Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरातील रुग्णांचा आकडा 60 हजार पार, 281 जणांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 281 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरातील रुग्णांचा आकडा 60 हजार पार, 281 जणांचा मृत्यू
कोरोना चाचणी प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 10:53 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय. अशावेळी गेल्या 24 तासांतील रुग्णांची वाढ चिंताजनक बनली आहे. राज्यात आज दिवसभरात 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 281 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं असून, आज दिवसभरात 31 हजार 624 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (Alarming increase of corona patients in the state, more than 60,000 corona patients today)

नव्या आकडेवारीचा विचार केला तर राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 35 लाख 19 हजार 208 वर पोहोचलीय. त्यातील 28 लाख 66 हजार 97 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत 58 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 93 हजार 42 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती –

आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील स्थिती चिंताजनक बनली असली तरी मुंबईला मात्र दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज दिवसभरात 11 हजार 263 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 7 हजार 898 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृतांपैकी 15 जणांना काही दीर्घकालीन आजार होते.

आजच्या आकडेवारीनुसार मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. 6 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर आलाय.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 313 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील आजची मृतांची आकडेवारी अत्यंत चिंताजनक बनली आहे. पुण्यात गेल्या 24 तासांत 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 18 रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 54 हजार 61 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 86 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

नव्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 3 लाख 39 हजार 823 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 79 हजार 906 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 856 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात आज दिवसभरात 6 हजार 826 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 518 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील मृतांचा आकडा काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाही. नागपुरात आजहीर 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 43 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 24 हजार 78 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 5 हजार 903 वर जाऊन पोहोचली आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown news : राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू, उद्धव ठाकरेंच्या घोषणा जशाच्या तशा

मुख्यमंत्र्यांकडून 5476 कोटींच्या पॅकेजची घोषणा; 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ महिनाभर मोफत

Alarming increase of corona patients in the state, more than 60,000 corona patients today

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.