Maharashtra Corona Update | कोरोना विस्फोट!, दिवसभरात तब्बल 39 हजार 544 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडाही 200 पार

आज दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

Maharashtra Corona Update | कोरोना विस्फोट!, दिवसभरात तब्बल 39 हजार 544 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडाही 200 पार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 9:00 PM

मुंबई : संपूर्ण देश कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Corona latest update) तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 28,12,980 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,00,727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Maharashtra Corona latest update all information of Mumbai Pune Nashik Nagpur Corona patients)

मुंबईला कोरोनाचा विळखा

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 41,47,773 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 352163 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 49953 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

ठाण्यात आतापर्यंत 5970 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,39,590 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 293897 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 5970 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 39,692 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यात तब्बल 64277 रुग्णांवर उपचार सुरु

पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 64277 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8325 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 536262 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 463611 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला

मुंबई शहरात आज दिवसभरात 5,394 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथे दिवसभरात 3,130 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात मुंबईत 15 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,14,714 वर पोहोचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,50,660 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 51,411 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,686 जणांचा मृत्यू झाला आहे.

corona patient

राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी

corona

राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या रोजच वाढत असल्यामुळे  राज्य सरकार कोरोना प्रतिंबधक नियम आणखी कडक करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा याबाबत गंभीरपणे विचार सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनसाठी तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. मात्र, लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून कोरोना चाचाणी, कोरोना प्रतिंबधक उपाय पाळण्यावर सरकारने जोर द्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकार आगामी काळात कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Balasaheb Thackeray Memorial Photo | तब्बल 400 कोटींचा खर्च, आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक नेमकं कसं असेल?

Kerala Assembly Election 2021 : प्रियंका गांधींची चूक भाजप खासदाराने सुधारली!, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

Corona Cases and Lockdown News LIVE : सांगलीत दिवसभरात 231 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

(Maharashtra Corona latest update all information of Mumbai Pune Nashik Nagpur Corona patients)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.