Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, सोमवारी 2369 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात सोमवारी 2 हजार 369 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झालीय. तर दिवसभरात 1 हजार 402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) आढळून आलेत.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, सोमवारी 2369 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 8:51 PM

मुंबई : राज्यात एकीकडे जोरदार राजकीय नाट्य पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे राज्यात कोरोना विषाणू (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. राज्यात सोमवारी 2 हजार 369 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झालीय. तर दिवसभरात 1 हजार 402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) आढळून आलेत. आज मुंबईत एकूण 1 हजार 62 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आज आपला जीव गमावलाय. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर गेला आहे.

राज्यात सोमवारपर्यंत एकूण 25 हजार 570 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात एकट्या मुंबईत 12 हजार 479 तर ठाण्यात 5 हजार 871 रुग्ण आहेत. एकूण आकडेवारी पाहिली राज्यात आतापर्यंत 77,91,555 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 97.83 इतकं आहे.

अजित पवार, छगन भुजबळही कोरोना बाधित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी काल कोरोनाची चाचणी केली होती. त्याच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल मी कोरोनाची चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे अजित पवार यांनी आवाहन केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’, असं आवाहन भुजबळ यांनी केलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.