Maharashtra Marathi Breaking News Live : आरोग्य क्षेत्रातील घटकांचा बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराने होणार गौरव
Maharashtra Breaking News in Marathi : आज 30 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.30 जानेवारी 2024 | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरु होत आहे. गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहे. नव्या संसदेत राष्ट्रपतींचे पहिलेच अभिभाषण होणार आहे. अहमदनगरमध्ये ३ फेब्रुवारी रोजी ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे. ओबीसींनी मराठा आरक्षण अडवले तर ओबीसींचे २७ टक्के आरक्षण जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
राजस्थानच्या शाळांमध्ये ड्रेस कोड लागू होणार
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करणार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. शाळांमध्ये नुकताच तयार करण्यात आलेल्या ड्रेसकोडची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता आम्ही कुठेही धर्मांतर होऊ देणार नाही. दिलावर म्हणाले की, अधिकाऱ्यांना ड्रेस कोडची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
-
डिंपल यादव मैनपुरीतून निवडणूक लढवणार, सपाने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी केली जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरीतून तर अक्षय यादव यांना फिरोजाबादमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. धर्मेंद्र यादव बदायूंमधून निवडणूक लढवणार आहेत.
-
-
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, पाच कमांडो जखमी
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात सीआरपीएफचे पाच कमांडो जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
आरोग्य क्षेत्रात काम उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा राज्य सरकारकडून सन्मान
मुंबई | कोरोना काळात डॉक्टरांसह पॅरा मेडिकल स्टाफने जीवाची बाजी लावून उपचार केले. तसेच त्याव्यतिरिक्त डॉक्टर आणि सहकारी कर्मचारी रुग्णसेवेत स्वत:ला झोकून देतात. या अशा आरोग्य क्षेत्रात अतुलनीय आणि उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. हा पुरस्कार 2023-24 वर्षापासून देण्यात येत आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
-
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर
मुंबई | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
-
-
चिंचखेड जवळ मुख्य जलवाहिनी फुटली, पाणी जपून वापरण्याचं आवाहन
अमरावती | अमरावती आणि बडनेरा शहरात 30 आणि 31 जानेवारी असे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चिंचखेड जवळ मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीसाठी दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. तसेच आज आणि उद्या अशा 2 दिवसात पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही, तर आणखी काही वेळ पाणीपुरवठा बंद राहू शकतो, अशी भीती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
-
एक तास बाहेर बसलो, मविआने अपमान केला, वंचितचे डाँ. धैर्यवर्धन पुंडकर यांचा आरोप
मुंबई : जागा वाटपाचा फाँर्म्युला आम्हाला द्या. आम्हाला एवढ्या जागा हव्यात असं महत्वाचं नाही. तसेच, जरांगे पाटील आणि ओबीसी आऱक्षणासंदर्भात भूमिका सांगा. मविआच्या आपआपसांत काहीही ठरलेलं नाही. एक ते दीड तास आम्हाला बसवण्यात आलं. ही वागणूक अपमानास्पद वागणूक आहे असा आरोप वंचितचे प्रतिनिधी डाँ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहे. चर्चेची दारे बंद झालं आम्ही म्हणणार नाही असेही ते म्हणाले.
-
आशा सेविका करणार मोदी आणि शिंदे सरकार विरोधात प्रचार
अमरावती : सरकारने वैद्यकीय महाविद्यालतील प्राध्यापकांचे मानधन दुपट्टीने वाढवल्यानंतर आशा सेविका सरकार विरोधात चांगल्याचं आक्रमक झाल्या आहेत. 19 दिवसापासून आमचा संप सुरू आहे. सरकारने सात हजार रुपये मानधन वाढीचा शब्द दिला पण तो पाळला नाही. त्यामुळे येत्या निवडणूक मोदी आणि शिंदे सरकार विरोधात निवडणुकीत प्रचार करणार असल्याची भूमिका आशा सेविकांनी मांडली आहे.
-
सत्ताधाऱ्यांची एकमेकांवर कुरघोड्या आणि श्रेयवादाची लढाई, विरीधी पक्ष नेत्यांचा आरोप
मुंबई : सरकारने अध्यादेश काढला त्याचा परिणाम भविष्यात काय होणार यासाठी ओबीसी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ओबीसी समाज धास्तावला आहे. आमच्या हक्काचं संरक्षण होणार की नाही असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मराठा समाजाचा सर्वे करुन अहवाल मागवला होता. कॅबिनेटपुढे हा निर्णय झाला नाही. मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जी आर काढला, मान तुटेपर्यंत सरकार का वाकले हा प्रश्न आहे अशी टीकाही त्यांनी केली.
-
वाशीम लोकसभा मतदार संघावर कॉंग्रेसचा दावा, दिल्लीत भेटीगाठी सुरु
नवी दिल्ली : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ कॉग्रेसच्या वाटेला यावा यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरीष्ठ नेत्याच्या भेटी घेतल्या. हा मतदारसंघ कॉग्रेससाठी पोषक आहे. या मतदारसंघात कॉग्रेस लढली तर आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा यश मिळेल मताचे ध्रुवीकरण होणार नाही. त्यामुळे कॉग्रेस विजयी होईल असा विश्वास देत हा मतदारसंघ मागितला असल्याचे कॉग्रेस नेते प्रवीण देशमुख यांनी सांगितले.
-
बँकानी केली फसवणूक, हजारो आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील आणि ठेवीदार आक्रमक झाले आहेत. बॅरीगेट तोडून आंदोलक आत घुसले. जलील यांच्या आवाहनानंतर ठेवीदार हे आत घुसत आहेत. ठेवीदार यांचे पैसे मिळावे यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त आहे. आदर्श महिला नागरी, ज्ञानोबा अर्बन, अजिंठा अर्बन, देवाई महिला, मलकापूर या बँकानी हजारो ठेवीदार यांची फसवणूक केली आहे.
-
राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची ओबीसी समाजाने होळी केली. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करत सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारने काढलेला जीआरचा ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळून निषेध केला आहे.
-
ठेवीदारांचा आशिर्वाद असेल तर मुख्यमंत्री होईल
ठेवीदारांचा आशिर्वाद असेल तर मी खासदार नाही तर मुख्यमंत्री सुद्धा होईल, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. मंत्र्यापासून क्लार्क सगळे पैसे खातात. निवडणूक प्रचार, उत्सव साजरे करण्यासाठी वेळ आहे. मात्र ठेवीदार यासाठी वेळ नाही, कोणी बोलत नाही, असे अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाठ यांच्यावर त्यांनी टीका केली.
-
संसदेला धर्मसंसद करण्याचा डाव
भारतीय संसदेला धर्मसंसद बनवण्याचा प्रयत्न आपल्या देशात सुरू आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे. त्याला हाणून पाडण्यासाठी भाजपविरोधी संघटनांच्या वतीने लोकसंसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशामध्ये रोजगार, गुंतवणूक तसेच सामाजिक सुरक्षा यासह सर्वच प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार अपयशी ठरलं आहे. या सरकारला पराभूत करण्यासाठी अभियान चालवण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या रविवारी पुण्यामध्ये युवक क्रांती दल आणि रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने गांधी भवन इथ लोकसंसदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर
ओबीसी नेत्यांची विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. स्थानिक संघटनेचे पदाधिकारी बैठकीसाठी दाखल झाले आहेत. अखिल भारतीय माळी महासंघ , महंत सुनील महाराज, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, वडार महाराष्ट्र, वंजारी समाज बांधव बैठकीसाठी दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी बबनराव तायवाडे, प्रकाश शेंडगे , चंद्रकांत बावकर , जे डी तांडेल यांपैकी कुणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही.
-
मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत येणार आहे. येत्या आठवड्यात NDA ची बैठक होणारं आहे. या बैठकीसाठी दोन्ही नेते दिल्लीत येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत अंतिम निर्णय होईल. अमित शाह, नड्डा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-
मोदींनी कॅलेंडर बदलून टाकले -सुषमा अंधारे
अयोध्येत राम मंदिर केले ही चांगली गोष्ट आहे. पण मोदींनी कॅलेंडर बदलून टाकले. निवडणुकीसाठी राम मंदिराचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला. राम नवमीला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा केला नाही, कारण निवडणूक अगोदर आहे, अशी टीका त्यांनी केली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पुणे दौऱ्यावर येत आहेत. 19 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी पुण्यनगरीत येतील. पुण्यातील नवीन विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन आणि महात्मा फुले स्मारकाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील होण्याची शक्यता आहे.
-
सरकारनं मराठा समाजाला मागास सिद्ध करावं- मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी सरकारनं मराठा समाजाला मागास सिद्ध करावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
-
किशोरी पेडणेकर यांची इडी चौकशी सुरू
कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची सध्या इडी चौकशी सुरू आहे.
