Maharashtra Marathi Breaking News Live : पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra Breaking News in Marathi: आज 26 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील इमारतींवर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरु असताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल होणार आहे. लाखो आंदोलकांसोबत मनोज जरांगे नवी मुंबईत पोहचले आहे. आझाद मैदानावर त्यांना आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. त्यानंतर ते आंदोलनावर ठाम आहे. मुंबईतील ग्रांट रोड परिसरात असलेल्या टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. रात्री जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
ज्ञानवापी सर्वेक्षणानंतर मुस्लिमांनी स्वतः मंदिर हिंदूंच्या ताब्यात द्यावे – गिरीराज सिंह
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, ज्ञानवापीवरील एएसआयच्या सर्वेक्षणानंतर मुस्लिम बाजूने हे मंदिर हिंदूंच्या ताब्यात द्यावे. यामुळे इतिहासात झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल आणि सामाजिक सलोखाही वाढेल.
-
दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार
दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. 16 फेब्रुवारीला अर्थमंत्री आतिशी बजेट सादर करणार आहेत. केजरीवाल सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची फाईल लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडे पाठवली आहे. दिल्ली सरकारने ही माहिती दिली आहे.
-
-
कोणत्याही पक्षाची देवावर मक्तेदारी नाही : थरूर
चेन्नईतील काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, “कोणत्याही राजकीय पक्षाची कोणत्याही धर्माच्या देवावर मक्तेदारी नाही. इथे सर्व धर्म आणि सर्व पक्षांचे पालन करणारे लोक आहेत. माझ्या पक्षात हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम, सर्व प्रकारचे लोक आहेत. आम्ही कोणत्याही एका पक्षाला असे म्हणू देऊ शकत नाही की त्यांचा विशिष्ट देव किंवा विशिष्ट धर्मावर कॉपीराइट आहे. हे योग्य नाही.”
-
सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवसाअखेर जिल्ह्यात सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण
पुणे | जिल्ह्यातील सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवसाअखेर जिल्ह्यात सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे 14 टक्के इतकं आहे. ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये 1 लाख 47 हजार 395 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तर पुणे महापालिका क्षेत्रात 1 लाख 74 हजार 257 कुटुंब तर पिंपरी-चिंचवड क्षेत्रात 1 लाख कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली आहे.
-
घटनात्मक दृष्ट्या टिकावे असे आरक्षण सरकारने मराठा समजाला द्यावे : पंकजा मुंडे
नाशिक | भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. “घटनात्मक दृष्ट्या टिकावे असे आरक्षण सरकारे मराठा समजाला द्यावे. मी आरक्षण संदर्भात आपली भूमिका वेळोवेळी मांडत आली आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर टिकणार आरक्षण दिले पाहिजे. मात्र एका समाजाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय नको”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“ओबीसी संघटना जर मुबंई ला जाणार आसतील तर सरकारची जबाबदारी वाढली आहे. आरक्षण संदर्भात सरकारच निर्णय घेईल”, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
-
-
तीन मुद्द्यांवर आरक्षण लावून धरले आहे, जरांगे पाटील
मुंबई : जिल्हास्तरावर वसतिगृहाची मागणी केली होती. मेन मागणी आरक्षणाची होती. रात्रभर जीआर वाचणार आहे. त्यावर चर्चा करणार आहे. तुम्हाला याबाबत काही चर्चा करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे या. माझ्याशी चर्चा करा.
-
त्या पत्राची तयारी सरकारने करावी, जरांगे पाटील यांचा इशारा
मुंबई : 4772 उमेदवारांना नोकऱ्या देण्यात येणार आहे. ३७ लाख म्हणजे कुणाला प्रमाणपत्र दिली त्याचा डेटा आम्हाला द्या. अंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे आहेत. गृहविभागातून याबाबत गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याचं सरकारने सांगितलं. पण त्यांनी पत्र दिलं नाही. पत्र लागणार आहे. पत्राची तयारी सरकारने करावी असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
आमच्या जागा राखीव ठेवून भरती करा – जरांगे पाटील
मुंबई : मराठा समाजाला जगातलं सर्व शिक्षण मोफत द्यावे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारने भरती करू नये. करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून भरती करा असे जरांगे पाटील म्हणाले.
-
जरांगे पाटील यांची महत्वाची मागणी शिंदे समिती बरखास्त करू नका
मुंबई : शिंदे समिती बरखास्त करायची नाही. या समितीने अविरत काम करायचं. त्यांनी मराठवाड्यात शोध घ्या. सरकारने समितीला दोन महिन्याची मुदत वाढ दिली आहे. आपण वर्षभर मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यांनी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देणार असल्याचं सांगितलं.
-
प्रमाणपत्र मिळालं त्याने शपथपत्र द्यायचं हा माझा सोयरा आहे, जरांगे पाटील
मुंबई : ज्यांना प्रमाणपत्र मिळालं त्याने शपथ पत्र द्यायचं की हा माझा सोयरा आहे. त्याआधारे त्याला प्रमाणपत्र द्यायचं. खोटा पाहुणा असला तर त्याला प्रमाणपत्र देऊ नका. 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घ्या. त्यात आमचे पैसे चालले. बाँड पेपर मोफत द्या. सरकारने हो म्हटलंय. टप्याटप्यात शिंदे सरकारची मुदत वाढणार, असे जरांगे पाटील म्हणाले.
-
चार दिवसातच प्रमाणपत्र वितरीत करा – जरांगे पाटील
मुंबई : नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबीयांना प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर अर्ज करावा लागेल. नोंदी मिळवण्यासाठी सहकार्य करा. अर्ज करून प्रमाणपत्रही मिळवून घ्यायचं आहे. ज्याची नोंद मिळाली त्यांनी तातडीने अर्ज भरून प्रमाणपत्र घ्या. चार दिवसातच प्रमाणपत्र वितरीत करा, असं मी सरकारला सांगितलं होतं असे जरांगे पाटील म्हणाले.
-
मराठा किती ताकदीने आलेत ते देश बघतोय – मनोज जरांगे पाटील
मुंबई : मराठा किती ताकदीने आलेत ते देश बघतोय. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र मिळावे. नोंदीवर ५ जरी फायदे झाले तरी दोन कोटी मराठा आरक्षणात जातो. नोंद मिळाल्याची माहिती नसेल तर अर्ज करणार कसा?
-
सरकारसोबत चर्चा झाली – मनोज जरांगे पाटील
मुंबई : आपल्या मागण्यांसाठी आपण मुंबईत आलो आहोत. आमची भूमिका काय? 54 लाख नोंदी सापडल्या. तर प्रमाणपत्राचे वाटप करा. काहींनी प्रमाणपत्र घेतले नाही. मागण्याबाबत सरकारसोबत चर्चा झाली असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
चांगल्या काम करणाऱ्या संस्थाचा पुरस्कार केला पाहिजे – देवेंद्र फडणवीस
नागपूर : परमात्मा एक परिवार सोबत माझा जुना संबंध आहे. मी अनेक कार्यक्रमात उपस्थित राहिलो आहे. बाबा झुंनदेवजी महाराज यांचे कार्य मोठं आहे. त्यांनी अनेकांना व्यसनमुक्त केलं आहे. या परिसराच्या विकासाचा आराखडा तयार झाला आहे. त्याला पूर्ण निधी दिला जाईल. चांगल्या काम करणाऱ्या संस्थाचा पुरस्कार केला पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
आमदार वैभव नाईक यांची पोलीस स्टेशनवर धडक
कणकवली : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनवर धडक दिली. रिक्षा व्यावसायिक असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.
-
ओबीसींवर अन्याय झाल्यास आंदोलन करणार – छगन भुजबळ
ओबीसींवर अन्याय झाल्यास आंदोलन करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
-
जरांगे पाटील यांची सरकार सोबत सकारात्म चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटील यांची सरकार सोबत सकारात्म चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. समाजाला विचारुनच कोणताही निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
हे सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे – एकनाथ खडसे
जळगाव – या सरकारने कितीही सांगितलं की मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या. या सरकारकडून एकाएकी आरक्षणाच्या मागण्या मान्य होणे अवघड आहे. हे सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे. ओबीसीतून आरक्षण देऊ असं सरकार म्हणतंय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्यायचे आहे. आरक्षणाबाबत सरकारने समाधानासाठी जीआर जर काढला असेल तर तो न्यायालयात टिकणारा नसेल. असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
-
जळगावात मोदींच्या दौऱ्यानिमित्त गुलाबराव पाटील यांनी केली सभास्थळाची पाहणी
जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभास्थळाचे पाहणी केली आहे.
-
सरकारच्या जीआरवर जरांगे पाटील दुपारी दोन वाजता बोलणार
आपण 2 वाजता चर्चा करू. एक तास थांबा, साऊंड सिस्टिमची व्यवस्था करतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकारच्या जीआरवर जरांगे पाटील दुपारी दोन वाजता बोलणार आहेत.
-
पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई
पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला आधीच विरोध केला जात आहे. आशानगरमध्ये उभारण्यात आलेली पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी झाली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटनाला विरोध केला. या टाकीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज दुपारी करणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी या टाकीचे उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार कार्यकर्ते टाकीकडे जायला निघाले मात्र त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. यावेळी आमदार धनगर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला. काही प्रमाणात झटापट देखील झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला येणार का याबद्दल उत्सुकता आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य- केसरकर
मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. जरांगेंची सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
1500 जणांनी नृत्याद्वारे विविधतेत एकतेचा संदेश दिला
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आहेत. 1500 जणांनी नृत्याद्वारे विविधतेत एकतेचा संदेश दिला आहे.
#WATCH | Cultural performances form a part of the #RepublicDay2024 celebrations at the Kartavya path in Delhi. The performing group consists of 1500 dancers giving the message of unity in diversity. pic.twitter.com/JQn94lLs1H
— ANI (@ANI) January 26, 2024
-
नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला
“प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही धोक्यात असल्याची टेप राऊत याने आजदेखील वाजवली. विश्वात सर्वात ताकदीचे नेते म्हणून ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश काँग्रेसच्या काळापेक्षा मजबूत झाला. हे राऊतला हजम होत नाही. लोकशाही आणि संविधान धोक्यात कसं असतं हे राऊतने आपल्या आवडीच्या पाकिस्तान आणि चीनमध्ये जाऊन पाहावं. राहुल गांधींच्या मांडीवर बसून ऐकावं,” असा टोला नितेश राणेंनी संजय राऊत यांना लगावला आहे.
-
पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिरात भाविकाने सोन्याचं घोंगडं केलं दान
पंढरपूर- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिरात भाविकाने सोन्याचं घोंगडं दान केलं आहे. तब्बल 82 तोळे सोनं वापरुन हे घोंगडं बनवण्यात आलं आहे. 55 लाख रुपये किंमतीचं हे घोंगडं जालनातल्या भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दान केलं आहे. याआधी याच भाविकाने श्री विठ्ठलाच्या खजिन्यामध्ये तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, मुकूट तसंच चांदीच्या वस्तू दान केल्या होत्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ही माहिती दिली आहे.
-
Live Update : जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने कार्यक्रमात उडाला गोंधळ
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी याठिताणी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमत गोंधळ… जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने कार्यक्रमात उडाला गोंधळ… कार्यक्रमांमध्ये भारतीय ध्वजाला आणि भारत मातेला स्थान न देता केवळ जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी अडवलं… भारतीय ध्वजारोहण कार्यक्रमात भगवे झेंडे आणि एका विशिष्ट पक्षाचा जयघोष केल्याने गोंधळ… तहसीलदार, पोलीस प्रशासनासमोरच उडाला गोंधळ
-
Live Update : सरकार सर्व मागण्या मान्य करत असेल तर हे कशासाठी – उदय सामंत
एखादी मागणी पूर्ण होत असेल तर आंदोलन करणं ठीक आहे… सरकार सर्व मागण्या मान्य करत असेल तर हे कशासाठी… मनोज जरंगे समजूतदार आहेत त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील… मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी मराठा समाजाने घ्यावी… तोडगा निघाला पाहिजे मी या मताचा आहे.. यामध्ये सामान्य माणूस भरडला जाणार नाही याची काळजी दोन्ही माध्यमातून घेतली जावी.. असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
-
Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक… युनायटेड कॉन्सिलिंगच्या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक… बैठकीमुळे काही कार्यक्रम झटपट आवरत मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी रवाना…
-
Live Update : सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – अजित पवार
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… मराठा आरक्षण संदर्भात काल मी बोललो आहे… मुख्यमंत्री यांनी भांगे नावाचे सेक्रेटरी आहेत ते चर्चा करत आहेत… मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत… मराठा समाजाला आरक्षण मिळाले च पाहिजे … विधी आणि न्याय खात्याचे काही लोकं आहेत… भांगे हे चर्चेला गेले आहेत… चर्चेतून तोडगा निघत असतो… असं देखील अजित पवार म्हणाले
-
नवी दिल्ली – परेड कमांडर भुवनेश कुमार यांच्या नेतृत्वात संचलनाला सुरूवात
कर्तव्य पथ येथे परेड कमांडर भुवनेश कुमार यांच्या नेतृत्वात संचलनाला सुरूवात झाली आहे.
या परेडसाठी पहिल्यांदाच देशातील 1500 शेतकरी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.
-
75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा – कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित
भारतीय प्रजासत्ताकाचा आज अमृत महोत्सव आहे. कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन प्रमुख अतिथी.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’ येथे हुतात्म्यांना अभिवादन
नवी दिल्ली – ‘नॅशनल वॉर मेमोरिअल’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.
-
नाशिक – पालकमंत्री दादा भुसे यांच्या ध्वजवंदन सोहळा
आज भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा असून नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजवंदन सोहळा पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक पोलिसांकडून संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नाशिककरांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
-
मेट्रो मार्गाचे काम जोमात
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गच काम जोरात सुरु आहे. या प्रकल्पात जर्मनीची कंपनी सिमेन्स फायनान्स कंपनी सहभागीदार आहे. कंपनीच्या सीईओने पुण्यात येऊन यासंबंधीची पाहणी केली. वेगाने होत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
-
वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभा
वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे. असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे. सरकारचे शिष्टमंडळ 10 वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात ही भेट होईल. त्यानंतर थोड्याच वेळात भव्य सभा होईल.
-
समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री
बेघर, अनाथ ,अपंग तसेच मतिमंद मुला-मुलींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शंकर बाबा पापडकर यांच्या अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील आश्रमात निराधार मुला मुलींना आधार दिला जातो. शंकर बाबा पापळकर यांनी अनेक अनाथ मुला मुलींचे पालकत्व स्वीकारल आहे.तसेच शंकर बाबा पापळकर यांनी अनेक मतिमंद मुला मुलींची शिक्षणाची जबाबदारी पार पाडली.
-
नवीन जीआर घेऊन शिष्टमंडळ भेटणार
सरकारचे शिष्टमंडळ 10 वाजता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात ही भेट होईल. मनोज जरंगे यांना भेटून त्यांना जीआर आणि राजपत्राचा मसुदा दाखवणार आहे. सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक करणार आहे. वकिलांसोबत बैठक झाल्यानंतर मसुद्यात मनोज जरांगे बदल सुचवणार आहेत. मनोज जरांगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री मनोज जरांगे जीआर देतील.आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत.
-
मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न
राज्य सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात दाखल झाले आहे. एका खोलीत मनोज जरांगे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे सलग दुसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू आहेत.
-
चांदीची चढाई, खरेदीची ‘सुवर्ण’संधी
प्रजासत्ताक दिनी सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. या महिन्यात सोने-चांदीला मोठी झेप घेता आली नाही. अनेक दिवसांपासून सोने-चांदीत घसरणीचे सत्र आहे. या किंमतीत मध्यंतरी वाढ झाली होती.
-
Manoj jarange patil | सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात दाखल
सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात दाखल. एका गुप्त खोलीत मनोज जरांगे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक सुरू असल्याची माहिती. मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे सलग दुसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू
-
आमच सरकार सर्वसामान्यांच सरकार – एकनाथ शिंदे
“आमच सरकार सर्वसामान्यांच सरकार. महाराष्ट्र सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. देशाचा जोरदार विकास होतोय. राज्यात शांतता-सुव्यवस्था राखली जात आहे. महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणार राज्य आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
Pune news | पुण्यात बँक मॅनेजरने व्यावसायिकाला फसवलं
पुण्यात बँक मॅनेजरनेच घातला गंडा. व्यावसायिकाची 13 कोटी रुपयांना फसवणूक. 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीला दिलं 13 कोटी कर्ज. बांधकाम व्यवसायिकाने तक्रार केल्यावर गुन्हा दाखल.
-
Republic Day 2024 | आज कर्तव्य पथावर दिसणार भारताची ताकद
भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सगळ्यांची नजर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावर आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताची सैन्य शक्ती आणि सांस्कृतीक विविधतेच प्रदर्शन केलं जाईल. वाचा सविस्तर….
-
Maharashtra news | ललित पाटीलसह साथीदारावर दोषारोपपत्र दाखल
ड्रग्स माफिया ललित पाटीलसह साथीदारावर दोषारोपपत्र दाखल झाले आहे. ललित पाटील आणि त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघ या दोघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुणे पोलिसांकडून 2600 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
-
Maharashtra news | पुण्यात पोलिसांच्या बदल्या
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आयुक्त रितेश कुमार यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या आहेत.
-
Maharashtra news | प्रजासत्ताक दिनानिमित्त मेट्रोमध्ये 30% सूट
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागपूर मेट्रो प्रवाशांना 30% सूट जाहीर करण्यात आली आहे. नागपूरात प्रजासत्ताक दिनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहे. ३० % सूट मिळाल्याने नागपूरकरांच्या प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.
-
Maharashtra news | मुंबईत भीषण आग
मुंबईतील ग्रांट रोड परिसरात असलेल्या टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. रात्री जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. चोर बाजार, कामाठीपुरा या भागात भीषण आग लागली. संपूर्ण टिंबर मार्केटला आग पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 20 पेक्षा अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत.
Published On - Jan 26,2024 7:22 AM