N 95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, राजेश टोपेंनी ठणकावलं

'एन-95' मास्क किंवा अन्य कोणतेही मास्क एका ठराविक किमतीतच विकावे लागतील.

N 95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, राजेश टोपेंनी ठणकावलं
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 8:30 PM

सांगली : ‘एन-95’ मास्क किंवा अन्य कोणतेही मास्क एका ठराविक किमतीतच विकावे (Health Minister Rajesh Tope) लागतील. याबाबत 4 दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत कोव्हिड रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले (Health Minister Rajesh Tope).

इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात 40 बेडचे हे अद्यावत कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यातून 50 ते 90 किलोमीटर प्रवास करुन यापूर्वी रुग्णांना सांगली आणि मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयामध्ये यावे लागत होते. मात्र, इस्लामपूरमधील नवीन कोव्हिड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने 10 कोटी रुपये खर्चून हे अद्यावत रुग्णालय उभारण्यात आले आहेत.

या रुग्णालयातील 10 बेड हे अतिदक्षता विभागात आहेत. 20 बेडचा जनरल वॉर्ड असणार आहे. या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह विविध अद्यावत आणि खास सोई-सुविधा दिल्या जाणार आहेत. या रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरकडून कोविड रुग्णांवर अद्यावत उपचार केले जाणार आहेत (Health Minister Rajesh Tope).

सांगली जिल्ह्यात सर्वात अगोदर, इस्लामपूर मधील एकाच कुटुंबातील 25 लोक कोरोना बाधित झाले होते. मात्र, सर्व रुग्ण करोनामुक्त झाले. इस्लामपूर पॅटर्नमुळे इस्लामपूर कोरोनामुक्त झाले होते. त्याच इस्लामपूरमध्ये वाळवा आणि शिराळा तालुक्यासाठी अद्यावत रुग्णालयात सुरु केलं आहे.

दरम्यान, शासकीय डॉक्टर बरोबरच, खासगी डॉक्टर यांना सुद्धा विमा सुरक्षा कवच आहे. आयएमएची मागणी मान्य केली आहे. खासगी डॉक्टर यांनीही आणखीन जास्त रुग्णसेवेसाठी पुढे यावे, असं मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

Health Minister Rajesh Tope

संबंधित बातम्या :

Nilesh Rane Corona | माजी खासदार निलेश राणेंना कोरोना, मुंबईत सेल्फ क्वारंटाईन

संजय राऊतजी, एकवेळ डॉक्टरांची माफी मागू नका, पण जनतेची मागा, ‘कंपाऊंडर’ वादावर ‘मार्ड’चे डॉक्टर आक्रमक

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.