Maharashtra Breaking Marathi News Live | कर्नाटकच्या सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, राहुल गांधी यांना न्यायालयाचे समन्स

| Updated on: Jun 15, 2023 | 6:58 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | कर्नाटकच्या सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, राहुल गांधी यांना न्यायालयाचे समन्स
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे. निवडुंगा विठ्ठल मंदिरातून पालखीचं होणार प्रस्थान. पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन. देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशीव दौऱ्यात बदल. आता 16 जून रोजी करणार दौरा. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून होणार सुरुवात. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2023 11:32 PM (IST)

    कर्नाटकच्या सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, राहुल गांधी यांना न्यायालयाचे समन्स

    बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर कर्नाटकातील राजकारण विविध मुद्यांनी ढवळून निघाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका चालू असताना काँग्रेसकडून प्रचार करताना भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावरून आता राजकारण तापले आहे. त्यामुळे आता बंगळुरू न्यायालयाने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपविरोधात खोट्या जाहिराती आणि बदनामीकारक प्रचार केल्याप्रकरणी न्यायालयाकडून तिन्ही नेत्यांविरोधात हे समन्स देण्यात आले आहे.

  • 14 Jun 2023 10:54 PM (IST)

    नाट्यगृहांच्या विकासासाठी  10 कोटी रुपयांची घोषणा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई : खिल भारतीय मराठी नाट्य परिषद च्या कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गो. ब.देवल स्मृतिदिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी शासनाच्यावतीने नाट्यगृहांच्या विकासासाठी  10 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी प्रशांत दामले यांची अध्यक्ष पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.  कलेच्या माध्यमातून मराठी कलाकार राज्याची सेवा केली असल्याचे सांगत मराठी कलाकारांचे त्यांनी कौतुकही केले.  मराठी रंगभूमी ही वेगवेगळ्या कलाकारांनी कला जोपासत तिची सेवा करत ही परंपरा वाढवले असल्याचे मतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

  • 14 Jun 2023 10:03 PM (IST)

    जाहिरातीत एवढा गोंधळ तर सरकार चालवताना केवढा गोंधळ ; रोहित पवार

    पुणे : शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन दिवसांच्या जाहिरातीमुळे आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही सरकारवर टीका करण्यात आली आहे. सरकारच्या या जाहिरातीमुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाल्याचीही चर्चा केली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावरही विरोधकांकडून टीका केली जात असून आमदार रोहित पवार यांनी सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ चालू असल्याची खोचक टीका केली आहे. जाहिरातीत एवढा गोंधळ तर सरकार चालवताना केवढा गोंधळ आहे असं म्हणत या सरकारकडून जनतेच्या कामापेक्षा सरकारने आपल्याच जाहिरातीवर वारेपमाफ खर्च केल्याचा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

  • 14 Jun 2023 09:55 PM (IST)

    श्रीकांत शिंदे खरंच दिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आले? पाहा नेमकं काय म्हणाले

    नवी दिल्ली : खासदार श्रीकांत शिंदे हे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. श्रीकांत शिंदे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले असल्याची चर्चा समोर आलेली. पण शिंदे यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला गेलो होतो. या दरम्यान आपण कुणाचीदेखील भेट घेतली नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

  • 14 Jun 2023 09:30 PM (IST)

    आशिष शेलार यांची भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत टिफीन पार्टी

    नाशिक : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये आशिष शेलार यांची भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत टिफीन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. शेलार टिफीन खात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत आहेत. या टिफीन पार्टीसाठी महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरून टिफीन आणले आहेत. नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या पार्टीचं आयोजन केलं आहे. अशोका मार्गवरील बँक्वेट हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 14 Jun 2023 09:17 PM (IST)

    जाहिरात वादानंतर शिंदे-फडणवीस पहिल्यांदाच एकत्र येणार

    मुंबई : जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. पालघरमध्ये उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. हा वाद ज्यादिवशी निर्माण झाला त्यादिवशी शासन आपल्या दारी या उपक्रमाचा मोठा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेला. पण फडणवीसांनी त्यादिवशी कोल्हापूर दौरा टाळला होता. त्यानंतर आता दोन्ही नेते उद्या समोरासमोर येणार आहेत.

  • 14 Jun 2023 08:57 PM (IST)

    Cyclone Biparjoy | बिपरजॉय चक्रीवादळामुळे द्वारका मंदिर 15 जूनपर्यंत बंद

    गांधीनगर |  बिपरजॉय चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज आहेत. बिपरजॉय वादळाचा धोका हा गुजरातला आहे. प्रशासनाकडून कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर 15 जूनपर्यंत बंद राहणार आहे.

  • 14 Jun 2023 08:43 PM (IST)

    Narendra Modi Bhopal Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी भोपाळ दौऱ्यावर

    भोपाळ | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी भाजप-काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मध्यप्रदेश दौऱ्यावर येण्याचं प्रमाण वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी मध्य प्रदेशात येत आहेत. मोदी प्रथम धार येथे जातील. मोदी धार इथे आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर मोदी भोपाळला पोहोचतील. तिथे मोदी जबलपूर ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

  • 14 Jun 2023 08:37 PM (IST)

    Nitish Kumar On Lok Sabha Eletion 2024 | लोकसभेच्या निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात’, नितीश कुमार यांचं वक्तव्य

    नितीश कुमार यांच्या आवाहनानंतर 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यात काँग्रेस नेते राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. या बैठकीपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार यांनी लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासोबतच प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  • 14 Jun 2023 08:25 PM (IST)

    Eknath Shinde Msrtc Employees DA | एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मुंबई | राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा मुख्यंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

  • 14 Jun 2023 08:19 PM (IST)

    Cyclone Biporjoy | अहमदाबादच्या काही भागात मुसळधार पाऊस

    अहमदाबाद | बिपरजॉय या विनाशकारी चक्रीवादळाचा प्रभाव अहमदाबादमध्येही दिसून आला आहे. वादळामुळे अहमदाबादच्या अनेक भागात आज संध्याकाळी पाऊस झाला. अहमदाबादच्या पश्चिम भागात पाऊस झाला आहे. वस्त्रापूर, घाटलोडिया, जोधपूरसह परिसरात अचानक पाऊस झाला.

  • 14 Jun 2023 07:58 PM (IST)

    आसाममध्ये पुरामुळे हैदोस, अनेक कुटुंब झालीत बेघर

    आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुत्रा नदीसह तिच्या उपनद्यांनाही पूरस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे राज्यातील 3 हून अधिक जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. आतापर्यंत दारंग, बिस्वनाथ आणि लखीमपूर जिल्ह्यातील हजारो लोक 5 हून अधिक बंधारे तुटल्यामुळे बेघर झाले आहेत.

