दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पण अद्याप खातेवाटप नाही, महायुतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे?

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपात होणारा विलंब होत आहे. ३९ नवीन मंत्र्यांना शपथ घेतल्यानंतरही खातेवाटप होण्यास उशीर झाल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. मंत्र्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असून, काही मंत्र्यांनी लवकरच खातेवाटप होईल असे आश्वस्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पण अद्याप खातेवाटप नाही, महायुतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे?
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 3:48 PM

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्र सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले. महायुतीत मंत्रिमंडळ विस्तारात अनेक माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर काही इच्छुक आमदारांना डावलण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ४ महिला आमदारांची वर्णी लागली. मंत्रिमंडळ विस्तार होऊन दोन दिवस उलटले असले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन आता विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने अनेक दिग्गज नाराज झाले आहेत. यातील अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खातेवाटपावरुन सातत्याने खलबतं सुरु आहेत. तसेच कोणाला कोणते खाते मिळणार? यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. “महायुतीत खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही. येत्या दोन दिवसात यावर चर्चा करुन निर्णय होईल. सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम आहे”, असे उदय सामंत यांनी सांगितले.

आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल

तसेच मंत्री गिरीश महाजन यांनीही खातेवाटपावरुन भाष्य केले. “खातेवाटपाबाबत महायुतीत कुठलीही नाराजी नाही. अजित पवार दिल्लीला गेले का? मला माहित नाही. लवकरंच खातेवाटप जाहीर होईल. अर्थखात्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. तर शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, असे सांगितले. “खातेवाटपाबाबत महायुतीत कुठलीही रस्सीखेच नाही. तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रीपद मिळालं होतं, आता त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. आम्ही तीन टर्म आमदार होतो, पण तेव्हा संधी मिळाली नाही. आता न मागता मंत्रीपद मिळालं”, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.