Maharashtra Marathi Breaking News Live : 20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल 2024 चं आयोजन
Maharashtra Breaking News in Marathi: आज 18 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.18 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रायश्चित्त पूजनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यात आज तीर्थ पूजन, जल यात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास होणार आहे. राज्यात करोना संसर्गामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात बुधवारी नव्या ८१ रुग्णांचे निदान झाले. १५ ते १७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये राज्यात करोनाच्या १७९ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रासाठी सुमारे ३ लाख ५३ हजार ६७५ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
तैवानशी आमचे चांगले संबंध आहेत- परराष्ट्र मंत्रालय
तैवान निवडणुकीसंदर्भात वक्तव्य करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, तैवानशी आमचे चांगले संबंध आहेत आणि दोन्ही बाजूंच्या लोकांमधील परस्पर संबंध मजबूत आणि दिवसेंदिवस वाढत आहेत. आम्ही त्याला शुभेच्छा देतो. तैवानबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे विधान महत्त्वाचे आहे. कारण परराष्ट्र मंत्रालयाने वन चायना धोरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून तैवानशी संबंधांवर भर दिला आहे.
-
सचिननंतर आता बॉलिवूड स्टार सोनू सूद डीप फेकचा बळी
सचिन तेंडुलकरनंतर आता बॉलिवूड स्टार सोनू सूद डीप फेक व्हिडिओचा बळी ठरला आहे. सोनू सूदने ट्विटरवर स्वतःचा एक फेक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आर्थिक मदतीसाठी एका कुटुंबाशी बोलताना दिसत आहे. सचिन तेंडुलकरवर बनवलेल्या डीप फेक व्हिडिओविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
-
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गोव्यात पोहोचले
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर गोव्यात पोहोचले आहेत. सीएम केजरीवाल 18 ते 20 जानेवारी दरम्यान गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
-
महोत्सवात मुंबई शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांची रेलचेल
मुंबई | मुंबईत २० ते २८ जानेवारी दरम्यान पर्यटन विभागामार्फत मुंबई फेस्टिव्हल२०२४ चं आयोजन करण्यात आलं आहे.या महोत्सवात मुंबई शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.त्यामुळे मुंबईकरांनी या महोत्सवाला हजेरी लावावी, असं आवाहन पर्यटन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.
-
वर्षा गायकवाड यांचं अंगणवाडी सेविकांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई | हक्काच्या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलनाला बसल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या या प्रश्नात सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पुर्णपणे पाठिंबा दर्शवत मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
-
-
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार शिष्टमंडळ
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. तत्पूर्वी मराठवाडा विभागाचे विभागीय उपायुक्त अनंत गव्हाणे हे आलेले आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी त्यावर देण्यात आलेले प्रमाणपत्र आणि इतर कारवाईबाबत माहिती दिली जात आहे.
-
मुंबईसह महाराष्ट्रात आंदोलन करणार – प्रकाश अण्णा शेंडगे
54 लाख कुणबी दाखले दिलेले आहेत. ते 2 दिवसांत दिले नाहीत तर 3 कोटी मराठा बांधव, 10 लाख गाड्या, ट्रॅक्टर असे सगळे हजारो कोटींचा चुराडा करत येणार असं सरकारला धमकी दिली होती. त्यांचं आंदोलन 20 तारखेला होणार असं म्हटलं होतं. म्हणून आम्ही सुद्धा 20 तारखेला आझाद मैदानात करणार होतो. ते आता 26 तारखेला येणार त्यामुळे आम्ही सुद्धा 26 तारखेलाच आंदोलन करणार. मुंबईसह महाराष्ट्रात आंदोलन करणार असं ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी म्हटले आहे.
-
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जळगावकर सज्ज
अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार्श्वभूमीवर जळगावात प्रभू श्रीरामाच्या विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. जळगावात झेंडे, प्रभू श्रीरामचंद्रांच्या विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते आहे. प्रभू रामचंद्र यांचे फोटो असलेले आकाश कंदील, झेंड्याची तसेच वेगवेगळ्या साहित्याला नागरिकांची मोठी मागणी आहे. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जळगावकर सज्ज आहेत.
