मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. 224 जागांसाठी आज मतदान होत असून येत्या 13 मे रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही. अटक वैध असल्याचं सांगितलं. खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार उफाळला. मेट्रो- 3 मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली चर्चगेट ते विधानभवन मेट्रो-3 भुयारी मार्गाची पाहाणी. बुलढाण्यात पेठजवळ खासगी लक्झरीला अपघात. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू. 25 जण जखमी. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
उद्याचा निकाल देशाच्या राजकारणातील महत्वाचा निकाल
कोणतीही गोष्ट आम्ही घटनाबाह्य केलेली नाही
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची उम्हाला उत्सुकता
सध्या राज्यात सर्वांचे लक्ष उद्याच्या निकालावर लागलं आहे
या निकालावर छत्रपती संभाजीराजेंना प्रश्न विचारण्यात आला
तेव्हा छत्रपती संभाजीराजेंनी सर्वसामान्यांना निकालात रस नाही असं म्हटलं आहे
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास
16 आमदारांवर कारवाई हरिभाऊ झिरवळ यांना करता येत नाही
झिरवळ यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झालेला होता
म्हणून विरोधात निकाल गेला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार
असा दावा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे
सत्तासंघर्षावरील निकालाचं टेशनं नसून अनिल बाबर लग्नकार्यात व्यस्त
पात्र-अपात्र बाबत आताच बोलणे योग्य होणार नाही
सांगलीच्या विटा येथून अनिल बाबर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे
निकालाबाबत पाचही न्यायाधीशांमध्ये एकमत
सरन्यायाधीश चंद्रचूड निकाल वाचन करणार
सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटनुसार सर्व न्यायाधीशांमध्ये एकमत
देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील
माफ करा पण, शब्द वापरतो, मुर्खांचा बाजार आहे
एकनाथ शिंदे राजीनामा कशाकरिता देतील?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणणवीस यांचा सवाल
जिल्हा पोलीस दलातील ४० बीट मार्शलला दुचाकी शासकीय वाहनांचे वितरण
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पार पडला वितरण सोहळा
घटनास्थळी तातडीने दाखल होण्यासाठी वाहनांची मिळणार मदत
निवडणूक मतदानाची वेळ संपली
मतदान केंद्रांचे गेट केंद्रप्रमुखांनी केली बंद
कोगनोळी मतदान केंद्रावर मतदारांची रांग
आमदारांच्या आपत्रतेसाठी केले होमहवन
आता देवाला याविषयीची केली प्रार्थना
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घातले साकडे
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आताच भाष्य नाही
शड्यूल 10 प्रमाणे निकाल दिल्यास आमदार आपात्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली भूमिका
यावर अधिक भाष्य करता येणार नाही
आमच्या बाजूने निकाल लागले, अशी आशा आहे
सरकार टिकणार, गुलाबराव पाटील यांचा विश्वास
सुप्रीम कोर्टातून सत्तासंघर्षाचा निकाल लाईव्ह
सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडून लाईव्ह स्ट्रिमिंग
16 आमदारांचं उद्या काय होणार?
सुप्रीम कोर्ट सुनावणार याचिकांवर निकाल
अपात्रतेचा चेंडू नेमका कोणाच्या कोर्टात?
की कोर्टच लावणार या प्रकरणाचा निकाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री असतील
शिंदे हे राजीनामा देणार नाहीत
शिंदे यांच्या नेतृत्वातच राज्यातील निवडणुकांना सामोरे जाऊ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया
उद्या सत्तासंघर्षाचा महाफैसला
सत्ताधाऱ्यांना बसेल धक्का की विरोधी गटाला फटका
आम्हीच जिंकणार हा सत्ताधाऱ्यांचा विश्वास वाढलेला आहे
देशातील सर्वसामान्य जनतेला ही कायदा कळतो
देशात उत्तर भारतातून सत्ता परिवर्तन होतो
उद्या संविधानाचा विजय होईल-संजय राऊत
संजय राऊत यांचे सूचक विधान
या देशात लोकशाही आहे की नाही हे समजेल
देश संविधानानुसार चालतोय का?- राऊत
आम्ही आशावादी आहोत
या देशाचं पाकिस्तान होता कामा नये
विरोधकांवर सुडबुद्धीनं कारवाई करण्यात येत आहे
देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल
लंडन आणि दुबईमध्ये कोणाचे हाॅटेल आहेत हे सांगितले पाहिजे
त्यांच्या बगलबच्चे यांच्याकडे कंत्राटं दिली होती, त्याचीही चौकशी झाली पाहिजे
राऊत यांच्याकडे ते गेले पाहिजे होते
उद्या कोणतीही बैठक बोलवली नाही
आम्ही गुवाहाटीला गेलो होतो
माताचा आमच्यावर आशिर्वाद आहे
त्यांच्याकडे 14 रेडे आहेत, ते ही आमच्याकडे यायला तयार आहेत
आम्ही माताजीला म्हणालो होतो की, त्यांनी नाही ऐकलं तर त्यांनाही आम्ही घेऊन येऊ
त्यामुळे आम्ही ऊद्धव ठाकरेंसोबत
जनता आमच्या सोबत
संजय शिरसाट जे काही सांगत आहे, त्याची चिंता त्यांनी करावी
आम्हाला काळजी नाही
प्रक्रिया सुरू होताना नार्वेकर साहेब सभागृहात नव्हते
मी निर्णय दिला त्यावेळी नार्वेकर साहेब नव्हते
अजूनही मी त्या जागेवर आहे, त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येणार
जो निर्णय दिलाय, तो मी दिलाय
अविश्वास दाखल झाल्यावर मान्य व्हावा लागतो
ना माझ्यावरचा अविश्वास मान्य झाला, ना अध्यक्षावरचा
काँग्रेस बहुमताने विजयी होईल
ज्या दिवशी बंद झाला त्यावेळीच एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूने यायला लागलेत
बहुसंख्य मतदार संघात 50 टक्केपर्यंत मतदान काँग्रस पक्षाला
भाजपाला कुठे एक टक्का तर कुठे पाच टक्के असे आकडे समोर येताहेत
भाजपाला जुने दिवस येणार आहेत
आज जे मतदान होत आहे, त्यामध्ये सुध्दा काँग्रेस बाजूने कौल येतोय
काँग्रेस पूर्ण बहुमताने विजयी होऊन सत्तेत येणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास
खामगाव शहरात तापमानाचा उच्चांक
44अंश सेल्सिअस तापमानाने सर्व हैराण
यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाने गाठला उच्चांक
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात केली चर्चा
संबंधित अधिकाऱ्यांसह येत्या मंगळवारी केले बैठकीचे आयोजन
16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल, आत्ताची सर्वात मोठी बातमी
शिवसेना खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना
घटनापीठ निकालाचं वाचन करणार
उद्या सत्तासंघर्षावर निकाल, सूत्रांची माहिती
16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच!
‘द केरला स्टोरी’ चित्रपट राज्यात करमुक्त करावा
पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
या चित्रपटातील विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे
त्यासाठी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा ज्यामुळे तो अधिकाधिक नागरिकांना पाहता येईल मुळीकांचे म्हणणं
पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
आत्ताची सर्वात मोठी बातमी उद्या सत्तासंघर्षाचा निकाल
16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल उद्या निकाल- सूत्र
गोरेगाव येथील पंचायत समिती समोरची घटना
दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक
चार गंभीर जखमी
यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचा भूमिपूजन सोहळा
इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणत तब्बल 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 5 लाखांचा मुददेमाल हस्तगत…
कोयत्याचा धाक दाखवत,घराचे कुलूप तोडत घरातील कपाटातील सोन्याचे दागीने चोरुन नेणाऱ्या तिघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलय..
याप्रकरणी शुभम उर्फ दिलशार अशोक पवार,उमेश अनिल काळे,आदेश अनिल काळे याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, पोलिसांनी आरोपींकडून चार गुन्हे उघडकीस आणत, 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व 3 मोबाईल असा 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय…
येरवड्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच
घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद
हातात कोयते घेऊन दहशत माजवून केली 6 ते 7 गाड्यांची तोडफोड
पूर्व वैमान्यातून गाड्यांची तोडफोड केल्याचे तपासात समोर
तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी सुभाष राठोड,अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांचा चव्हाण गँग नी हत्या केली होती. त्यातील तीन आरोपीची नुकतीच जामीनावर सुटका झाली होती. त्या रागातून खून झालेल्या राठोड गटातील तरुणांनी दहशत माजवण्यासाठी गाड्या फोडल्या
यामध्ये चार चार चाकी, रिक्षा आणि दुचाकी या गाड्यांचा समावेश
मुंबईत रस्ते कामात भ्रष्टाचार – आदित्य ठाकरे
राज्यात बिल्डर, कंत्राटदार सरकार सत्तेत – आदित्य ठाकरे
विद्यापीठातील प्रश्नांबाबत राज्यपालांसोबत चर्चा
सुषमा अंधारे मोठया कलाकार, संजय शिरसाट यांचा टोला
शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली – शिरसाट
निकाल आमच्या बाजून लागेल कारण आम्ही चुकीचं केलेलं नाही – शिरसाट
‘द केरळ स्टोरी’सिनेमाची कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली आहे….’,
मराठी अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल… वाचा सविस्तर
सतत विरोध होत असताना देखील ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात गर्दी…
सिनेमाने पाच दिवसांत कमावले इतके कोटी… कमाईचा आकडा थक्क करणारा… वाचा सविस्तर
पुणे शहराच्या आढाव्यासंदर्भात आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक
पुणे शहराचे संपर्कप्रमुख सचिन अहिर बैठकीला उपस्थित
मालेगाव तालुक्यातील उमरदरी येथील शिवारात घडली घटना….
घटनेची माहिती कळतास जऊळका पोलीस घटना स्थळी दाखल पुढील तपास सुरू…..
– राज्यात जानेवारी महिन्यात १६००, फेब्रुवारी महिन्यात १८१० आणि मार्च महिन्यात २२०० हजारहुन अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत अशी धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
– २०२० पासून देशातील मुली बेपत्ता होण्याऱ्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे.
– राज्य महिला आयोगाने १६ महिन्यात पोलिसांकडून आढाव घेतला.
– प्रत्येक पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करणारा एक विभाग आहे. त्याच्यामाध्यमातून माहिती घेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला.
– राज्यसरकारला याबाबतची अहवालाद्वारे माहिती दिली. पण, राज्यसरकारने त्यावर काही केले नाही.
– पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंदणी विभागाचे काम कसे चालते हे पाहण्याची तसदीही गृहविभाग घेत नाही, अशी टीका त्यांनी केली.
– युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे राज्यपाल रमेश बैस यांचं राजभवन येथे भेट घेणार आहेत.
– दुपारी २ वाजता आदित्य ठाकरे राजभवन येथे जाणार आहेत.
– राज्यातील विद्यापीठ यांच्याशी संबंधित असलेले आणि अन्य काही विषयावर ते राज्यपाल यांची भेट घेणार आहेत.
– पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.
– यामुळे पुणे महानगरपालिकेने दर गुरुवारी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
– महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे आता पुणेकरांना गुरुवार पाण्याविना घालवावा लागणार आहे.
– द केरला स्टोरीच्या निर्मात्यांकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
– पश्चिम बंगालमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
– सिनेमावरील बंदी उठविण्यात यावी अशी मागणी निर्मात्यांनी या याचिकेमधून केली आहे.
– या याचिकेवर १२ मे रोजी सुनावणी होणार आहे.
– शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती.
– शिरसाट यांनी केलेल्या टीकेने व्यथित झालेल्या अंधारे यांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही.
– या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अजित पवार यांची तक्रार केलीय.
– माझ्यावर हा प्रसंग ओढवला असताना अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सभागृहात बोलायला हवं होते असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
– कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान होत आहे.
– या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला उतरल्या आहेत.
– निपाणी मतदारसंघात विशेषतः महिलांची मतदनं केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.
– आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
पगारवाढीच्या मागणीसाठी परिचारकांचं आंदोलन
सध्या परिचारिकांना ३ हजार रुपये वेतन, ते वाढवून किमान २१ हजार करावे या मागणीसाठी गेल्या १० दिवसांपासून आझाद मैदानात सुरू होते आंदोलन
मात्र सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त परिचारिकांनी आज मंत्रालयासमोर केले आंदोलन
पश्चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी
बंदी उठवण्याबाबत सर्वोच्च सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
वकील हरीश साळवे यांनी लवकर सुनावणी घेण्याची केली होती मागणी
सुप्रीम कोर्टात येत्या शुक्रवारी होणार सुनावणी
वादग्रस्त चित्रपट असल्याने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून बंदी
एका मासिकाच्या लेखिका ई जीन कॅरोल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप सिद्ध
ट्रम्प यांना कॅरोलला भरपाई म्हणून 41 कोटी रुपये (5 मिलियन डॉलर) द्यावे लागणार
न्यूयॉर्कच्या फेडरल न्यायालयाचा निर्णय , 9 सदस्यीय ज्युरीचा निर्णय
कॅरोलची बदनामी केल्याबाबत ट्रम्प दोषी
ट्रम्प यांना मोठा दिलासा
ज्युरींनी ट्रम्प यांना बलात्काराच्या आरोपात मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प यांच्यावरील बलात्काराचा आरोप ज्युरीने फेटाळून लावला आहे.
या प्रकरणात ट्रम्प यांना अटक होणार नाही. मात्र दंड भरावा लागेल
अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असल्यास कोर्ट हस्तक्षेप करू शकतं
पद रिक्त नसल्यामुळे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतात.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी बेंगळुरू येथे मतदान केले.
तत्पूर्वी सुधा मूर्ती यांनीही जयनगरमध्ये मतदान केले.
“मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. मतदान हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे मी सर्वांना मतदान करण्याची विनंती करते.” – सुधा मूर्ती
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज 224 जागांसाठी मतदान होत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज 224 जागांसाठी मतदान होत आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी हुबळी-धारवाड़ येथे केले मतदान
लोकांमध्ये भाजपाविरोधात बराच आक्रोश आहे. मी या क्षेत्राच्या लोकांसाठी पुरेसे काम केले आहे – जगदीश शेट्टार
– रोडवर अभ्या असलेल्या एसटी बसला दोन बसने धडक दिली
– पहिल्या बंद बसवर दुसरी बस धडकली आणि दुसऱ्या बसवर तिसरी बस धडकली
– 10 प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती गंभीर
13 ऑगस्ट 2004 ला मातोश्रीत बैठक झाली होती
पत्राचाळीतील लोकांची घर राऊतांनी बळकावली
मराठी कुटुंबाकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात विकत घेतली
राऊतांकडून वारंवार भाजपा नेत्यांवर टीका केली जाते
शिंदेंकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न सुरू आहेत
शिंदे, फडणवीस यांच्या कृतीचा निषेध करतो
कर्नाटकमध्ये भाजपाला कोणताही देव पावणार नाही
हनुमानाची गदा भाजपच्या पाठीत पडणार
घाम, पैसा गाळूनही भाजपचा पराभव होणार
कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणार
मणिपूर पेटलेले असतानाही मोदी, शाह मात्र कर्नाटकमध्ये व्यस्त आहेत, राऊतांची टीका
सत्ता संघर्षवरच्या निकालाची तारीख आजच येणार
वकील सिद्धार्थ शिंदे यांचा दावा
उद्या किंवा परवा निकाल लागण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुढची 72 तास महत्त्वाचे
निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाला 22 मे पासून उन्हाळी सुट्टी
नागपूर वर्धारोडवर तीन बसेसचा विचित्र अपघात
रोडवर उभ्या असलेल्या एसटी बसला दोन बसने दिली धडक
बंद बसवर दुसरी बस धडकली आणि दुसऱ्या बसवर तिसरी बस धडकली
१० प्रवाशी जखमी, चालक गंभीर
सांगलीमध्ये पार पडलेल्या नीट परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांचे अंगावरील कपडे आणि अंतर वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा द्यायला लावण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. याबाबत जागृत पालकांनी या घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली.
दिल्ली विद्यापीठाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. ५ मे ला राहुल गांधी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. तसंच विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी जेवण देखील केलं होतं. त्यानंतर आता विद्यापीठाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली असून विद्यापीठाचे मते राहुल गांधी यांच्या अशा अचानक भेटीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
11 वर्षाच्या मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना
57 वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याने उडाली एकच खळबळ
शेख शकील असे अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव आरोपीला तोफखाना पोलिसांनी केली अटक
नगर शहरातील बागडपट्टी परिसरातील दुर्दैवी घटना
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांना खुलासा देण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात बोलवण्यात आले होते. मात्र आलेल्या विद्यार्थीनी बदलेले हस्ताक्षर आमचे नाही, अशी माहिती दिल्याने इतक्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत बदल केला कोणी असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. या प्रकरणी चौकशी केली जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती बोर्डकडून देण्यात आली.
राज्यातील 34 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तीन हजार तीनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप मिळेना
राज्य सरकारने अवकाळीनंतर मदतीची घोषणा करून महिना उलटला तरी शेतकऱ्यांना मिळेना मदत
शासनाचा आदेश निघत नसल्याने 34 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा
शासनाचा आदेश निघाला नसल्याने खात्यावर अद्यापही रक्कम जमा नाही
१२ विधान परिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर १२ मेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत नियुक्ती करता आलेली नाही
ठाकरे सरकारने १२ आमदारांची यादी दिली होती
ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थंड बस्त्यात ठेवली गेली.
सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी नवीन यादी पाठविली
MI vs RCB IPL 2023 : घरच्या मैदानात रोहित शर्मा बरोबर योग्य झालं नाही. सहाजिकच त्याच दु:ख रोहितच्या चेहऱ्यावर दिसत होतं. वाचा सविस्तर….
