Maharashtra Breaking News Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

| Updated on: Mar 11, 2023 | 6:15 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
Maharashtra News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आज होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरात लवकर निवडणुका लावा, हीच आमची इच्छा आहे, अशी मागणी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतिश कौशिक अनंतात विलीन. वर्सोवा येथील स्मशानभूमीत पार पडले अंतिम संस्कार. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Mar 2023 06:33 PM (IST)

    शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या फसवणूकीचे सत्र

    या सोनूने दिला अनेक गुंतवणूकदारांना चकमा

    हमखास परताव्याचे आमिष दाखवून घातला गंडा

    अनेकांच्या आयुष्याची कमाई केली फस्त

    एनएसईने दिला सावधगिरीचा इशारा

    नेमकं काय आहे फसवणुकीचे प्रकरण, वाचा एका क्लिकवर

  • 10 Mar 2023 06:30 PM (IST)

    पुणे: पुण्यातील शिवजयंती कार्यक्रमात आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट टळली

    पुण्यातील शिवजयंती कार्यक्रमात आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट टळली

    हेमंत रासने रविंद्र धंगेकरांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले

    रविंद्र धंगेकरांना कार्यक्रमाला येण्यासाठी 5 मिनीटं उशीर झाल्यानं

    दोघांची एकत्रित भेट टळली

    जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली आहे

    या भागाचा आता आमदार आहे

    शिवाजी महाराजांचे संस्कार घरातूनच मिळाले आहे

    मी दरवर्षी मिरवणुकीला हजर असतो

    आजही मी विधानसभेतून आलोय

    मी स्वतःला भाग्यवान समजतो

    मी भवानी माता मंदिरपासून मिरवणुकीला सुरुवात केली

    सामाजिक कामात मी राजकारण आणणार नाही

    राजकारणाचं युद्ध संपल़य आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालंय

    रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

  • 10 Mar 2023 05:40 PM (IST)

    शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने येणार एकत्र

    कसबा गणपती शिवजयंती मंडळाच्या कार्यक्रमाला आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने येणार एकत्र

    कसबा गणपतीसमोर होणार शिवजयंती कार्यक्रम

    थोड्या वेळात धंगेकर आणि रासने कार्यक्रमासाठी येतील

  • 10 Mar 2023 05:37 PM (IST)

    नाशिकच्या कळवण शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

    कळवण (नाशिक) :

    – नाशिकच्या कळवण शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण

    – शरद पवार यांच्या हस्ते आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार अनावरण

    – दिल्ली येथील सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी साकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

    – 21 फूट पुतळ्याची उंची, 7 टन पुतळ्याचे वजन

    – उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच 171 फूट शिवध्वजाचे देखील होणार अनावरण

  • 10 Mar 2023 05:34 PM (IST)

    ही सुवर्णसंधी सोडू नका, उरला थोडासा अवधी

    स्वस्त सोन्यात गुंतवणुकीचा जोरदार पर्याय

    सरकारसह आरबीआय घेत आहे गुंतवणुकीची हमी

    गोल्ड बाँडमध्ये करा गुंतवणूक

    घरबसल्या तुम्हाला गोल्ड बाँडमध्ये करता येईल गुंतवणूक

    थोड्याच वेळात संपणार सुवर्ण रोख्यात गुंतवणुकीची संधी, वाचा बातमी 

  • 10 Mar 2023 05:25 PM (IST)

    सांगली: कृष्णा नदी पात्रात मृत माशांचा खच

    कृष्णा नदी पात्रात प्रदूषणामुळे हजारो मासे मृत

    नदी पात्रात मृत माशांचा खच

    मृत मासे नेण्यासाठी सांगलीकरांची झुंबड

    अंकली पुलाखाली मृत मासे नेण्यासाठी नागरिकांची गर्दी

  • 10 Mar 2023 04:51 PM (IST)

    शेअर बाजारात घसरणीचे सत्र

    दुसऱ्या दिवशीही बाजाराने गुंतवणूकदारांचे पाय खेचले

    गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी पाण्यात

    भीतीच्या भूताने बाजारासह गुंतवणूकदारांना पछाडले

    इतरही अनेक कारणांमुळे बाजाराला ऐन उन्हाळ्यात हुडहुडी, वाचा बातमी 

  • 10 Mar 2023 04:01 PM (IST)

    तब्बल 21 तासानंतर सापडला गणेश गीते यांचा मृतदेह

    नाशिक : नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला मृत्यू,

    पालकमंत्री दादा भुसे यांना संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतला होता घेरावा,

    मृतदेह सापडत नाही तोपर्यंत जाऊन न देण्याची भूमिका घेतल्याने दोन तास थांबण्याची वेळ,

    गणेश गिते यांचा मृतदेह सापडल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे कळवण येथील पुढील दौऱ्यासाठी रवाना.