  • 14 Jun 2023 07:48 PM (IST)

    उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी-

    उद्धव ठाकरेंना जर भाजपसोबत यायचं असेल तर त्यासाठी भाजपची दारं कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी, आम्ही उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत गेल्याची टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

    ज्यांचे चार खासदार आहेत ते पंतप्रधान पदाची स्वप्न पाहात आहेत. शरद पवारांवर जोरदार टीका, जे 50 खासदार निवडून आणू शकत नाहीत ते मोदींना रोखण्याससाठी एकत्र येत आहेत. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचंही केशवप्रसाद मोर्या म्हणाले. विरोधी पक्षाच्या बैठकीवर बोलताना मोर्या यांनी निशाणा साधला.

  • 14 Jun 2023 07:32 PM (IST)

    गुजरातमधील 50,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

    गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत राज्याच्या किनारपट्टी भागातून सुमारे 50,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तिन्ही सेना प्रमुखांशी चर्चा केली आणि ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेतला.

  • 14 Jun 2023 07:25 PM (IST)

    फेरीवाले आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट

    अंबरनाथमध्ये फेरीवाले आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. जप्त केलेलं साहित्य पुन्हा उचलून नेत असल्यानं झाला वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • 14 Jun 2023 07:11 PM (IST)

    मुंबईतील ठाकरे गटाला पडणार खिंडार

    संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांच्या मतदार संघातील 2 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत. सुनिल राऊतांच्या मतदार संघावर शिंदे गटाची नजर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या सगळ्यात जुन्या नगरसेविका आणि नेत्या सुवर्णा करंजे आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समजत आहे. नरेश म्हस्के यांच्याकडे ठाकरे गटाच्या नगरसेवकांना फोडण्याची महत्वाची जबाबदारी सोपवल्याची माहिती आहे.

  • 14 Jun 2023 07:00 PM (IST)

    लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात उद्या आरोपपत्र दाखल होणार?

    कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी दिल्ली पोलीस उद्या भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात. बृजभूषण शरण सिंग यांनी अनेक वर्षांपासून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.

  • 14 Jun 2023 06:55 PM (IST)

    मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना समन्स

    भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले आहेत.

  • 14 Jun 2023 06:52 PM (IST)

    अंतर्वस्त्रातून 1.07 कोटी रुपयांचे सोने घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

    लखनौच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतर्वस्त्रात 1.07 कोटी रुपयांचे सोने ठेवल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. शारजाहून येणाऱ्या दोन्ही तरुणांची सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांच्या अंतर्वस्त्रात लपवलेले सोने जप्त करण्यात आले.

  • 14 Jun 2023 06:44 PM (IST)

    बिपरजॉय : संरक्षण मंत्री राजनाथ यांनी तिन्ही लष्करप्रमुखांशी साधला संवाद

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सेना प्रमुखांशी बोलून ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सैन्य दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला. चक्रीवादळामुळे कोणत्याही परिस्थितीला किंवा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिक आणि अधिकाऱ्यांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यासाठी सशस्त्र दलांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

  • 14 Jun 2023 06:39 PM (IST)

    राजस्थानच्या जालोरमध्ये बिपरजॉयचा प्रभाव

    बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातही दिसून येत आहे. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जोधपूरहून एसडीआरएफची टीम जालोरला पोहोचली आहे.

  • 14 Jun 2023 06:30 PM (IST)

    शरद पवार यांना धमकी देणाऱ्या बर्वेला 14 दिवसांची कोठडी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 28 जूनपर्यंत सागर बर्वे न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

  • 14 Jun 2023 06:24 PM (IST)

    नावेद हसन मुश्रीम 2 दिवसात ईडीसमोर हजर राहणार?

    आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या मुलाची चौकशी होणार आहे. समन्स देऊनही उत्तर आलं नाही असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. अटकेच्या भीतीने पळापळ सुरु असा दावाही वकिलांनी कोर्टात केला होता. मुश्रीफ यांच्या मुलांनी तपासात सहकार्य करावं असे आदेश त्यानंतर कोर्टाने दिले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

  • 14 Jun 2023 06:14 PM (IST)

    विखेंच्या संस्थेला झाकीर नाईककडून 5 कोटी – संजय राऊत

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थेला इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईककडून पाच कोटी रुपये मिळाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय पाटलांच्या आरोपावर विखे पाटलांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. चौकशीला तयार असल्याचं विखे पाटील यांनी पलटवार केला आहे.

  • 14 Jun 2023 06:09 PM (IST)

    सीबीआय-ईडीचे नाव बदलून ‘भाजप सेना’ ठेवावे – मुख्यमंत्री केजरीवाल

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय आणि ईडीवर निशाणा साधत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सीबीआय-ईडीचे नाव बदलून ‘भाजप सेना’ करण्यात यावे, असे ते म्हणाले. सीएम केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एकेकाळी एजन्सींचा आदर केला जात होता. आज या एजन्सी भाजपचे हत्यार बनल्या आहेत.

  • 14 Jun 2023 06:03 PM (IST)

    जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागात भूकंपाचे धक्के, 3.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता

    गुजरातच्या कच्छ आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 मोजण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी गुजरातमधील कच्छमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बचावकार्याच्या नैऋत्येला 5 किमी अंतरावर होते. दुपारी 4.15 वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भागातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

  • 14 Jun 2023 05:59 PM (IST)

    नाविद मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता

    हसन मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणात त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत नाविद मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहू शकतात.

  • 14 Jun 2023 05:50 PM (IST)

    रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 16 जून रोजी शेतकरी प्रश्नावर ते मुंबईमध्ये आंदोलन करणार होते. पण या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना बुलढाण्यात ताब्यात घेतले आहे.

  • 14 Jun 2023 05:45 PM (IST)

    मुख्यमंत्री सुरक्षित वाटत नाहीत -जयंत पाटील

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरक्षित वाटत नाही. त्यांच्यावर दबाव असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे. शिंदे यांना घाबरविण्याचे काम सुरु आहे का, असा सवाल ही त्यांनी विचारला. दोन्ही पक्षात भांडण, मतभेद सुरु असल्याचे हल्लाबोल त्यांनी भाजपवर चढवला.

  • 14 Jun 2023 05:42 PM (IST)

    पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये

    पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ठिकाणी 52 नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच जलद न्यायदान प्रक्रियेला गती मिळावी यासाटी जलगती न्यायालयाने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

  • 14 Jun 2023 05:37 PM (IST)

    आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, उपक्रम राबविणार

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, उपक्रम राबविणार. दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ देण्यात यावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • 14 Jun 2023 05:25 PM (IST)

    आप्पासाहेब जाधव यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

    बीड जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आप्पासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आप्पासाहेब जाधव यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारल्याचा दावा केला होता. त्यानंतर जिल्हाप्रमुख पदावरुन पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती.

