Gram Panchayat Election Results 2021 : पाटोद्यात आदर्श सरपंच पेरे पाटील हरले, हिवरे बाजारात पोपटराव पवार जिंकले, अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?
आण्णा हजारे यांच्या विचारांच्या ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. (Anna Hazare Ralegan Siddhi election)
अहमदनगर : पाटोद्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे यांच्या गावात म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अण्णांच्या विचारांच्या ग्रामविकास पॅनलने राळेगणसिद्धीमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्याचे समोर आले आहे. (Anna Hazare supporters won the election of Ralegan Siddhi)
राज्यात 12,711 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत असली तरी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे पटोदा, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, आणि ज्येष्ठ जमाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी या तीन गावांच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगली होती. नेहमीच चर्चेत असणाऱ्या या गावांमध्ये कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. त्यातंनर आत प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यांनतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. या गावांपैकी पाटोद्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला. तर हिवरे बाजारातून पोपटराव पवार यांचं पॅनल जिकंलं आहे. यानंतर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी सत्ता कायम राखत येथील ग्रामपंचायतीवर विजयी पतका फडकवली आहे.
अण्णा समर्थकांचा पूर्ण जागांवर विजय
राळेगणसिद्धी या गावात एकूण 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यापैकी 2 जागांवर याआधीच बिनविरोध निवडणूक झाली. 16 जानेवारी रोजी बाकीच्या 7 जागांवर निवडणूक झाली. त्यांनतर आज प्रत्यक्ष निकाल समोर आले आहेत. या सातही जागांवर अण्णा हजारे यांच्या समर्थकांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.
राळेगणसिद्धीमध्ये विजयी झालेले उमेदवार
1) जयसिंग मापारी 2) मंगल पठारे 3) मंगल मापारी 4) लाभेष औटी 5) सुनीता गजरे 6) डॉ. धनंजय पोटे 7) मंगल उगले
पाटोद्यात भास्करराव पेरे पराभूत
आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पोटोद्यात भास्करराव पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला. येथील ग्रामपंचायतीत एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवून भास्करराव यांच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.
(Anna Hazare supporters won the election of Ralegan Siddhi)
संबंधित बातम्या :
निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV