Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांनंतर आता पुन्हा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेला इशारा, चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान आणि निलेश लंके यांचं उपोष या पार्श्वभूमीवर आजही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजकीय घडामोडींसोबत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांसह ग्रामीण भागातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यांचाही आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल होत असलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात सोलापूर बंदची हाक
सोलापूर :
– महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल होत असलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात सोलापूर बंदची हाक
– 16 डिसेंबरला सोलापूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे
– छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल ओमान कारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोलापूर बंद
– श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने देण्यात आली हाक
– सोलापुरातील भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला
– सोलापुरातील डाळिंबी आड मैदानात शिवप्रेमींची बैठक झाली
-
सीमा प्रश्नावर केवळ राजकारण सुरु आहे
Marathi News LIVE Update
सीमा प्रश्नावर केवळ राजकारण सुरु आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
कर्नाटकचे मुख्यमंत्री भूमिका बदलणार नाहीत
आपण ही आपली भूमिका सोडणार नाहीत
प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्षनेत्याचे नाव पत्रिकेत नसते
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला
-
-
माझ्यावर भ्याड हल्ला,महाराष्ट्रात झुंडशाही सुरु आहे
Marathi News LIVE Update
माझ्यावर भ्याड हल्ला,महाराष्ट्रात झुंडशाही सुरु आहे
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
‘कुणाला घाबरत, हिंमत असेल तर समोरुन या, पोलीस बाजूला करतो’,
शाईफेक प्रकरणात योग्य चौकशी करण्यात येणार
-
पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
Marathi News LIVE Update
पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक
दिलगिरीनंतरही पाटील यांच्यावर शाई फेकली
शाईफेक करणारे पोलिसांच्या ताब्यात
कर्मवीर, फुले, आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर समता परिषद आक्रमक
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये
Marathi News LIVE Update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये
समृद्धी महामार्गाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्धघाटन
शिंदेकडून पंतप्रधानांच्या सभास्थळाची पहाणी
महामार्गाच्या उद्धघटनाआधी शिंदे घेत आहेत आढावा
-
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात दाखल समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाआधी एकनाथ शिंदे नागपुरात दाखल
-
एमपीएससीच्या मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने 2025 पासून लागू होणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सामान्य प्रशासनाच्या अतिरीक्त मुख्य सचिवांना आदेश
एमपीएससीच्या मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने 2025 पासून लागू करण्यासंदर्भात सर्व बाजू तपासून अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना
एमपीएससीनं 2023 पासून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे
हा निर्णय 2025 पासून लागू करा आमदार अभिमन्यू पवार यांच देवेंद्र फडणवीसांना पत्र
राज्य सरकार एमपीएससी आयोगाचा निर्णय बदलणार का ?
कोरोना काळात परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत त्यामुळे हा निर्णय 2025 पासून लागू करा विद्यार्थ्यांची मागणी
देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलं दिलं पत्र
-
’16 आमदार असलेल्या पक्षाने पंतप्रधानाविषयी बोलू नये’
’16 आमदार असलेल्या पक्षाने पंतप्रधानाविषयी बोलू नये’, नमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार ‘उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार त्यांना जुमानत नाही’ सुधीर मुनगंटीवार यांची टीका
-
सीमा प्रश्न लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Marathi News LIVE Update
सीमा प्रश्न लवकरच सुटेल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
सीमाप्रश्नी कर्नाटक मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
राज्यातील जनतेला कुठलाच त्रास होणार नाही
फडणवीस यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्गाचं काम
-
पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार
चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कारवाई करण्याची केली मागणी
पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली तक्रार
महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असं केलं होतं वक्तव्य
या विरोधात सर्वपक्षीयांनी पुण्यात तक्रार दिली आहे.