  • 14 Jun 2023 05:15 PM (IST)

    राज्यात शिवकालीन थीम पार्क उभारणार 

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी राज्यात शिवकालीन थीम पार्क उभारण्यात येणार आहे. पर्यटकांना आणि शिवप्रेमींना शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शिवनेरी, गोराई, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), नाशिक व रामटेक या ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय आणि शिवकालीन थिम पार्क उभारणार अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

  • 14 Jun 2023 05:03 PM (IST)

    नागपूरकरांना वंदे भारतचे गिफ्ट

    वंदे भारत एक्सप्रेस भारताच्या रेल्वे नकाशावर झपाट्याने आगेकूच करत आहे. देशातील विविध राज्यांकडून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत आहे. अनेक राज्यात ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांच्या या रेल्वेवर उड्या पडल्या आहेत. सध्या ही रेल्वे 17 मार्गावर धावत आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी ही पहिली वंदे भारत रेल्वे धावली होती. वंदे भारत रेल्वेचा प्रवास अद्भूत आणि आलिशान आहे. वंदे भारत एक्सप्रेस पूर्वी नागपूर ते विलासपूर (Nagpur-Bilaspur) धावली होती. पण प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने डब्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता नागपूरकरांना पुन्हा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल. आता सिंकदराबाद मार्गावर ही रेल्वे धावेल. नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल.

  • 14 Jun 2023 04:53 PM (IST)

    आकाशवाणीचा पुणे वृत्तविभाग बंद करू नये – खासदार सुप्रिया सुळे

    – आकाशवाणीचा पुणे वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पुणे वृत्त विभाग बंद करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे. पुणे वृत्त विभाग बंद करण्याऐवजी अधिक सक्षम करण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुणे वृत्त विभाग विभाग बंद केल्यास श्रोत्यांची गैरसोय होईल असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर म्हटले आहे. आकाशवाणीचा पुणे वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. त्यासंदर्भातील वृत्त आज वर्तमान पत्रात आले आहे.

  • 14 Jun 2023 04:40 PM (IST)

    अमित शहा यांचा तेलंगणा दौरा पुढे ढकलला

    देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा तेलंगणा राज्याचा 15 जून रोजीचा दौरा पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या बिपरजॉय चक्री वादळामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. बिपरजॉय चक्री वादळा गुरुवारी सकाळी गुजरातच्या मांडवी- जाखू बंदरात पोहचण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरील 40 हजार नागरीकांना हलविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

  • 14 Jun 2023 03:56 PM (IST)

    डोंबिवलीत वीजेच्या खांबाचा शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू

    विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने डोंबिवली कोपर रोड परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मांगीलाल मोरे असे मयत इसमाचे नाव असून काल रात्री घरी जात असताना जिन्यावर चढताना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

    केडीएमसी व एमएसीबीच्या हलगर्जीपणामुळे व वीजेच्या खांब्यावरील उघड्या वायरीमुळे लोखंडी जिन्यावर चढताना शॉक लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हलगर्जी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी स्टेशन रोडवर रस्ता रोको केला. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली.

  • 14 Jun 2023 03:52 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसची २० जून रोजी महत्वाची बैठक

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २० जून राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

  • 14 Jun 2023 03:49 PM (IST)

    कापूस प्रश्नावर जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते झाले आक्रमक

    शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याने जळगाव मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस झाली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

    जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कापसाबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतला आहे

  • 14 Jun 2023 03:41 PM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे गृहमंत्री अमित शहांचा तेलंगणा दौरा रद्द

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणचा दौरा रद्द केला आहे. गृहमंत्री सतत या चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहेत. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमित शहा यांची सभा होणार होती.

  • 14 Jun 2023 03:32 PM (IST)

    यंदा चांगला पाऊस पडू दे , विठ्ठलाला घातलं साकडं – सुप्रिया सुळे

    यंदा चांगला पाऊस पडू दे असं शेतकऱ्यांसाठी साकडं आणि मागणं विठ्ठलाला घातलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी काम करत राहते मी कधीच थकत नाही, असं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे वडकी नाला इथून वारीत सहभागी झाल्या होत्या.

    विरोधकांना सुबुद्धी मिळावी म्हणून साकडं घालणार का ? या प्रश्नावर राम कृष्ण हरी म्हणत त्यांनीराजकीय विषयावर बोलणं टाळलं.

  • 14 Jun 2023 03:18 PM (IST)

    पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर

    पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिकेा प्रशासनाचे काम जोरदार सुरू झाले आहे. पेठांमधील ३० धोकादायक वाडे जमीनदोस्त करण्यात आले असून ५८ वाड्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे.

    तसेच पालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. १० जूनपर्यंत ३० धोकादायक वाडे बांधकाम विभागाने जमीनदोस्त केले. पालखी सोहळ्यामुळे तीन दिवस काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • 14 Jun 2023 03:06 PM (IST)

    CBI-ED चे नाव बदलून‘भाजप सेना’ असे ठेवले पाहिजे – अरविंद केजरीवाल

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय आणि ईडीवर निशाणा साधत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सीबीआय-ईडीचे नाव बदलून ‘भाजप सेना’ असे ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.

    केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. एकेकाळी एजन्सींचा आदर केला जात होता. आज या एजन्सी भाजपचे शस्त्र बनल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

  • 14 Jun 2023 03:02 PM (IST)

    शिवसेनेच्या नऊ लोकांचा उदो उदो चाललायं- अजित पवार

    शिवसेनेच्या जाहिरातीवरून अजित पवारांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत नऊ मंत्र्यांची नावे छापून आली, त्यावर शिवसेनेच्या नऊ लोकांचा उदो उदो चाललायं असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. या सोबतच 24 तासात शिंदे सरकारला बॅकफूटवर यावं लागलं असेही अजित पवार यावेळी म्हणाले

  • 14 Jun 2023 02:53 PM (IST)

    ठाण्यामध्ये कोणा कोणाला संरक्षण दिलं जातयं?- अजित पवार

  • 14 Jun 2023 02:44 PM (IST)

    जाहिरातीसाठी देण्यात आलेला पैसा कुणी दिला? – अजित पवार

    वृत्तपत्रात देण्यात आलेल्या शिवसेनेच्या जाहितारीवरून शिवसेनेची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वृत्तपत्रात देण्यात आलेली जाहिरात हितचींतकाने दिली असे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले असले तरी या जाहिरातीसाठी नेमका कुणी खर्च केला हे जनतेला कळायला हवे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

  • 14 Jun 2023 02:33 PM (IST)

