AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार, अमित देशमुखांची ग्वाही

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्य सरकारला काहीसा दिलासादायक निर्णय घेतलाय. कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केलीय.

Corona Update : कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार, अमित देशमुखांची ग्वाही
माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
| Updated on: Apr 05, 2021 | 6:52 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त फर्निचर उभं करणं म्हणजे आरोग्य यंत्रणा नव्हे, असं प्रत्युत्तर एका उद्योगपतीला दिलं होतं. राज्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अपुरे पडण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. त्यावर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्य सरकारला काहीसा दिलासादायक निर्णय घेतलाय. कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केलीय. (5,000 medical officers, 15,000 nurses will be available, informed Amit Deshmukh)

परीक्षेनंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स उपलब्ध होणार

राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार 5 हजार 200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका होणार

राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्यांच्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठया प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत होणार आहे.

नागरिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांचं आवाहन

“नागरिकांना आवाहन आहे की, शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटयझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे या सुचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ वा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येते की, त्यांनी देखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा”, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलंय.

संबंधित बातम्या :

Corona Update : धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करु, शरद पवारांना विश्वास

Maharashtra Lockdown | दुकान, मॉल ते धार्मिक स्थळं, लग्नाचा हॉल, महाराष्ट्रातील निर्बंधांची ‘ए टू झेड’ नियमावली

5,000 medical officers, 15,000 nurses will be available, informed Amit Deshmukh

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.