Maharashtra Corona Updates : महाराष्ट्रात 24 तासात 15,051 नवे कोरोना रुग्ण, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

Maharashtra Corona Updates : महाराष्ट्रात 24 तासात 15,051 नवे कोरोना रुग्ण, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
corona viएकूणच दम्याची औषधं कोरोनाची लक्षणं कमी करण्यास मदत करत असल्याने दम्याच्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा कमी असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.rus
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 8:55 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. याशिवाय 10 हजार 671 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर 48 रुग्णांचा मृत्यू झालाय. यासह राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 547 इतकी झालीय (Maharashtra Corona Updates on 15 March 2021 Latest News).

राजधानी मुंबईत मागील 24 तासात (15 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,063 आहे. आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 3 लाख 18 हजार 642 इतके आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14 हजार 582 इतकी आहे. सध्या येथे रुग्ण दुपटीचा दर 165 दिवस आहे.

नवी मुंबई

नवी मुंबईत आज एकूण 136 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीय, तर कोविड 19 मुळे एकाचा मृत्यू झालाय. बेलापूरमध्ये 20 रुग्ण, नेरुळमध्ये 22 रुग्ण, वाशीमध्ये 19, तुर्भेत 11, कोपरखैरणेत 23, घणसोलीत 23, ऐरोलीत 18 रुग्ण आढळले.

वसई विरार

मागच्या 24 तासात वसई विरारमध्ये 46 नवे कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालीय, तर 40 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात एकाचाही मृत्यू नाही. नवे 46 रुग्ण पकडून वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 30 हजार 895 इतकी झालीय. यात 900 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालाय. वसई विरार क्षेत्रात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29 हजार 539 इतकी आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 456 इतकी आहे.

पिंपरी चिंचवड

आज पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 728 इतकी झालीय. 673 जण कोरोनामुक्त झालेत आणि 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. आत्तापर्यंत पिंपरी चिंचवडमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजार 754 इतकी आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 5 हजार 929 इतकी आहे. आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 1880 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

नागपूर

नागपूर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झालाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2297 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. आज तपासणी केलेल्या 8666 नमुन्यांपैकी 26.5 टक्के कोरोना चाचण्या पॅाझिटीव्ह आल्या. जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे.

सांगली

सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 84 कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 46 हजार 890 इतकी झालीय. सांगलीत आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा 1769 वर गेलाय. अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 375, तर उपचार घेणारे 30 जण आज कोरोनामुक्त झालेत. आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 46 हजार 890 इतकी आहे.

उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात आज 52 नवीन कोरोना रुग्ण आढळले. दरम्यान, 7 मार्च रोजी 49, 8 मार्चला 16, 9 मार्चला 38, 10 मार्चला 24, 11 मार्चला 58, 12 मार्चला 27, 13 मार्चला 54, 14 मार्चला 69, 15 मार्चला 52 रुग्णांची नोंद झाली.

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात 362 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. उस्मानाबादमध्ये एकूण 1 लाख 36 हजार 587 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 17 हजार 842 रुग्णांचे नमुने कोरोना बाधित आढळले. या प्रमाणे रुग्ण सापडण्याचा दर 13.83 टक्के इतका आहे. 16 हजार 893 रुग्ण बरे झालेत. बरं होणाऱ्यांचा दर 94.68 टक्के आहे. आतापर्यंत 588 रुग्णांचा मृत्यू झालाय. याप्रमाणे 3.30 टक्के मृत्यू दर आहे.

अमरावती

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 379 नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या 42 हजार 876 झाली आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृत्यूंची संख्या 605 वर पोहचली.

हेही वाचा :

धोका वाढला! राज्यात आज 14 हजार 317 कोरोना बाधित सापडले

Maharashtra Lockdown Updates : महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन?, सामना अग्रलेखातून गंभीर इशारा

महाराष्ट्रात 28 जिल्ह्यात कोरोनाचं संकट पसरलं, लॉकडाऊन हाच पर्याय? वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Maharashtra Corona Updates on 15 March 2021 Latest News

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.