    निवडणूका लावल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल- अजित पवार

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आजही वर्तमान पत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीवरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. आजच्या जाहिरातीत नऊ मंत्र्यांची नावे प्रकाशीत करण्यात आलेली आहेत. यावरून काही वादग्रस्त मंत्र्यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला जर तुमच्या पक्षाबद्दल इतका विश्वास असेल तर मग निवडणूकीला सामोरं जा असेही अजित पवार म्हणाले. निवडणूका लावल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

  • 14 Jun 2023 02:32 PM (IST)

    74 टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको आहेत का? जाहिरातीवरून अजित पवारांचा प्रश्न

    काल एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दर्शवणारी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशीत करण्यात आली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकप्रियतेची टक्केवारी देण्यात आली होती. यावरून अजित पवारांनी प्रश्न उपस्थित करत 74 टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको आहेत का असा तर्क लावला. तसेच आज देण्यात आलेली जाहिरात म्हणजे कालच्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

  • 14 Jun 2023 02:09 PM (IST)

    कालच्या जाहिरातीवर उत्तरं हवी होती- अजित पवार

    काल काही वर्तमान पत्रात एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबद्दल जाहिरात पाहण्यात आली. या जाहिरातीवरून अनेकांनी आपआपली मते मांडण्यास सुरूवात केली आहे. यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वगळण्यात आल्याने यांनी काल टिका केली होती तर, दुसरीकडे प्रवीण दरेकर यांचादेखील नाराजीचा सुर दिसला. आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. कालच्या जाहिरातीवर उत्तरं द्यायला हवी होती असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

  • 14 Jun 2023 01:59 PM (IST)

    दौंड: पालखी सोहळ्यासाठी यवत नगरी सज्ज, मोबाईल चार्जिंग आणि आंघोळीची व्यवस्था

    संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी सध्या गावोगावी सुरू आहे. 15 जूनला पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवतमध्ये मुक्कामी येत असल्याने या सोहळ्याच्या तयारीसाठी दौंड तालुक्यातील यवत नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण गावकरी आणि ग्रामपंचायतच्या वतीने पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पालखी यवतमध्ये मुक्कामी येत असल्याने एकाच वेळी हजार महिला आणि पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र आंघोळीची सोय करण्यात आलीय. मोबाईलसाठी चार्जिंगची खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

  • 14 Jun 2023 01:53 PM (IST)

    महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे संजय राऊत यांच्यावर आरोप

    संजय राऊत यांचा मानसिक संतुलन बिघडलंय. आधारहीन आरोप करण्याची त्यांची सवय. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कुठेही द्यावे. आम्ही चौकशीला घाबरणार नाही. स्फोटक विधान करून लोकप्रियता मिळवण्याची राऊत यांची धडपड, आपल्या मालकाला खुश करण्याचा त्यांचा हा प्रयत्न. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे संजय राऊत यांच्यावर आरोप.

  • 14 Jun 2023 01:50 PM (IST)

    कापूस प्रश्नावर जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

    शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याने जळगाव मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे मुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कापसाबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतला आहे.

  • 14 Jun 2023 01:47 PM (IST)

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कोणताच विसंवाद नाही- राधाकृष्ण विखे पाटील

    जाहिराती संदर्भात प्रशासकीय पातळीवर चूक झाली आहे का हे मला माहित नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कोणताच विसंवाद नाही. पूर्ण क्षमतेने राज्य सरकार जनतेसाठी काम करतंय. आपल्या काळातील अपयश झाकण्यासाठी विरोधक आज टिका करतायत. सरकारची लोकप्रियता वाढली हे देखवत नाही. जाहिरातीचा संदर्भ जोडून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मात्र तसे काही नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सेनेच्या जाहिरातीवर वक्तव्य.

  • 14 Jun 2023 01:42 PM (IST)

    आदिशक्ती मुक्ताई मंदिरात विठ्ठल नामाचा जयघोष

    आदिशक्ती मुक्ताई मंदिरात आज योगिनी एकादशीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदीयाळी. मुक्ताई मंदिरात सकाळपासून लांबच लांब भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. आषाढी वारीच्या आधी असलेल्या योगिनी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या राज्यभरातील भाविक मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी येत असतात. यावेळी आदिशक्ती मुक्ताई मंदिरात विठ्ठल नामाचा जयघोष सुरू.

  • 14 Jun 2023 01:35 PM (IST)

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अजब कारभार

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अजब कारभार. मराठी माध्यमाच्या पेपर मध्ये हिंदी आणि मराठी भाषेत प्रश्न. काही प्रश्न मराठीत तर काही प्रश्न हिंदीमध्ये आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण. पत्रकारिता विभागाच्या परीक्षेतील धक्कादायक प्रकार. पत्रकारिता विभागाच्या ॲडव्हर्टायझिंग मीडिया या मराठी पेपरमध्ये प्रश्न क्रमांक तीन, चार,पाच व सहा प्रश्न क्रमांक 7 मधील सर्व टिपणी लिखाणाचे प्रश्न हिंदी भाषेत देण्यात आले. विद्यार्थी पोहचले अमरावती विद्यापीठात.

  • 14 Jun 2023 01:29 PM (IST)

    सरकारची प्रतिमा कोण खराब करू पाहतंय त्याला शोधलं पाहिजे- चंद्रशेखर बावनकुळे

    कालचा खोडसाळपणा दूर करण्यासाठी आजची जाहिरात. शिवसेनेच्या जाहिरातीचा विषय आता संपला. सरकारची प्रतिमा कोण खराब करू पाहतंय त्याला शोधलं पाहिजे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य.

  • 14 Jun 2023 01:25 PM (IST)

    सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी जाहिरात छापली का?- चंद्रशेखर बावनकुळे

    संजय राऊतांवर बोलणार नाही, राऊतांना राणे उत्तर देतील. सेनेच्या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्त्यांचं मन दुखावलं. शिंदे-फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी आहे. जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते नाराज. सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी जाहिरात छापली का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. भविष्यात असं होऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदेंशी बोललो.

  • 14 Jun 2023 01:20 PM (IST)

    घणसोली मनसेच्या वतीने विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा

    घणसोली पाणी पुरवठा अधिकारी निलेश मोरे यांच्या विरोधात विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा. नवी मुंबई महानगर पालिकेकडून गेली चार महिने घणसोलीतील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत आहे. घणसोली मनसेच्या वतीने विभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. मोर्चा वेळी घणसोली मधील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

  • 14 Jun 2023 01:13 PM (IST)

    आम्ही बोलताना काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी- शंभूराज देसाई

    बेताल वक्तव्य कुणी करत असेल तर बरोबर नाही. आम्ही बोलताना काळजी घेतो, भाजपनेही घ्यावी. अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावीत. अनिल बोंडे यांच्या टीकेवर शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर.

