मुंबई: शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका लागला असून त्यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानात दहशतवादी हल्ला. तीन तास चाललेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, कोट्यवधी रुपये येणार तिजोरीत
काकवी, पेन्सिल शार्पनर होणार स्वस्त, या वस्तुंच्या किंमती कमी
गुटखा, पान मसाल्याबाबत झाला हा निर्णय, GoM ने केली होती शिफारस, वाचा बातमी
आयकर विभागाच्या सर्वेक्षणात या गोष्टी आल्या बाहेर
60 तास प्राप्तिकर विभागाचे पथक बीबीसी कार्यालयात
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली ही माहिती, वाचा बातमी
मातोश्रीच्या गेटवर ओपन जीपवरून उद्धव ठाकरे संबोधित करणार
मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते मातोश्रीवर दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावसुद्धा पोटनिवडणूकी पर्यंतच वापरता येणार
शिंदे गटाला शिवसेना हे नाव देण्यात आले
ठाकरे गट पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाणार
नांदेश्वर मंदीरात भक्तांकडून महापूजा संपन्न
शिवशंकराच्या गजरात भक्त तल्लीन
मंदिर परीसरात शिवशंकराची आकर्षक रांगोळी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाची निदर्शन
बिंदू चौकात ठाकरे गटाचं आंदोलन
आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी
भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापुर : बिंदू चौकात ठाकरे गटाच आंदोलन,
आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी,
भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी.
शिवसेनेची मालकी आयोगातील पोपटरावांनी ठरविली – संजय राऊत
सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ- संजय राऊत
लोकशाही, लोकभावना पायदळी तुडवून निर्णय- संजय राऊत
ही सूडभावना, लोकशाही मार्गाने निर्णय नाही, राऊतांचा आरोप
कोल्हापूर : अमित शहा उद्या कोल्हापुरात बैठक घेणार या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर होणार चर्चा,
मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या हालचाली वाढल्या,
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विस्तार करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती,
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर हालचाली वाढल्या.
– शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी जुन्नर येथे १९ फेब्रुवारी येथे शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
– १८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत वाहनांची होणारी गर्दी पाहता आदेश
– कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.
– नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जातील.
– ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.
– गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील.
– आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
औरंगाबाद : महिलांची छेड काढल्यामुळे पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस ठाण्यात केली पोलिसानेच शिवीगाळ,
पोलीस सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्याने फौजदाराने पोलीस ठाण्यात जाऊन घातला गोंधळ.
मद्य धुंद फौजदाराने महिलांना दिला होता त्रास आणि धमक्या.
औरंगाबाद मध्ये पोलीस अधिकाऱ्यानंतर फौजदाराची महिलांना धमकवल्याने गुन्हा दाखल.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी गर्दी झाली आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पण आज ओंकारेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेणाद आहेत
दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली आहे
खुल्या बाजारात केंद्र सरकारने आणला मोठा साठा
किंमती कमी करण्यासाठी ई-लिलावाद्वारे गव्हाची विक्री
गव्हाच्या पीठाचे गगनाला भिडलेले दरही येणार आटोक्यात
खासगी व्यापाऱ्यासह राज्य सरकारांना गव्हाच्या खरेदीची मुभा, वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत सहकार परिषदेला लावणार हजेरी
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये बैठकीची शक्यता
अमित शहा जे डब्ल्यू मँरीयट हॉटेलमध्ये असणार आहेत
काश्मीरमधील शहीद पोलिसांच्या मुलींशी संवाद कार्यक्रमाला लावणार हजेरी
पुणे शहर पोलीस बीडीडीएस पथकाकडून मंदीर परिसराची तपासणी
तेजा या श्वानाच्या मदतीने पोलीसांकडून तपासणी करण्यात आली आहे
मंदिर परिसरात आतापासूनच पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे
अमित शाह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली आहे
तेल आयातीत 384 टक्क्यांची वाढ
रशियाकडून भारताने केली स्वस्तात तेल खरेदी
देशात पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार
आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय, वाचा बातमी
नाशिक : औरंगाबाद रोडवरील ओढा येथे घडली घटना,
अवघ्या चार तासांत पोलिसांनी संशयितांना शहापूर येथून पकडले,
संशयित मध्ये पोलीस हवालदाराच्या मुलाचा समावेश.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल
भद्रकाली, नाशिकरोड, पंचवटी, अंबड या ठिकाणी मिरवणूक मार्गावर वाहतुकीत बदल
रविवारी दुपारी बारा वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीत राहणार बदल
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
डेन्मार्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात पुण्याचाही नंबर
जगात वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात 6 वा नंबर पुण्याचा
10 शहरांच्या यादीत पुणे 6 व्या स्थानावर आहे
पुण्यात10 कि.मी अंतर कापण्यासाठी 17 मिनटं लागतात, इन्स्टिट्यूटचा सर्व्हे
कोल्हापूर : शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करून नियुक्तींचे अधिकार एकट्याकडे घेतली,
नियुक्तीचे अधिकार एकट्याकडे घेणाऱ्यांनी लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढू नये,
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका,
2018 ची घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हाच ते उघडे पडतील दीपक केसरकर यांचा दावा,
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे यांची झाली चौकशी
ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्जप्रकरणी झाली चौकशी
चौकशीनंतर तिघांनाही ईडीने बजावलं समन्स
ब्रिक्स प्रकरणी सर्वच माझे संचालकांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता
बँकेवरील छापा सत्रानंतर तर आता माजी संचालकांची चौकशी
आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील श्री बाबुलाल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी,
मुंबईतील विविध भागातील शिवभक्तांची सुमारे 1 किलोमीटरची रांग आहे,
हे सर्व भाविक श्री बाबूनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी आले आहेत,
रस्त्यावर वाहतुकीची समस्या आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त.
अमित शाह रात्रीच नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले
नागपुरात आगमन झाल्यानंतर त्यांनी फुटाळाच्या पाण्यावर तरंगणारा फाउंटन शो बघितला
त्यानंतर आता ते रेडिसन ब्लू हॉटेलला पोहचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह मिळाल्याने
ठाकरे गटाचे कार्यकर्ते केंद्रीय निवडणूक आयोगावर नाराज
ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोस्टर लावून निषेध करत आहेत
हे पोस्टर दादर परिसरात लावण्यात आले आहे
लोकशाहीची हत्या, असं पोस्टरवर लिहिलंय
हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना व धनुष्यबाण हे कोणा गटाला बहाल केला
ही तर लोकशाहीची हत्या आहे.
निवडणूक आयोगाच्या निषेध
हुकूमशाहीकडे पडलेलं पहिलं पाऊल… पोस्टरवर असा मजकूर छापण्यात आला आहे
सध्या जिथे जिथे अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत, तिथे मुंबई पोलीस ती पोस्टर्स हटवत आहेत
परंपरागत पुजाऱ्यांकडून 12 वाजता अभिषेक आणि आरती
24 तासात दीड ते दोन लाख भाविक दर्शन घेण्याची शक्यता
यंदा कोरोनाचे निर्बंध संपूर्णपणे उठल्यानंतरची पहिलीच महाशिवरात्र असल्यामुळे
भाविकांनी मध्यरात्रीपासूनच शिव मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली
मंदिर परिसरात आणि बाहेरच्या भागात तब्बल 500 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे