Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election Results 2021: ‘मला धक्का देणारा अजून जन्मला नाही’, नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, अशा शब्दात नितेश राणे वैभव नाईक यांच्यावर कडाडले. (Nitesh Rane Vaibhav Naik gram panchayat)

Gram Panchayat Election Results 2021: 'मला धक्का देणारा अजून जन्मला नाही', नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले
VAIBHAV NAIK AND NITESH RANE
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 3:20 PM

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिकंल्या आहेत. आम्ही शिवसेनेला धक्का दिल्ला आहे. यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे शिवेसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर कडाडले. (Nitesh Rane criticizes Vaibhav Naik on gram panchayat election)

कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. शिवसेनेने राणेंना धक्का दिला आहे, असे विधान करत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना डिवचले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. “सिंधुदुर्गातील 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. आम्ही शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे कोलगाव या ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. या निकालावरून राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे; हे स्पष्ट होते” असे नितेश राणे म्हणाले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसुद्धा आमचीच

यावेळी बोलताना आगामी काळात कोकणात शिवसेनेचे अस्तित्व नाहीसे होईल, असा दावा नितेश राणे यांनी केला. “सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट होते. आता पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच जिंकेल,” असे वक्तव्य राणे यांनी केले. तसेच, आगामी काळात विरोधक नष्ट होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

वैभव नाईक काय म्हणाले ?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 60 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा केला. तसेच, पुढे बोलताना कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या 2 निवडणुकीत सातत्याने राणेंना धक्का दिला आहे. त्यामुळे राणे यांचं अस्तित्व संपलं असल्याचे नाईक म्हणाले. तसेच राणे यांनी शिवसेनेने धक्का दिला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

संबंधित बामत्या :

Gram Panchayat Election Results 2021 : जाऊबाई जोरात, काट्याची लढत घरात, जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

(Nitesh Rane criticizes Vaibhav Naik on gram panchayat election)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.