-
मद्यविक्रीसह मटण चिकन दुकानं बंद करा
अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा दिवशी मद्यविक्री तसंच मटण, चिकन, मासे यांची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना या मागणीचे पत्र देण्यात आले आहे.
-
मनोज जरांगे ट्रॅक्टरवर स्वार
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईला जाणार आहेत. याच दरम्यान राज्यातूनही मोठ्या प्रमाणात मराठा समाज ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना आज जरांगे पाटील यांनी ट्रॅक्टर चालवत याचा सराव केला. आता जरांगे पाटीलही ट्रॅक्टर वर स्वार होत मुबई जाणार का हे 20 तारखेला बघावे लागेल.
-
NDA 400 हून अधिक जागा जिंकणार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतात NDA 400 हून अधिक जागा जिंकेल तर महाराष्ट्रात ४५ नव्हे तर ४८ पैकी ४८ आम्ही जिंकूनच दाखवणार, असा विश्वास डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. राम मंदिराच्या होमहवनला पाच हजार लिटर गिरगाईचे तूप राजस्थान वरुन मागविण्यात आले आहे. सावंत परिवाराच्या वतीने हे तूप अयोध्येत पाठवले जाणार आहे.
-
आम्ही पण जनतेच्या न्यायालयात दाद मागू
जर तुम्ही काही केलं नाही तर घाबरू नका, एजंसीला त्यांचं काम करू द्या, सुषमा अंधारेंना असं वाटत असेल तर त्यांच्या नेत्यांनी कारवाईला, चौकशीला सामोरं जावं, असे भरत शेठ गोगावले म्हणाले. ऊबाठा गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलोय, बघू हायकोर्ट काय निर्णय देते ते. ते जनतेच्या न्यायालयात गेले तसे आम्ही पण जाऊ, दुध का दूध पानी का पानी होईल, असे गोगावले म्हणाले.
-
वाढदिवस ठरला चर्चेचा विषय
नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील आदिवासी उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस काल धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. एका सरकारी अधिकाऱ्याचा शासकीय कार्यालयात अशा रीतीने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला गेल्याने चर्चेचा विषय ठरलाय. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
-
घाई घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका
मनोज जरांगे पाटील यांना तीन वेळा तारीख दिल्या. घाई घाईत कुठलाही निर्णय होता कामा नये.कुठल्याही समाजाचे नुकसान करता कामा नये, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण देत असतात ओबीसी आरक्षणला कुथलिही बाधा होऊ नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
-
कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडले
अहमदनगर जिल्हापरिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी कार्यालयात तोडफोड केली. जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीची त्यांनी मागणी केली होती. पाठपुरावा करूनही चौकशी होत नसल्याने पोटे यांच्याकडून तोडफोड करण्यात आली.
-
अजित पवार मुख्यमंत्री होतील असं बोलू नये…, भरत गोगावले यांचा अजितदादा गटाला टोला
मुंबई : राज्याची जनता तीन महिन्यात निकाल देईल, एनसीपीने बाहेर जनतेत अजित पवार मुख्यमंत्री होतील असं बोलू नये. ६ महिन्यांपासून त्यांचा हा प्रयत्न सुरू होता. आमची सुनावणी होती तेव्हा एमसीपीचे बरेच कार्यकर्ते चर्चा करत होते की सरकार जाईल. ते काही गेलं नाही. कार्यकर्ते आणि नेते यांनी संभाळून बोलावं असा टोला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी अजितदादा गटाला लगावला.
-
एकेरी उल्लेख करत अजित पवार यांची नाना पटोले यांच्यावर टीका
मुंबई : पीएम मोदी यांच्या कार्यक्रमात कोण कोणत्या गाडीत बसायचे हे ठरले होते. मुख्यमंत्री आणि आम्ही दोन उपमुख्यमंत्री एकत्र बसणार होतो. पण, आमचे सहकारी आले. त्यांना आम्ही जागा दिली. नाना सांगा मला शिकवू नको. तु किती पक्ष फिरून आला ते पहा अशा शब्दात अजित पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केलीय.
-
नागपुरात 40 फूट उंचीचा भले मोठे श्रीरामाचे कट आउट
नागपूर : नागपूरमध्ये श्रीरामाचे 40 फुटी मोठे कट आउट लावण्यात येणार आहे. काही आर्टिस्ट यांनी एकत्रित येत ही पेंटिंग केली आहे. वॉटर कलर पेंटिंगच्या माध्यमातून कट आउट साकारण्यात आलं आहे. सुंदर आणि भव्य दिव्य कट आउटवर कलाकार शेवटचा हात मारत आहेत. 22 तारखेला कट आउट गोळीबार चौकात हे कट आउट लावून त्याचे पूजन केलं जाणार आहे.
-
दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे शिवसंग्राम संघटने बाहेर
बीड : बीडमधून एक राजकीय ब्रेकिंग समोर येत आहे. दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रामहरी मेटे आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत. जय शिवसंग्राम या नावाने रामहरी मेटे सक्रिय होणार आहेत.
-
शिक्षक भरती विरोधात पुण्यात आपचे आंदोलन
पुणे : शिक्षक भरती गुणवत्तेच्या आधारे झाली पाहिजे अशी मागणी करत आप पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करत केला आप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. माध्यमाची अट न लावता शिक्षक भरती करण्यात यावी, तसेच राज्यातील 67 हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी आपने यावेळी केली.
-
मुंबई नाशिक महामार्गावर सशस्त्र दरोडा, 3 कोटी 67 लाखांचा ऐवज लुटला
नाशिक : मुंबई नाशिक महामार्गावर सशस्त्र दरोडा घालून 3 कोटी 67 लाखांचा ऐवज लुटण्याची घटना घडली आहे. सोने आणि चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या बजरंग कुरिअर सर्व्हिस च्या इको गाडीवर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला. गाडीमधील व्यक्तीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून दरोडेखोरांनी 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा, 90 हजार घरांचे करणार लोकार्पण
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. 30 हजार गृह प्रकल्पाच्या डेमो प्लॅटची पाहणी, योगा सेंटरचे उद्घाटन, रे नगर येथील 15 घरे आणि महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेतून साकारलेल्या 90 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा सोलापुरी चादर, हातमागावर विणलेली शॉल, सोलापुरी फेटा, स्मृतीचिन्ह आणि बुके देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे मोठे विधान
त्या आदेशाची अंमलबजावणी होणार का आतापर्यंत खूप आदेश झाले. आम्हाला ५४ लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या प्रमाणपत्र द्या असे आदेश काढून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर बघावं लागेल. असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोठे विधान
राम मंदिर उभारणीसाठीचे आंदोलने सुरू असताना आमच्या पाळधी गावात उसळलेल्या दंगलीत एका कार्यकर्त्याचा खून झाला होता. मी दैव कृपेने वाचलो होतो. यावेळी काही दिवस भूमिगत राहिलो. आम्ही तिघे सख्खे भाऊ जेलमध्ये गेलो होतो, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
-
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या, असे आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
-
राजू शेट्टी यांनी केले मोठे विधान
भाजपसोबत जाण्याच्या बातम्या पेरल्या जातात. प्रत्यक्ष माझ्याबरोबर कोणी अशी चर्चा केलेली नाही. अप्रत्यक्षपणे येऊन काही लोक दिल्लीला भेटण्याचा आग्रह करतात. आम्हाला यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News : पत्राचाळ प्रकरणी 16 फेब्रुवारीला आरोप निश्चित होणार
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 16 फेब्रुवारीला आरोप निश्तित होणार आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर या कथित घोटाळ्याचा आरोप आहे.