-
चौकशीआधी संजय राऊत आणि संदिप राऊत यांच्यात चर्चा
संजय राऊत आणि संदिप राऊत यांच्या इडी चौकशीला जाण्याआधी चर्चा झाली. संदिप राऊत यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे.
-
आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
-
नाशिकमध्ये मनपा कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी
नाशिकमध्ये मनपा कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कर्मचाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून साडेतील लाख घरांचा सर्वे करण्यात आला आहे.
-
‘एअर इंडिया’ वसाहतीतील कर्मचाऱ्यांना दिलासा
कलिना इथल्या ‘एअर इंडिया’च्या वसाहतीतील रिकाम्या इमारतींवरील पाडकाम कारवाई पुढील सुनावणीपर्यंत करणार नाही, अशी हमी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीने नुकतीच उच्च न्यायालयात दिली. कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर तातडीने घेतलेल्या सुनावणीच्या वेळी कंपनीने ही हमी दिली. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. कंपनीतर्फे वसाहतीतील वीस इमारती गेल्या आठवड्यात पाडण्यात आल्या.
-
राऊत कुटुंबावर दबाव आणण्यासाठी हे सर्व केलं जातंय- संदीप राऊत
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. मुंबई महानगरपालिका खिचडी कोविड घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संदीप राऊत म्हणाले, “हा राजकीय हेतूने प्रेरित मुद्दा आहे आणि दुसरं काही नाही. संजय राऊत त्यांच्याविरोधात बोलत आहेत आणि त्यांना खाली खेचलं पाहिजे, म्हणून हे सर्व केलं जातंय. राऊत कुटुंबावर दबाव आणण्यासाठी हे सर्व केलं जातंय.”
-
टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव
टाटा वीज कंपनीने येत्या 1 एप्रिलपासून दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल.
-
किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी दाखल
किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.
-
सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला; जरांगे पाटलांचा सवाल
मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जातीची विचारणा केल्यावरून अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला, असा सवाल त्यांनी केला आहे.
-
Live Update : पुणे पोलिसांकडून चक्क पोलीस स्टेशनमध्येच चोरी
पुणे पोलिसांकडून चक्क पोलीस स्टेशन मध्येच चोरी… पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन… लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा प्रताप… पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विकल्या पोलीस ठाण्यातील जप्त केलेल्या दुचाकी… दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे असे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे
-
Live Update : कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात चौकशी
कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणार चौकशी… घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊतांची ईडी चौकशी… संदीप राऊत हे संजय राऊतांचे धाकटे भाऊ…
-
Live Update : संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक… बैठकीसाठी सगळ्या पक्षांना निमंत्रण… इंडिया आघाडी बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत… १ तारखेपासून ९ तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन… अधिवेशनात केवळ ८ बैठका होणार… प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अर्थसहाय्याची रक्कम ६ हजारावरून १२ हजार होवू शकत असल्याची माहिती समोर येत आहे.
-
Live Update : मनोज जरांगे पाटील जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला मर्गस्थ
मनोज जरांगे पाटील जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला मर्गस्थ… जिजाऊंचे दर्शन घेतल्यावर रायगडावर पायी चालत जाणार
-
जे खरं आहे, ते चौकशीत बाहेर येणार – किशोरी पेडणेकर
मी कधीही, कोणावरही दबाव टाकलेला नाही. जे खरं आहे, ते चौकशीत बाहेर येईल, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
कोराना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणात त्यांची आज ईडी चौकशी होणार आहे.
-
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही ईडीच्या रडारवर
बिहारमधील सत्तांतरानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही ईडीच्या रडारवर आहेत. लँड फॉर जॉब प्रकरणी तेजस्वी यादव यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
-
अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्र्यांची आज मुंबईत बैठक
अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्र्यांची आज मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यसभेच्या जागेवर चर्चा होण्याची शक्यता. छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरही चर्चा होऊ शकते.
-
मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची – मनोज जरांगे पाटील
सरकारने मराठा समाजाला मागास सिद्ध केलं पाहिजे. ती सरकारची जबाबदारी आहे. मराठा समाजाची पोरं मुंबईतूनन आरक्षण घेऊन आलेत.
-
अहमदनगर – महसूल मंत्र्यांच्या संस्थेकडेच लाच मागणाऱ्या निरिक्षकास अटक
लोणी / अहमदनगर – राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थेकडे लाच मागितली. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था संचलित पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाचखोर निरीक्षकास अटक केली. लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये गोदावरीची महाआरती होणार
हरिद्वारला होणाऱ्या गंगा आरतीच्या धर्तीवर १९ फेब्रुवारीपासून आता नाशिकच्या गोदावरीची देखील महाआरती होणार आहे. गोदावरी जन्मोत्सवापासून गोदेच्या महाआरतीला प्रारंभ होणार आहे. गोदावरी आरतीसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधी जाहीर झाला आहे. रोज गोदावरीची आरती होत असली, तरी शासकीय पातळीवर मोठ्या स्वरूपात गोदेची आरती करण्याचा प्रयत्न आहे. आरतीसाठी गोदा घाटावर हायमास्ट दिवे, एल ई डी स्क्रीन, पूजा थाळी, कलश, शंख, वाद्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
-
राज्यसभा निवडणुकीत पुण्यातून कुणाला संधी?
पुण्यातून कुठला चेहरा राज्यसभेत जाणार याकडे लक्ष आहे. राज्यसभेच्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक जाहीर होईल. पुण्यातून राज्यसभेच्या 2 जागा रिक्त होत आहेत. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि भाजपचे प्रकाश जावडेकर यांच्या 2 जागा रिक्त होणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकूण 6 जागा आहेत. भाजप पुण्यातून एक जागा देण्याची शक्यता आहे.
-
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयीन काम आज बंद
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज ठप्प राहणार आहे. न्यायालयातील वकील आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत. अहमदनगरमधील वकील दाम्पत्याच्या अपहरण आणि खून प्रकरणाचा निषेध करणार आहेत. वकील संरक्षण कायद्याची मागणी या वकीलांकडून करण्यात येत आहे. खंडणी वसुलीसाठी अहमदनगर मधील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा यांचा खुनाची घटना नुकतीच उघडकीस आलीय.
-
कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण
कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झालीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात लाल कांद्याची मुबलक आवक झाल्याने कांद्याचे दर पडले आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा स्टॉक शिल्लक आहे. कांद्याची मोठी आवक आणि निर्यातबंदी मुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात कांदा केवळ 20 रुपये किलोने मिळतोय. कांद्याच्या घसरत्या भावाने शेतकऱ्यांसह व्यापारी देखील हवालदिल आहे. पुणे मार्केट यार्डमध्ये देखील कांद्याची मोठी आवक होतेय.
-
निवडी नंतरचा अतिउत्साहीपणा मनसे पदाधिकाऱ्यांचा अंगलट
कोल्हापूरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह 300 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. विनापरवाना बाईक रॅली काढल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांची कारवाई. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे. शनिवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाल्या होत्या नव्या पदाधिकारी निवडी.
-
विमानतळाचे रत्नागिरीकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार
रत्नागिरी विमानतळाचे रत्नागिरीकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसाठी निधी मंजूर. राज्य सरकारने केला निधी मंजूर, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी.
-
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत पुणे लेनवर खंडाळा आणि वडगाव मावळ भागात लेग सर्विसेंबल गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुपारी 12 ते 2 या वेळेत करण्यात येत आहे. या कालावधीत पुणे लेनवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने कुसगावं टोल नाक्यावरून जुन्या-मुंबई पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार आहेत
-
वडिलांनीच घेतला पोटच्या मुलाचा जीव
सोलापुरात वडिलांनीच घेतला पोटच्या मुलाचा जीव. कोल्डड्रिंकमध्ये विषारी पावडर टाकून मुलाला संपवलं. स्वतः मुलाच्या वडिलांनेच कबुली दिल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसांत दिली तक्रार. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलाने हे कृत्य केलं.
-
Marathi News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत केंद्र पुरस्कृत महत्वाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, भारत नेट प्रकल्पाचा आढावा घेणार आहे.
-
Marathi News | आमदार धंगेकर यांच्यावर गुन्हा
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
-
Marathi News | चाकूचा धाक दाखवून ओला चालकाची लूट
डोंबिवलीतील धक्कादायक घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवून ओला चालकाची लूट करण्यात आली आहे. प्रवाशी बनून ओला चालकांना लुटणाऱ्या तीन सराईत चोरट्याना मानपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
Marathi News | संसदेचे बुधवारपासून अधिवेशन
संसदेचे उद्यापासून अर्थसंकलपीय अधिवेशन आहे. मोदी -२ सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर दोन्हीं सभागृहांची बैठक होणार आहे. ज्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाणार आहे.
Published On - Jan 30,2024 7:08 AM