Maharashtra Breaking News Live : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग

| Updated on: Mar 22, 2023 | 6:10 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. संपावर तोडगा न निघाल्याने संप सुरूच आहे. आजही हा संप सुरूच राहणार असल्याचं कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केलं. अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Mar 2023 07:56 AM (IST)

    अमरावती : गोरगरिबांच्या सणासाठी आनंदाचा शिधा पोहचलाच नाही

    अमरावती : गोरगरिबांच्या सणासाठी आनंदाचा शिधा पोहचलाच नाही

    अमरावती जिल्ह्यातील साडेपाच लाखावर लाभर्ती तूर्तास तरी वंचितच

    जिल्ह्यातील 20 पैकी एकाही गोडाऊनमध्ये गोरगरिबांना मिळणारा शिधा पोहचलाच नाही

    गुडीपाडव्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान एकदाच शिधावाटप होणार

  • 20 Mar 2023 06:58 PM (IST)

    साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर गडचिरोली शहरात शिरलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

    गडचिरोली :

    साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर गडचिरोली शहरात शिरलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

    गडचिरोली चंद्रपूर मार्गावरून एक वाघीण गडचिरोली शहरात आज दुपारच्या वेळेस आयटीआय कॅम्पसमध्ये शिरली होती

    या वाघिणीला नागरिकांनी बघितल्यानंतर सध्या गडचिरोली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते

    साडेचार तास वन विभागाच्या प्रयत्नांनी अखेर वाघिणी आता सायंकाळी जेरबंद करण्यात आले

    गडचिरोली वन विभाग व पोलीस विभाग प्रयत्नाने जेरबंद करण्यात यश आला

    जेरबंद झालेल्या वाघिणीला बघण्यासाठी खूप मोठी गर्दी गडचिरोली शहरात नागरिकांनी केली

  • 20 Mar 2023 06:22 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर

    ८० उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर

    पहिल्या यादीमध्ये वकील, डॉक्टर, आयटी क्षेत्रातील उमेदवार

    सर्व 224 जागांवर आम आदमी पक्ष उमेदवार देणार

    पहिल्या 80 उमेदवारांमध्ये 69 चेहरे नवीन असल्याचा आपचा दावा

  • 20 Mar 2023 05:06 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

    पुणे : पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग मधील कर्मचारी माञ संपावरच,

    आम्हाला अद्याप कुठलाही निरोप आला नाही त्यामूळे आमचा संप सूरू आहे,

    आम्हाला निरोप आल्यावर नक्कीच आम्ही आमचा संप मागे घेऊ पण अद्याप आणि संपावर ठाम.

  • 20 Mar 2023 04:37 PM (IST)

    कल्याण डोंबिवली मनपाच्या उंबर्डे येथील कचरा प्रकल्पात कचऱ्याला आग

    कल्याण उंबर्डे येथे कचरा वर्गीकरणाचा प्रकल्प

    सुका कचरा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं

    घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

    आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

  • 20 Mar 2023 03:44 PM (IST)

    गडचिरोली : शेतात ठेवलेल्या मिरचीचे खूप मोठे नुकसान झाले

    गडचिरोली : शेतात ठेवलेल्या मिरचीचे खूप मोठे नुकसान झाले

    जिल्ह्यात गारपीट अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान

    दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन शेतकरी घेतात

    दुसरी तोडणी होण्याआधीच अवकाळी पाऊस आणि गारपीट

  • 20 Mar 2023 03:22 PM (IST)

    महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपात सहभागी

    नाशिक : इगतपुरी नगरपरिषदेत असलेले सर्व कर्मचारीही संपात सहभागी

    2005 पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाहीये त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून त्यांना फक्त 2500 रूपये पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे

    जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप आणि संघर्ष सुरूच राहणार आहे

    सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, नोटीसही काढण्याचं प्रयत्न करत आहे

    सरकारी कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी जनतेची सेवा करतात पेन्शन त्यांचा हक्क आहे

