AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Maharashtra gram panchayat election results 2021: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गावात सत्ता राखता आली नाही, असा टोला लगावला आहे. (Balasaheb Thorat Gram Panchayat Election )

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला
| Updated on: Jan 18, 2021 | 6:19 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ग्रामपंचायत निकालांवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. अंतिम निकाल हाती येतील तेव्हा काँग्रेसच्या ताब्यात 4500 ग्रामपंचायती असतील, असं थोरात म्हणाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Balasaheb thorat claim congress will win four thousand five hundred Gram Panchayat)

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतल यश हे महाविकास आघाडीच‌ं यश असून कॉग्रेसला विदर्भात ५० टक्के ‌यश मिळालं आहे. महाविकास आघाडीला ८० टक्के ‌जागा राज्यात ‌मिळाल्या आहेत. चार ते साडे ‌चार हजार गावात सरपंच हे कॉग्रेसचे झालेले दिसतील. या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की भाजपच्या आजी आणि माजी प्रदेशाध्यक्ष यांना त्यांची गावं सुद्धा सांभळता आली नाहीत हे आहे.

महाविकास आघाडीला मोठ यश मिळालय.विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ यश मिळालय.महानगर पालिका निवडणुकीत ही भाजप ला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा‌ प्रयत्न असून योग्य त्या गोष्टी योग्य वेळेत करू, असं थोरातांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद नामांतरणावरुन जे प्रसिद्धी पत्रकात म्हणटल तीच आमची भूमिका असल्याचे‌ बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा ‌स्पष्ट करत यावर अधिक भाष्य करण्याचं ‌टाळलंय.

चंद्रपूरमध्ये काँग्रेस आघाडीवर विजय वडेट्टीवारांचा दावा

चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीने मिळून 75 टक्के ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असा दावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धिम्या गतीने येत आहेत. पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या गावातही सत्तांतर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांन चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

“नागपूर जिल्ह्यात 73 ग्रामपंचायतीत यश, पूर्व विदर्भात भाजप सर्वात मोठा पक्ष”, भाजप आमदार समिर मेघेंचा दावा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: मुनगंटीवारांना धक्का, एक ग्रामपंचायत वंचितकडे; अक्कलकोटमध्ये आठवलेंचे 34 उमेदवार विजयी

(Maharashtra gram panchayat election results 2021 Balasaheb thorat claim congress will win four thousand five hundred Gram Panchayat)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.