Maharashtra Breaking News Live : अदानी, अंबानीच नाही तर या धनकुबेरावरही लक्ष्मी रुसली

| Updated on: Feb 26, 2023 | 6:10 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live :  अदानी, अंबानीच नाही तर या धनकुबेरावरही लक्ष्मी रुसली
Maharashtra News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगंवत मान यांनी घेतली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. आता मतदानाकडे सर्वांचं लक्ष. तजिकिस्तानमध्ये भूकंपाचा जोरदार झटका. अनेक इमारती जमीनदोस्त.यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Feb 2023 09:04 PM (IST)

    होळीपूर्वीच केंद्र सरकार देणार कर्मचाऱ्यांना गिफ्ट

    काँग्रेस राज्य सरकारांवर केंद्र करणार कुरघोडी

    जुनी पेन्शन योजनेवर तोडगा काढण्यासाठी जालीम उपाय

    वेतनात मोठी वाढ करण्याची शक्यता

    होळीपूर्वीच किमान वेतन मर्यादेत होऊ शकते वाढ, वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 08:48 PM (IST)

    अवैधरित्या गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला नालासोपारा येथे अटक

    वसई

    अवैधरित्या गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला नालासोपारा येथे अटक

    गुन्हे शाखा कक्ष 02 वसईचे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणविरे यांच्या पथकाला यश

    अटक संशयिताकडून एक गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतूस आणि एक रामपुरी चाकू असा मुद्देमाल जप्त

    नालासोपारा पूर्व ओसवाल नगरी, ओम साई पॅलेस जवळ आज शनिवारी झाली ही कारवाही

    याबाबत आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.

    पृथ्वीराज कुंदनप्रसाद भारती असे अटक आरोपीचे नाव

    हा वसई पूर्व गोखीवरे, आंबेडकर नगर, जानकीपाडा येथील सुरज गवारी चाळीमधील राहणारा आहे.

  • 25 Feb 2023 08:40 PM (IST)

    जर काँग्रेसमध्ये ताळमेळ नाही असं म्हणता मग घाबरता का ?; बाळासाहेब थोरात यांचा सवाल

    मुंबईः

    मी राजीनामा दिला असं कोणी सांगितलं ?

    बाळासाहेब थोरातांचा यु टर्न की थोरातांनी राजीनामा दिला नाही ?

    पक्षपातळीवर या संदर्भात चर्चा सुरू

    सगळ्या पक्षात हे असतं मात्र काँग्रेसची चर्चा जास्त होती

    निवडणूक आयोगाकडे भाजपा तक्रार करणार होतं

    मात्र पैसे वाटप करतं त्याची तक्रार नाही

    जो आरोप आहे तो गंभीर आहे मात्र प्रशासनाने काळजी घेऊन आश्वासन दिलं

    कसब्याच्या निवडणूकीत आम्ही प्रचाराला गेलो

    जर काँग्रेसमध्ये ताळमेळ नाही असं म्हणता मग घाबरता का ?

    एवढी यंत्रणा कसब्यात प्रचारासाठी भाजपनं उतरवली

  • 25 Feb 2023 08:35 PM (IST)

    सोलापुरात भाजपासह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

    – सोलापुरात भाजपासह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

    – भाजपासह प्रहार संघटनेला दक्षिण सोलापूर तालुक्यात धक्का

    – दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप आणि प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात केला प्रवेश

    – माजी आमदार रविकांत पाटील, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश

    – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश

  • 25 Feb 2023 08:30 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमधील गंगागमाई साखर कारखान्यात स्फोट

    अहमदनगर

    शेवगाव येथील गंगागमाई साखर कारखान्यात स्फोट

    इथेनॉल प्लांटला आग लागल्याची प्राथमिक माहिती

    अनेकजण दगावल्याची भीती तर अनेक गंभीर जखमी

  • 25 Feb 2023 08:15 PM (IST)

    गुंतवणूकदारांचा बाजारातील हनिमून संपला

    नवशिके आणि ट्रेडर्स यांचा बाजारातून काढता पाय

    रातोरात श्रीमंत होण्यासाठी घेतली होती बाजारात धाव

    एका वर्षात बाजारातून म्हणावा तसा परतावा नाही मिळाला

    शेअर बाजारात हिरमोड झाल्याने गुंतवणूकदारांचे सपशेल दुर्लक्ष, वाचा बातमी 

  • 25 Feb 2023 08:10 PM (IST)

    शेवगाव येथील गंगागमाई साखर कारखान्यात स्पोर्ट

    इथेनॉल प्लांट ला आग लागल्याची प्राथमिक माहिती

    अनेकजण दगावल्याची भीती तर अनेक गंभीर जखमी

  • 25 Feb 2023 07:14 PM (IST)

    महारत्न कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिला रग्गड परतावा

    सुरुवातीच्या काळात केली गुंतवणूक आणि ठेवला संयम

    पाच वेळा दिला या कंपनीने बोनस शेअर, झाला मोठा फायदा

    4.38 रुपयांहून शेअर आता 100 रुपायांच्या पुढे

    आता फायद्याचा हिशेब तुम्हीच लावा, वाचा बातमी 

  • 25 Feb 2023 06:35 PM (IST)

    सोलापुरात प्रेमी युगुलाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

    सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये

    एकाच झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलांनी आत्महत्या केलीये

    मृत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती

  • 25 Feb 2023 06:21 PM (IST)

    अदानी, अंबानीच नाही तर या धनकुबेरावरही लक्ष्मी रुसली

    गौतम अदानी यांचे तर साम्राज्यच हादरले

    अदानी आता श्रीमंतांच्या टॉप-30 यादीतून बाहेर

    अंबानी ही भारतातील सर्वाधिक संपत्ती गमाविणाऱ्या यादीत दुसरे

    डीमार्टच्या प्रमुखांसाठी यंदाचे वर्ष वाईट, अब्जाधीशांचे झाले नुकसान, वाचा बातमी 

  • 25 Feb 2023 06:10 PM (IST)

    आम्ही युती कोणासोबत करू शकतो हे राज्यावर सोडून देणार; इम्तियाज जलील

    – पक्षाला कशी मजबुती करता येईल असे अनेक प्रश्न ओवैसी यांच्याकडे आम्ही मांडले

    -पाच लोकांची एक कमिटी तयार करण्यात आली आहे. वाचननामा तयार करण्यासाठी

    -आम्ही युती कोणासोबत करू शकतो हे राज्यावर सोडून देण्यात आले

    -एक आमचं हेड ऑफिस तयार करण्यात यावं हा मुद्दादेखील मांडला

    -हे अधिवेशन उद्या शेवटचा दिवस आहे चेंबूर येथे ओमीगा हॉलमध्ये होणार

    -उद्या काही ठराव देखील आम्ही मांडणार आहोत

    -पुढचं अधिवेश हे हैद्राबादलादेखील ओवैसी घेणार

  • 25 Feb 2023 06:02 PM (IST)

    Pune By Polls 2023 | चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक, मतदान प्रक्रियेसाठी पोलीस सज्ज

    Pimpari Chichwad By Polls 2023 |  मतदान प्रक्रियेसाठी पोलीस सज्ज

    – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज

    – अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    -13 संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष

    – 7 पोलीस उपायुक्त,110 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक,1100 पोलीस कर्मचारी,275 होमगार्ड ,05 निमलष्करी दलाच्या तुकड्या,1 सीआरपीएफ तुकडी असा तगडा बंदोबस्त.

  • 25 Feb 2023 05:34 PM (IST)

    ठाण्यात शिवगर्जना यात्रेचा शुभारंभ, ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

    ठाणे :

    ठाण्यात शिवगर्जना यात्रेचा शुभारंभ

    ठाण्यातील मासुंदा तलाव याठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

    वंचित बहुजन आघाडीचा देखील सक्रिय सहभाग

    पुढील आठवडाभर विविध कार्यक्रम करणार आयोजित

    सेना खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली रॅली साज आयोजन

    ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेसह इतर मान्यवर उपस्थित

  • 25 Feb 2023 05:32 PM (IST)

    टाटा समूहाच्या या कंपनीचा परदेशातही डंका

    जगभरातील पाच खंड आणि 55 देशांमध्ये सेवा

    परदेशात, अमेरिकेत पहिल्यांदा सुरु केले होते कार्यालय

    गुंतवणूकदारांना मोठा फायदा होण्याची शक्यता

    दीर्घकालीन गुंतवणुकीचा होणार मोठा फायदा,  वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 05:20 PM (IST)

    भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला

    पुणे : 

    भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला

    काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची तक्रार करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला

    आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा या शिष्टमंडळात समावेश

  • 25 Feb 2023 04:57 PM (IST)

    महाविकास आघाडीकडून उद्या बोगस मतदान होण्याची शक्यता आहे- भाजप

    शरद पवारांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यानंतर बोगस मतदान होण्याची भाजपला भीती,

    बोगस मतदान होणाऱ्या मतदान केंद्रांची यादी भाजप शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांना दिली,

    या मतदान केंद्रावर अधिकचा बंदोबस्त देण्याची मागणी

  • 25 Feb 2023 04:47 PM (IST)

    धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार; राजेश पांडे यांचा इशारा

    – रवींद्र धंगेकर यांनी बिनबुडाचे आरोप करत स्टंटबाजी केली

    – रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार

    – धंगेकर यांची उमेदवारी रद्द का करू नये ? अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करणार आहोत,

    – यापूर्वीही धंगेकर यांनी अशा पद्धतीने स्टंट केले होते,

    – आज 4:30 वाजता भाजप तक्रार दाखल करणार

    –  भाजप नेते राजेश पांडे यांची तक्रार

  • 25 Feb 2023 04:45 PM (IST)

    गोऱ्या साहेबांच्या देशात भाजीपाल्याचा तुटवडा

    सुपरमार्केट्स, मॉल, दुकानात खरेदीवर मोठे निर्बंध

    दुकानात फळही मिळत नसल्याची ओरड

    ग्राहकांनी साठा करु नये यासाठी खरेदीवर आली मर्यादा

    संपूर्ण इंग्लंडमध्येच भाजीपाला, फळांचा मोठा तुटवडा

    दरवर्षी ब्रिटेन थंडीत 90 टक्के आयातीवर अवलंबून, वाचा बातमी 

  • 25 Feb 2023 04:44 PM (IST)

    कसबा विधानसभा पोट निवडणूक रद्द करा- अभिजित बीचुकले

    कसबा विधानसभा पोट निवडणूक रद्द करण्याची मागणी

    उमेदवार अभिजित बीचुकले यांनी केली

    काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेले

    उपोषण हे आचारसंहिता भंग असून निवडणुक रद्द करण्याची मागणी

  • 25 Feb 2023 04:33 PM (IST)

    पुणे

    कसबा विधानसभा पोट निवडणूक रद्द करा

    उमेदवार अभिजित बीचुकले यांची मागणी

    काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेले उपोषण हा आचार संहिता भंग म्हणून या निवडणुक रद्द करण्याची मागणी

    दोन्ही पक्षांनी नियमांचा भंग केला

    अभिजीत बीचुकले थेट निवडणूक कार्यालयात

  • 25 Feb 2023 04:22 PM (IST)

    इगतपुरी

    कसारा येथील तानाजी नगर मधील जुन्या झोपडीला लागली आग

    आगीत संसारउपयोगी साहित्य जळून खाक

    सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही

    आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण

  • 25 Feb 2023 04:07 PM (IST)

    अब्जाधिशांच्या यादीत अदानी ३३ व्या क्रमांकावर

    अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी यांचा क्रमांक घसरला

    अदानी ३३ व्या क्रमांकावर पोहचले

    अंबानी यांची प्रगती, आले आठव्या क्रमांकावर…वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 04:01 PM (IST)

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात भीषण आग

    अमरावती :

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात भीषण आग विद्यापीठ परिसरात परिसरात दूरवर पसरली आग

    आगीत अनेक औषधी वनस्पती जळून खाक

    विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी यांचा आग विजवण्यासाठी प्रयत्न

    अग्निशामक दलाच्या गाड्या विद्यापीठ परिसरात दाखल

  • 25 Feb 2023 04:00 PM (IST)

    सुषमा अंधारे यांचा भाजपवर निशाणा

    सुषमा अंधारे यांच्या भाषणातील मुद्दे :

    भाजप पुढे गेली असं म्हणले जात असताना बजरंग दल आणि इतर थिंक टँक त्यांच्या मागे होती,

    बाबासाहेबांचं लंडन येथील घर घेतल्याचा कांगावा करणे गरजेचे होते का?

    ती सरकारची राष्ट्रीय जवाबदारी होती,

    घर ताब्यात घेणे कुण्या समाजावर उपकार होत नाही,

    इंदू मिलच उद्घाटन झालं, मात्र पुढे काहीच झालं नाही,

  • 25 Feb 2023 03:27 PM (IST)

    मुंब्रा : महेश आहेर यांच्या विरोधात मोर्चा

    मुंब्रामध्ये मूक मोर्चा राष्ट्रवादी आणि स्थानिक नागरिक सहभागी

    ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात मोर्चा

    लवकरात लवकर निलंबन करण्याची मागणी

    जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना आलेल्या धमकीबाबत राष्ट्रवादीत आक्रोश

    जितेंद्र आव्हाड यांना समर्थनार्थ मूक मोर्चा

    आव्हाड याच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी

  • 25 Feb 2023 03:27 PM (IST)

    Entertainment Uptate : Nawazuddin Siddiqui च्या संसारात अडचणी; पत्नी म्हणाली ‘माझे पती दिसतात तसे पण…’

    बॉलिवूड अभिनेता Nawazuddin Siddiqui याच्या अडचणीत मोठी वाढ

    पत्नी आलिया सिद्दीकी हिच्याकडून खासगी आयुष्याविषयी गंभीर आरोप… वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 03:05 PM (IST)

    कल्याण कोळसेवाडी परिसरात धक्कादायक घटना

    मुलाला पोलीस ठाण्यात सोडवण्यास आलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा  संशयास्पद मृत्यू…

    पोलीसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप

    मारहाणीमुळे नाही तर फिट आल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा

  • 25 Feb 2023 02:48 PM (IST)

    नितिन गडकरी यांच्या सभास्थळी शेतकऱ्याचा गोंधळ

    नितिन गडकरी स्टेजवर लोकार्पण करत असताना स्टेजच्या डाव्या बाजूला शेतकऱ्याने घातला गोधळ

    हिंगोली येथे होती सभा, पोलिसांनी गोधळ घालणाऱ्या शेतकऱ्याला घेतलं ताब्यात

    राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकारी अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला

  • 25 Feb 2023 02:35 PM (IST)

    औरंगाबादच्या नामांतरानंतर गोपीचंद पडळकर यांच्याकडून सरकारचे आभार

    औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.

    त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच असा विश्वास भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला व्यक्त.

  • 25 Feb 2023 01:45 PM (IST)

    हिंगोली- नितीन गडकरी यांच्या सभास्थळी शेतकऱ्याचा गोंधळ

    नितीन गडकरी स्टेजवर लोकार्पण करत असताना स्टेजच्या डाव्या बाजूला शेतकऱ्याने घातला गोंधळ

    पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्याला घेतले ताब्यात

    राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकारी अन्याय करत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप

  • 25 Feb 2023 12:33 PM (IST)

    हडपसर भागातील दोन टोळ्यांमधील गुन्हेगारांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला, तिघेजण जखमी

    ससून रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी झालेल्या या घटनेमुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ

    हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

    हडपसर येथील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला

    या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले

    रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाबाहेर दोन टोळ्यांमधील गुन्हेगार समोरासमोर आले

    त्यावेळी गुन्हेगारांसोबत असलेल्या त्यांचे साथीदार एकमेकांशी भिडले

    त्यांनी शिवीगाळ करीत एकमेकांवर कोयत्याने वार केले

    ससून रुग्णालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न

    पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांना अटक केली

  • 25 Feb 2023 12:23 PM (IST)

    चाळीसगाव

    चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तीतूर नदीलगत असलेल्या पाण्याच्या वॉलला गळती

    शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्यपाईपलाईनच्या वॉलला गळती

    पालिकेच्या दुर्लक्षपणा मुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी

  • 25 Feb 2023 12:21 PM (IST)

    नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचा अर्थसंकल्प सादर

    2022 -23 साठी 359 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापकांकडून सादर

    अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यावर अधिक भर

    या वर्षाच्या शेवटपर्यंत महापालिकेच्या ताफ्यात एकूण 169 बसेस दाखल होणार

    यावर्षी बस तिकीट दरात कुठलीही दरवाढ करण्यात आलेली नाही

  • 25 Feb 2023 12:19 PM (IST)

    पुण्यात पुन्हा MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन

    पुण्यात MPSC चे काही विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर

    टेक्नीकल विषयाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले

    नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थांची मागणी

    पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू

  • 25 Feb 2023 12:19 PM (IST)

    सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे किराणा दुकानाला भीषण आग

    दोन मजली किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज

    शॉपिंग कॉम्पलेक्स असल्याने शेजारील दुकानाचेही नुकसान

    आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल

    या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही, मात्र कोट्यवधीचा माल जाळून खाक

    टाकळी सिकंदर येथे वाघमोडे किराणा नामक दोन मजली दुकान आहे

    सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली

    आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भीमा साखर कारखाना, लोकनेते साखर कारखाना, पंढरपूर नगरपरिषद येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

  • 25 Feb 2023 12:17 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर जनशताब्दी एक्सप्रेस नें चिपळूण रेल्वे स्टेशनवर दाखल

    कार्यकर्त्यांनी त्यांचा जंगी स्वागत केलं

    कार्यकर्ते रॅली काढत एक्सप्रेसने चिपळूण रेल्वे स्टेशनवर दाखल झाले

    आंबेडकर यांचे चिपळूण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आलं

    बाईक रॅली काढून वंचितनं शक्ती प्रदर्शन केलं

  • 25 Feb 2023 12:15 PM (IST)

    मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठीच गद्दारी; गुलाबराव पाटील यांचं विधान

    गुलाबराव पाटील गद्दार झाले नाहीत

    एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली

    पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा मोठं वक्तव्य

    विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते पण मराठा आहेत. आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. मी मेंटल आहे का?

    तुम्ही कोणत्याही गोष्टीत जातिवाद करता, मी जो त्याग केला तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी केला

    गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसतो यातच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे

  • 25 Feb 2023 12:15 PM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार

    पुणे : मतदानासाठी मतदान यंत्र मतदान केंद्रावर पोहचविण्यात आलेत.

    दुसरीकडे घोडेबाजार रोखण्यासाठी चौदा पथकं तैनात

    510 केंद्रावर 5 लाख 68 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    चिंचवड मध्ये तेरा मतदान केंद्र संवेदनशील

  • 25 Feb 2023 12:01 PM (IST)

    Entertainment Uptate : RRR सिनेमाने रचला आणखी एक विश्वविक्रम ; ‘या’ पुरस्कारवर नाव कोरल्यानंतर राजामौली म्हणाले…

    एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाला मिळतंय जगभरातून प्रेम

    ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर सिनेमाने ‘या’ पुरस्कारवर कोरलं नाव… वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 11:23 AM (IST)

    हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कार्यकर्ते आक्रमक

    मुरगुड पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांचं आदोलन

    संतांची घोरपडे साखर कारखान्यांच्या काही सभासदही आंदोलन करत आहेत

    राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कार्यकर्ते आक्रमक

    सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू

  • 25 Feb 2023 11:22 AM (IST)

    Entertainment Uptate : अक्षय कुमार स्टारर ‘सेल्फी’ सिनेमाला कंगना रनौत हिने ठरवलं ‘फ्लॉप’, पोस्ट करत म्हणाली…

    ‘ज्या प्रकारे मला त्रास देतात…’, अक्षय कुमार स्टारर ‘सेल्फी’ सिनेमाला अपयश मिळाल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

    दिग्दर्शक करण जोहर याच्याबद्दल कंगना म्हणाली…, वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 11:22 AM (IST)

    नागपूर : स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल

    नागपूर : स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल

    श्वानाला धडक देऊन फरपटत नेणाऱ्या स्कूल व्हॅन चालकावर गुन्हा दाखल

    स्पीच लेस ऑर्गनायझेशन स्मिता मिरे यांनी ड्रायव्हर विरोधात हुडकेश्वर पोलिसात केली तक्रार

    हुडकेश्वर येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या श्वानाला अविनाश भेंडे या स्कूल व्हनचालकाने दिली

    भारतीय दंड संहितेच्या कलम 428 आणि पीसीए कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला

  • 25 Feb 2023 10:35 AM (IST)

    Pune By Election – कसबा पोट निवडणुकीचा वाद पेटला

    मी उपोषण करणारच – काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर

    मी सह पत्नी कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार- धंगेकर

    भाजप पैसे वाटत आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत- धंगेकर

  • 25 Feb 2023 10:31 AM (IST)

    रेल्वेत विना तिकीट प्रवास कारणाऱ्यांना ऑनलाईन दंड भरण्याचा पर्याय

    मध्य रेल्वेकडून 800 टीसींना मिळणार QR कोड

    रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना ऑनलाईन दंड भरता येणार

  • 25 Feb 2023 10:24 AM (IST)

    जेव्हा दाखवण्यासारखे काम नसते तेव्हा गावांची नावं बदलतात- इम्तियाज जलील

    महापूरूषांची नावे घेऊन आम्ही राजकारण केले नाही- इम्तियाज जलील

    राजकीय स्वार्थासाठी हे काम केले जात आहे – इम्तियाज जलील

    लोकांना भावनीक मुद्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न, इम्तियाज जलील यांचा आरोप

  • 25 Feb 2023 10:18 AM (IST)

    सोन्या-चांदीत पुन्हा घसरण

    ग्राहकांना सोने खरेदीची सुवर्णसंधी

    गेल्या 10 दिवसांत इतक्या रुपयांनी घसरली किंमत

    गुंतवणुकीसाठी चांदीही फायदेशीर, वाचा बातमी 

  • 25 Feb 2023 09:47 AM (IST)

    नागपूर महापालिकेच्या ताफ्यात एकूण 169 बसेस येणार

    नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वर्ष 2022 -23 साठी 359 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प

    अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक बसेसवर अधिक भर

    नागपूर महापालिकेच्या ताफ्यात एकूण 169 बसेस दाखल होणार

    यावर्षी बस तिकीट दरात कुठलीही दरवाढ नाही

  • 25 Feb 2023 09:41 AM (IST)

    जळगाव

    गुलाबराव पाटील गद्दार झाले नाहीत

    एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली

    पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा मोठं वक्तव्य

    विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते पण मराठा आहेत

    आम्ही मराठा मुख्यमंत्री केला, मी मेंटल आहे का?

    तुम्ही कोणत्याही गोष्टीत जातिवाद करता, मी जो त्याग केला तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी केला

    गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसतो यातच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे

  • 25 Feb 2023 09:36 AM (IST)

    पुणे

    कसबा विधानसभा पोट निवडणुकीत पैसे वाटले जात आहेत

    काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

    रवींद्र धंगेकर करणार उपोषण

    कसबा गणपती मंदिरासमोर थोड्याच वेळात रवींद्र धंगेकर करणार उपोषण

    कसबा गणपती मंदिराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त

  • 25 Feb 2023 09:27 AM (IST)

    औरंगाबादच्या या सहकारी बँकेवर मोठी कारवाई

    आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने आरबीआयने कसला लगाम

    खातेदारांना पुढील सहा महिने नाही काढता येणार पैसा

    देशातील पाच बँकावर रिझर्व्ह बँकेची कारवाई

    बँकेतील अनियमिततेचा ग्राहकांना मोठा फटका, वाचा बातमी 

  • 25 Feb 2023 09:10 AM (IST)

    मतदानासाठी कसब्यात कडक बंदोबस्त

    पुणे : एकूण ७६ मतदान केंद्रांवरील २७० बुथवर मतदान होणार आहे.

    नऊ मतदान केंद्र संवेदनशील…१७०० पोलीस तैनात

    मतदानाच्या दिवशी कसबा मतदारसंघात १७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

    शहर पोलिस दलातील एक हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी.

    तसेच सीआरपीएफ चे ५०० जवान आणि राज्य राखीव पोलिस दलातील शंभर पोलिस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी होणार आहेत.

    मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात राहणार.

  • 25 Feb 2023 09:01 AM (IST)

    अमरावतीत आजपासून दोन दिवसीय विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा

    विदर्भ केसरीसाठी विदर्भातील नामांकीत 175 दिग्गज मल्ल अमरावतीत दाखल

    महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन

    1996 नंतर प्रथमच अमरावतीत होत आहे विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा

    कुस्ती स्पर्धेसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

  • 25 Feb 2023 09:00 AM (IST)

    कोल्हापूर- पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वतःलाही संपवले

    कागल मधील कसबा सांगाव इथली हृदयद्रावक घटना

    घटनेत सुदैवाने मुलगी बचावली, मृत तिघेही हलसवडे गावचे

  • 25 Feb 2023 08:55 AM (IST)

    चिंचवड विधानसभा मतदारसंघात 46 टक्के तरुण तर 39 टक्के प्रौढ मतदार

    चिंचवड विधानसभा मतदारसंघात 46 टक्के तरुण तर 39 टक्के प्रौढ मतदार

    त्यामुळे मतदानाची मदार तरुणाईवरच

    20 ते 40 वयोगटातील मतदाराची संख्या 2 लाख 56 हजार 42 तर 40 ते 60 वयोगटातील प्रौढ मतदाराची संख्या 2 लाख 23 हजार 794 इतकी

    त्यामुळे या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवायची जबाबदारी आता तरुणाईकडे

    मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच मतदारानी मतदान करण्याचं आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आल आहे

  • 25 Feb 2023 08:53 AM (IST)

    उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले पाहिचे- संजय गायकवाड

    औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करण्याला केंद्र सरकारची मंजुरी

    मुघलांनी अत्याचार करून मुळ नाव बदलले होते- संजय गायकवाड

    अशा अनेक शहरांची नावे बदलण्याची गरज- संजय गायकवाड

  • 25 Feb 2023 08:41 AM (IST)

    रशियाकडून कच्चा तेलाची रेकॉर्डब्रेक आयात

    गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात केवळ 0.2 टक्के होती आयात

    यंदा जानेवारीत आयातीचे सर्व रेकॉर्ड तोडले

    रशिया भारताला करत आहे स्वस्तात इंधन पुरवठा

    इतर देशांपेक्षा भारताला कमी किंमतीत मिळत आहे इंधन

    देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात कपात होणार? वाचा सविस्तर

  • 25 Feb 2023 08:39 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    -चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत उमेदवाराकडून झालेला खर्च सादर

    -एकूण 28 उमेदवारा कडून एकूण 14 कोटी दहा लाख 96 हजार रुपये झाला इतका खर्च

    -या पोटनिवडणुकीत एकूण 28 उमेदवार रिंगणात असून त्यात भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र लोकहितवादी पक्ष,आजाद समाज पक्ष,बहुजन भारत पक्ष,बहुजन मुक्ती पक्ष यांच्यासह 22 अपक्ष उमेदवार आहेत

    -या प्रचारात सर्वाधिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 25 लाख 59 हजार 596 रुपये असून त्या खालोखाल भाजपच्या अश्विनी जगताप यांनी 24 लाख 23 हजार 914 तर बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांनी 22 लाख 57 हजार 987 रुपये इतका प्रचारासाठी खर्च केला आहे

  • 25 Feb 2023 08:15 AM (IST)

    पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वतःलाही संपवले

    पत्नीसह दोन मुलांना कालव्यात ढकलून स्वतःलाही संपवले

    कोल्हापूरच्या कागलमधील कसबा सांगाव इथली हृदयद्रावक घटना

    घटनेत सुदैवाने मुलगी बचावली

    मृत तिघेही हलसवडे गावचे

    संदीप पाटील राजश्री पाटील आणि सन्मित पाटील अशी मृतांची नावे

    आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही केलेल्या कृत्यामुळे खळबळ

  • 25 Feb 2023 08:15 AM (IST)

    चंद्रपुरात गौण खनिजाची तस्करी

    पाच लाख रुपयांचा दंड गोंडपिपरी एसडीओंनी ठोकला

    विठ्ठलवाडा ते नवेगाव मार्गावर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोन हायवा जप्त

    दोन्ही वाहने कुणाल गायकवाड गोंडपिपरी यांच्या मालकीचे आहेत

    या प्रकरणी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे

    या परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक केली जाते

  • 25 Feb 2023 08:04 AM (IST)

    पुण्यातील कर्वेनगर, कोथरूड, डेक्कनसह अन्य भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार

    एसएनडीटी परिसरात फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार

    या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

    महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती

  • 25 Feb 2023 08:00 AM (IST)

    नागपुरातील दोन भागांत गोवरचा उद्रेक

    गोवरचं संक्रमण हळूहळू वाढताना असल्याने चिंता वाढली

    आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये एकही प्रौढ रुग्ण नाही

    तीनपेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या मोमीनपुरा आणि गरीब नवाजनगरात उद्रेक

    सध्या महापालिकेच्या १४ पथकांकडून उद्रेकग्रस्त भागात घरोघरी सर्वेक्षण सुरु

    मनपाकडून ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील संशयित रुग्णांचा शोध घेतला जातोय

    या मुलांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यासाठी मनपाचे प्रयत्न

  • 25 Feb 2023 07:52 AM (IST)

    शहरातील कर्वेनगर, कोथरूड, डेक्कनसह अन्य भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार

    पुणे : एसएनडीटी परिसरात फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार,

    या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता,

    महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती.

  • 25 Feb 2023 07:04 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील 1305 अंगणवाड्यांना कुलूप बंद

    भंडारा : 33 हजार 666 लाभार्थी पोषण आहार पासून वंचित,

    पांच दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा संप किती दिवस चालणार याकडे लक्ष लागले आहे,

    ऐनवेळी पोषण आहार बंद झाल्याने ग़रोदर माता,किशोरवयिन मूल मूली याचे हाल सुरु झाले आहेत.

  • 25 Feb 2023 06:39 AM (IST)

    राज्यात लवकरच हमीभावाने नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू होण्याची शक्यता

    सोमवार पासुन म्हणजेच येत्या 27 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांना नाफेडमध्ये हरबरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार

    हमीभावाने हरबरा खरेदीसाठी केंद्र शासनाचा प्रस्ताव सादर लवकर प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता

    हरबरा नाफेड मार्फत हमीभावाने विकण्यासाठी शेतकऱ्यांना 27 तारखेपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार

  • 25 Feb 2023 06:37 AM (IST)

    गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी केवळ पुण्यापर्यंतच धावणार

    रेल्वेच्या पुणे मंडळातील सातारा ते कोरेगाव स्थानका दरम्यान तांत्रिक काम करणार असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार

    28 फेब्रुवारीला कोल्हापूर ऐवजी पुण्यावरूनच गोंदियासाठी सुटणार रेल्वे

    विदर्भातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना करावी लागणार पर्यायी व्यवस्था

    कोल्हापूर ते पुणे मार्गदरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

  • 25 Feb 2023 06:34 AM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

    कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

    खासगी साखर कारखान्यासाठी प्रत्येकी दहा हजार शेअर्स घेऊन 40 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

    कागल मधील विवेक कुलकर्णी यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात केला गुन्हा दाखल

  • 25 Feb 2023 06:31 AM (IST)

    रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या महिलेने दुसऱ्या मजल्यावरून टाकली उडी

    पुण्यातील खेड तालुक्यातील मेदनकर वाडी येथील घटना

    महिला रात्रीच्या सुमारास घराच्या कड्या लावत असताना नागरिकांना आली आढळून

    पोलिसांना बोलविण्याअगोदरच महिलेने पळून जाण्याच्या प्रयत्न करत दुसऱ्या मजल्यावरून टाकली उडी

    उडीचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद, महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती

Published On - Feb 25,2023 6:28 AM

Follow us
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.