Maharashtra Corona Update | मोठी बातमी ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती ?
राज्यात दिवसभरात 66191 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीय. तसेच दिवसभरात तब्बल 832 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेयत. ( todays Maharashtra Corona update)
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक विध्वंसक असल्याचं दिसतंय. राज्यात रोज रुग्ण वाढत असून मृत्यूसंख्यासुद्धा वाढत आहे. आज दिवसभरातील कोरोनाशी संबंधित आकडेवारी राज्य सरकारने जाहीर केली आहे. ही आकडेवरी चिंता वाढवणारी आहे. राज्यात दिवसभरात 66191 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीय. तसेच दिवसभरात तब्बल 832 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेयत. दिवसभरात आज 61,450 जण कोरोनोमुक्त झाल्याचे राज्य सरकारने सांगतले आहे. तर आज दिवसभरातील बरे झालेल्या रुग्णांना मिळून राज्यात एकूण 35,30,060 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा 1.51 टक्क्यांवर आला आहे. (Maharashtra Corona update todays 25 april Corona information Pune Mumbai Aurangabad Nashik Nagpur Thane Corona update)
नव्या रुग्णांची संख्या घटली, मृतांचे प्रमाण वाढले
आज आढललेल्या रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत कमी आहे. काल (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 67,160 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. तसेच एकीकडे रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल दिवसभरात एकूण 676 जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर आज दिवसभरात तब्बल 832 जणांनी आपला प्राण गमावला आहे.
मुंबईत 75498 सक्रिय रुग्ण
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतोय. सध्या मुंबईत 75,498 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 12790 जणांचा मृत्यू झालाय. मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 627644 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत एकूण 537944 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 107503 सक्रिय रुग्ण
पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठी विध्वंसक ठरत आहे. येथे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. राज्य सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात बाधितांचा आकडा 796645 वर पोहोचला आहे. तर येथे आतापर्यंत एकूण 680067 जण कोरोनामुक्त झालेयत. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 9020 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 107503 सक्रिय रुग्ण आहेत.
नाशिकमध्ये बाधितांचा आकडा 2 लाख 82 हजारांवर
नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 2,82,066 वर पोहोचला आहे. येथे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,36,302 वर गेली असून येथे आतापर्यंत 2865 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 42,898 जणांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबादेत सध्या 16324 सक्रिय रुग्ण
औरंगबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 16324 वर पोहोचली आहे. येथे कोरोनामुळे आतापर्यंत 1618 जणांचा मृत्यू झाला आहे. तर औरंगाबादेत बाधितांचा आकडा 118295 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 100339 जण कोरोनातून बरे झाले आहेत. येथे 14 कोरोना रुग्णांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू, 641 नवे कोरोनाबाधित
आज जिल्हयात 641 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 424 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13799 वर पोहचली. तसेच सध्या 4524 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हयात एकूण 322 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे
दरम्यान, कालच्या तुलणेत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कालच्या तुलनेत वाढली आहे. याच कारणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णावाढीची संख्या अशीच घटली तर आगामी काही दिवसांत कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ शकले असे सांगितले जात आहे.
इतर बातम्या :
(Maharashtra Corona update todays 25 april Corona information Pune Mumbai Aurangabad Nashik Nagpur Thane Corona update)