AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींवर 27 भाषांमध्ये चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा, गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन

"पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचे भाजप संबंध तपासा", असं निवेदन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी सीबीआयला दिले आहे.

नरेंद्र मोदींवर 27 भाषांमध्ये चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा, गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 6:53 PM

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंहचा भाजपशी नेमका संबंध काय, याबाबत तपास करण्याचे निवेदन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी सीबीआयला दिले आहे. संदीप सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनवला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट त्याने 27 भाषांमध्येही तयार केला आहे. त्यामुळे संदीप सिंहचे भाजप संबंध तपासा, असे निवेदन अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिले आहे.

अनिल देशमुख यांनी शनिवारी (29 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. “नरेंद्र मोदींवर 27 भाषांमध्ये बायोपिक करणाऱ्या संदीप सिंहचे भाजपशी काय संबंध आहेत? बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांशी काय संबंध आहेत? याचा तपास करण्याची मागणी करणारी अनेक निवेदने माझ्याकडे आली होती. ती निवेदने मी सीबीआयला दिली आहेत”, असं अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी सांगितलं.

“भाजपच्या अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे, याची आपल्याला कल्पना आहे. त्यांचे पाच वर्ष सरकार होते. त्यावेळी त्यांनी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे”, असा टोला अनिल देशमुख यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील संदीप सिंहची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संदीप सिंहचा भाजप कनेक्शन काय आहे, याचाही सीबीआयेने तपास करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

संदीप सिंह कोण आहे?

संदीप सिंह सुशांतचा मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे. संदीप सिंहचे सुशांतसोबतचे फोटोही व्हायरल होत आहे. पोस्टमार्टेमच्या दिवशी संदीप सिंह सुशांतची बहीण मितू सिंह आणि त्यानंतर अंकिता लोखंडेसोबतही दिसला होता.

संदीप सिंह हा बिहारच्या मुजफ्फरपूरचा आहे. त्याने मुंबईत सुरुवातीला आईस्क्रीमही विकली, अशी माहिती समोर येत आहे. संदीप सिंहला पत्रकार व्हायचं होतं. त्यामुळे त्याने सुरुवातीला काही मासिकं आणि मीडिया हाऊसमध्येही काम केलं. रेडिओमध्ये काम करताना त्याची सेलिब्रिटींशी ओळख झाली. त्याने 2007 मध्ये ‘सावरिया’ चित्रपटाच्यावेळी संजय लीला भंसाळींसोबत काम केलं. त्याने 2015 मध्ये भंसाळींची कंपनी सोडली. त्यानंतर तो स्वत: निर्माता झाला. अलिगड, भूमी, सरबजित, आणि पीएम नरेंद्र मोदी यांसारखे चित्रपट काढले

पोस्टमार्टेमपासून ते अंत्यविधीपर्यंत संदीप सिंह सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होता. मात्र संदीप सिंहच मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. संदीप सिंहनेच पोलिसांच्या मदतीने आपल्याला कूपर रुग्णालयातून बाहेर काढल्याचा आरोप कूपर रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

सुशांतचा मित्र असल्याचं संदीप सिंहही सांगत असला तरी, वर्षभर संदीप सुशांतला भेटलाच नव्हता, अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता याच संदीप सिंहवरुन काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना सुरु झाला आहे.

हेही वाचा : मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?

IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.