  • 10 Mar 2023 03:06 PM (IST)

    इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे मोठं वक्तव्य

    अरबी समुद्रात शिवस्मारक होणं हे स्वप्नवतच राहील.कारण स्मारक होणं अश्यक आहे.

    अरबी समुद्रातच स्मारक करण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा समुद्र किनारी आंतराष्ट्रीय स्मारक करणं गरजेचं आहे- इंद्रजित सावंत

    सरकारने अर्थसंकल्पात गड किल्ले संवर्धनासाठी जाहीर केलेला ३०० कोटींच्या निधीतून काय केलं जाणार याची माहिती जाहीर करावी.- इंद्रजित सावंत

  • 10 Mar 2023 02:57 PM (IST)

    त्याचं एकाच मांडवात दोघींसोबत लग्न, सतीबाबूच्या Love Story ने चक्रावून जालं

    दोन्ही मुलीच्या कुटुंबीयांना अखेर सतीबाबूचा फॉर्म्युला अखेर मान्य करावा लागला. वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 02:11 PM (IST)

     सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने बजेट विरोधात गाजर वाटप आंदोलन 

    शिंदे-फडणवीस सरकारने बजेटमध्ये केवळ गाजर दाखवण्याचे काम केल्याचा आरोप

    कालचा अर्थसंकल्प या गद्दार सरकारने केवेळ शब्दांचे इमले बांधून मांडला आहे असा आरोप

    महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या तोंडाला पाणं पुसणारा आणि जनतेच्या हातात गाजर देणारा अर्थसंकल्प आहे- ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका

  • 10 Mar 2023 01:49 PM (IST)

    ‘आता यापुढे अरविंद केजरीवाल यांचा नंबर’; मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचं वक्तव्य

    “सत्याचा विजय झाला आहे, आता पुढे अरविंद केजरीवाल यांचा नंबर असेल”

    मनी लाँड्रिंग प्रकरणातील गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरचं वक्तव्य

    पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात त्याला आज दिल्ली न्यायालयात केलं होतं हजर

  • 10 Mar 2023 01:38 PM (IST)

    Entertainment News Live | आलिया भट्ट फोटो लीकप्रकरणी रणबीर कपूरने उचललं मोठं पाऊल

    अभिनेत्री आलिया भट्टच्या फोटो लीकप्रकरणी मोठा वाद आलिया तिच्या घरात असताना समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून पापाराझींनी क्लिक केले फोटो सेलिब्रिटींनी उचलून धरला प्रायव्हसीचा मुद्दा कायदेशीर कारवाई करणार असल्याची रणबीर कपूरची माहिती, वाचा सविस्तर

  • 10 Mar 2023 01:30 PM (IST)

    लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीने ट्रॅफिकचा फायदा घेत केली धक्कादायक गोष्ट, ज्याची सर्वत्र होतेय चर्चा

    असं करण्यासाठी मग ट्रॅफिकची काय गरज होती? वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 01:30 PM (IST)

    WPL 2023 : Virat Kohli 20 वर्षाच्या मुलीसाठी का देव आहे? या मुलीच विराटशी काय कनेक्शन आहे?

    WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमने अजून खातं उघडलेलं नाही. पण या टीममधील एक 20 वर्षांची ऑलराऊंडर मुलगी 2 मॅच खेळूनच स्टार बनली आहे. वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 01:29 PM (IST)

    IND vs AUS Test : हुश्श अखेर जोडी फुटली, पण त्याआधी कॅमरुन ग्रीनचा शतकी प्रहार, टीम इंडिया बॅकफूटवर

    IND vs AUS Test : दुसऱ्यादिवशी अखेर अश्विनची फिरकी चालली, सामन्याची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 01:26 PM (IST)

    शिवाजी विद्यापीठाच्या आधीसभेत अभाविचे विद्यार्थी घुसले

    आधी सभेत घुसून विद्यार्थ्यांचा गोंधळ

    प्रचंड गदारोळात सदस्यांनी केली सभा त्याग

    कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी

    विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा परिषदेचा आरोप

  • 10 Mar 2023 12:45 PM (IST)

    नवी दिल्ली

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजधानी दिल्लीत दाखल

    प्रदेशाध्यक्ष पदावरून पटोले यांना हटवावं अशी आमची मागणी नाही

    काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांचा दावा

    मुंगडिया नायडू यांच्यासह काँग्रेस नेत्यांची काँग्रेस मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

  • 10 Mar 2023 12:15 PM (IST)

