Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 | ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला 17 पैकी 4 जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले (Aditya Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav)

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 | ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 4:06 PM

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 : माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) आणि संजना जाधव (Sanjana Jadhav) या पती-पत्नीचा दारुण पराभव झाला. औरंगाबादमधील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला. पर्यायाने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवणारे हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव (Aditya Jadhav) यांनाही मोठा धक्का बसला आहे. (Aditya Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav Aurangabad Gram Panchayat Election Result)

पती-पत्नीचा दारुण पराभव

पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला 17 पैकी 4 जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तब्बल 9 जागांवर विजय मिळवला. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.

औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजकीय संन्यासानंतर त्यांचा नवा वारसदार कोण, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. आधी जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव  यांच्याकडे समर्थकांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर चित्र पालटलं. रिंगणात उडी घेत हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने कन्नडमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली.

आईविरोधात मुलाचं पॅनल

हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये पत्नी संजना जाधव यांनी स्वतःचं एक पॅनल उभं केलं. हर्षवर्धन जाधव यांना सुरुवातीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणातून ते बाद होणार का, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या मुलाने ऐनवेळी एन्ट्री घेत रंगत वाढवली होती.

रायभान जाधवांची तिसरी पिढी सक्रिय

अकरावीत शिकणाऱ्या आदित्य जाधवने आईविरोधात रणशिंग फुंकले. त्यामुळे काँग्रेस नेते रायभान जाधव यांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात उतरताना दिसत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही त्याने पत्रकार परिषदेत केली होती. आदित्यच्या पाठीशी वडील संपूर्ण ताकद लावणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं.

जावई vs सासरे

हर्षवर्धन जाधव, संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांचे नातेसंबंध एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेले आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई, तर संजना जाधव यांचे पती. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवे यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. त्यामुळे सासरे-जावई यांच्यातील वाद सर्वदूर पोहोचला आहे.

हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत

हर्षवर्धन जाधव नुकतेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यासोबतच पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना नुकतीच अटक सुद्धा झालेली आहे. संजना जाधव यांना काडीमोड देण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे जाधव आणि दानवे कुटुंबाचे संबंध टोकाचे ताणले गेलेले आहेत. त्यामुळे सुद्धा हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. (Aditya Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav Aurangabad Gram Panchayat Election Result)

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई
  • काँग्रेस नेते रायभान जाधव यांचे हर्षवर्धन हे पुत्र
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • मनसे सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या :

राजकारणाचा अजब डाव : हर्षवर्धन जाधव Vs पत्नी संजना जाधव Vs मुलगा आदित्य जाधव

हर्षवर्धन जाधवांच्या राजकारणाचा अस्त तर संजना जाधवांचा उदय? पिशोर ग्रामपंचायतीचा सविस्तर रिपोर्ट

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE

(Aditya Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav Aurangabad Gram Panchayat Election Result)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.