-
Maharatha Reservation : सरकारनं आडमुठीची भूमिका घेऊ नये- मनोज जरांगे
कोणता मंत्री मराठा आरक्षणाला विरोध करतोय त्याचं नाव घ्यायला लावू नका अन्यथा त्याचा सुपडा साफ होईल असं मोज जरांगे म्हणाले. सरकारनं आडमुठीची भूमिका घेऊ नये असंही ते म्हणाले. 20 जानेवारीला सर्वांनी अंतवालीमधून मुंबईकडे जाण्यासाठी जमावे असंही जरांगे म्हणाले.
-
Manoj Jarange : सरकारनं भानावर यावं, ट्रॅप रचू नये- मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकारनं भानावर यावं ट्रॅप रचू नये असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
-
Maratha Reservation : सरकारकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू- मनोज जरांगे
तोडगा निघाला असं सरकार सांगतय, पण तसं झालेलं नाही. सरकारकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
-
लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक
लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी अमरावती शहरात काँग्रेसच्या पश्चिम विदर्भाच्या पहिल्या आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यशोमती ठाकुरसह काँग्रेस नेते उपस्थित आहेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि महत्वाचे पदाधिकारीही उपस्थित आहेत.
-
वैमानिकांच्या वेळापत्रकावरून एअर इंडिया, स्पाईसजेटला दंड
विमान उड्डाणांना विलंब होत असताना प्रवाशांच्या गैरसोयींवरून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी हवाई वाहतूक सुरक्षा कार्यालय (बीसीएएस) यांनी कारवाईचा बडगा उगारला. तीन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवाशांनी जेवण केल्याप्रकरणी ‘इंडिगो’ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दंड ठोठविण्यात आला आहे. तर वैमानिकांचे वेळापत्रक (रोस्टर) योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल ‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 30000 पैकी 15 हजार घरांचं लोकार्पण उद्या पार पडणार आहे. सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 2 IG, 10 SP, 22 Dysp आणि 3 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
-
राजन साळवींना भाजपच्या ऑफर आल्या होत्या- सुषमा अंधारे
“राजन साळवींना भाजपच्या ऑफर आल्या होत्या. मात्र ते निष्ठावंत राहिले. याच्या आधीपण त्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. पण काही सापडलं नाही. आता ईव्हीएमवर विश्वास ठेवू नका. जिथे खाली बसून यान हाताळले जाते तेव्हा ईव्हीएम काय चीज आहे. इतर देशात ईव्हीएम बंद झाली आहेत,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.
-
आधी तुमचं भाषण ठाकरेमुक्त करून दाखवा- सुषमा अंधारे
“आधी तुमचं भाषण ठाकरेमुक्त करून दाखवा. तुमच्या भाषणाची सुरुवात ठाकरेंपासून ते शेवट पण ठाकरेंनीच करतात. त्यांनी मला सोडलं नसतं. मात्र माझी कोरी पाटी आहे. माझ्या बाईपणावर काही बोलघेवडे बोलत आहेत. पीएम फंडाचं काय झालं ? अनेकांनी देणग्या दिल्या होत्या त्या पीएम केअर फंडाचं काय झालं? सुरेश कुटेवर बीडमध्ये धाड पडली. धाड पडल्यानंतर पाचव्या दिवशी बावनकुळेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबली, यावर व्हिडिओ स्पेशलिस्ट का बोलत नाहीत,” असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
-
Live Update : जनता न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडला – सुषमा अंधारे
जनता न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडला… या पत्रकार परिषदेनंतर भाजपचा जळफळाट झाला आहे… भाजपला भीती वाटायला लागली आहे… जनता न्यायालयावरून लक्ष हटवण्यासाठी सूरज चव्हाण यांना अटक केली… राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकण्याचा प्रयत्न केला… असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत…
-
Live Update : मोखाडा घाटात जळगाव पोलिसांच्या वाहनाला अपघात..