  • 14 Jun 2023 01:07 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटतो- अनिल बोंडे

    शिवसेनेच्या जाहिरातीवर अनिल बोंडे यांची टीका. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही. शिंदेंचा सर्व्हे ठाण्यापुरता मर्यादित होता का? भाजप खासदार अनिल बोंडे यांची जहरी टीका. एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटतो. मुख्यमंत्री शिंदेंवर भाजप खासदाराची टीका.

  • 14 Jun 2023 12:57 PM (IST)

    पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर

    पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे. पेठांमधील ३० धोकादायक वाडे जमीनदोस्त तर ५८ वाड्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.. १० जूनपर्यंत ३० धोकादायक वाडे बांधकाम विभागाने जमीनदोस्त केले आहेत. पालखी सोहळ्यामुळे तीन दिवस काम थांबवण्याचा निर्णय देखील पालिकेकडून घेण्यात आला आहे…

  • 14 Jun 2023 12:45 PM (IST)

    दिवे घाटात माऊलींच्या पालखीला जोडली जाणार आणखी एक बैलजोडी

    दिवे घाटात माऊलींच्या पालखीला आणखी एक बैलजोडी जोडली जाणार आहे. बैलजोडीचा मान मिळाला म्हस्कु तुकाराम झेंडे या शेतकऱ्याच्या बैलजोडीला मिळाला आहे. लक्ष्या आणि सुंदर असं बैलजोडीचं असं बैलजोडीचं नाव आहे. लक्ष्मीची जोडी असल्याची शेतकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे..

  • 14 Jun 2023 12:40 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, डॉक्टरांकडून सल्ला

    देवेंद्र फडणवीस यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. फडणवीस यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे… कानाला त्रास होत असल्यामुळेल फडणवीसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.. शिवाय प्रवास टाळण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी फडणवीस यांना दिला आहे..

  • 14 Jun 2023 12:36 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांच्या फोटोसह शिवसेनेची सुधारित जाहिरात

    शिवसेनेच्या सुधारित जाहिरातीत शिंदे – मोदींसह फडणवीसांचा फोटो देखील दिसत आहे… सेनेच्या जाहिरातीत आता बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, अमित शाहा यांचा फोटो देखील दिसत आहे.. शिंदे – फडणवीस नेतृत्त्वाला ४९.३ टक्के जनतेचा आशीर्वाद असल्याचा दावा सेनेकडून करण्यात आला आहे…

  • 14 Jun 2023 12:31 PM (IST)

    खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतले माऊलींच्या पालखीचे दर्शन

    खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतले माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले आहे. ज्यामुळे सर्वत्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची चर्चा रंगली आहे… यावेळी आमदार चेतन तुपेंसोबत खासदार कोल्हेनी फुगडी खेळत वारकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाले.. अमोल कोल्हेनी खांद्यावर भगवा झेंडा घेत काही अंतर पायी चालत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला…

  • 14 Jun 2023 12:29 PM (IST)

    उल्हासनगरात चुकीच्या औषधांमुळे दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू?

    उल्हासनगरात चुकीच्या औषधांमुळे दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची चर्चा रंगत आहे. ज्यमुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे.. आरोग्य विभागाचा हलगर्जीपणाचा असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे… डॉक्टर मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया नकार देत आहेत..

  • 14 Jun 2023 12:11 PM (IST)

    खासदार श्रीकांत शिंदे राजधानी दिल्लीत… अनेक चर्चांना उधाण

    राज्यात एकीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना राज्यातील विविध वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे काल रात्रीच राजधानी दिल्ली इथं दाखल झाले, रात्री त्यांनी भाजपच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या संदर्भात खासदार शिंदे यांनी या सगळ्या अफवा असून मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीत आलोय असं सांगितलंय…

  • 14 Jun 2023 12:03 PM (IST)

    राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरात महाआरती..

    औरंगाबाद | राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजी नगरात महाआरती करण्यात आली आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हनुमानाला नवस केला आहे.. सुपारी हनुमानाला मनसे सैनिकांकडून राज ठाकरे मुख्यमंत्री बनावेत असा नवस करण्यात आला आहे.. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करण्यात आली आहे..

  • 14 Jun 2023 11:57 AM (IST)

    बृजनभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ४ महिला पहिलवानांनी दिले पुरावे

    कुस्ती महासंघांचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 4 पीडित महिला पहलवानांनी पोलिसांना पुरावे दिले आहेत. या पुराव्यात ऑडिओ आणि व्हिडीओचा समावेश आहे. मात्र, या पुराव्यावरून बृजभूषण शरणसिंह यांच्यावरील आरोप सिद्ध होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. येत्या १५ जूनला या प्रकरणात दिल्ली पोलिस न्यायालयात चार्जशीट दाखल करणार आहे.

  • 14 Jun 2023 11:01 AM (IST)

    नाशिकमध्ये आगामी सिंहस्थाच्या पार्शवभूमीवर नाशिक-त्रंबकेश्वर मेट्रो सुरू करा

    आगामी सिंहस्थाच्या पार्शवभूमीवर नाशिक-त्रंबकेश्वर मेट्रो सुरू करा, अशी मागणी काँग्रेस नेते राजाराम पानगव्हाणे यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सिंहस्थात येणारे साधू महंत आणि त्रंबकेश्वरच्या वारकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. नाशिक त्रंबकेश्वर वाहतूक देखील सुरळीत होणार असल्याचा दावा केला आहे. शहरातील रखडलेले कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.

  • 14 Jun 2023 10:47 AM (IST)

    नांदेडच्या मु्स्तापूर गावात तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई

    नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुस्तापूर गावात गेल्या तीन महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिकांसह बालकांना देखील पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. लहान बालक, महिला यांना या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुस्तापूर गावातील गावकऱ्यांचा अख्खा दिवस पाणी आणण्यात जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय.

  • 14 Jun 2023 10:45 AM (IST)

    शिवसेनेच्या जाहिरातीवर आमदार रोहित पवार यांची ट्विटवरुन टीका

    इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी, असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

  • 14 Jun 2023 10:42 AM (IST)

    बुलढाण्यात कारमध्ये संशयास्पद वस्तू, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात वाहनाच्या तपासणीसाठी नाकाबंदी सुरु होती. यावेळी एक तेलंगाणा राज्यातील स्विफ्ट डिझायर कंपनीची पांढरी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाहतूक शाखेने पाठलाग करून सदर कारला अडवून ताब्यात घेत कारची तपासणी केली. तपासणीदरम्यान 2 तलवारी, पेट्रोल बॉटल आणि लाकडी काठी मिळून आली. यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमधील एक जण पंजाब राज्यातील तर दुसरा हा आंधरप्रदेशातील आहे.

