Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, कुठे किती नवे रुग्ण?

यवतमाळ, पिंपरी चिंचवड या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या वाढली (Maharashtra Corona Patient Update) आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, कुठे किती नवे रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 5:19 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Corona Patient Update) आहे. मुंबई, पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर, यवतमाळ, पिंपरी चिंचवड या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे लागून असलेल्या जुहू गल्लीतील एका चाळीत (Maharashtra Corona Patient Update) तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांना नायर, नानावटी आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लालबागमध्ये सर्वेक्षण करताना चार आरोग्य सेविकांना कोरोनाची लागण झाली आहेत. त्याशिवाय एशियन रुग्णालयातील 31 कर्मचाऱ्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यात 8 नर्स आणि 23 बाहेरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबईतील चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील पंजाबी कॉलनीत 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर गायकवाड नगरमध्येही 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चेंबूरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 59 वर पोहोचला आहे.

पुण्यात 55 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

त्यापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात 55 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 319 वर पोहोचली आहे. तर पुण्यात 80 जणांचा कोरोनाबळी गेला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण रुपीनगर भागातली आहे. पिंपरी चिंचवडमधील रुपीनगर हा भाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखला आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

  • मुंबई – 44
  • पुणे – 55
  • पिंपरी चिंचवड – 3
  • हिंगोली – 4
  • सोलापूर – 4
  • यवतमाळ – 11
  • बुलडाणा – 3
  • अमरावती – 3
  • कल्याण डोंबिवली – 8

तर हिंगोलीत आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चारही जण SRPF चे जवान आहेत. त्यामुळे हिंगोलीतील कोरोनाबाधितांची संख्या 12 झाली आहे. यातील एकाला डिस्चार्ज मिळाला आहे.

सोलापूर आणि यवतमाळमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ

तर सोलापुरात तीन डॉक्टर आणि एक नर्स कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

यवतमाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. यवतमाळमध्ये आज 13 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये 73 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यात आतापर्यंत 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 61 जणांवर उपचार सुरु आहेत. हे सर्व जण हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आणि प्रतिबंधित क्षेत्रातील (Maharashtra Corona Patient Update) आहेत.

अमरावतीत आणखी तिघांना कोरोना

अमरावतीत आणखी तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अमरावतीतील कोरोनाबाधितांची संख्या 23 वर पोहोचली आहे. तर अमरावतीत 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात आणखी तीन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून धार्मिक कार्यक्रमासाठी 11 जण आले आहे. त्यापैकी तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 24 झाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत आज नवीन 8 रुग्ण आढळले आहेत. यात 7 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेती कोरोना रुग्णांची संख्या 137 झाली आहे.

संबंधित बातम्या : 

पुण्यात आणखी एक कोरोनाबळी, ससूनमध्ये महिलेचा मृत्यू, मृतांचा आकडा 78 वर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद, लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.