    नवी दिल्लीत जंतर-मंतरवर जोरदार शक्ती प्रदर्शन

    बीआरएस नेत्या के. कविता यांचे धरणे आंदोलन

    ईडीचे समन्स असतानाही कविता यांचे आंदोलन

    महिला आरक्षणासाठी कविता यांचे आंदोलन

    देशातील 18 पक्षांनी पाठिंबा दिल्याचा बीआरएसचा दावा

  • 10 Mar 2023 11:44 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

    शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडूनही शिवरायांना अभिवादन

    दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेकडून शिवजयंतीचं आयोजन

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज ठाकरे यांच्याकडून अभिवादन

    शिवाजी पार्कात मनसैनिकांची मोठी गर्दी, पोलिसांचाही मोठा बंदोबस्त

  • 10 Mar 2023 11:38 AM (IST)

    सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने बजेट विरोधात गाजर वाटप आंदोलन

    सोलापूरमध्ये ठाकरे गटाच्या वतीने बजेट विरोधात गाजर वाटप आंदोलन

    शिंदे-फडणवीस सरकारने बजेटमध्ये केवळ गाजर दाखवण्याचे काम केल्याच्या निषेधार्थ गाजर आंदोलन

    ठाकरे गटातर्फे गाजर वाटप करत निदर्शने केली जात आहेत

  • 10 Mar 2023 11:20 AM (IST)

    खासदार रजनी पाटील मलिकार्जुन खरगे यांच्या भेटीला

    खासदार रजनी पाटील मलिकार्जुन खरगे यांच्या भेटीला

    खर्गे यांच्या निवासस्थानी खासदार रजनी पाटील दाखल

    नाना पटोले यांच्या विरोधात खर्गे यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दिल्लीत

  • 10 Mar 2023 10:52 AM (IST)

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

    विमानतळाबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

    विमानतळाबाहेर शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन

    उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अरविंद सावंत उपस्थित

  • 10 Mar 2023 10:51 AM (IST)

    सणासुदीच्या हंगामात खुशाल तळा भजी!

    स्वस्त झाल्या खाद्यतेलाच्या किंमती

    देशात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण

    परदेशी बाजारातील भावातील घडामोडींचा मोठा परिणाम

    पंधरवाड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत दुसऱ्यांदा घसरण

    पण खाद्यतेलात भेसळीच्या अनेक घटना ही समोर, वाचा सविस्तर 

  • 10 Mar 2023 10:43 AM (IST)

    विरोधकांचं विधानभवनाबाहेर भोपळा घेऊन आंदोलन, सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा

    विधान भवनाबाहेर विरोधकांची घोषणाबाजी

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप

    अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जोरदार मागणी

  • 10 Mar 2023 10:41 AM (IST)

    नवी दिल्ली

    राजधानी दिल्लीत ईडीचे छापे

    पंधरा ठिकाणी ईडी कडून छापे

    लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर छापे

    कथित रेल्वे घोटाळ्या प्रकरणी ईडी कडून पहाटेपासून छापेमारी

  • 10 Mar 2023 10:33 AM (IST)

    IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आईच निधन

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आईची दुर्धर आजाराशी सुरु होती झुंज. सध्या बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान भारत-ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील चौथा अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 10:12 AM (IST)

    हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी BMC लवकरच SOP बनवणार

    मुंबई : हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच प्रमाणित कार्यपद्धती बनवणार आहे.

    बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी ही कार्यपद्धती उपयोगात आणली जाणार आहे.

    हवा शुद्धिकरण करणारी सुमारे २०० यंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

    हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार

  • 10 Mar 2023 10:11 AM (IST)

    सोने-चांदीच्या किंमतीत आज वाढ

    पण ऑलटाईम हायपेक्षा भाव अजूनही कमी

    खरेदीदारांना दागिने खरेदीची मोठी संधी

    गुंतवणूकदारांचीही होणार लवकरच चांदी

    चांदीच्या किंमतीत पण मोठी तफावत नाही, वाचा बातमी 

  • 10 Mar 2023 10:01 AM (IST)

    WPL 2023: Mumbai Indians च्या मुलीची कमाल, जाणून घ्या कोणाकडे आहे ऑरेंज आणि पर्पल कॅप?

    WPL 2023 Orange Cap and Purple Cap Winner: BCCI ने आयोजित केलेली पहिली वूमेन्स प्रीमियर लीग जोरात सुरु आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा बोलबाला आहे. वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 10:00 AM (IST)

    WPL 2023 Points Table : दिल्लीने संधी गमावली, Mumbai Indians आता कुठल्या स्थानावर?

    Women’s Premier League (WPL) 2023 Standings Ranking: लीगमध्ये अशी एक टीम आहे, ज्यांनी एकही सामना गमावलेला नाही. त्याचवेळी अशी पण एक टीम आहे, ज्यांनी एकही मॅच जिंकलेली नाही. वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 09:27 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्टरस्ट्रोक

    अमेरिकेच्या आणले नाकीनऊ

    सुपरपॉवरला दिवसाच दाखवले तारे

    भारत-रशियाच्या मैत्रीपुढे डॉलरचे लोटांगण

    अमेरिकेला फुटला घाम, वाचा बातमी 

  • 10 Mar 2023 08:45 AM (IST)

    अमरावतीत समृध्दी महामार्गावर भीषण अपघात

    अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजना जवळ अपघात

    समृध्दी महामार्गावरून थेट ट्रक खाली कोसळला

    एकाचा जागीच मृत्यू.. एक गंभीर जखमी

    नागपूर कडून मुंबई कडे जात होता ट्रक

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 10 Mar 2023 08:44 AM (IST)

    कच्चे तेल झाले स्वस्त, तुम्हाला दिलासा कधी

    तेल कंपन्यांना गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे फायदा

    तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्याचा मुहूर्त कधी साधणार, वाचा बातमी 

  • 10 Mar 2023 08:31 AM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना 7 हजार सायकलींचं वाटप

    तर शंभर गरीब निराधार नागरिकांना घरकुलाचे वाटप करणार

    तसेच 40 सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी चार चाकी वाहनाचे देणार

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत केल्या जाणार वाटप

  • 10 Mar 2023 08:31 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या बारामती दौऱ्यावर

    गडकरींच्या हस्ते ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सेंटर ऑफ एक्‍सलन्स डेअरी प्रकल्पाच्या उदघाटन

    विद्या प्रतिष्ठानच्या सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनासाठी गडकरी उद्या बारामतीत

    यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित राहणार.

  • 10 Mar 2023 08:29 AM (IST)

    IND vs AUS Test : एकदम कडक, एक, दोन, तीन टप्पे Mohammed shami किती लांब उडवला स्टम्प, VIDEO

    IND vs AUS Test : पीटर हँडसकॉ़म्ब डिफेन्स करत राहिला, तो पर्यंत शमीने खेळ संपवलेला. पहिल्या दिवसाचा एक अप्रतिम बोल्ड पहा VIDEO.

  • 10 Mar 2023 08:28 AM (IST)

    IND vs AUS Test : अहमदाबाद टेस्टमध्ये एक चूक भारी पडली, 10 ओव्हरमध्ये बिघडला टीम इंडियाचा खेळ

    IND vs AUS Test : बॉलिंग कोच पारस महाम्ब्रे यांनी ती चूक दाखवून दिली. वाचा सविस्तर….

  • 10 Mar 2023 06:29 AM (IST)

    आज राज्यभरात शिवजयंती साजरी होणार

    राज्यात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार

    शिवजयंती निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10 वाजता एक्सप्रेसवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार

  • 10 Mar 2023 06:26 AM (IST)

    धुलिवंदनाची देणगी दिली नाही म्हणून दुकानदाराला दुकानात घुसून मारहाण

    नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील धक्कादायक प्रकार

    धुलिवंदनाच्या दिवशी अनेकजण देणगी मागण्यास गेले, मात्र दुकानदाराने 50 रुपये दिले. अधिक देणगी देण्यास नकार दिला

    त्यामुळे वर्गणी मागणाऱ्यांनी दुकानात धुडगूस घातला

    दुकानदाराला मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

    पोलीस काय कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे

  • 10 Mar 2023 06:24 AM (IST)

    ईडीच्या कारवाई विरोधात आज धरणे आंदोलन

    राजधानी दिल्लीतल्या जंतर-मंतरवर होणार धरणे आंदोलन

    काँग्रेस सोडून देशातील 18 पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या कन्या कविता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    ईडी आणि सीबीआय या संस्थांकडून चुकीची कारवाई होत असल्याच्या विरोधात आंदोलन

    ठाकरे गटाकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी सहभागी होण्याची शक्यता

  • 10 Mar 2023 06:22 AM (IST)

    संपूर्ण देशभरात काँग्रेसमध्येमध्ये मोठे फेरबदल होणार

    राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेणार लवकरच मोठा निर्णय

    महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांची उचल बांगडी होणार

    2024 च्या लोकसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी

    अनेक राज्यांचे प्रभारी असलेल्या नेत्यांच्या कार्यशैलीवर खरगे यांच्याकडून नाराजी, सूत्रांची माहिती

  • 10 Mar 2023 06:20 AM (IST)

    लवकरात लवकर निवडणूक लावा, हीच आमची इच्छा : आदित्य ठाकरे

    आदित्य ठाकरे यांनी रात्री 12 वाजता घेतलं चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन

    राज्याचा अर्थसंकल्प निवडणुका होण्याचे संकेत असेल, आदित्य ठाकरे यांचा टोला

    तिथी आणि तारखेचा वाद नको, महाराजांचा प्रत्येक दिवस जयंती साजरा झालाच पाहिजे. त्यांनी दिलेली शिकवण पुढे घेऊन गेलं पाहिजे

Published On - Mar 10,2023 6:15 AM

Follow us
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...