पालघर बंदोबस्तासाठी जात असताना मोखाडा घाटात जळगाव पोलिसांच्या वाहनाला अपघात… मोखाडा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला उलटून झाला पोलिसांच्या शासकीय वाहनाचा अपघात… अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी… दोन जखमी कर्मचाऱ्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
Live Update : कोल्हापूरच्या चौका चौकात लागले प्रभू श्रीरामांचे कट-आउट
कोल्हापूरच्या चौका चौकात लागले प्रभू श्रीरामांचे कट आउट… बिंदू चौक, ताराराणी चौकासह शहरातील प्रमुख चौकात 15 फुटांचे कट आउट… तर राम लल्लांच्या प्रतिष्ठापना पूर्वसंध्येला दसरा चौकात 108 फुटांची श्रीरामांची प्रतिमा लावली जाणार… जिल्ह्यातील गावांमध्ये हनुमान मंदिरात आज पासून धार्मिक विधी… अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा कोल्हापुरातही उत्साह…
-
Live Update : बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची सर्वोच्च न्यायालयात धाव
बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची सर्वोच्च न्यायालयात धाव… गुन्हेगारांना कारागृहात आत्मसमर्पण करण्यासाठी हवी आहे मुदतवाढ… आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली… न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली आहे…
-
मुंबई – सायन येथील पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल २० जानेवारीपासून बंद
मुंबईतील सायन येथील पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल २० जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे, रेल्वेच्या सहकार्याने हा पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार. पाडकाम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने या पुलावरील वाहतूक २० जानेवारीपासून बंद करण्यात येत असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.
रहदारीचा हा पूल पाडण्यात येणार असल्याने या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
-
अयोध्येतील कार्यक्रमाचा कोल्हापुरातही उत्साह, चौका चौकात लागले प्रभू श्रीरामांचे कट आउट
अयोध्येतील प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा कोल्हापुरातही उत्साह दिसत आहे. कोल्हापूरच्या चौकाचौकात प्रभू श्रीरामांचे कट आउट लागले आहेत.
बिंदू चौक, ताराराणी चौकासह शहरातील प्रमुख चौकात 15 फुटांचे कट आउट लागले आहेत. तर राम लल्लांच्या प्रतिष्ठापना पूर्वसंध्येला दसरा चौकात 108 फुटांची श्रीरामांची प्रतिमा लावली जाणार आहे.
-
23 जानेवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू होणार
मराठा आरक्षणासदंर्भात मोठी बातमी. 23 जानेवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू होणार आहे. मराठा समाजाबरोबर खुल्या प्रवर्गाचं होणार सर्वेक्षण.शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण सुरू होणार.
जरांगेच्या आंदोलनाबाबत तोडगा निघण्याची शक्यता.
-
राजकीय सूडातून माझ्यावर कारवाई – राजन साळवी
राजकीय सूडातून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. ठाकरे गटाची साथ सोडली नाही म्हणून मला त्रास दिला जात आहे असा आरोप राजन साळवी यांनी केला.
ठाकरेंसोबत राहिल्याने त्रास होणार याची कल्पना होती, ACB च्या चौकशीबाबच अगोदरच कल्पना होती, असेही ते म्हणाले.
-
राजन साळवी, रवींद्र वायकरांवर दबाव – संजय राऊत
शिंदे गटात आला नाहीत तर कारवाई होईल असे निरोप येत होत, सूरज चव्हाणांवरील कारवाईवरून संजय राऊत यांचा आरोप. राजन साळवी, रवींद्र वायकरांवर दबाव टाकण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
-
कर नाही तर डर कशाला ?
आम्ही घाबरत नाही. कर नाही तर डर कशाला ? विरोधकांना संपवून टाकण्याचं काम सरकारकडून केलं जातं आहे अशी टीका राजन साळवी यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली. रत्नागिरीतील राजन साळवींच्या घरी एसीबीच्या टीमने झडती घेतली.