  • 14 Jun 2023 10:39 AM (IST)

    कोल्हापूर शहरात पाणी टंचाई

    कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात यावर्षी कमालीची घट झाली आहे. परिणामी कोल्हापूर शहराला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीमध्ये पाटबंधारे विभागाने दिवसा बंदी लागू केल्याने उद्यापासून कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय शहरातील अनेक उपनगरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. 51 टँकरच्या सहाय्याने सध्या कोल्हापूर उपनगरात पाणीपुरवठा सुरू असून चार ते पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या टँकरचं पाणी भरण्यासाठी नागरिकांची देखील झुंबड उडतेय.

  • 14 Jun 2023 10:38 AM (IST)

    यवतमाळ शहरात बीआरएसकडून पोस्टरबाजी

    लुटणाऱ्याच्या हातात सत्ता देणार नाही अशा आशयाचे पोस्टर लावत बीआरएसने सरकार विरोधात आघाडी उघडली आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी होर्डिंग लावले. उद्याला नागपूरमध्ये चंद्रशेखर राव यांचा दौरा असून, त्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

  • 14 Jun 2023 10:27 AM (IST)

    सांगलीत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

    सहकाऱ्याच्या घरी पार्टी केल्यानंतर पोहोयला गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील सोनीमधील घटना घडली. होमगार्ड चालकांची परिक्षा घेण्यासाठी गेले होते. परीक्षा संपल्यानंतर सहकाऱ्यासोबत पार्टी केली आणि मग शेततळ्यात पोहायला गेले. यावेळी ही घटना घडली.

  • 14 Jun 2023 10:24 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात वर्षभरात 44 बालकांचा गुदमरून मृत्यू

    नागपूर जिल्ह्यात एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षभरात 1381 बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी 44 बालकांचा घरीच मृत्यू झालाय. या 44 बालकांचा दूध पाजताना निष्काळजीपणा झाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे. “अन्ननलीका आणि श्वासनलिका जवळ असते, बाळाला झोपून दूध पाजल्यास, बाळाला स्वास घ्यायला त्रास होतो आणि अशावेळेस गुदमरून बाळासा मृत्यू होतो. शिवाय दूध पाजल्यानंतर दूध अन्ननलिकेत गेल्यास बाळाचा मृत्यू होतो. नागपूर जिल्ह्यात झालेल्या घटनांमध्ये साम्य आहे” अशी माहिती ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

  • 14 Jun 2023 10:13 AM (IST)

    भाजप-शिवसनेत काही आलबेल नाही – संजय राऊत

    शिंदे गटाच्या मनात काय हे कालच्या जाहिरातीनं स्पष्ट झालं आहे. 24 तासात असं काय झालं की शिंदे महाराष्ट्रातून गेले. फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहीरात झळकली. भाजप-शिवसेनेत आलबेल नाही. मुख्यमंत्री काश्मीरला जाऊन आले. काश्मीरच्या हॉटेलमध्ये शिंदेंची कुणासोबत चर्चा झाली ते माहित आहे. शिवसेनेची जाहीरात देणारा हितचिंतक नाही शत्रू आहे. महाराष्ट्रात वाहणारं वारं कानात शिरलं की कान दुखतो. फडणवीस नाराज असतील तर त्यांची नाराजी समजून घेतली पाहिजे. संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.

    राहुल कुल, दादा भुसेंविरोधात ईडीकडे तक्रार केली, मात्र कारवाई नाही. दादा भुसेंचा 178 कोटींचा घोटाळा आहे. राहुल कुल यांच्यासोबत 500 कोटींचा घोटाळा आहे. राधाकृष्ण विखे पाटलांबाबत मी अधिकची माहिती ईडीला देणार आहे. विखे-पाटलांवर कारवाई होते का हे आम्ही पाहू. ईडीमुळेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे.

  • 14 Jun 2023 10:10 AM (IST)

    दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागते – सुप्रिया सुळे

    42 टक्के त्याच्या बाजूने आहे याचा अर्थ जास्त लोक विरोधात, वेल मी विशरच्या शोधात आहे. आज जाहिरात बदलावी लागते. दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागते. पीएमसीकडे पाणीबाबत वारंवार आम्ही मागणी करतोय. गेल्या एक वर्षीत आम्ही अनेकदा भेटलो. आमचा विरोध मेट्रोला नाही, पण पाण्यासाठी पैसे नाहीत. कशाला महत्व द्यायचे कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आंनी केली आहे. सरकार निवडणूक घ्यायला घाबरत आहे. कोणी तरी कुठला डोस दिला की त्यामुळे जाहिरात फोटो पण लावले आहेत. राज्याच्या कामात सरकारचं लक्ष नाहीच. सरकार येऊन मोठा कुठला बदल झाला आहे.

    देवेंद्र फडणवीस यांचा अपमान झाला आहे. आमचे विरोधक असले तरी शिंदे गटाने त्यांचा अपमान केला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. एवढा अपमान झाल्यानंतर का जावं कार्यक्रमाला? वारकरी लाठीचार्जची सविस्तर चौकशी व्हावी याची मागणी करणार, गृहखात काय करतंय प्रश्न उपस्थितीत राहतोय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 14 Jun 2023 10:00 AM (IST)

    यवतमाळ- जिल्ह्यातील 4 कृषी केंद्रावर परवाने निलंबनाची कारवाई

    यवतमाळ जिल्ह्यातील 4 कृषी केंद्रावर परवाने निलंबनाची कारवाई झाली आहे. कृषी विभागाच्या सुनावणीत दोषी आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कीटकनाशक साठ्यात खोडतोड, साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई झाली. या कारवाईने कृषी चालकाचे धाबे दणाणले आहेत.

  • 14 Jun 2023 09:56 AM (IST)

    चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकण्याचा अंदाज

    अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकतं. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे 150 किलोमीटर प्रती तास इतका राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरात नुकसान होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

  • 14 Jun 2023 09:49 AM (IST)

    कडक उन्हाळा आणि लांबलेल्या मोसमी पावसामुळे कोयना धरण पडले कोरडे

    यंदाचा कडक उन्हाळा आणि लांबलेल्या मोसमी पावसामुळे कोयना धरण कोरडे पडले आहे. धरणात मंगळवारी फक्त 7.12 टीएमसी (7 टक्के) पाणीसाठा होता. कोरड्या पडलेल्या पात्रातील गाळालाही भेगा पडल्या आहेत. या पाण्यावर ये-जा करणाऱ्या बोटीसुद्धा काठावर नांगरून पडलेल्या दिसतात.

