Gram Panchayat Election Results 2021: राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पाच ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, तेव्हापासून मनसेचे इंजिन पुढे सरकरलेलेच नाही.

Gram Panchayat Election Results 2021: राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही
राज ठाकरे यांचं एक ठाम असं काही नसतं, असे सचिन सावंत यांनी म्हटले. त्यामुळे आता 'मनसे'कडून काँग्रेसच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 11:11 AM

मुंबई: ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) निकालात मात्र फारसे यश मिळताना दिसत नाही. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पाच ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, तेव्हापासून मनसेचे इंजिन पुढे सरकरलेलेच नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवण्याचा मनसेचा निर्धार फुसका बार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Raj Thackeray MNS leading in only 5 villages in gram panchayat election results 2021)

यापूर्वी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे.

निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV

राज ठाकरे यांच्या भूमिका कायमच चर्चेचा विषय असतात. अ‍ॅमेझॉनविरुद्धच्या आंदोलनामुळे राज्यभरात मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांचे सध्याचे निकाल पाहता मनसे कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसेला सभांनी होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित करता येत नाही, हे गृहीतक सिद्ध झाले आहे. सध्या मनसेकडून राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या नेत्यांच्या बैठकी सुरु आहेत. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता मनसेवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेची राज्यभरात जोरदार घौडदौड

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला महाविकासआघाडीने एकत्र निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार महाविकासआघाडीत शिवसेना सर्वाधिक 339 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनाप्रणित पॅनेल्सनी बाजी मारली आहे.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

कोल्हापुरात जनसुराज्यपाठोपाठ शिवसेनेची कमाल; मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती, निगडी गावात बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा विजय

(Raj Thackeray MNS leading in only 5 villages in gram panchayat election results 2021)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.