AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Expansion 2024 : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर

विशेष म्हणजे तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. त्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यापूर्वी काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.

Maharashtra Cabinet Expansion 2024 : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर
Image Credit source: tv9
| Updated on: Dec 15, 2024 | 8:29 AM
Share

Maharashtra Cabinet Minister 2024 : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. त्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यापूर्वी काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.

येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. सध्या कोणत्या पक्षातील किती आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या ‘या’ शिलेदारांची मंत्रि‍पदासाठी वर्णी

  1. उदय सामंत
  2. दादा भुसे
  3. शंभूराज देसाई
  4. संजय शिरसाट
  5. भरत गोगावले
  6. अर्जुन खोतकर
  7. प्रताप सरनाईक
  8. प्रकाश आबिटकर
  9. विजय शिवतारे

भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

  1. रविंद्र चव्हाण
  2. नितेश राणे
  3. मंगलप्रभात लोढा
  4. आशिष शेलार
  5. अतुल भातखळकर
  6. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  7. गोपीचंद पडळकर
  8. माधुरी मिसाळ
  9. राधाकृष्ण विखे पाटील
  10. चंद्रशेखर बावनकुळे
  11. संजय कुटे
  12. गिरीश महाजन
  13. जयकुमार रावल
  14. पंकजा मुंडे
  15. अतुल सावे

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

  1. छगन भुजबळ
  2. आदिती तटकरे
  3. अनिल पाटील
  4. संजय बनसोडे
  5. अजित पवार
  6. मकरंद पाटील
  7. नरहरी झिरवाळ
  8. धनंजय मुंडे
  9. सना मलिक
  10. इंद्रनील नाईक

उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

दरम्यान सध्या नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज दुपारी 4 नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. यानंतर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.