  • 14 Jun 2023 09:42 AM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडात एकाच कुटुंबावर काळाचा घाला

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडात एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला. सविता मोरे, आठ वर्षीय कुशल मोरे या माई-लेकाचा आणि रितेश कोशिरे या नातेवाईकाचा होरपळून मृत्यू झाला. द्रुतगती मार्गावरील अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांवर तातडीनं उपचार मिळावेत म्हणून ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. पण त्याठिकाणी पुरेशा सुविधा आणि स्टाफही उपलब्ध नाही. म्हणूनच मंगळवारी आगीत होरपळलेल्या सहा रुग्णांना तिथून पुढे नऊ किलोमीटर घेऊन जावं लागलं होतं. त्यात चौघांचा मृत्यू झाला.

  • 14 Jun 2023 09:35 AM (IST)

    आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

    राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचा नाशिक ते मुंबई बिऱ्हाड मोर्चा दुसऱ्या दिवशीदेखील सुरूच आहे. काल नाशिक मुंबई महामार्गावरील विल्होळी परिसरात मुक्काम होता. शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. 25 मे 2023 रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, या त्यांच्या मागण्या आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना काढून खासगी कंपनीला काम देण्याचे सरकारने निर्णय घेतल्याने नाशिक ते मुंबई बिऱ्हाड मोर्चा काढत आहेत.

  • 14 Jun 2023 09:28 AM (IST)

    मुंबईहून बोरिवलीकडे जाणाऱ्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

    जोगेश्वरी ते बोरिवलीकडे जाणाऱ्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहने संथ गतीने जात आहेत. गेल्या 45 मिनिटांपासून महामार्गावर वाहनांची ही कोंडी सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर या वाहतूक कोंडीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या वाहतूक कोंडीत नागरिक तासनतास अडकले आहेत.

  • 14 Jun 2023 09:21 AM (IST)

    यवतमाळ : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा वाद सुटला

    उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दादाराव डोलारकर हेच मुख्याधिकारी राहतील. तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी राजकीय सुडातून बदली झाल्याचा आरोप केला होता. मॅटने मडावीच्या बाजूने निकाल देत जैसे थे स्थिती करावी असा आदेश दिला होता. मात्र मॅट निर्णयाविरोधात डोलारकर यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून मॅटचा आदेश रद्द ठरवला.

  • 14 Jun 2023 09:14 AM (IST)

    सांगली : पाणीसाठी कमी झाल्याने सिंचनासाठी उपसाबंदीचे आदेश

    कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सिंचनासाठी लागणार्‍या पाणी वापरामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून वाहणार्‍या कृष्णा नदीतून टेंभू बॅरेज ते म्हैसाळ बंधार्‍यापर्यंत पाटबंधारेकडून सिंचनासाठी उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 14 जून ते 17 जून दरम्यान उपसाबंदी आदेश लागू असणार आहे. या दरम्यान कोणत्याही शेतकर्‍याने पाणी उपसा केल्यास त्याची विद्युत मोटार जप्त करून एक वर्षासाठी त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचेही पाटबंधारेकडून सांगण्यात आले आहे.

  • 14 Jun 2023 09:07 AM (IST)

    वाशी : विद्यार्थांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने शाळेतून काढून टाकलं

    वाशी इथल्या सेंट लॉरेन्स शाळेत काही विद्यार्थ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे तिथल्या मुख्याध्यापक आणि शाळेने सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याचा आरोप मनसेने केला आहे. नवी मुंबई मनसे सचिव सचिन कदम यांनी या घटनेचा विरोध केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याच्या विरोधात शाळेबाहेर मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे.

  • 14 Jun 2023 08:59 AM (IST)

    नालासोपाऱ्यात विवाहित महिलेवर बलात्कार

    पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एका महिलेवर आरोपीने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी सुद्धा नालासोपारा भागात राहतो. घर दाखवण्याच्या बहाण्याने तो महिलेला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो काढले. ते फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपीने पीडित महिलेला तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीला अटक करुन पोलीस कोठडीत पाठवण्यात आलय.

  • 14 Jun 2023 08:58 AM (IST)

    ज्यूनिअर नाना पाटेकर याने फेसबुक लाइव्ह करत फिनाइल घेतलं

    ज्यूनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख असलेल्या कॉमेडियन तीर्थानंद राव याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर लाइव्ह करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर…..

  • 14 Jun 2023 08:56 AM (IST)

    NEET परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून संपवलं आयुष्य

    गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीने नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले म्हणून आयुष्य संपवल्याची घटना घडली. NEET परीक्षेचा निकाल रात्री उशिरा अकरा वाजता लागला. घरातील सर्व झोपी गेले होते. नीट परीक्षेत कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे या मुलीने आयुष्य संपवलं.

  • 14 Jun 2023 08:52 AM (IST)

    Team India Test Captaincy : BCCI च ठरलय? ‘या’ टूर नंतर Rohit Sharma ला कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या हालचाली

    Team India Test Captaincy : WTC 2023 मधील मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचे फॅन्स खवळले आहेत. भविष्याचा विचार करुन टीममध्ये बदल करण्याची मागणी सुरु आहे. BCCI सुद्धा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वाचा सविस्तर…..

  • 14 Jun 2023 08:44 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न

    प्रेमाला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला. चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे सोमवारी संध्याकाळची ही घटना घडली. पीडित मुलगी घरी एकटी असतांना आरोपीने तिच्या घरात प्रवेश करून अंगावर पेट्रोल टाकलं.

  • 14 Jun 2023 08:30 AM (IST)

    किशोर आवारे यांच्या आईच ठिय्या आंदोलन

    तळेगाव दाभाडेमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या होऊन एक महिला उलटला, तरी मुख्य मारेकरी उजळ माथ्याने फिरत आहेत, असा आरोप किशोर आवरेंच्या आई सुलोचना आवारे यांनी केलाय. पोलीस हे रक्षक आहेत की भक्षक? असा प्रश्न सुलोचना आवारे यांनी उपस्थित केलाय. मुलाच्या हत्ये प्रकरणी न्याय मिळावा म्हणून त्या तळेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनाला बसल्यात.

  • 14 Jun 2023 08:25 AM (IST)

    एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कदर करा – बच्चू कडू

    “एकनाथ शिंदेनी उठाव केला नसता, तर भाजपा आताही सत्तेत नसतं. काही ठिकाणी भूमिका पाहिली, काही ठराविक नेते जर सोडले तर काही निवडक लोकांकडून 40 आमदारांच्या मतदारसंघात त्रास द्यायचा प्रयत्न होत आहे. जो त्रास होत आहे तो थांबला पाहिजे, त्यांची कदर केली पाहिजे यांच्या बलिदानातून तुमचं सरकार आलेलं आहे. पाच वर्ष जर उद्धव ठाकरेंचं सरकार राहिलं असतं, तर जे आता भाजपचे 100 आमदार आहे ते 50-60 वर आले असते त्यामुळे त्यांचे महत्त्व जाणलं पाहिजे” असं आमदार बच्चू कडू म्हणाले.

