रुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग किंमत…

राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगच्या किंमती निश्चित केल्या आहेत (Maharashtra Government fix price of Plasma Bag)

रुग्णांसाठी कमी दरात प्लाझ्मा उपलब्ध होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, प्रति बॅग किंमत...
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 8:14 PM

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगच्या किंमती निश्चित केल्या आहेत (Maharashtra Government fix price of Plasma Bag). या प्लाझ्मा बॅकसाठी (200 मि.ली.) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहणार आहे. अन्यथा, संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर निशुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पध्दती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन आणि सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरेपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले. याआधी खासगी आणि विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळेच रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने प्लाझ्माचा प्रती डोसची किंमत निश्चित केली आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदे मार्फत तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च आणि राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या/विशेष चाचण्या यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केले आहेत.

यानुसार प्लाझ्मा बॅग (200 मिली) 5500 रुपयांना उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किमती व्यतिरक्त) तर केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले ‘जम्बो’ कोव्हिड सेंटर ‘कुपोषित’, ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धूळखात

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश

संबंधित व्हिडीओ :

Maharashtra Government fix price of Plasma Bag

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.