Maharashtra Breaking News Live : यंदा भारतीयांच्या पगारात होणार घसघशीत वाढ
Maharashtra News Live : दिवसभरातील महhttps://www.tv9marathi.com/wp-admin/admin.php?page=tv9ranking/tv9ranking.phpत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज दिग्गज मैदानात उतरणार आहेत. मतदानाला अवघे दोन दिवस उरल्याने दिग्गजांचा दोन्ही मतदारसंघात तळ. इंडोनेशियात मध्यरात्री भूकंपाचा जोरदार धक्का. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.3 एवढी नोंदवण्यात आली. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी मनसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश
पुणे :
– कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी मनसैनिकांना राज ठाकरेंचा आला आदेश
-हिंदुत्वाच्या मुद्यावर पूर्ण ताकतीने मनसे कसबा आणि चिंचवडमध्ये भाजप बरोबर असणार,
– राज ठाकरे यांचे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश,
– याच आदेशानुसार काम करण्याच्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना,
– शिवाय मी स्वतः पुण्यात तळ ठोकून असणार आहे बाळा नांदगावकर यांची मनसेच्या प्रमुख पदाधिकऱ्यांच्या बैठकीत माहिती
-
त्र्यंबकेश्वर तालुक्यात खाजगी बसचा भीषण अपघात
गुजरातल्या जोडणाऱ्या घाटात बस उलटली
गुजरातचे भाविक त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन परतत असताना झाला अपघात
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
जवळपास 30 भाविक जखमी, त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर
-
-
यंदा भारतीयांच्या पगारात होणार घसघशीत वाढ
महागाईशी सामना करण्यासाठी कंपन्या देणार इन्क्रिमेंट
भारतातील अनेक कंपन्या वेतनवाढीसाठी अनुकूल
पगारवाढीसाठी काही कंपन्यांचा मध्यममार्ग, सोयी-सुविधा वाढविणार, वाचा बातमी
-
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर बलात्काराचा आरोप
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणी वाढल्या आहेत
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले
आता अभिनेत्यावर थेट बलात्काराचा आरोप करण्यात आलाय
-
प्रवीण दरेकर
राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत
कारण शिंदे फडणवीस यांचा सरकार स्थिर आम्हाला पूर्ण बहुमत
राज्यातल्या जनतेचा विश्वास
जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार
ऑन राष्ट्रवादी विधान
हे सगळ शरद पवार यांच्या समोर घडल
या राज्यात जातीयतेचे विष कुणी परल तो नेता कोण हे महाराष्ट्राला माहित आहे
भाजप नेते प्रवीण दरेकर यांची नाव न घेता शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची थट्टा केली आहे
राज्यातली जनता तुम्हाला चांगलीच ओळखते
ऑन अजित पवार राणे विधान
अजित दादांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं
सकाळची शपथ घेतल्यानंतर तुम्हाला फोडाफोडीवर बोलण्याचा अधिकार नाही
तुम्ही देखील वसंत दादा पाटील यांच्या पाटीत खंजीर खुपसून राजकारण केलं होतं
-
-
पुणेकराच्या हाती लवकरच जागतिक बँकेची कमान?
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दर्शविली पसंती, नाव केले पुढे
भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवणार, वाचा बातमी
-
वाशिम मंगरुळपीर येथे भीषण आग
मंगरूळपीर येथे भीषण आग लागलीये
मंगरूळपीर शहरातील अकोला चौकातील कदम कुशन येथे आग
कदम कुशनसोबतच बाजूच्या दुकानांचेही मोठे नुकसान
-
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’!
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करून माहिती
-
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी
औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करून माहिती
-
भाजपा निवडणूकीसाठी काहीही करू शकत- यशोमती ठाकूर
ज्या दिवशी गरज असेल तेव्हा उद्धव ठाकरे बाहेर पडतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यशोमती ठाकूरांच प्रत्युत्तर
कसब्यात काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल
देशात भाजपची अरेरावी चालली आहे, मुस्कटदाबी केली जाते
-
मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारी
मुंबई :
मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसवायच्या विद्यार्थ्यांमध्ये ही हाणामारी झाली
सध्या समता नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
‘ज्या दिवशी गरज असेल तेव्हा उद्धव ठाकरे बाहेर पडतील’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यशोमती ठाकूरांच प्रत्युत्तर
पुणे :
‘भाजपा निवडणूकीसाठी काहीही करू शकतं’
‘ज्या दिवशी गरज असेल तेव्हा उद्धव ठाकरे बाहेर पडतील’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यशोमती ठाकूरांच प्रत्युत्तर
‘कसब्यात काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल’
‘देशात भाजपची अरेरावी चालली आहे’
‘मुस्कटदाबी केली जाते’
‘पवन खेरांना विमानतळावरून अटक करण्यात आली’
‘राज्यात अरेरावी सुरू आहे’
यशोमती ठाकुरांची प्रतिक्रिया
-
सर्वसामान्यांवर ईएमआयचा बोजा पडणार?
आरबीआयच्या धोरणाचा होणार परिणाम
काय म्हणतायेत रेटिंग एजन्सीज, काय केला दावा
आता ईएमआय आता आणखी किती वाढणार
चाकरमान्यांचे बजेट पुन्हा कोलमडणार? वाचा बातमी
-
राज्य सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारणार
मुंबई :
राज्य सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारणार
सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य शासनाला नोटीस
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी
-
सोलापूर
सोलापुरात कंटेनरखाली दुचाकी घुसून झालेल्या अपघाताचे Cctv फुटेज आले समोर
अपघातात एक युवक ठार तर एक गंभीर जखमी
सोलापूर-अक्कलकोट रोडवर झाला अपघात
अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुननगर जवळील टाटा शोरूम समोर ही घटना घडली.
या अपघातात विनीत पोरंटला या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पवन नामपल्ली (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पवन आणि विनीत हे दोघेही अक्कलकोटहुन सोलापूरकडे येत असताना झाला भीषण अपघात
याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा
-
जुनी पेन्शन योजनेवरुन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी टोचले कान
केंद्र सरकारने टाकला आर्थिक बॉम्ब
जुनी पेन्शन योजनेविषयी केंद्राची प्रतिकूल भूमिका
नवीन पेन्शन योजनेसाठी केंद्र सरकार आग्रही
कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, वाचा बातमी
-
काँग्रेसचं यंदा 85 वं राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगडमधल्या रायपुरमध्ये
रायपुर : विविध राज्यातील काँग्रेस नेते रायपुरमध्ये यायला सुरुवात,
रायपुर शहरात सगळीकडे काँग्रेसची बँनरबाजी,
राष्ट्रीय नेते अधिवेशनासाठी राहणार उपस्थित,
महाराष्ट्र काँग्रेसबाबत कोणता निर्णय अधिवेशनात घेतला जाणार.
-
उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या
रोहित रमेश गांगुर्डे (36) असं मृताचं नाव, तर अमित रमेश गांगुर्डे (34) असं आरोपी भावाचं नाव
घरगुती वादातून डोक्यात दगड घालून केली हत्या
उल्हासनगर पोलिसांनी आरोपी भावाला घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
-
हेमंत रासने यांच्या रोड शो मध्ये शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के सहभागी
पुणे : हेमंत रासने आणि एकनाथ शिंद यांच्यावर लोकांमध्ये असलेल्या प्रेमामुळं भाजपचे उमेदवार हेमंत रासने नक्की विजयी होतील,
राष्ट्रवादी मतांसाठी करत असलेलं राजकारण उस्मान हिरोली यांच्या वक्तव्यवरून दिसतंय,
सुप्रिया सुळे कायं म्हणतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही – नरेश म्हस्के.
-
बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीकडून बजेट जलावो आंदोलन
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बजेटच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला
जोरदार निदर्शने करून बजेट वाढवून देण्याची मागणी केली
-
अजय बंगा अन् पुणे नाते
जागतिक बँकेचे होणारे प्रमुख अजय बंगा यांचे पुण्याशी नाते
अजय बंगा यांचा जन्म पुण्यात….वाचा सविस्तर
-
Entertainmen Update : Money Laundering प्रकरणात प्रसिद्ध निर्माता ईडीच्या रडारवर; अडचणीत मोठी वाढ
२०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रसिद्ध निर्मात्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता
ईडीकडून सेलिब्रिटीला समन्स… कोण आहे हा प्रसिद्ध सिनेमा निर्माता?… वाचा सविस्तर
-
काँग्रेस वर्किंग कमिटी साठी निवडणूक होणार नाही
रायपुर : वर्किंग कमिटीच्या नियुक्तींबाबत अध्यक्षांना सर्वाधिकार,
रायपूर महाअधिवेशनात याबाबत सहमतीने निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती,
अध्यक्षपदासाठी निवडणुकीनंतर वर्किंग कमिटीच्याही निवडणुका घेण्याची होती मागणी.
-
भारतीय जनता पार्टीचा चिंतन मेळावा चिपळूण येथे सुरु
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा मेळाव्याला उपस्थित
भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन
भाजपच्या मेळाव्याला अजय कुमार मिश्रा यांची उपस्थितीत प्रचंड घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी केली चिंतन बैठकीला सुरुवात
-
Ravindra Jadeja : जाडेजामुळे टीम इंडियाच्या एका प्लेयरच करिअर संपल! नाईलाजाने घ्यावी लागली निवृत्ती
एकवेळ अश्विनसोबत त्याची जोडी हिट समजली जायची. पण नाईलाजाने त्याला निवृत्ती घ्यावी लागली. वाचा सविस्तर…..
-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
नाशिक : नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील बांधकाम भवन समोर कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन,
संपूर्ण महाराष्ट्रात आज सुरू आहे आंदोलन,
नाशिकमधील जवळपास 70 ते 80 कर्मचाऱ्यांचा सहभाग,
60 ते 85 वयोगटातील कर्मचारी सहभागी.
-
Gautam Gambhir : स्वत:च्या टीमच्या कॅप्टनवर येताच गौतम गंभीर बचावासाठी उतरला मैदानात
Gautam Gambhir : तेच अन्य मोठ्या खेळाडूंबद्दल बोलताना गंभीरची जीभ अजिबात कचरत नाही. वाचा सविस्तर….
-
BCCI | मुंबईतलं बीसीसीआयचं ऑफिस खाली करण्यात येणार, कारण नक्की समजून घ्या
बीसीसीआयचं मुंबई ऑफिस लवकरच होणार रिकामं, बीसीसीआय भाड्याच्या इमारतीतून सध्या चालवणार कारभार. वाचा सविस्तर….
-
कोल्हापूर : मोबाईल चोरणाऱ्या महिलांना नागरिकांनी पकडलं
यात्रेच्या गर्दीत भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या महिला चोरट्या सापडल्या
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावातली घटना
दोघा महिला चोरट्यांना नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
रुकडीच्या दर्गा परिसरात या चोरट्या महिलांना पकडले
त्यांच्याकडून दोन चोरलेले मोबाईलही घेतले ताब्यात
-
आज सोने-चांदीत पडझड
सोने-चांदी खरेदीची मोठी संधी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महागण्याची शक्यता
सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा सोने 2800 रुपायांनी स्वस्त
चांदी उच्चांकी किंमतीपेक्षा 14800 रुपयांनी घसरली, वाचा बातमी
-
मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली
काही दिवसांआधी दिल्लीपेक्षा वाईट झाली होती मुंबईची हवा
हवेची गुणवत्ता सुधारल्याने मुंबईकर घेत आहेत मोकळा श्वास
चेंबुर आणि बीकेसीमध्ये हवा अजूनही दुषीतच
-
राजस्थान : शिक्षक भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
मुख्य आरोपी भूपेंद्र सरनला बेंगळुरू विमानतळावरून अटक
-
भारताचं नागरिकत्व मिळवण्याबाबत अक्षय कुमारने केलं स्पष्ट
अक्षय कुमारकडे कॅनेडियन नागरिकत्व
भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी केला अर्ज
भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे, मी जे काही कमावलं ते सर्व मला इथूनच मिळालं- अक्षय कुमार, वाचा सविस्तर
-
आधी लग्नाचा खोटा ड्रामा, नंतर शारीरिक-मानसिक छळ; अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप
‘मिठाई’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता आशिष भारद्वाज याच्यावर अभिनेत्री काजल चोनकरकडून गंभीर आरोप
सहा महिन्यांपूर्वी केलं लग्न, मात्र आशिषकडून लग्नाचा स्वीकार करण्यास नकार
काजलकडून आशिषविरोधात FIR दाखल, वाचा सविस्तर
-
IND vs AUS Test : खूप गहजब झाला, तो नागपूर आणि दिल्ली टेस्ट मॅचचा पीच कसा होता? समोर आला ICC चा निर्णय
दिल्ली आणि नागपूर कसोटी तीन दिवसात संपली. आता ICC ने पीच संदर्भात महत्त्वाच निरीक्षण नोंदवलय. वाचा सविस्तर…..
-
मनपाची नवीन नळजोडणी आता झाली महाग
नाशिक : अनामत शुल्क तसेच व्यावसायिक नळजोडणीसाठी मोजावे लागणार जादा पैसे,
घरगुती पाचपट तर व्यावसायिक नळजोडणी 15 पट महागली,
घरगुती एक इंची नळजोडणी साठी मोजावे लागणार 500 रुपये,
व्यावसायिक नळजोडणी साठी मोजावे लागणार 100 ऐवजी 1500 रुपये.
-
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वधारले
आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झाली का वाढ
देशातील या राज्यांनी व्हॅट आणि सेस लावला
तुमच्या शहरात आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव
वाचा बातमी या लिंकवर : Petrol Diesel Price : काही राज्यांनी लागू केला सेस, आज तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय
-
Harmanpreet Kaur ने देशापासून काय लपवलं? पराभवानंतर देशासमोर ती गोष्ट नाही येऊ दिली
अशी कुठली गोष्ट Harmanpreet Kaur ने देशाला कळू दिली नाही. वाचा सविस्तर…..
-
VIDEO : MS Dhoni आणि Harmanpreet Kaur च्या ‘त्या’ Video ने कोट्यवधी फॅन्सचे डोळे पाणावले
MS Dhoni आणि Harmanpreet Kaur चा एक व्हिडिओ ICC ने शेअर केलाय. हा व्हिडिओ कोट्यवधी भारतीयांचे डोळे पाणावतील. वाचा सविस्तर…..
-
Pune Live -पवनानगर येथे अजगराला दिले जीवदान
वन्यजीव रक्षक मावळ सर्पमित्र आणि मावळ वन विभागाने या अजगराला रेस्क्यू करत दिले जीवदान
पवना धरण परिसरातील अमरजा इस्टेट येथील एका इमारतीत हा अजगर लपून बसला होता
-
राज्यातील कमाल तापमाणात वाढ
विदर्भात सर्वाधीक तापमाणाची नोंद
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधे तापमाणाचा पारा 37 अंशावर
नागरिकांना काळजी घेण्याचे आवहान
-
पवनानगर येथे अजगराला दिले जीवदान
-पवनानगर येथे अजगराला दिले जीवदान
-वन्यजीव रक्षक मावळ सर्पमित्र आणि मावळ वन विभागाने या अजगराला रेस्कु करत दिले जीवदान
-पवना धरण परिसरातील अमरजा इस्टेट येथील एका इमारतीत हा अजगर लपून बसला होता
-रहिवाशानी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यां सोबत संपर्क साधत त्यांना पाचारण केले,ह्या सदस्यांनी अजगराला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले
-
गोदावरीतून मल नव्हे, तर मलजल वाहत असल्याची राजेंद्र सिंह यांची टीका
नाशिक : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली खंत,
गोदावरीचा नैसर्गिक जलप्रवाह संपुष्टात आल्याची केली टिप्पणी,
ब्रम्हगिरी पर्वतरांगेत सुरू असेलल्या अवैध उत्खनन बाबत व्यक्त केली नाराजी.
-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यातून रायपूरला रवाना
काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला लावणार उपस्थिती
बाळासाहेब थोरातांचाही राष्ट्रीय अधिवेशनात विषय समितीत समावेश आहे
बाळासाहेब थोरात अधिवेशनाला जाणार का?
25 पासून अधिवेशनाला होणार सुरुवात
महाराष्ट्र काँग्रेसचा वाद रायपूरमध्ये मिटण्याची शक्यता
-
नगरच्या पाथर्डीत चोरट्यांच्या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी
पाथर्डी शहरातील सुवर्णकार बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी केला हल्ला
हल्ल्यात चिंतामणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
हल्ला करून चोरट्यांचा पोबारा
बंडूशेठ चिंतामणी हे काल सायंकाळी नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले होते
घरा जवळ अज्ञात मोटर सायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी चिंतामणी यांच्या दुचाकीला अडवले
त्यांच्याकडील दुकानांच्या चाव्या आणि पिशवी घेऊन चोरट्यांनी केला धारदार शस्त्राने डोक्यावर वार
या हल्ल्यामध्ये चिंतामणी गंभीर जखमी
-
संजय राऊत यांच्या विरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल
दोन समाजात तेढ निर्माण करणे, शिवाय त्या वक्तव्यामुळे दोन्ही गटात द्वेष निर्माण झाल्याची तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांनी केलीय
त्यानुसार बीड शहर पोलिसांत खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय
अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याने संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे
-
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत भाषण केलेल्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करा
भाजपा माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकरांची पुणे पोलिसांत तक्रार
मयत माणसांनाही हजर करा असं व्हीडीओच्या माध्यमातून केलं होतं आवाहन
तशी व्हिडीओ क्लीपही पुरावा म्हणून केली सादर
बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
भाजपनं या विरोधात पेटवलं रान
-
इंडोनेशियाला भूकंपाचे जोरदार झटका; कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही
मध्यरात्री इंडोनेशियात भूकंपाचा जोरदार धक्का
रिश्टर स्केलवर 6.3 एवढी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली
टोबेलोपासून 177 किलोमीटरवर उत्तर दिशेला भूकंपाचा केंद्र बिंदू होता
या आधी गुरुवारी रात्री गुजरातच्या अमरेलीत भूकंपाचे धक्के जाणवले होते
गुरुवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले होते
गुजरातमधील भूकंपाची तीव्रता 3.4 एवढी होती
Published On - Feb 24,2023 6:11 AM