-
एसीबीची टीम राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी दाखल
रत्नागिरी – राजन साळवी यांच्या घरी एसीबीचं पथक दाखल झालं आहे. एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या घरी झडती सुरू.
-
मेडीक्युयर मेडिकल स्टोअरला आग
पहाटे चार वाजता पुण्यातील अशोक नगर, रेंजहिल रस्ता येथे मेडीक्युयर मेडिकल स्टोअरला आग लागली होती. अग्निशमन दलाची चार अग्निशमन वाहने आणि जवान यांनी आग पुर्ण विझवली आहे. जखमी कोणी नाही. आगीमध्ये मेडिकल स्टोअरचे पुर्ण नुकसान झाले आहे. शेजारील दोन दुकांनाना ही आगीची झळ बसली आहे.
-
महंत सुधीरदास महाराज यांचे शंकराचार्य यांना आवाहन काय?
महंत सुधीरदास महाराज यांनी शंकराचार्य यांना आवाहन केलं आहे. शंकराचार्यांनी राजकीय वक्तव्य करू नये. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय वळण देऊ नये. फक्त बद्रिकाश्रम ज्योतिष पिठाचे अभिमुक्तेशवरानंद महाराज यांचा विरोध आहे. बाकी शंकराचार्यांनी सोहळ्याला संमती दिली आहे. वेळ पडल्यास अयोध्येत येऊन सर्वांसोमर शास्त्रार्थ करावा, असं आवाहन महंत सुधीरदास महाराज म्हणाले आहेत.
-
निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांकडून शेकोटी पेटवून उब मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-
२२ जानेवारीला मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्याची मागणी
२२ जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. २२ जानेवारीला अयोध्यात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा उत्सव देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ जानेवारीला देशातमध्ये उत्साहचं आनंदी वातावरण राहावं. यामुळे सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप एक दिवसाठी बंद ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
-
आज अयोध्येत काय विधी होणार?
आज प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार. आज तीर्थक्षेत्रपूजन होणार आहे, गंगापूजन होईल. देशभरातून आणण्यात आलेल्या पाण्याने जलधिवास केला जाईल. आज जलधिवास आणि गंगाधीवास असणार आहे. मूर्ती काल रात्री मंदिर परिसरात दाखल झाली आहे
-
शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या तीन जागा लढविणार
शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या तीन जागा लढविणार तर विधानसभेसाठी महायुतीकडे 12 जागांची मागणी. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती. विधानसभेला बीड जिल्ह्यात ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय.
-
Marathi News | पाण्याच्या तळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
पुण्याच्या भुगाव येथील फॉरेस्ट ट्रेल लेबर कॅम्प येथे असलेल्या पाण्याच्या तळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विक्रांत पोटफोडे आणि अर्पित गौतम अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
-
Marathi News | विद्युत पोलला बांधून मारहाण, एकाचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलाना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला आहे.
-
Marathi News | कोरोनामुळे राज्यात एकाचा मृत्यू
करोना संसर्गामुळे राज्यात बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात बुधवारी नव्या ८१ रुग्णांचे निदान झाले. १५ ते १७ जानेवारी या दोन दिवसांमध्ये राज्यात करोनाच्या १७९ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. करोना संसर्गाच्या जेएन.१ या उपप्रकाराची लागण झालेल्या एकूण ४५१ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. या उपप्रकारातील सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे येथे १८९ इतकी नोंदवण्यात आली आहे. ठाणे येथे ८९, तर मुंबईमध्ये या ३७ रुग्णांची नोंद झाली आहे.
-
Marathi News | महाराष्ट्रात ३ लाख ५३ हजार ६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रासाठी अडीच लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे ध्येय राज्य सरकारने निश्चित केले होते. प्रत्यक्षात अनेक देशांतील उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवल्याने महाराष्ट्रासाठी सुमारे ३ लाख ५३ हजार ६७५ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Published On - Jan 18,2024 7:19 AM