    डॉ. डी. एल. कराड यांचा सरकारवर हल्लाबोल

  • 20 Mar 2023 03:04 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीच्या दुसऱ्या नोटीशीलाही उत्तर दिलं

    हक्कभंग समितीने गेल्या आठवड्यात दिली होती दुसरी नोटीस

    सात दिवसांच्या आत उत्तर देण्याची दिली होती मुदत

    पहिल्या नोटीशीला संजय राऊत यांनी दिले होते उत्तर

  • 20 Mar 2023 02:24 PM (IST)

    पंचनाम्या अभावी आमच्या संसाराचा आता वरवंटा होऊ दे का?; राजू शेट्टी यांचा शासकीय कर्मचाऱ्यांना उद्विग्न सवाल

    कोल्हापूर

    आज गारपीट झाली अवकाळी झाला, आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची कवितेतून संपात सहभागी सरकारी कर्मचाऱ्यांना विचारणा

    पंचनाम्या अभावी आमच्या संसाराचा आता वरवंटा होऊ दे का?

    अशा शब्दात व्यक्त केल्या उद्विग्न भावना

    कांद्याचे दर, दूध आंदोलन, रास्ता रोको अशा आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी इतरांना त्रास दिला नसल्याची ही करून दिली आठवण

    राजू शेट्टींच्या कवितेची सोशल मीडियात चर्चा

  • 20 Mar 2023 02:19 PM (IST)

    भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

    – भंडारा जिल्ह्यातील काल आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसामुळे गहू पिकाच भाजीपाल्याचे मोठे नुकसान.

    – संपूर्ण गहू पिक काळसर पडले असून. गव्हाची गुणवत्ता सुद्धा कमी होणार आहे. गहू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

    – भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तुमसर लाखनी व इतर भागातही पिकांना अवकाळी पावसाने झोडपले.

    – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  • 20 Mar 2023 01:13 PM (IST)

    चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण बनले बस चालक

    जळगाव : आमदारांनी केले विद्यार्थ्यांच्या बसचे सारथ्य,

    त्यांचा राज्य परिवहन महामंडळाची बस चालवत अतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे,

    चाळीसगावातील विद्यार्थ्यांचा विधान भवन दौरा आमदारांनी आयोजित केला होता,

    विद्यार्थ्यांना मुंबईकडे घेऊन जाणारी बस आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः चालवली,

    यावेळी त्यांचा बस चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायला होत आहे.

  • 20 Mar 2023 12:45 PM (IST)

    गुढी पाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारा “आनंदाचा शिधा” सांगलीत दाखल.

    रवा,डाळ आणि तेलाचे ट्रक दाखल.

    मागणीच्या 60 टक्के रवा,डाळ आणि तेल सांगलीच्या शासकीय गोदामात पोहचले.

    साखर देखील लवकरच होणार दाखल.

  • 20 Mar 2023 12:22 PM (IST)

    चक्क पेढ्यांनी केली रवींद्र धंगेकर यांची तुला

    इंदापूर : हनुमानाला केलेला नवस केला पूर्ण,

    कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वजनाचे पेढे वाटून केली नवस पूर्ती

    बिजवडी येथील काळे वस्तीतील लोकांनी केली धंगेकर यांची अनोखी तुला.

  • 20 Mar 2023 11:45 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग

    सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही

    गारपीठीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही.

    अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

    आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि वाटप सुरू करा, आजच्या आज उपाययोजना करून तात्काळ निर्णय करावा, जयंत पाटील यांची मागणी

  • 20 Mar 2023 11:37 AM (IST)

    विजय ताड खून प्रकरणाचा उलगडा

    जतच्या भाजप माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणाचा उलगडा.

    खून प्रकरणी 5 जणांची नावे समोर, भाजपा माजी नगरसेवकाचा समावेश.

    माजी नगरसेवक उमेश सावंत मुख्य सूत्रधार असल्याचे समोर.

    खून प्रकरणातील चौघा आरोपींना कर्नाटकच्या गोकाक येथून अटक.

    माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार.

    खुनाचे कारण मात्र आद्यप अस्पष्ट.

    पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची माहिती

  • 20 Mar 2023 11:37 AM (IST)

    अंबरनाथच्या भंगार गल्लीत पुन्हा लागली आग

    भंगाराच्या गोदामांना शॉर्टसर्किटमुळे लागली आग

    तीन गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी, इतर गोदामांनाही धोका

    अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

    11 मार्च रोजी याच भंगार गल्लीत लागली होती आग

  • 20 Mar 2023 11:08 AM (IST)

    युवासेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या बाहेर विविध मागण्यांसाठी आंदोलन

    मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकी आधी युवासेना ठाकरे गट आक्रमक,

    मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची वार्षिक सभा दीक्षांत सभागृह फोर्ट येथे आयोजित करण्यात आली आहे,

    मात्र सभेपूर्वी युवा सेना ठाकरे गटाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे,

    अधिसभेची वार्षिक बैठक होत असताना विद्यापीठच्या विविध प्राधिकरणाच्या सिनेट सदस्यांचे नियुक्ती झालेले नाहीत,

    शिवाय सिनेट निवडणूक झाली नाही या बैठकीमध्ये फक्त राज्यपाल नियुक्त सभासद हजर राहणार आहेत,

    त्यामुळे विद्यापीठ व विद्यार्थी प्रश्नसंदर्भातील मागण्या नेमक्या कोण मांडणार ? असा प्रश्न युवासेना ठाकरे गटाने विचारला असून विविध मागण्यांच्या फलकांसह विद्यापीठाच्या गेट समोर आंदोलन केले जात आहे

  • 20 Mar 2023 10:59 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात वाढ

    राहिलेला माल खराब झाला आहे तरीही तशीच आवक होत नसल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे

    वटाणे आधीचे दर 20 ते 25 रुपये आताचे 36 ते 40 रुपये

    टोमॅटो आधीचे दर 16 ते 20 रुपये आता 28 ते 32 रुपये

    शिमला मिरची आधीचे दर 28 ते 30 आताचे दर 35 ते 40 रुपये

    कोंथिबीर एक जुडी 6 ते 8 रुपये, आताचे दर 15 रुपये

  • 20 Mar 2023 10:58 AM (IST)

    थाळी नाद आंदोलन

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे थाळी नाद आंदोलन सुरू

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन

    शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी

    थाळी वाजवून केली जात आहेत निदर्शने.

  • 20 Mar 2023 10:56 AM (IST)

    कोल्हापूर | छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

    आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला होणार सुरुवात

    27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

    कारखान्याच्या 21 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान

    राजाराम निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक आणि सतेज पाटील गट पुन्हा येणार आमने-सामने

    दोन्ही गटाकडून निवडणुकीची जोरदार तयारी

  • 20 Mar 2023 10:54 AM (IST)

    वाशिमच्या शिरपूरमधील मंदिरात आणि मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त

    रविवारी जैन धर्मियांच्या दोन पंथांमध्ये झाला होता वाद

    दर्शनासाठी एका वेळी फक्त पाच भाविकांना मंदिरात सोडलं जात आहे

    दर्शन झाल्यानंतर लगेचच भाविकांना बाहेर यावे लागणार

    वादाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात बसण्यास मनाई

  • 20 Mar 2023 10:53 AM (IST)

    शिवसेनेच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार

    सातारा जिल्ह्यातील मोरगिरी परिसरात काल रात्री हत्येची घटना.

    शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं केला गोळीबार

    गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

    मदन कदमनं श्नीरंग जाधव,योगेश सावंत यांची केली हत्या

    मदन कदमांच्या मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती..

