Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?
आपण कोव्हॅक्सिन लसीचे 40 लाख डोस आणि कोविशिल्ड लसीचे 50 लाथ डोस मागितले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वेगाने वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडून पंतप्रधान मोदींकडे महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींची मागणी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरु आहे. त्यात आपण कोव्हॅक्सिन लसीचे 40 लाख डोस आणि कोविशिल्ड लसीचे 50 लाथ डोस मागितले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे, त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केल्याचं टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर काही लोकांचा गैरसमजातून लसीकरणाला विरोध असतो. त्यामुळे केंद्राकडून याबाबत काही नियमावली करता येईल का? अशी विचारणा केल्यांचही टोपे म्हणाले.
‘घरीच कोरोना चाचणी करणाऱ्यांची नोंद व्हावी’
तर कोरोना चाचणीच्या अनुषंगाने होम किट्स आणि रॅपिड अँटिनेन टेस्ट द्वारे जे लोक पॉझिटिव्ह येत आहेत. त्याची माहिती मिळत नाही. ती बाबही केंद्राच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे ज्या फार्मसी शॉपमध्ये ते विकले जातात त्यांनी त्याबाबत नोंद ठेवावी. अशा रुग्णांना फोन करुन त्यांच्या आरोग्याची चौकशी करता येईल, याबाबत चर्चा केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
‘डेल्टा व्हेरियंट आजही प्रभावी’
पंतप्रधानांना लक्षात आणुन दिलं की, चार हजार नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग केली तेव्हा तेराशे नमुने ओमिक्रॉनचे आढळले, तर 2 हजार 700 नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यांमुळे डेल्टा आजही प्रभावी असल्याचं निदर्शनास आलं आहे. अडीच लाख केसेसमध्ये 70 टक्के डेल्टा आणि 30 टक्के ओमिक्रॉन आहे. त्यामुळे ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत अत्यंत सुस्पष्टता असावी ती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं राज्य सरकारांना मार्गदर्शन
तर पंतप्रधान मोदी राज्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीविरोधात भारताची लढाई आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. परिश्रम हा आपला एकमात्र मार्ग तर विजय हा एकमात्र पर्याय आहे. आपण 130 कोटी भारताचे लोक, आपल्या प्रयत्नातून कोरोनावर नक्की विजय मिळवू. ओमिक्रॉनबाबत सुरुवातीला जी संशयाची स्थिती होती ती आता कमी होत आहे. सुरुवातीला जे व्हेरियंट होते त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने ओमिक्रॉन नागरिकांना संक्रमित करत आहे. आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. मात्र पॅनिक होऊन चालणार नाही. आपल्याला हे पाहावं लागणार आहे की सणासुदीच्या काळात लोक आणि प्रशासन अलर्टनेसमध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी सूचना मोदींनी सर्व राज्यांना केलीय.
Speaking at meeting with the Chief Ministers. https://t.co/VDA7WeB7UA
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2022
इतर बातम्या :