मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय थेट निर्णय देणार की सत्तासंघर्षाचं प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवणार याकडे देशाचं लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याच्या दौऱ्यावर. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली
सविस्तर बातमी | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण!
कोपरगाव /अहमदनगर
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
अपघातात दोन ठार तर दोन जखमी
भरधाव कारचा टायर फुटल्याने झाला अपघात
टायर फुटून कार दुभाजकावर आदळली
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील घटना
मयतांमध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश
एअरबॅग उघडूनही दोघांनी गमावला जीव
तर दोन जखमी तरुणींवर कोपरगावच्या रुग्णालयात उपचार सुरू
वैद्यकीय कारणासाठी नागपूरहून नाशिककडे जात असताना झाला अपघात
म्युच्युअल फंडातील या योजना करतील मदत
गुंतवणुकीवर जोरदार मिळेल परतावा
कर बचतीसाठी या योजनांचा करता येईल उपयोग
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधील गुंतवणूक फायदेशीर, वाचा सविस्तर
केंद्रीय बँकेने पाच वर्षांत सोन्याची केली मोठी खरेदी
पण आरबीआयने देशात ठेवले कमी सोने
परदेशातील या केंद्रीय बँकांमध्ये ठेवला सोन्याचा साठा
जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे आहे, वाचा बातमी
जीएसटी परिषदेची शनिवारी बैठक
काही वस्तूंवर जीएसटी कमी होण्याची दाट शक्यता
पान मसाला, गुटखा यांचाविषयीचा ही निर्णय होणार
सीलबंद फूड आयटम स्वस्त होण्याची शक्यता, वाचा सविस्तर
दरवर्षीपेक्षा यंदा जास्त गर्दी होण्याची शक्यता
सर्व प्रकारची व्यवस्था सज्ज असल्याची एसीपी संतोष कुमार सिंह यांची माहिती
घाट आणि मंदिराच्या आत सुरक्षाव्यवस्था, तसंच सीसीटीव्ही बसवण्यात आले
केंद्राने केलेले सीलबंद कव्हर सूचना स्वीकारणार नाही- CJI डीवाय चंद्रचूड
सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण पारदर्शकता राखायची आहे- चंद्रचूड
14 फेब्रुवारीपासून सुरू आहे छापेमारीची कारवाई
तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात छापेमारी
स्फोटात एक कामगार ठार, चार जखमी
स्फोटाच्या वेळी कंपनीत होते 49 कामगार
योग्यवेळी सर्व खुलासे करणार – संजय राऊत यांचा इशारा
अफजल खानने जसा विडा उचलला तसा यांनी विडा उचलला -संजय राऊत
तुरुंगात पाठवून मला मारण्याचा डाव होता हे सर्वांनांच माहिती आहे- संयज राऊत
नाशिक : बाजार समितीत लिलाव बंद पाडून नाशिक -औरंगाबाद मार्गांवर केला रास्ता रोको,
आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे इतर पक्षही झाले सहभागी,
कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव किंवा 1500 रुपये अनुदान देण्याची केली जात आहे मागणी.
पालिकेचे प्रशासक राजेश नार्वेकर हे अर्थसंकल्प सादर करत आहेत
यात कोणतीही करवाढ नसणार आहे
प्रलंबित नागरी सुविधा असणारा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे
नवी मुंबईतील नागरिकांना आणखी काय दिलासा मिळतो याची उत्सुकता
अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात
लाखांदूर नगरपंचायतवर एसीबीची मोठी कारवाई
1 लाख 10 हजारांची लाच स्वीकारताना तिघांना अटक
स्थापत्य अभियंता, कनिष्ठ लिपिक व खासगी वाहन चालकाचा समावेश
भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घडामोडी घडलीय. वाचा सविस्तर….
पुणे : चंद्रकांत पाटील कसबा पेठ मतदारसंघात घेणार मनसे पदाधिकाऱ्यांची भेट
गणेश भोकरे यांच्या घरी चंद्रकांत पाटील भेट देणार आहेत,
पुण्यात भाजपचे नेते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला.
शरद पवार आता कसब्याच्या मैदानात
22 तारखेला 4 ते 9 कसब्यात प्रचारसभा
पवारांची कसब्यात जाहीर सभा होणार
आता कसब्यात थेट पवार
पुणे : ८० वर्षाचे पवार साहेब व्याधीग्रस्त असताना पावसामध्ये भिजत सभा घेतात तेव्हा राष्ट्रवादी त्यांच्या जीवाशी खेळत नव्हते का ?
केविलवाणा आरोप करून राष्ट्रवादीने स्वताचा पराभव मान्य केला आहे,राष्ट्रवादीवर टीका,
पक्षनिष्ठा काय असते हे गिरीश बापट यांनी दाखवून दिलं आहे,
गिरीश बापट कसब्यात सक्रिय झाल्यानंतर भाजप राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप.
कोल्हापूर : थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते शाहू कॉलेजमधील एन डी पाटील सभागृहाचं होणार भूमिपूजन,
अजित दादा शाहू कॉलेजच्या आवारात दाखल.
भारतीयांनी केले सोन्याला आडवे
जानेवारीतील आकड्यांनी वाढली चिंता
लग्नसराईत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता
वाढलेल्या किंमतींचा मागणीवर मोठा परिणाम, वाचा सविस्तर
रवींद्र जाडेजाला एक न्याय, त्याला दुसरा न्याय का? त्याला रणजी किंवा दुसऱ्या सामन्यात न खेळवता कशी संधी दिली? वाचा सविस्तर….
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे चक्क बैल घरावरती चढल्याचा प्रकार
बैलगाडा घाटात शर्यतीची बारी झाल्यानंतर हे बैल चक्क एका घरावरती चढले
घराचा सिमेंटी पत्रा फुटून एक बैल घरामध्ये कोसळला
या दोन्ही बैलांना सुखरूप वाचवण्यात यश
नवी मुंबई
उरण येथील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर लागली आग
सुदैवाने कोणतेही जिवितहानी नाही
आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश
अधून मधून वणवा लागण्याच्या घटना सुरूच
आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट
जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या कातकरी समाज बांधवांचे, शिवराज युवा प्रतिष्ठानच्या मावळ्यांचे सर्वत्र कौतुक
पंढरपूर ..
– मंगळवेढा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शाहिरी पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते….
– यावेळी सांगलीच्या 8 वर्षीय हर्षवर्धन माळी या बालशाहीराने छत्रपती शिवरायांवरती बहारदार पोवाडा सादर केला…..
– अवघ्या आठ वर्षाच्या शाहिराने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली…..
– मंगळवेढ्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते…..
– पोवाडे ऐकण्यासाठी हजारो मंगळवेढेकरांनी उपस्थिती लावली होती…
आज दुसरा कसोटी सामना. कोण इन? कोण आऊट? वाचा सविस्तर…..
पुणे : 23 तारखेला आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा,
संध्याकाळी 7 वाजता नाना पेठेत होणार सभा,
मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा,
आदित्य ठाकरेंची सभा अंतिम टप्प्यात ठेवली.
शिर्डी
शाळेतील मुलांना विषबाधा
अमरावतीहून शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
रात्री जेवण केल्यानंतर सुरू झाला उलटी आणि मळमळीचा त्रास
88 जणांना केले रुग्णालयात दाखल
शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
डाॅ. प्रितम वडगावे यांची माहिती
अमरावतीहून 4 थी ते 6 वीच्या 230 विद्यार्थ्यांची निघाली होती सहल
नेवासा येथे रात्री सहलीत बनवले होते जेवण
88 जणांना जेवणानंतर झाला त्रास
रात्री 11 वाजता शिर्डीतील रूग्णालयात केले दाखल
सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची डाॅक्टरांची माहिती
शिवजयंती च्या कार्यक्रमानिमित्त शहरात शिंदे गटाकडून लावण्यात आले बॅनर ..
विशेष उपस्थितां शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांसोबत सत्यजित तांबे
सत्यजित तांबेच्या बॅनर ची नाशिकमध्ये चर्चा ..
मविआचा अमित शहा आणि एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर प्रचारासाठी मास्टर स्ट्रोक
23 तारखेला आदित्य ठाकरेंची कसब्यात जाहीर सभा
संध्याकाळी 7 वाजता नाना पेठेत होणार.सभा
मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
आदित्य ठाकरेंची सभा अंतिम टप्प्यात ठेवली
कामा कारखान्यातील सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी व्यवस्थापक, अभियंता सुरक्षा रक्षकासह ४ जणांना अटक
ज्वेलरी फॅक्टरीत सोन्याची फसवणूक करणाऱ्या प्रोसेस मॅनेजर, सुरक्षा रक्षकासह ४ जणांना मुंबईच्या वनराई पोलिसांनी अटक केली आहे.
कारखान्यातून सुमारे 2 किलो 700 ग्रॅम सोने, प्लॅटिनम आणि 250 ग्रॅम चांदीची बिस्किटे चोरून सर्वजण फरार झाले होते. फेरफार केलेल्या सोन्याची एकूण किंमत सुमारे 1 कोटी 56 लाख रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलचे भाव खरंच कमी होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत
लोकसभा निवडणुकीची ही रंगती तालीम आहे का?
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर घ्या जाणून, वाचा बातमी
चेतेश्वर पुजाराच्या आधी 100 व्या कसोटीत फेल झालेले भारताचे स्टार खेळाडू कोण? वाचा सविस्तर….
Sapna Gill And Prithivi Shaw: हॉटेलबाहेर सपना गिल सोबत झालेल्या वादामुळे पृथ्वी शॉ मोठ्या संकटात सापडला आहे. वाचा सविस्तर….
सोलापूर : सुनील नेमीनाथ लामकाने असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे,
महापालिकेच्या गवसू विभागात सहाय्यक अभियंता पदावर होते कार्यरत,
ठेकेदाराकडून मोजमापे पुस्तकावर सही करण्यासाठी स्वीकारली होती 13 हजार रुपयांची लाच,
महापालिकेच्या इमारतीत स्वतःच लाच स्वीकारताना लामकाने रंगेहात सापडले,
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
पुणे : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम खंदारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल,
महिलेला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती,
पोलीस ठाण्यात 37 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
उत्तम खंदारेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती,
भाजपच्या पदाधिकारी दिव्या ढोले यांच्याकडे तक्रार आल्यावर महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.
बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
750 रुपयांत विद्यार्थ्यांना पास होणार उपलब्ध
घर ते परीक्षा केंद्रापर्यंत पास असणार वैध
21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होतीये परीक्षा
परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना पुढील दरवाज्याने प्रवेश मिळेल
विद्यार्थ्यांना बस मिळावी यासाठी थांब्यावर पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात येणार
राज्य उत्पादन शुल्काची गाडी करत होती पाठलाग
पळून जाण्याच्या नादात टेम्पो झाला पलटी, रस्त्यावर पडली गावठी दारू
गावठी दारूचा महामार्गावर सुटला वास
टेम्पो वाडीवऱ्हे पोलीसांनी घेतला ताब्यात
अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित
टोल प्रशासन आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल
अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून वाहतूक केली सुरळीत
मागच्या वेळेस 15000 कापसाचा भाव होता
मात्र आता सध्या 8 हजार भाव आहे
आपण या बाबीकडे लक्ष द्यावं, असं आमदार चिमणराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोरच कापसाच्या भावाबाबत मागणी केली
संजय काकडेंनी दिवसभरात घेतली मनसे पदाधिकऱ्यांची भेट
संजय काकडे कसब्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची घेतायत भेट
मी नाराज नव्हतो, मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर असल्यामुळे प्रचारात सहभागी होऊ शकलो नाही,
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार दिवसभर प्रचार सुरू केला आहे
आम्हाला महाविकास आघाडीचे आव्हान नाहीय, काकडे यांचा दावा
टोल भरण्याच्या मुद्द्यावरून 60 जणांनी टोलनाक्याची तोडफोड केली
संत सेवालाल यांच्या जयंतीसाठी हे जाणार होते
पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले, पुढील कारवाई सुरू आहे
डोंबिवली कोळगाव परिसरातील धक्कादायक घटना
गोळीबार झाल्याने बाजारात नागरिकांची भीतीने धावपळ
मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लष्करी जवानाला घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल
विनेश विजय सुर्वे असे या निवृत्त लष्करी जवानाचे नाव