  • 20 Mar 2023 10:51 AM (IST)

    सातारा जिल्ह्यातील मोरगिरी परिसरात गोळीबार

    शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं केला गोळीबार

    गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

    मदन कदमकडून श्रीरंग जाधव, योगेश सावंत यांची हत्या

    मदन कदमच्या मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती

    योगेश कदम आणि गौरव कदम यांना ताब्यात घेतल्याची माहिती

  • 20 Mar 2023 10:49 AM (IST)

    चेन्नई | रजनीकांत यांच्या मुलीच्या घरी दागिन्यांची चोरी

    रजनीकांत यांची मुलगी आणि निर्माती ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरातील मौल्यवान दागिन्यांची चोरी

    तीनमपेट पोलीस ठाण्यात ऐश्वर्या यांनी दाखल केली तक्रार, वाचा सविस्तर..

  • 20 Mar 2023 10:47 AM (IST)

    चंद्रपूर : गाडीच्या धडकेत दुचाकीवरील २ जण जखमी

    चारचाकी गाडीच्या अपघाताची घटना cctv कॅमेरात कैद

    भद्रावती येथील गौतम नगरकडे जाणाऱ्या वळणावर अपघात

    अपघातात 2 तरुण जखमी, भद्रावती पोलीस करताहेत तपास

  • 20 Mar 2023 10:43 AM (IST)

    Entertainment Update : अपघातानंतर Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

    अपघाताच्या अनेक दिवसांनंतर बिग बींच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर,

    अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट करत व्यक्त केली ‘ही’ इच्छा… वाचा सविस्तर

  • 20 Mar 2023 10:43 AM (IST)

    विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजीट

    टोपलीत कांदे आणि द्राक्षे घेऊन विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यावर

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थिती आंदोलन

  • 20 Mar 2023 10:04 AM (IST)

    Entertainment Update : रणबीर – श्रद्धा स्टारर Tu Jhooti Main Makkar सिनेमा ओटीटीवर येणार पाहता?

    Tu Jhooti Main Makkar सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी, कसा आणि कुठे पाहता येणार?

    जाणून घ्या रणबीर कपूर – श्रद्धा कपूर यांच्या सिनेमाबद्दल सर्व डिटेल्स… वाचा सविस्तर

  • 20 Mar 2023 10:03 AM (IST)

    सांगली मासे मृत्यू प्रकरणात कारवाई

    कृष्णा नदीचे प्रदूषण आणि मासे मृत्यूप्रकरणी अखेर कारवाई झाली आहे. दत्त इंडियाचा वीज आणि पाणीपुरवठा तोडला आहे. महावितरण, पाटबंधारे विभागाची कारवाई.

  • 20 Mar 2023 09:57 AM (IST)

    पुणे : म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत

    6058 घरांसाठी असणार सोडत

    देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ऑनलाइन उपस्थित राहणार

    6058 घरांसाठी 58 हजार अर्ज म्हाडाकडे दाखल

  • 20 Mar 2023 09:57 AM (IST)

    भाजपच्या पदाधिकारी अनुराधा चव्हाण यांनी केली औरंगाबाद नावाची तोडफोड

    छत्रपती संभाजी नगर : सिडको परिसरातील आय लव्ह औरंगाबाद या नावाची केली तोडफोड,

    हातात काठी घेऊन नावाची केली तोडफोड,

    तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • 20 Mar 2023 09:48 AM (IST)

    महापालिका उपयुक्त अपर्णा थिटे यांची आज ईडी कार्यालयात चौकशी

    छत्रपती संभाजी नगर ब्रेकिंग :-

    महापालिका उपयुक्त अपर्णा थिटे यांची आज ईडी कार्यालयात चौकशी

    महापालिका उपायुक्त अपर्णा थिटे मुंबईत दाखल

    पंतप्रधान अवास योजनेत घोटाळा झाल्या प्रकरणी होणार चौकशी

    पंतप्रधान अवास योजनेच्या टेंडर प्रक्रियेत झाला होता घोटाळा

  • 20 Mar 2023 09:11 AM (IST)

    पुण्यात वारजे माळवाडी येथील आहेरे गाव येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या

    पुणे : बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी,

    वन विभाग व वारजे पोलीस घटनास्थळी दाखल.

  • 20 Mar 2023 09:07 AM (IST)

    जळगावच्या चाळीसगावमध्ये दुर्देवी घटना घडली आहे..

    वॉल कंपाऊंड ची भिंत अंगावर कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे..

    एच. एच. कंपनीत हे मजूर काम करत होते….हे तीनही मजूर उत्तर प्रदेश येथील होते….

    तर एक मजूर गंभीर रित्या जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे..

  • 20 Mar 2023 09:03 AM (IST)

    कंटेनर थेट रस्त्यात झाला पलटी, चालक जखमी

    कंटेनर थेट रस्त्यात झाला पलटी, चालक जखमी
    मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे येथे अती वेगाने आलेल्या एका कंटेनर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर उलटला आहे
    चालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
    वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती,मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,पलटी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे
    या कंटेनर मध्ये माल असल्याने आतील मालाचेही नुकसान झाले आहे
  • 20 Mar 2023 08:49 AM (IST)

    नवी दिल्ली : विरोधी खासदार लाँग मार्च काढण्याच्या तयारीत

    थोड्याच वेळात विरोधी पक्षातील नेत्यांची होणार बैठक

    संसद परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

    यापूर्वी ईडी कार्यालयावर निघालेल्या मार्चला परवानगी देण्यात आली नव्हती

    आज राष्ट्रपती भवनापर्यंत विरोधी खासदार मार्च काढण्याच्या तयारीत

    सभागृहात आजही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार

  • 20 Mar 2023 08:34 AM (IST)

    नंदुरबार अवकाळी पाऊस

    – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचे पंचनामे होत नसल्याचा ठाकरे गटाचा आरोप.

    – सरकार फक्त घोषणा करते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही पंचनाम्याची प्रतीक्षा.

    – आतापर्यंत जिल्ह्यात एकही शेतकऱ्याचा नुकसानीचा पंचनामा झाला नसल्याचा ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचा आरोप.

    – सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करत नाही.

  • 20 Mar 2023 08:08 AM (IST)

    दोन देशी बनावटीच्या मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त 

    वर्धा स्टोरी
    स्लग –
    – दोन देशी बनावटीच्या मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त
    – काही दिवसांपूर्वी वर्ध्यात दोन गटांत राडा होऊन फायरींग झाली होती
    – त्या घटनेतील फरार असलेला तसच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रितिक तोडसाम याला अटक
    – रीतिक तोडसामकडून दोन देशी बनावटीच्या मॅगझीनसह पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त
  • 20 Mar 2023 07:59 AM (IST)

    नाशिक – महिला चोरट्यांनी केला बँकेत हात साफ

    महिला चोरांची टोळी करत आहे आता थेट बँकेत येऊन चोरी

    सही करण्यासाठी ग्राहक उठला असता चोरली त्याच्या बॅग मधील रोकड

    हात चलाखी करत लांबवली 32 हजारांची रोकड

    चोरीचा व्हिडियो सीसीटीव्ही कॅमेरात कैद

    अंबड पोलिसात दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

  • 20 Mar 2023 07:56 AM (IST)

    वाशिम : श्वेतांबरपंथी आणि दिगंबरपंथीयांमध्ये वाद

    वाशिम : जैन धर्मीयांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिरपूर येथे काल जैन धर्माच्या श्वेतांबरपंथी आणि दिगंबरपंथी मध्ये काल वाद झाला.

    वादानंतर आज शिरपूर मध्ये शांतता. 40 पोलिसांचा मंदिर परिसरात बंदोबस्त.

    पार्श्वनाथाच्या मंदीरावरून दोन पंथीयांमध्ये मागील तीन दिवसापासून सुरू आहे वाद.

    काल झाली होती प्रचंड हाणामारी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 11 मार्च रोजी उघडण्यात आलं मंदिर.