-
आमदार निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतले
महामार्गाच्या कामासाठी उपोषणाला बसले होते
चार दिवसांपासून सुरु होते उपोषण
मनधरणी केल्यानंतर आणि आश्वासनानंतर उपोषण मागे
-
लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन
92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आज दुपारी 12 च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने झाले निधन
-
अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवर 2 गाड्यांचा अपघात
अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवर 2 गाड्यांचा अपघात, महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र सुरूच, पालेगाव ते नेवाळी दरम्यान झाले अपघात
-
पक्षातून मला बाहेर ढकलण्याचं काम केलं जातं आहे – वसंत मोरे
माझी ताकत आजमवण्यापेक्षा पक्षासाठी ताकत लावा, बाबू वागस्कर यांना टोला
माझ्यासाठी फक्त राज ठाकरे प्रमाण आहे, दुसरं कुणी नाही
माझं आणि राज ठाकरे यांच्यातील नातं दाखवण्यासाठी मी तो व्हिडीओ ट्विट केलाय
-
कोल्हापुरात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
सीमा प्रश्नसह राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात धरणे आंदोलन
माजी मंत्री हसन मुश्रीफ सतेज पाटील आंदोलनासाठी शाहू समाधीस्थळाच्या ठिकाणी
-
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागपुरात जय्यत तयारी
लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गावरून 10 किलोमीटरचा फेरफटका मारणार
वंदे भारत एक्सप्रेसलादेखील नरेंद्र मोदी दाखविणार हिरवी झेंडी
वंदे भारत एक्सप्रेस नागपुरात दाखल
नागपूर मेट्रो 2 च्या प्रकल्पांना मान्यता
-
जालना- घनसावंगी: 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संमेलनस्थळी पोहचले
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन
संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक शेषेराव मोहिते
संमेलनाला राज्यभरातून मोठी गर्दी
दोन दिवसीय संमेलनाला सामाजिक आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती
-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता 13 डिसेंबरला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता 13 डिसेंबरला
सकाळी 10 30 वाजता होणार सुनावणी
घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार
कोर्टाकडून प्रकरण लिस्ट
-
धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय असं सांगत फसवणूक
एका व्यक्तीनं मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे केली होती पैशांची मागणी
धनंजय मुंडेंनी ट्टीट करत आपली प्रतिक्रिया दिली
-
महाराष्ट्रातील पदवीधर शिक्षण मराठीमध्ये होणार
सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग डॉक्टर वकील हे शिक्षण इंग्रजीमध्ये होतं
ते आता मराठीत करण्याचा विचार महाराष्ट्र राज्य करत आहे.
-
आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस
चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील येणार
रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी लंके यांचं आमरण उपोषण
आज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर उपोषण मागे घेण्याची शक्यता
-
पुणे बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
पुणे : 13 डिसेंबरच्या पुणे बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा, राज्यपालांच्या विरोधात 13 डिसेंबरला दिली पुणे बंदची हाक, बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन
-
उस्मानाबादेत एका 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
14 वर्षाच्या मुलाने केला बलात्कार, घरा शेजारी राहणाऱ्या मुलीवर केला अत्याचार
मुलगी घरात खेळण्यासाठी आली असताना आरोपीने केला बलात्कार
आरोपीसुद्धा अल्पवयीन असल्याने खळबळ, पोलिसांनी केली अटक
आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
-
13 डिसेंबरच्या पुणे बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
13 डिसेंबरच्या पुणे बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
राज्यपालांच्या विरोधात 13 डिसेंबरला दिली पुणे बंदची हाक
पुणे बंदला पाठिंबा वाढला
वंचित बहुजन आघाडीनं दिला पाठिंबा
बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन
-
चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
सोलापूर : चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, शिक्षणसंस्थाच्या अनुदानासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद, डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन
-
अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
नाशिक : मुंबई नाका परिसरात एका अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह, नासर्डी नदीपात्रात 20 ते 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
-
कृषी महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद
कृषी महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद
नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर प्रदर्शन
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शन
शेतीमाल, भाजीपाल्यासह कृषी उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
वन विभागातर्फे देखील नागरिकांचे प्रबोधन
-
गोंदियात तापमान ८.८ अंशावर
गोंदिया : दुसऱ्या दिवशी पारा घसरला, विदर्भात सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात थंडी, गोंदियात तापमान ८.८ अंशावर
-
आज जळगाव जिल्हा दूध संघाचे मतदान
आज जळगाव जिल्हा दूध संघाचे मतदान, जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडणार , 441 जण मतदान करणार, दिगजांची प्रतिष्ठा पणाला
-
पुण्यातील लक्ष्मी रोडवर रविवारी वॉकिंग प्लाझा
पुण्यातील लक्ष्मी रोडवर रविवारी वॉकिंग प्लाझा
महापालिकेच्यावतीने पादचाऱ्यांसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ राबविण्यात येणार
त्यामुळे रविवारी लक्ष्मी रस्ता सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार
वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरावा
शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांचं आवाहन
-
पुणे-लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या रद्द
पुणे – पुणे-लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या १३ डिसेंबरपर्यंत रद्द, लोहमार्गाच्या कामासाठी वाहतूक विस्कळीत, १० ते १३ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पुणे ते लोणावळा दरम्यानच्या आठ फेऱ्या रद्द
Published On - Dec 10,2022 7:28 AM