Exit Poll: भाजपला सर्वात मोठा धक्का, एक्झिट पोलच्या आकडेवारीत ‘इतक्या’ही जागा जिंकता येणार नाहीत?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला कमी जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही पोलमध्ये भाजपला ७७ ते १०८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, तर काही पोलमध्ये ८० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता दाखवली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात देखील जागांच्या संख्येबाबत मोठी तफावत आहे. एक्झिट पोलमधील विविध संस्थांच्या अंदाजांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Exit Poll: भाजपला सर्वात मोठा धक्का, एक्झिट पोलच्या आकडेवारीत 'इतक्या'ही जागा जिंकता येणार नाहीत?
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 8:42 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. अनेक संस्थांनी आपल्या आकडेवारीत महायुतीला यश मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. पण सर्व एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर भाजपला या निवडणुकीत 100 चा आकडा गाठताना देखील नाकेनऊ येण्याची शक्यता आहे. अनेक संस्थांनी तर भाजपला 80 पेक्षाही कमी जागांवर यश मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला आहे. टीव्ही 9 रिपोर्ट पोलनुसार, राज्यात भाजपला 81 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भाजपला 100 जागांपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता कमी आहे. विविध संस्थाचे पोलनुसार भाजपसाठी नेमकी काय-काय आकडेवारी जाहीर केली आहे? याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

इलेक्टोरल एजनुसार भाजपला 78 जागा

इलेक्टोरल एजच्या पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 118 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला तब्बल 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला केवळ 78 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 26, अजित पवार गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 20 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

पोल डायरीनुसार भाजपला 77-108 जागा

पोल डायरीच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार बनण्याची शक्यता आहे. महायुतीला 122-186 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 69-121 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 12-29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला 77-108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. केवळ पोल डायरीनुसार भाजपला कमीत कमी 77 आणि जास्तीत जास्त 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच पोलनुसार, शिंदे गटाला 27-50 आणि अजित पवार गटाला 18-28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

चाणक्य स्ट्रॅटेजीसनुसार भाजपला 90 जागा

चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या पोलनुसार, महायुतीला 152-160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 6-8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पण या पोलनुसार, भाजपला केवळ 90 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 48 जागांवर, तर अजित पवार गटाला 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसला 63, ठाकरे गटाला 35 आणि शरद पवार गटाला 40 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

मॅट्रिझनुसार भाजपला 89 ते 101 जागा

मॅट्रिझच्या पोलनुसार, महायुतीला 105 ते 170 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही भाजपला केवळ 89 ते 101 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 37 ते 45 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला 17-26 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 110-130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, काँग्रेसला 39-47, ठाकरे गटाला 21-39, शरद पवार गटाला 35-43 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
पुन्हा महायुतीची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
पुन्हा महायुतीची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?.
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके.
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?.