दोन वर्षांनंतर गाजणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा, तारीखही ठरली, यंदा साताऱ्यात दंड कडाडणार
यंदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा दंड कडाडणार आहेत. पुन्हा मैदान गाजणार आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) साताऱ्यात पार पडणार आहेत.
मुंबई : गेल्या दोन वर्षात अनेकदा होणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक जत्रा, यात्रा, उरूस रद्द झाले. त्यामुळे कुस्तीप्रेमींच्या (Wrestling) आनंदावर विर्जन पडलं. तसेच मल्लानाही मोकळीपणाने दंड थोपटता आले नाहीत. मात्र यंदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा दंड कडाडणार आहेत. पुन्हा मैदान गाजणार आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) साताऱ्यात पार पडणार आहेत. या कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर झालं आहे. यंदाची 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान रंगणार असल्याची माहिती देण्यात आलीय. याची नियमावलीही कुस्तीगीर परिषदेनं जाहीर केली आहे. 5 तारखेला या कुस्ती स्पर्धेचे जंगी उद्घाटन पार पडणार आहे. त्यामुळे मल्लांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून मैदान थंड पडलं होतं आता मात्र काही दिवसातच पुन्हा मैदानं गजबलेली पहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्रला कुस्तीची मोठी परंपरा
महाराष्ट्राला आणि देशाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. आपल्या देशातले अनेक मल्ल जागतिक स्तरावर गाजले आहेत. कुस्तीने भारताला ऑलिम्पिकमध्येही अनेक पदकं जिंकून दिली आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. आपल्या देशाला कुस्तीत मल्लांनीही अनेक पदकं मिळवून दिली आहेत. महराष्ट्र केसरी ही सर्वात जास्त मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मल्ल वर्षभर तयारी करत असतात. देशभरातून पैलवान या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे मैदानातला थरार आणि स्पर्धा चांगलीच वाढते. आता पुन्हा हा थरार चांगलाच रंगणार आहे.
स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरूवात 1961 साली झाली. हा मानाचा किताब आतापर्यंत अनेक जणांनी पटकावला आहे. आपल्या देशात कुस्तीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. काही भागात तर घराघरात एखादा पैलवान पहायला मिळतो. कोल्हापूरला तर कुस्तीची पंढरी म्हटलं जातं. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून मल्ल कुस्तीची तयारी करण्यासाठी येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कुस्तीचे आखाडे थंड पडले होते. मैदानात आवाज घुमणारे दंड आणि मानेवर पडणारे हातांचे हातोडे पैलवान जणू विसरून गेले होते. मात्र हा थरार पुन्हा रंगणार असल्याने पुन्हा जोमाने तयारी सुरू झाली आहे.
हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?; Ashish Shelar यांचा संतप्त सवाल
VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका