Bison VIDEO | गवा वसाहतीत शिरला, 10-12 कुत्र्यांनी घेरला, कोल्हापुरातील व्हिडीओची चर्चा

एकटा गवा दहा-बारा कुत्र्यांना भिडताना व्हिडीओत दिसत आहे. कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीत गव्याला 10 ते 12 पाळीव कुत्र्यांनी घेरलं होतं. मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

Bison VIDEO | गवा वसाहतीत शिरला, 10-12 कुत्र्यांनी घेरला, कोल्हापुरातील व्हिडीओची चर्चा
कोल्हापुरात गव्याला कुत्र्यांच्या कळपाने घेरले
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 10:13 AM

कोल्हापूर : गव्याची एकच फाईट, कोणाचंही वातावरण टाईट करु शकते, मात्र कोल्हापुरातील कुत्र्यांनी चक्क एका गव्याला जेरीस आणलं. 10 ते 12 पाळीव कुत्र्यांनी रात्रीच्या वेळेस गव्याला घेराव घातला. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून पुण्यातील गवा चर्चेत होता. नागरिकांच्या अतिउत्साहीपणामुळे बळी पडलेल्या गव्याला नुकतंच सोशल मीडियावर ‘प्रथम पुण्यस्मरण’ म्हणून श्रद्धांजली वाहण्यात आली होती. पुण्यात जिथे ही घटना घडली, तिथेही सर्वसामान्य नागरिकांनी पोस्टरबाजीही केली होती. आता कोल्हापुरातही एका गव्याचा वावर असल्याचं समोर आलं.

नेमकं काय घडलं?

‘शेर तो अकेला आता है, झुंड में सुवर आते है’ या वाक्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे कोल्हापुरातून समोर आलेला एक व्हिडीओ. यात एकटा गवा दहा-बारा कुत्र्यांना भिडताना दिसत आहे. कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीत गव्याला 10 ते 12 पाळीव कुत्र्यांनी घेरलं होतं. मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

स्थानिकांनी कुत्र्यांना हुसकावलं

खरं तर गवा या कुत्र्यांना पुरुन उरलाही असता. कुत्र्यांचा कळप गव्याला इजा करण्याच्या तयारीत होता. हे पाहून काही स्थानिक तरुणांनी कुत्र्यांना हकलले. दोन दिवसांपासून बालिंगा फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत परिसरात या गव्याचा वावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरी वस्तीत आलेल्या गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Cobra Video | अजब गावात गजब प्रकार, नागाने जबड्यातून बाहेर काढला मृत घोणस, कोल्हापुरात चर्चा

पुणे तिथे काय उणे! मागील वर्षी मृत्यू झालेल्या गव्याला श्रद्धांजली, कोथरुडमध्ये प्रायश्चित सभेचे बॅनर

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.