डॉलरचा दबाव वाढल्याने घसरण
तर मंदीच्या भीतीने दरात किंचित वाढ
कच्चा तेलात काही दिवसांपासून चढउतार
काय आहे आज तुमच्या शहरातील भाव
पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त, वाचा सविस्तर
Khargone Bus Accident : मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. 50 फूट उंच पुलावरुन प्रवाशांनी भरलेली एक बस नदीत पडली. यात 24 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 43 जखमींवर उपचार सुरु आहेत.
मराठवाड्यातील थकबाकीदार ग्राहकांकडून 504 कोटींची थकबाकी वसूल.
न्यायालयाची नोटीस पाठवून महावितरणने केली वसुलीची कारवाई.
44 हजार पेक्षा अधिक ग्राहकांना न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर 504 कोटींची थकबाकी वसूल.
घरगुती ग्राहक,औद्योगिक ग्राहकांसोबतच इतर ग्राहकांचा होता थकबाकी दारांच्या यादीत समावेश..
राज्यात चक्रवातविरोधी स्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली असून, मुंबईत तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे.
यंदा मे महिन्यात मुंबईकरांना चढ्या तापमानाला सामोरे जावे लागणार आहे, सध्याच्या चक्रवातविरोधी स्थितीमुळे मुंबईतील तापमानही 37 ते 38 अंशांदरम्यान पोहोचू शकते,
Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. काल रात्री वानखेडेवर सूर्यकुमार यादवच्या वादळात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पालापाचोळा झाला. वाचा सविस्तर…..
18 मे पासून पुण्यात दर गुरुवारी पाणी राहणार बंद
पावसाळा लांबल्याने पुणे महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय
पुणे शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखरी क्षेत्रात पाणीसाठा कमी असल्याने आता शहराला दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे
यंदाचा पावसाळा लावण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवला होता
त्याच अनुषंगाने पुणे महापालिका अधिकाऱ्यांनी पाणी नियोजनासाठी महत्त्वाची बैठक घेत हा निर्णय जाहीर केला आहे
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजघडीला 9.70 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेती तसेच उद्योगांना देखील धरणातून पाणीपुरवठा होत असतो.
पुणे शहराचा पाणी वापर महिन्याला 1.5 टीएमसी इतका आहे.
एका आठवड्यातील एक दिवस याप्रमाणे महिनाभर पाणी कपात केल्यास 0.25 टीएमसी पाणी वाचणार आहे.
म्हणजेच पुण्याला किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतकं पाणी वाचवण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय.
राज्यातील मद्यविक्रीत वर्षभरात तब्बल 25 टक्क्यांची वाढ झाली असून त्यामुळे सरकारला करातून मिळणार्या उत्पन्नात 25 टक्क्यांची भर पडली आहे
सन 2021-22 आणि 2022-23 या वर्षांची तुलनात्मक आकडेवारी नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केली आहे
मद्य विक्रीतून राज्य शासनाला मोठा फायदा झाल्याचा देखील समोर आल आहे
2022-23 मध्ये सरकारला तब्बल 21 हजार 550 कोटी रुपयांचे मिळाले उत्पन्न
गतवर्षाच्या तुलनेत मद्य विक्रीत 25 टक्क्यांची वाढ
निपाणीत अभिषेक कोळकी या नव मतदाराने कुटुंबीयांसोबत येत बजावला मतदानाचा हक्क
पहिल्यांदाच मतदान करणं हा एक वेगळा अनुभव, मतदानानंतर अभिषेकने व्यक्त केली प्रतिक्रिया
थकीत बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पुन्हा चोरून वीज वापर
महावितरण अधिकाऱ्यांनी टिटवाळा पट्ट्यातील 105 जणांविरूद्ध केला गुन्हे दाखल
महावितरणच्या पथकाने टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागात
थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी केली
ट्रॅव्हल्स नदीत कोसळली, चिखली रोडवरील पेठजवळ झाला अपघात
काल रात्री 11 वाजेची घटना
तीन प्रवासी गंभीर जखमी, इतरांना मुका मार लागला
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात जाळपोळ, हिंसाचार
हजारो इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले, पाकिस्तानातील परिस्थिती बिघडली
आर्मी प्रमुखांनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
सकाळी 8 वाजता होणार मतदानाला सुरुवात. मतदानासाठी मतदान केंद्र सज्ज
बेळगावच्या निपाणी मध्ये मतदान केंद्रावर फुग्याची सजावट आणि सेल्फी पॉईंट उभारला
मतदानाची तयारी देखील पूर्ण, कर्नाटक मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस
बेळगावच्या निपाणी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर