांसह पाच बंडखोर आमदारांविरोधात एल्गार पुकारण्यासाठी पाचोऱ्याची सभा मालेगावपेक्षाही रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी संजय राऊत सलग तीन दिवस जळगावात
-
अक्षय तृतीयेच्या दिवशी पुणे शहरात 5 सह दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू
नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 22 एप्रिलला सुरू राहणार
राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांचे निर्देश
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांच्या गर्दीमुळे घेण्यात आला निर्णय
-
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाकडून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक
रोमी नेहल आणि विनोद गुरुबानी असं अटक केलेल्या बुकींची नावे आहेत
त्यांच्याकडून सात मोबाईल, एक लॅपटॉप 4500 रोख असा एक लाखाहून अधिक रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय
आयपीएलवर बेटिंग लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पेट्रोलिंग करताना तळेगाव दाभाडे येथे पोलिसांनी ही कारवाई केली
-
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात
राष्ट्रवादी मित्रपक्ष विरुद्ध सर्वपक्षीय थेट लढत
18 जागांसाठी एकूण 57 उमेदवार रिंगणात
राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल विरुद्ध सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीमध्ये थेट लढत
पुढील आठवडाभर हवेली तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी पाहावयास मिळणार
-
परशुराम घाट 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत बंद राहणार, मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
कोकणातील परशुराम घाट 27 एप्रिल ते 3 मे पर्यंत बंद राहणार
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे
परशुराम घाट एका आठवड्यासाठी बंद राहणार
Published On - Apr 21,2023 7:26 AM