  • 14 Jun 2023 08:20 AM (IST)

    भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांची नाशिकमधील सभा ढकलली पुढे

    येत्या शुक्रवारी नाशिकमध्ये होणारी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सभा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सभा आता 26 जून रोजी होणार आहे. त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम मैदानावर सभा होईल. राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.

  • 14 Jun 2023 08:16 AM (IST)

    करवीर निवासिनी अंबाबाई चरणी 47 तोळ्याचा सोन्याचा किरीट अर्पण

    15 मार्च ते 10 जून या कालावधीत 32 लाखाहून अधिक भाविक करवीर निवासिनी अंबाबाई चरणी लीन झाले. त्यांनी कोल्हापूरच्या देवीच दर्शन घेतलं. या कालावधीत भाविकांनी दोन कोटीहून अधिक दान केलं. जालना येथील संस्थेकडून 47 तोळ्याचा सोन्याचा किरीटही अर्पण करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या वाढली. वाढत्या भाविकांच्या तुलनेत पार्किंगसह अन्य सुविधा वाढवण्याची गरज आहे.

  • 14 Jun 2023 08:13 AM (IST)

    ‘आवाज करू नका, माझा नातू आजारी आहे’ – राज ठाकरे

    राज ठाकरे यांनी उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मनसे सरचिटणीस नयन कदम आणि विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी काल रात्री राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. रात्री ठीक 12 वाजता राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्ताऱ्यांना राज ठाकरे म्हणाले की, ‘आवाज करू नका, माझा नातू आजारी आहे’

  • 14 Jun 2023 07:59 AM (IST)

    धक्कादायक, नागपूर जिल्ह्यात वर्षभरात 44 नवजात बालकांचा दूध पाजताना गुदमरून मृत्यू

    नागपूर जिल्ह्यात वर्षभरात 44 नवजात बालकांचा दूध पाजताना गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षभरात 1381 बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 40 बालकांचा घरीच मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. दूध पाजताना निष्काळजीपणाचा कळस झाल्यामुळे वर्षभरात 44 बाळांचा मृत्यू झाला. गोंदिया येथील महिला नागपूरात नातेवाईकांकडे आली असता दूध पाजताना दूध अन्ननलिकेत गेल्याने बाळाचा मृत्यू झाला होता. नुकत्याच घडलेल्या दुसऱ्या घटनेत दूध पाजताना गुदमरून बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, झोपून बाळाला दूध न पाजण्याचं ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॅा. अविनाश गावंडे यांनी आवाहन केलं आहे.

  • 14 Jun 2023 07:52 AM (IST)

    सिंधुदुर्गातील ओसरगाव येथील टोल नाका आजपासून होणार सुरू

    सिंधुदुर्गातील तळ कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका आजपासून सुरू होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून टोल नाका सुरू होणार असल्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती आहे. सिंधुदुर्गामधील गाड्यांना टोलमधून माफी द्यावी नंतरच टोल सुरू करावा, अशी मागणी टोल विरोधी कृती समितीने केली आहे. याबाबत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. टोलविरोधी कृती समितीचा टोल वसुलीला तीव्र विरोध आहे. टोल नाका बंद करण्यासाठी थोड्याच वेळात सिंधुदुर्गवासीय टोल नाक्यावर धडकणार आहेत.

  • 14 Jun 2023 07:43 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात कृषी विभागात 46 टक्के पदे रिक्त, 435 पदांपैकी केवळ 235 पदे भरली

    भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत आहेत. विभागात 435 पदांपैकी केवळ 235 पदे भरलेली असून, 200 पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्हा कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील जवळपास 65 टक्के नागरिक शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना व प्रकल्पांचे संचालन केले जाते. योजनांचा थेट लाभ दिला जात असतो. कृषी विभागात रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला आहे.

  • 14 Jun 2023 07:32 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस, विविध कार्यक्रमांचं आयोजन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी पोस्टर लावून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही पोस्टर्सवरती तर राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे.

  • 14 Jun 2023 07:29 AM (IST)

    नागपूरात भाच्याच्या वाढदिवसानिमित्त मामाकडून पिस्तुल भेट, पोलिसांकडून अटक

    नागपुरात मामाने चक्क भाच्याला पिस्तुल भेट दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसानिमित्ताने ही भेट देण्यात आली. त्यानंतर एक 17 वर्षांचा मुलगा हातात पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली. या प्रकरणात मामा ब्रिजेशकुमार सेवकराम रत्ने लाही आरोपी करण्यात आलंय. पोलीसांनी छापा टाकून पिस्तुल ताब्यात घेतली आहे.

  • 14 Jun 2023 07:27 AM (IST)

    महिला पैलवानांच्या समर्थनार्थ परभणीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कॅन्डल मार्च

    दिल्ली जंतरमंतरवर महिला पैलवानांनी सुरू केलेले अत्याचारविरोधी आंदोलन पोलिसी बळाच्या जोरावर चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. केंद्र सरकारने हा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ परभणीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवअयात आला. वसंतराव नाईक पुतळा येथून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  • 14 Jun 2023 07:24 AM (IST)

    सोलापुरात श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आज पाडणार

    सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे. चिमणी पाडकामपूर्वी मोठ्या संख्येने पोलीसांचा फौजफाटा कारखान्यात दाखल झाला आहे. साखर कारखान्याच्या एक किलोमीटर परिघात सर्वत्र पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. रात्रीपासूनच कारखान्यात बसलेल्या शेतकरी सभासद आणि कारखान्याच्या कामगारांना पोलिसांनी पहाटेपासून ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास पाचशेहून अधिक कामगार आणि सभासदांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

  • 14 Jun 2023 07:19 AM (IST)

    जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान, पालखी दर्शनासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी

    थोड्याच वेळात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान होणार आहे. पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरातून तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने निघणार आहे. या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो पुणेकरांनी गर्दी केली आहे. त्यामुळे पुण्यातील रस्ते माणसांनी फुलून गेले आहेत.

    संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचेही पुण्यातून सासवडकडे प्रस्थान होणार आहे. पुण्यातील पालखी विठोबा मंदिरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन दिवसाच्या विसाव्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे. आज पालखी सोहळा दिवेघाटाचा अवघड प्रवास करणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला असंख्य वारकरी निवडुंगा विठोबा मंदिरात दाखल झाले आहेत.

Published On - Jun 14,2023 7:15 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.