Maharashtra Pune Bandh LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Pune Bandh Live Update in Marathi : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : भारत आणि चीन सीमाप्रश्न पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी भारत आणि चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सीमाप्रश्नावर आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुण्यात रिक्षाचं आंदोलन चिघळण्याचीही भीती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. या दोन्ही मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्या तथा डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञात समजकठकांचा हल्ला
– नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्या तथा डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञात समजकठकांचा हल्ला
– धारधार शास्त्राने केला हल्ला
– प्राची पवार ह्या माझी आमदार व राष्ट्रवादीचे माजी दिग्गज नेते वसंत पवार यांची मुलगी
– प्राची पवार यांची प्रकृती गंभीर
– उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
– प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी चव्हाट्यावर
-
10.79 लाख जनधन खाती करणार बंद
Marathi News LIVE Update
10.79 लाख जनधन खाती करणार बंद
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली माहिती
10.79 लाख डुप्लिकेट खाती बंद करणार
या 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात जवळपास 47.57 कोटी जनधन खाती उघडली
-
-
राज्यात औद्योगिक विकासाला मिळणार चालना
Marathi News LIVE Update
राज्यात औद्योगिक विकासाला मिळणार चालना
राज्यात 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजूरी
गडचिरोलीत 20 हजार कोटींचा स्टील प्रकल्प होणार
पुण्यात 10 हजार कोटींचा ईलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प होणार
-
सीमा प्रश्नाबाबत उद्या दिल्लीत बैठक
Marathi News LIVE Update
सीमा प्रश्नाबाबत उद्या दिल्लीत बैठक
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहण्याची चर्चा
विरोधकांची बैठकीपूर्वीच राज्य सरकारवर सडकून टीका
-
शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश
शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचा आदेश, सूत्रांची माहिती
फडणवीसांनी पोलिसांना आरोपींवर लावण्यात आलेलं कलम 307 मागे घ्या, असा आदेश दिल्याची माहिती
-
-
11 पोलिसांचं निलंबन मागे घ्या
Marathi News LIVE Update
11 पोलिसांचं निलंबन मागे घ्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आदेश, सूत्रांची माहिती
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण
आरोपींवरील कलम 307 मागे घेण्याचेही दिले आदेश
-
प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Marathi News LIVE Update
प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-प्रकाश आंबडेकर यांच्यात बैठक
आंबेडकरांची शिंदे -फडणवीसांसोबत बैठक
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत बैठक
-
महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा
Marathi News LIVE Update
महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा
किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली घसरला
परिस्थिती कायम राहिल्यास RBI करु शकते मोठी घोषणा
येत्या काही दिवसात व्याजदराचा बोजा ही होऊ शकतो कमी
-
बिपिन बाफना खून प्रकरणी आज झाली सुनावणी
नाशिक : बिपिन बाफना खून प्रकरणी 3 निर्दोष 2 दोषी,खंडणी-अपहरण खून प्रकरणी आतापर्यंत 35 साक्षीदार तपासले,चेतन पगारे, अमन जट या दोघांना दोषी ठरविण्यात आले,उर्वरित तीन जण सुटले निर्दोषदोषींना शिक्षा गुरुवारी सुनावली जाणार,9 जून 2013 रोजी बिपिन बाफनाचे झाले होते अपहरण -
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सुनावणी लांबली
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात सुनावणी लांबली,सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याची दिली सुप्रीम कोर्टाने सूचना,याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यानुसार करण्यात येणार सुनावणी,आता 17 जानेवारी रोजी होणार सुनावणी. -
ओबीसी आरक्षण आणि प्रभार रचनेची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचने संदर्भात सुनावणी लांबली, सर्व याचिकाकर्त्यांना एकत्रितपणे मुद्दे मांडण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना, 17 जानेवारी रोजी पुढील सुनावणी
-
16 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री कोकण दौरा करणार, सूत्रांची माहिती
16 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री कोकण दौरा करणार, सूत्रांची माहिती
कोकणातील या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री अनेक विकासकामांचा मुख्यमंत्री शुभारंभ करणार
उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित राहणार
त्याचबरोबर बार बारसू रिफायनरीबाबतही आढावा बैठक घेणार, सूत्रांची माहिती
-
शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला
मुंबई : शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला,
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारमधील रहिवासी,
गेल्या २-३ महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता,
बिहारमधून धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेणार, उद्यापर्यंत मुंबईत आणणार.
-
नाशिकरोड येथील जयभवानी रोडवर तणावाचे वातावरण
नाशिक : नाशिकच्या नाशिकरोड येथील जयभवानी रोडवर तणावाचे वातावरण
अनधिकृतरित्या बसविण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मनपाने हटविला
पुतळा हटविल्याने तणाव निर्माण झाला आहे, असून नागरिक आक्रमक
मोठ्याप्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले, तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
-
जिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानं खळबळ
कर्नाटक : रायचूरमध्ये जिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानं खळबळ, पाच वर्षांच्या मुलीमध्ये आढळली लक्षणे, कर्नाटक सरकारकडून झिका व्हायरसबाबत पुष्टी, पुण्यातील लॅबच्या अहवालानुसार पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर
-
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
शरद पवार यांना धमकीचा फोन
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
सिल्व्हर ओकवर फोन करून पवारांना जीवे मारण्याची धमकी
-
महाराष्ट्र राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा उघड
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा उघड,
शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगरचा उल्लेख,
शहराच्या नावात बदल होण्याआधीच महामंडळाने बदललं शहराचं नाव,
औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगरचे झळकले बोर्ड,
शिवशाही बसेसच्या डिजिटल बोर्ड मध्ये करण्यात आला बदल.
-
पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त
पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अलका टॉकीज चौकात महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी
अलका टॉकीज चौकातील सर्व दुकानं बंद
-
आजपासून पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता
रत्नागिरी : पाऊस आणि ढगाळ वातावरण आंबा बागायतदार धास्तावले, तुडतुड्यांसह बुरशीचे संकट गडद, आजपासून पुढचे दोन दिवस रत्नागिरीत अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
-
Video : पुणे बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट
पुणे : पुणे बंदमुळे मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट, बंदच्या पार्श्वभूमीवर जागोजागीच पोस्टरबाजी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे बंदची हाक, वाचा सविस्तर वृत्त
पाहा व्हिडीओ :
-
रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधून बाईक चोरणारा अखेर गजाआड
मुंबई : रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधून बाईक चोरणारा अखेर गजाआड, बोरिवली जीआरपी पोलिसांची कारवाई, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश, वाचा सविस्तर वृत्त
-
डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट
ठाणे : डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट, एका रात्रीत फोडली ७ दुकाने, घटना सीसीटीव्हीत कैद, परिसरात दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
-
गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
नाशिक : गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक,
गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या नाशिकरोड पोलिसांनी केली कारवाई,
एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस असा 25500 रुपयांचा मुद्देमाल जप्त,
संशयित आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस असा 25500 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
-
जळगाव : भाडेकरुने केली घरमालकाही हत्या
जळगाव : भाडेकरुने केली घरमालकाही हत्या, एमआयडीसी पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल, दोघांना अटक, हत्येचं धक्कादायक कारणही समोर, वाचा सविस्तर वृत्त
-
खाजगी कार चालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग
कोल्हापूर : खाजगी कार चालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग, कोल्हापुरातील धक्कादायक घटना, कारचालक रोहित कार्वेकर जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक, कोल्हापूर ते पुणे प्रवासादरम्यान उद्धट वर्तन करत मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून केला विनयभंग
-
महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात पुणे बंद
पुणे : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात आज पुणे बंद, डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा निघणार, लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप, मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसलेही सहभागी होणार, व्यापारी महासंघाचाही आजच्या पुणे बंदला पाठिंबा
Published On - Dec 13,2022 7:26 AM