  • 20 Mar 2023 07:27 AM (IST)

    समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर नागपुरात आरएसएसच्या स्मृती मंदिर परिसरात

    समीर वानखेडे यांनी हेडगेवार यांच्या स्मृतीचं दर्शन घेतलं

    समीर वानखेडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात पोहोचल्याने पुन्हा चर्चेत

    तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले

    समीर वानखेडे हे सपत्नीक आरएसएसच्या स्मृती मंदिरात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

    यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्यंसेवक संघाच्या व्हिजिट बुकमध्ये मनोगतही व्यक्त केले

  • 20 Mar 2023 07:25 AM (IST)

    राज्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या हजारावर

    बदललेले हवामान, विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली

    आठ दिवसांत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट

    सध्या 1308 सक्रिय रुग्ण असून, सर्वाधिक 279 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत

    रविवारी राज्यात 236 नवीन रुग्णांचे निदान झाले

    आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांमधील कोरोनाबाधितांचा आकडाही हळूहळू वाढताना दिसतोय

  • 20 Mar 2023 07:23 AM (IST)

    आरटीई प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची संख्या तीन लाखांवर

    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ

    17 मार्च रोजी मुदत संपली होती, मात्र पालकांच्या मागणीनुसार अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ

    राज्यातील 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध

    या जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून तब्बल 3 लाख 14 हजार 731 प्रवेश अर्ज दाखल

    शिक्षण संचालनालयाने अर्ज सादर करण्याची मुदत 25 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत वाढवल्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती

    पुणे जिह्यातील 15,655 जागांसाठी 68,192 ऑनलाइन अर्ज

  • 20 Mar 2023 07:22 AM (IST)

    कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचे आयएसआयसी संबंध?

    पंजाब पोलिसांच्या दाव्याने देशभरात खळबळ, एनआयएकडून तपास होण्याची शक्यता

    अमृतपाल सिंगच्या संघटनेमधील चार सदस्यांना पंजाबमध्ये अटक

    पंजाबमधल्या अनेक भागात इंटरनेट बंदी

    ताब्यात घेतलेल्या चार सदस्यांकडे पंजाब पोलिसांची कसून चौकशी

  • 20 Mar 2023 06:51 AM (IST)

    अवकाळी पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, बुलढाणा जिल्ह्यात एक दिवसात 2371 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

    सर्वाधिक नुकसान खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात 18 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला

    तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे

    यामुळे 2371 हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, भुईमुग, संत्रा यासह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे

    निसर्गाने रब्बी हंगामात सुद्धा शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास फिरवून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे

  • 20 Mar 2023 06:46 AM (IST)

    मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

    भंडारा शहरातील रहिवासी असलेल्या भूषण पालटकर (वय 50) यांनी कारधा पुलावरून उडी घेत केली आत्महत्या

    वैनगंगा नदीच्या पुलावर जात सायकल बाजूला ठेवली, बुट काढून ठेवत पुलावरून उडी घेतली

    पण जवळच असलेल्या लोकांनी पाहिल्यावर भूषण यांना दोरीच्या सहाय्याने वाचविण्याचा प्रयत्न केला

    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे

  • 20 Mar 2023 06:08 AM (IST)

    मीरारोड येथील श्री माहेश्वरी भवन याठिकाणी बागेश्वर बाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी

    मिरारोड येथील श्री माहेश्वरी भवन याठिकाणी बागेश्वर बाबांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने बागेश्वर बाबांच्या भक्तांनी गर्दी केली होती

    यावेळी बागेश्वर बाबांनी बाहेर येऊन या सर्व भक्तांना दर्शन दिले

    यावेळी जय श्री रामचा आवज घुमला

    यादरम्यान बागेश्वर बाबांना पाहून भक्तांनी आरती देखील केली

  • 20 Mar 2023 06:03 AM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात चोरी, पोलिसात गुन्हा दाखल

    ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून एसी, टीव्ही, वॉशिंग मशीनची चोरी

    एकून 4 लाख रुपयाचा मुद्देमाल झाला चोरी

    या चोरीच्या मागे टोळी असल्याचा सदावर्ते यांचा आरोप

    वागळे पोलिसांचा तपास सुरु

Published On - Mar 20,2023 6:00 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.