Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजदार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.
मुंबई : मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत हलकी घट झाली असली तर राज्यातील रुग्णसंख्या मात्र 45 हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं (Health Department) दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. तर 15 हजदार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣207 new cases of #OmicronVariant reported from Maharashtra today; Sangli- 57, Mumbai-40
*⃣Patients infected with #Omicronvariant in Maharashtra reported till date- 1,216
(2/6)?@airnews_mumbai pic.twitter.com/TZrrqnqWqe
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 9, 2022
राज्यात एका दिवसांत 207 ओमिक्रॉनबाधित रुग्ण!
राज्यात आज 207 ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 155 रुग्णांचा अहवाल बी जे वैद्यकीय महाविद्यालय, तर 52 रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिलाय. महत्वाची बाब म्हणजे राज्यात आज सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण हे सांगली जिल्ह्यात आढळून आले आहेत.
आज ओमिक्रॉनचे कुठे आणि किती रुग्ण?
सांगली – 57 मुंबई – 40 पुणे मनपा – 22 नागपूर – 21 पिंपरी चिंचवड – 15 ठाणे मनपा – 12 कोल्हापूर – 8 अमरावती – 6 उस्मानाबाद – 5 बुलडाणा – 4 अकोला – 4 गोंदिया – 3 नंदुरबार – 2 सातारा – 2 गडचिरोली – 2 औरंगाबाद – 1 जालना – 1 लातूर – 1 मीरा भाईंदर – 1
एकट्या मुंबईत 19 हजारापेक्षा अधिक रुग्ण
महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 19 हजार 474 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी मुंबईत सलग तीन दिवस कोरोना रुग्णांची संख्या 20 हजाराच्या पुढे गेली होती. 8 जानेवारी रोजी मुंबईत 20 हजार 318 नवे रुग्ण सापडेल होते. 7 जानेवारी अर्थात शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत 20 हजार 181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
#CoronavirusUpdates ९ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- १९४७४
२४ तासात बरे झालेले रुग्ण-८०६३
बरे झालेले एकूण रुग्ण-७७८११९ बरे झालेल्या रुग्णांचा दर-८५%
एकूण सक्रिय रुग्ण- ११७४३७
दुप्पटीचा दर-४१ दिवस कोविड वाढीचा दर (२ जानेवारी- ८ जानेवारी)-१.६६%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 9, 2022
पुण्यात रुग्णवाढ दुप्पट
पुण्यात आज तब्बल 4 हजार 29 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 688 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. पुणे शहरातील 1 आणि ग्रामीण भागातील 2 अशा एकूण 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात 134 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ही आकडेवारी पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. कारण, काल पुण्यातील रुग्णसंख्या 2 हजाराच्या घरात होती, ती आज 4 हजाराच्या पुढे गेली आहे.
पुणे कोरोना अपडेट : रविवार, दि. ०९ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : १४,८९० ◆ नवे रुग्ण : ४,०२९ (५,२६,०३५) ◆ डिस्चार्ज : ६८८ (५,०२,०१८) ◆ चाचण्या : १८,०१२ (३९,७७,३८१) ◆ मृत्यू : १ (९,१२७)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/ojWGuQmtPt
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 9, 2022
इतर बातम्या :