Maharashtra Live Updates : ‘विनंती करतो, कसबा आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी’

| Updated on: Feb 04, 2023 | 5:58 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : 'विनंती करतो, कसबा आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी'
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून या निकालावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अदानी समूहाच्या घोटाळ्यावरून राजकीय पडसाद उमटले आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Feb 2023 08:07 PM (IST)

    अहमदनगर : सरपंच निवडीवरून घमासान

    तांभोळ गावात सरपंच पदाच्या निवडणुकीला गालबोट

    मतदानापासून महिला सदस्याला जमावाकडून रोखण्याचा प्रयत्न

    गावातील जमावाने चार चाकी वाहनाच्या काचा फोडल्या

    पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्या जमावावर लाठीचार्ज

    तांभोळ गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस गावात तळ ठोकून

  • 03 Feb 2023 05:27 PM (IST)

    गौतम अदानी यांच्या संपत्तीत कमाल घसरण

    श्रीमंतांच्या यादीत आता टॉप-20 मध्ये पण स्थान नाही

    अदानी यांची एकूण संपत्ती 61.3 अब्ज डॉलर

    24 तासांत 10.7 अब्ज डॉलरने संपत्ती घटली

    अदानी श्रीमंतांच्या यादीत 21 व्या स्थानावर फेकले गेले

    ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सने जाहीर केली आकडेवारी

  • 03 Feb 2023 04:52 PM (IST)

    ‘सर्वांना विनंती करतो की कसबा आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी’

    पुणे : 

    – ‘सर्वांना विनंती करतो की कसबा आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी’

    – पुण्यातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यातील सर्व पक्षांना विनंतती

    – ‘मी राज ठाकरे, सर्वांना विनंती करतो की एका वर्षासाठी निवडणुका होऊ नये. सर्व बिनविरोध होऊ द्या’

  • 03 Feb 2023 04:21 PM (IST)

    महाविकास आघाडीची पुण्यात बैठक

    कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीची पुण्यात बैठक

    नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी होणार बैठक

    बैठकीला शहरातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार

  • 03 Feb 2023 03:57 PM (IST)

    आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचा फैसला होणार

    औरंगाबाद : आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचे प्रकरण,

    उच्च न्यायालयाची पुरातत्व विभागाला नोटीस,

    8 फेब्रुवारी रोजी म्हणणे मांडण्याचे दिले आदेश,

    आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचा होणार फैसला.

  • 03 Feb 2023 03:49 PM (IST)

    उच्च न्यायालयाची पुरातत्व विभागाला नोटीस

    आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचे प्रकरण

    उच्च न्यायालयाची पुरातत्व विभागाला नोटीस

    8 फेब्रुवारी रोजी म्हणणे मांडण्याचे दिले आदेश

    आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचा होणार फैसला

  • 03 Feb 2023 03:48 PM (IST)

    मतमोजणीत सहभागी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

    मतमोजणीत सहभागी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडळ अधिकारी यांचा मृत्यू

    शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटाक्याने मृत्यू

    अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणी देत होते सेवा

    काल मध्यरात्री छातीत अचानक दुखत असल्याने रुग्णालयात केले होते त्यांना भरती

  • 03 Feb 2023 02:20 PM (IST)

    IND vs AUS टेस्ट सीरीजबद्दल एक वाईट बातमी, श्रेयस अय्यरनंतर आणखी एक प्लेयर होऊ शकतो बाहेर

    IND vs AUS टेस्ट सीरीजमधून आणखी कुठला खेळाडू होऊ शकतो बाहेर? वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 02:19 PM (IST)

    Shubhaman Gill : ‘तिला’ शुभमनसोबत डेटवर जायचं होत, पण भर मैदानात अर्शदीपने मोडलं मन, VIDEO

    Shubhaman Gill : मैदानात काय घडलं? अर्शदीपने काय इशारा केला? वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 02:18 PM (IST)

    Shaheen Afridi Wedding : निकाह आज होणार पण पत्नी सोबत राहणार नाही? शाहीन आफ्रिदीच्या लग्नाआधी मोठी बातमी

    Shaheen Afridi Wedding : लग्नानंतर शाहीनची पत्नी त्याच्यासोबत का राहणार नाही? वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 02:16 PM (IST)

    Dinesh Karthik : ‘मी आता जे काही सांगणार आहे, ते…’ दिनेश कार्तिकच विराटच्या नंबर 3 स्थानाबद्दल महत्त्वाचं विधान

    कारण त्याची जागा घेणारी नावं मोठी असतील आणि मग तेव्हा आपण मागे जाऊन स्कोअर पाहून म्हणू की, त्याने फक्त 40 किंवा 30 धावा केल्या होत्या. वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 02:14 PM (IST)

    रत्नागिरीतील महालक्ष्मी मंदिराल क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा देणार

    – पुढच्या नियोजन मंडळाच्या बैठकीत रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराला क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा दिला जाईल- उदय सामंत

    – नव्याने बांधण्यात आलेल्या खेडशी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहन सोहळा आज पार पडला या वेळी पालकमंत्र्यांची हजेरी

  • 03 Feb 2023 02:05 PM (IST)

    भाजपने प्रवक्ते पदाची मोठी जबाबदारी दिली आहे, त्याचा मला आनंद आहे

    पुणे : याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही,

    मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर घरात उमेदवारी।मिळावी अशी पक्षाकडे मागणी केली आहे,

    पक्ष काय निर्णय घेणार त्यानंतर भूमिका स्पष्ट करू.

  • 03 Feb 2023 01:57 PM (IST)

    अमरावतीत भाजपला धक्का

    अमरावतीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

    तब्बल ३० तासांच्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर

    भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव

  • 03 Feb 2023 01:55 PM (IST)

    Entertainment News Live | आठव्या दिवशीही ‘पठाण’ची दमदार कमाई

    शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने देशभरात 8 दिवसांत कमावले 336 कोटी रुपये

    बुधवारी देशात 17.50 कोटी रुपयांची कमाई

  • 03 Feb 2023 01:47 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणा दरम्यान घोषणाबाजी

    स्वतंत्र विदर्भाच्या दिल्या घोषणा

    वर्ध्यातील साहित्य संमेलनातील प्रकार

    विदर्भवाद्यांनी कागदं फाडत, घोषणाबाजी करत केली मागणी

    पोलिसांकडून विदर्भवादी कार्यकर्ते ताब्यात

  • 03 Feb 2023 12:42 PM (IST)

    कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार निश्चित

    कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार निश्चित

    हेमंत रासने यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

    अधिकृत घोषणा दिल्लीतून संध्याकाळी होणार

    चंद्रकांत पाटील यांच्यांकडून दुजोरा नाही

  • 03 Feb 2023 12:39 PM (IST)

    साताऱ्यात वाई तालुक्यातील खानापूर येथे खून

    साताऱ्यात वाई तालुक्यातील खानापूर येथे खून

    अभिषेक जाधव नावाचा 20 वर्षाच्या युवकाचा निर्घृण खून

    प्रेम प्रकरणातून युवकाचा खून झाल्याची शक्यता

    घटनास्थळी पोहचले पोलीस

  • 03 Feb 2023 12:28 PM (IST)

    कसब्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात मनसेचा निर्णय रविवारी

    स्वत: मनसेप्रमुख राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

    येत्या रविवारी आणि सोमवारी दोन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

    कसब्यासंदर्भात रविवारी संध्याकाळी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत पुण्यात बैठक

    मनसेचे स्थानिक पदाधिकारी निवडणूक लढवण्यावर ठाम

  • 03 Feb 2023 12:24 PM (IST)

    मनविसे प्रमुख अमित ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर

    सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल

    दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

  • 03 Feb 2023 12:19 PM (IST)

    आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त

    आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त

    संतप्त शिवप्रेमींच क्रांती चौकात आंदोलन

    पुरातत्व विभागाच्या पक्षपाती निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

    येत्या १९ तारखेला आग्र्याच्या ऐतिहासीक किल्ल्यामध्ये शिवजयंतीच्या भव्य कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं

    अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे आणि आर आर पाटील फाउंडेशन अध्यक्ष विनोद पाटील यांनी केलं होतं नियोजन

    कार्यक्रमासाठी पुरातत्व विभागाकडे रितसर परवानगीही मागितली होती

    मात्र कोणतही कारण न देता परवानगी नाकारण्यात आली आहे

    त्याविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

  • 03 Feb 2023 11:11 AM (IST)

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाच्या मनात प्रचंड भिती, म्हणूनच प्रमुख बॉलरच्या डुप्लीकेटला बोलवलं प्रॅक्टिसला

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन टीमवर भारताच्या ‘या’ बॉलरची प्रचंड दहशत आहे. ऑस्ट्रेलियन टीम त्याला भरपूर घाबरते. वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 11:10 AM (IST)

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधक आक्रमक

    लोकसभा आणि राज्यसभा कामकाज सुरू

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधक आक्रमक

    लोकसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

    लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित

    राज्यसभा अडीच वाजेपर्यंत स्थगित

  • 03 Feb 2023 11:10 AM (IST)

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने भारतात पाऊल ठेवताच BCCI ने दिला पहिला धक्का, आता कांगारु काय करणार?

    IND vs AUS Test : दौऱ्याआधीच ऑस्ट्रेलियाने सुरु केला रडीचा डाव. वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 11:09 AM (IST)

    Team India : स्मृती, हरमनप्रीतचा फ्लॉप शो, फायनलमध्ये दिसली जुनी कमजोरी

    ‘ती’ च्या बॅटिंगमुळे फिरला सामना, World cup मध्ये टीम इंडियाचा काय होणार? वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 10:56 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

    येत्या रविवारी दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर

    एका खासगी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दिल्ली दौरा

    दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होणार

    विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भाजप पक्षातील दिग्गज एकत्र येणार

  • 03 Feb 2023 10:51 AM (IST)

    अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरूच

    मविआचे धिरज लिंगाडे आतापर्यंत 2423 मतांनी आघाडीवर

    भाजपचे उमेदवार रणजित पाटील पिछाडीवर

    धिरज लिंगाडे यांची विजयाकडे घौडदौड सुरू

    धीरज लिंगाडे यांना आतापर्यंत मिळाले 43806 मतं

    रणजीत पाटील यांना आतापर्यंत मिळाले 41383 मते

    सध्या पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी सुरू

    धीरज लिगांडे 2423 मतांनी आघाडीवर

    दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आतापर्यंत 16 उमेदवार बाद

  • 03 Feb 2023 10:30 AM (IST)

    मराठवाड्यातील 3300 शाळांना प्रत्येकी 31 हजार रुपयांची पुस्तके देण्याची घोषणा

    औरंगाबाद : शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विजयी झाल्यावर दुसऱ्या दिवशी शाळांना भेटी देत कामकाजला सुरुवात,

    वेरूळ, खुलताबाद येथील गुरुदेव सामंतभद्र विद्या मंदीर येथे साधला विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद,

    शाळेला प्रिंटर व कॉम्पुटर भेट देण्याची घोषणा,

    जुनी पेन्शन व अनुदान यासाठी काम करणार, दिवसरात्र काम करणार,

    माझं चुकलं तर शिक्षा करा मात्र मतांची शिक्षा देऊ नका,

    विक्रम काळे यांचे शिक्षकांना आवाहन.

  • 03 Feb 2023 10:24 AM (IST)

    अदानी समूहाला 100 अब्ज डॉलरचा फटका

    आरबीआयने दिलेल्या कर्जाची मागितली माहिती

    बँकांना द्यावा लागेल कर्जासंबंधीची माहिती

    बँकांनी दिले अदानी समूहाला मोठे कर्ज

    हिंडनबर्ग अहवालाने देशात मोठे वादळ

  • 03 Feb 2023 10:03 AM (IST)

    अबुधाबी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    अबुधाबी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    – कालीकतला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची अबुधाबी विमानतळावर इमर्जन्सी लँडीग

    – आग लागल्याने इमर्जन्सी लँडीगचा घेतला निर्णय, सर्व प्रवासी सुरक्षित

    – फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनला आग लागल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग

  • 03 Feb 2023 08:38 AM (IST)

    तेल कंपन्यांना मोठा फायदा

    कच्चा तेलाच्या दरात पुन्हा घसरण

    कच्चा तेलाच्या किंमतीत गेल्या 24 तासात 1 डॉलर प्रति बॅरलची घसरण

    ब्रेंट क्रूडचा भाव 82.44 डॉलर प्रति बॅरलवर

    डब्ल्युटीआय 76.14 डॉलर प्रति बॅरलवर

    मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

    औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर

    नागपूरमध्ये पेट्रोल 106.70 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर

    नाशिकमध्ये पेट्रोल 106.07 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

    कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर

    पुण्यात पेट्रोलचा भाव 106.89 आणि डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर

  • 03 Feb 2023 08:30 AM (IST)

    अरेरे, एका बॉलमध्ये Mumbai Indians चा ‘गेम’, श्वास रोखून धरायला लावणारी लास्ट ओव्हर

    लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूनिशी सगळ्यांचच टेन्शन वाढत होतं. वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 08:29 AM (IST)

    टीम इंडियाच्या बॉलरला 5 बॉलमध्ये मारले 6,6,6,6,6, RCB ने काढून टाकलेल्या खेळाडूने दाखवली ताकत

    युवराज सिंहची बरोबरी करण्यासाठी फक्त 1 सिक्स कमी पडला. वाचा सविस्तर….

  • 03 Feb 2023 08:05 AM (IST)

    वंदे भारत रेल्वेची सोलापूर ते मुंबई दरम्यानची अवघ्या तीन तासात यशस्वी चाचणी

    सोलापूर-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची गुरुवारी पार पडली चाचणी

    10 फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर पुणे मार्गे धावणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    त्याआधी काल या रेल्वे गाडीची चाचणी पार पडली आहे

    ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार ही गाडी

  • 03 Feb 2023 07:44 AM (IST)

    पुण्यात गुन्हेगारी थांबता थांबेना, येरवड्यात गुंडांचा धुडगूस

    पुणे : येरवड्यात गुंडाच्या तोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न,

    टोळक्याकडून दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड,

    दहा ते बारा जणांनी येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात केली वाहनांची तोडफोड,

    रिक्षा, दुचाकी, स्कूल वाहन तसेच इतर वाहनांचे मोठे नुकसान,

    परिसरात दहशत पसरवण्यासाठी नशा करत गुंडांनी केली तोडफोड,

    काही संशयित आरोपींना येरवडा पोलिसांनी घेतले ताब्यात.

  • 03 Feb 2023 07:35 AM (IST)

    कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित

    उद्या होणाऱ्या परीक्षाही रद्द

    विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाचा परिणाम

    शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सलग तीन दिवस रद्द

    मागण्यांची पूर्तता न झाल्यास कर्मचारी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात

    कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सेवक संयुक्त कृती समितीच सुरू आहे राजव्यापी आंदोलन

    कर्मचारी संघाच्या आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका

  • 03 Feb 2023 07:33 AM (IST)

    पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन

    परीक्षा विभागाच्या कामकाजावर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

    पुणे विद्यापीठातील परीक्षेची संबंधित कामकाज आजपासून राहणार बंद

    कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी

    या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन

    तर मागण्या मान्य नाही झाल्यास 20 फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंदचा इशारा

  • 03 Feb 2023 07:13 AM (IST)

    परीक्षेत कॉपी कराल तर आता होणार फौजदारी कारवाई

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इशारा

    इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाचे कडक पावले

    21 फेब्रुवारीपासून बारावीच्या तर 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात

    परीक्षा संदर्भातील विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या नव्या सूचना

  • 03 Feb 2023 07:12 AM (IST)

    राज्यात मार्चपर्यंत गोवरची तीव्रता राहणार, राज्य टास्क फोर्सचा अंदाज

    गोवरची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे लसीकरण मोहीम

    तरी देखील मार्चनंतरच गोवरची तीव्रता कमी होईल

    मार्च महिन्यापर्यंत लहान मुलांची काळजी घ्या आरोग्य विभागाचे आवाहन

  • 03 Feb 2023 07:10 AM (IST)

    कोल्हापुरात करवीर तालुक्यातील तेरसवाडी इथं सावकाराच्या घरावर छापा

    सहकार विभागाची कारवाई

    दहा दस्त, धनादेश तसेच व्याजाचा उल्लेख असलेले डायरी केली जप्त

    रघुनाथ भोगम असं कारवाई झालेल्या सावकाराचे नाव

    जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाची कारवाई

  • 03 Feb 2023 07:08 AM (IST)

    ईडी करावाई विरोधात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आक्रमक

    कोल्हापूर : कारवाईचे निषेधार्थ आज कर्मचारी एक तास उशिरा काम सुरु करणार,

    कर्मचारी संघटनेचा निर्णय,

    आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित चौकशीनंतर ईडी ने बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना घेतलय ताब्यात,

    30 तासांच्या चौकशीनंतर ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यान बँक कर्मचाऱ्यांचा संताप.

  • 03 Feb 2023 06:26 AM (IST)

    आम आदमी पक्ष चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम

    आपकडून कसब्यात चार तर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी सहा जण इच्छुक आहेत

    यापैकी एका उमेदवाराची आम्ही निवड करणार असून लवकरच उमेदवारी अर्ज घेणार, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांची माहिती

    भाजपाकडून एकाच कुटुंबातून इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज घेतला आहे

    त्यामुळे आम्ही सहानुभूती न दाखवता ही निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे आप पक्षचे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले

  • 03 Feb 2023 06:24 AM (IST)

    सोलापुरात बच्चू कडूंच्या पत्रकार परिषदेच्या कार्यालयाबाहेरच महिलेने प्रहारच्या कार्यकर्त्यांना धरले धारेवर

    आमदार बच्चू कडू येणार म्हणून कार्यकर्त्यांनी गाड्या आडव्या लावून आडवला होता रस्ता

    कोणाच्या परवानागीने रस्ता आडवला, तुम्ही शिक्षित आहात ना? असा सवाल करत महिलेने विचारला जाब

    त्यानंतर कार्यकर्त्यांनी गाडी काढून महिलेस वाट मोकळी करून दिली

    आमदार बच्चू कडू यांची पत्रकार परिषद सुरु असताना सोलापुरात घडला प्रकार

    सोलापुरातील काळी मज्जिद परिसरात घडला प्रकार

  • 03 Feb 2023 06:21 AM (IST)

    डोंबिवलीत बुलेट चालकाने सायकलस्वाराला उडविले

    सायकलस्वार गंभीर अपघातात जखमी

    अपघाताचा थरारा सीसीटीव्हीत कैद

    बुलेट चालका विरोधात गुन्हा दाखल

  • 03 Feb 2023 06:18 AM (IST)

    तुळजापूर येथील श्री श्री रवीशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचा गोंधळ

    संभाजी ब्रिगेडच्या 4-5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना घोषणाबाजी

    श्री श्री रविशंकर यांचा तुळजापूरात जागर भक्तीचा कार्यक्रम

    श्री श्री रविशंकर यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा संभाजी ब्रिगेडने दिला होता इशारा

    श्री श्री रविशंकर यांनी छञपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संबधाबाबात प्रसारित केलेल्या चित्र फितीवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

Published On - Feb 03,2023 6:14 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.