Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:12 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज शनिवार, 12 नोव्हेंबर 2022. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आज जितेंद्र आव्हाड यंच्या अटकेचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश विधानसभेच्या (Himachal Pradesh Election) निवडणुकीचं मतदान आज पार पडतंय. यासोबत चित्रा वाघ यांनी यवतमाळमध्ये काल पत्रकारावर संपात व्यक्त केला होता. संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या पत्रकारावर भडकल्या होत्या. त्यानंतर आज वर्ध्यात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. दरम्यान, पुण्यातील शाळेच्या बसचा रायगडमध्ये काल रात्री अपघात झाला. या अपघाताने राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्नही पुन्हा अधोरेखित केलाय. या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या जाणून घेण्यार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Nov 2022 10:42 PM (IST)

    पुण्यात शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का, 50 कार्यकर्ते करणार प्रवेश

    – पुण्यात शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का,

    – पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस, राष्ट्रवादी पर्वती विधानसभा उपाध्यक्षासह राष्ट्रवादीचे 50 कार्यकर्ते करणार शिंदे गटात प्रवेश,

    – शिवाय लातूरमधील जिल्हा परिषद सदस्य करणार शिंदे गटात प्रवेश,

    – उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्ष प्रवेश,

    – शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची माहिती

  • 12 Nov 2022 09:51 PM (IST)

    आरोग्य खात्यातील बदल्यांना 24 तासातच स्थगिती

    – आरोग्य खात्यातील बदल्यांना 24 तासातच स्थगिती,

    – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी अशा 22 अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल दुपारी आदेश देण्यात आले होते,

    – मात्र याला 24 तासातच स्थिगिती देण्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश,

    – माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान सुरू असल्यामुळे बदल्यांना तात्पुरती स्थगिती, पत्रात देण्यात आले कारण,

    – त्यामुळे नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले.

  • 12 Nov 2022 09:15 PM (IST)

    शिव्यांचं माझ्यात जीवनसत्वांमध्ये रुपांतर होतं

    Marathi News LIVE Update

    शिव्यांचं माझ्यात जीवनसत्वांमध्ये रुपांतर होतं

    तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

    रोज दोन तीन किलो शिव्या खात असल्याने थकत नाही

    पंतप्रधान दक्षिण राज्यांच्या दौऱ्यावर

  • 12 Nov 2022 08:24 PM (IST)

    परदेशी गुंतवणूकदार Nykaa वर फिदा

    Marathi News LIVE Update

    परदेशी गुंतवणूकदार Nykaa वर फिदा

    परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची या फॅशन ब्रँडमध्ये मोठी गुंतवणूक

    मॉर्गन स्टेनलीने केले 82,13,050 शेअर खरेदी

    सिंगापूरच्या या फर्मची नायकामध्ये एकूण 153 कोटींची गुंतवणूक

    तीन फर्म्सनी दोन दिवसांत गुंतविले एकूण 290 कोटी रुपये

  • 12 Nov 2022 07:49 PM (IST)

    मोदींचं जग फिरुन झालं असेल तर पदयात्रा काढावी

    Marathi News LIVE Update

    मोदींचं जग फिरुन झालं असेल तर पदयात्रा काढावी

    राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

    राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता

    भारत जोडो यात्रेचं शेट्टींकडून स्वागत

    भारत जोडो यात्रा नांदेड नंतर हिंगोली जिल्ह्यात

  • 12 Nov 2022 07:36 PM (IST)

    मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    मुंबई :

    पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    वाहनांच्या लांबच लांब रांगा

    वाहनांची वाहतूक संत गतीने सुरू

    अंधेरीतील गोखले पूल बंद झाल्याने याचा फटका पश्चिम द्रुतगती मार्गावर दिसून येतोय

    नेस्को येथील एक कार्यक्रम असल्याने त्याचाही परिणाम पश्चिम द्रुतगती मार्गावर

    वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास

  • 12 Nov 2022 07:34 PM (IST)

    लग्न सराईत सोन्याची गोल्डन जंप

    Marathi News LIVE Update

    लग्न सराईत सोन्याची गोल्डन जंप

    सोन्याचा आजचा दर 52 हजारांच्या पुढे

    24 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति ग्रॅम 5,228 रुपये

    22 कॅरेट सोने दर प्रति ग्रॅम 5,103 रुपये

    सोन्यासोबत चांदीच्या भावात ही वृद्धी

  • 12 Nov 2022 07:15 PM (IST)

    राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी अपेक्षा नाही

    Marathi News LIVE Update

    राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी अपेक्षा नाही

    जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया

    हर हर महादेव सिनेमाला विरोध कायम राहणार

    आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम

  • 12 Nov 2022 07:14 PM (IST)

    सोलापूरमध्ये यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

    चादर आणि टॉवेल निर्मिती करणाऱ्या कारखान्याला भीषण आग

    सोलापुरातील निलमनगर भागातील यंत्रमाग कारखान्याला आग

    सर्व मशिनरी आणि कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती

    कामगार वेळीच बाहेर पडल्याने त्यांना कोणतीही इजा नाही

    आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच-सहा गाड्या घटनास्थळी रवाना

  • 12 Nov 2022 07:01 PM (IST)

    डीसीपी विनय कुमार राठोड यांची वाहतूक शाखेत बदली

    Marathi News LIVE Update

    डीसीपी विनय कुमार राठोड यांची वाहतूक शाखेत बदली

    जितेंद्र आव्हाड यांनी घेतले होते डीसीपींचे नाव

    राठोडांनी अटक केल्याचा आव्हाडांचा दावा

    काहीही करु शकतो हे दाखविण्यासाठी आपल्याला अटक

    आव्हाडांचा इशारा नेमका कोणाकडे?

  • 12 Nov 2022 06:50 PM (IST)

    चित्राताई या विचित्र ताई, यशोमती ठाकूर यांची टीका

    Marathi News LIVE Update

    चित्राताई या विचित्र ताई, यशोमती ठाकूर यांची टीका

    पत्रकारांवर भडकल्याप्रकरणात दिली प्रतिक्रिया

    काल चित्रा वाघ यांची पत्रकारांवर आगपाखड

    संजय राठोड यांच्या प्रकरणात प्रश्न विचारल्याने चढला होता पारा

  • 12 Nov 2022 06:35 PM (IST)

    Blue Tick मुळे औषधी कंपनीला 1500 कोटींचा फटका

    Marathi News LIVE Update

    Blue Tick मुळे औषधी कंपनीला 1500 कोटींचा फटका

    बनावट खाते तयार करुन Eli Lilly कंपनीला गंडविले

    मोफत इन्शुरन्स वाटपाचे खोट्या ट्विटने कंपनीला लाखोंचा फटका

    अमेरिकेतील औषधी कंपनीला खोट्या ट्विटचा मोठा मनःस्ताप

  • 12 Nov 2022 06:07 PM (IST)

    50 खोके नाही, विकास कामांसाठी 200 खोके दिले

    Marathi News LIVE Update

    50 खोके नाही, विकास कामांसाठी 200 खोके दिले

    खोक्यांवरील आरोपांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

    अडीच महिन्यात एवढं काम केल्याने विरोधकांना धडकी भरली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला विरोधकांवर निशाणा

  • 12 Nov 2022 05:41 PM (IST)

    जितेंद्र आव्हाडांना अटक केलेल्या डीसीपींची बदली

    Marathi News LIVE Update

    जितेंद्र आव्हाडांना अटक केलेल्या डीसीपींची बदली

    विनय कुमार राठोड यांची करण्यात आली बदली

    डीसीपीवर अटकेसाठी मोठा दबाव असल्याचा दावा

    जितेंद्र आव्हाड यांनी केला होता पोलिसांवर आरोप

  • 12 Nov 2022 05:21 PM (IST)

    समृद्धी महामार्ग आता थेट भंडाऱ्यापर्यंत

    Marathi News LIVE Update

    समृद्धी महामार्ग आता थेट भंडाऱ्यापर्यंत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    मुंबई ते नागपूरपर्यंत असणारा महामार्ग पुढे नेणार

    आता मुंबई ते थेट भंडारा समृद्धीने करा प्रवास

  • 12 Nov 2022 05:10 PM (IST)

    हर हर महादेव चित्रपटाला विरोध कायम

    Marathi News LIVE Update

    हर हर महादेव चित्रपटाला विरोध कायम

    चित्रपटातून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न

    पोलिसांचा दोष नाही, डीसीपी दबावात होते

    कोणाच्या तरी दबावात अटक करण्यात आली

    आम्ही प्रेक्षकांना मारहाण केलेली नाही

    जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

  • 12 Nov 2022 04:53 PM (IST)

    पोलिसांची हतबलता दिसत होती

    Marathi News LIVE Update

    पोलिसांची हतबलता दिसत होती

    महाराष्ट्राला दाखविण्यासाठी घाईगडबडीत अटक केली

    5 वाजता चौकशीसाठी बोलाविले, 2.30 वाजता अटक केली

    आम्ही काहीही करु शकतो हे दाखविण्यासाठी अटक

    जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात

  • 12 Nov 2022 04:28 PM (IST)

    महिंद्रा बोलेरोवर ग्राहकांसाठा मेगा सवलत

    Marathi News LIVE Update

    महिंद्रा बोलेरोवर ग्राहकांसाठा मेगा सवलत

    24 तासात घरबसल्या मिळवा डिलिव्हरी

    ग्राहकांना मिळणार 42,000 हजारांचा फायदा

    ऑनलाईन पोर्टलवरुन ही करता येणार चारचाकीचे बुकिंग

  • 12 Nov 2022 04:08 PM (IST)

    रस्ते विकासासंदर्भातील बाँडमध्ये गुंतवणुकीची संधी

    Marathi News LIVE Update

    रस्ते विकासासंदर्भातील बाँडमध्ये गुंतवणुकीची संधी

    भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आणला बाँड

    इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) बाँडमध्ये जोरदार गुंतवणूक

    आता सर्वसामान्यांसाठी गुंतवणूक होणार दुप्पट

    वाटा 25 टक्क्यांहून 50 टक्के करण्यात आल्याने गुंतवणूकदारांना फायदा

    आतापर्यंत 1,500 कोटी रुपयांचे बाँड जारी

  • 12 Nov 2022 03:33 PM (IST)

    संजय राऊत त्यांचे वकील अशोक मुंदरगी यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले

    तुरुंगातून सुटल्यानंतर ईडीच्या कायदेशीर बाबींवर संजय राऊत यांची आपले वकील अशोक मुंदरगी यांच्याशी होणार चर्चा

    तुरुंगातून बाहेर आल्यावर पहिल्यांदाच संजय राऊत हे अशोक मुंदरगी यांच्या भेटीसाठी पोहोचले

  • 12 Nov 2022 03:23 PM (IST)

    तीन महिन्यांत उद्योग बाहेर जातात का

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला टोला

    उद्योग बाहेर जायला ही काही जादूची कांडी आहे का

    आमचं सरकार उद्योगाला चालना देणार – मुख्यमंत्री

  • 12 Nov 2022 03:08 PM (IST)

    राज्यातील सहकारी बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

    Marathi News LIVE Update

    राज्यातील सहकारी बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

    बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द

    बँकिंग व्यवहार करण्यास घातली बंदी

    ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षणाचा फायदा

  • 12 Nov 2022 02:29 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी

    व्हिव्हीयाना मॉल मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवासंची न्यायालयीन कोठडी

    ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली कोठडी

    आव्हाड आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार

  • 12 Nov 2022 02:08 PM (IST)

    गोसेखुर्द प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न

    Marathi News LIVE Update

    गोसेखुर्द प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न

    भंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

    गोसेखुर्द प्रकल्पाचा पूर्व विदर्भाला मोठा फायदा

    प्रकल्पामुळे 700 गावं येणार ओलीताखाली

    राज्याच्या दृष्टीने फार मोठा प्रकल्प -शिंदे

  • 12 Nov 2022 01:51 PM (IST)

    अभिनेता शाहरुख खानला कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर रोखलं

    शाहरुखकडे 18 लाखांच्या घड्याळ्याचे कव्हर

    शाहरुख खानला दंड भरावा लागला, विमानतळावर भरली कस्टम ड्युटी

    दंड भरल्यानंतरच जाण्याची परवानगी

  • 12 Nov 2022 01:35 PM (IST)

    राज्य सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केल्याबद्दल पुण्यात जल्लोष

    पुण्यात दिव्यांग बांधवांकडून राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत

    लाडू वाटप करत दिव्यांग बांधवांचा पुण्यात जल्लोष

    या जल्लोष दरम्यान दिव्यांग बांधवांनी बच्चू कडू आणि राज्य सरकारच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली

    दिव्यांग मंत्रालयाच्या मार्फत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा देखील दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.

  • 12 Nov 2022 01:04 PM (IST)

    हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

    सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

    आतापर्यंत हिमाचल प्रदेशात 22 टक्के मतदान

    अनेक मतदान केंद्रावर रांगा, तर काही मतदान केंद्र ओस पडली

  • 12 Nov 2022 12:17 PM (IST)

    “हर हर महादेव” चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेडची सेन्सर बोर्डाकडे तक्रार

    संभाजी ब्रिगेड कडून “हर हर महादेव” चित्रपटाविरोधात सेन्सर बोर्डाकडे तक्रार करण्यात आलीये.

    इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी चित्रपटावर बंदी घालून सर्व भाषेतील प्रमाणपत्र सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीये.

    प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि अॕड. विकास शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तक्रार दाखल केलीये.

  • 12 Nov 2022 11:56 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर निर्णय यायला उशीर लागणार

    एक ते दीड तासाने निर्णय येणार

    तोपर्यंत आव्हाड यांच्यासह इतर आरोपींना सेफ कस्टडीत ठेवणार

    जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

  • 12 Nov 2022 11:53 AM (IST)

    अंधेरीतील गोखले पुलावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु

    अंधेरीतील गोखले पुलावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु

    गोखले पूल बंद झाल्यानंतर अंधेरी विलेपार्ले येथे मोठा वाहतूक होत होती

    वाहतूक कोंडीमुळे आंदोलन केल्याचं ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

    गोखले पुलाचा एक भाग सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत

  • 12 Nov 2022 11:48 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय

    ठाणे जिल्हा न्यायालयात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद संपला

    आव्हाड यांना जेल होणार की बेल? सर्वांचे लक्ष

    माझ्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव, आव्हाडांचा नातेवाईकांशी बोलताना आरोप

    मला अटक करण्यासाठी पोलिसांना एका चाणक्याचा वारंवार फोन, आव्हाडांचा गंभीर आरोप

  • 12 Nov 2022 11:36 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची तयारी करा

    शिंदे गट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ताकदीने लढणार

    21 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बोलावणार बैठक

    स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदे गटाचं प्राबल्य वाढवण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी करा शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

    राज्यातील 7 हजार ग्रामपंचायतीचं बिगुल वाजलं

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणूकांची तयारी सुरू

  • 12 Nov 2022 10:15 AM (IST)

    गजानन मेहेंदळे यांची राज ठाकरे पुण्यात भेट घेणार

    इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची राज ठाकरे पुण्यात भेट घेणार

    ऐतिहासिक चित्रपट हर हर महादेव वरुन सध्या वाद

  • 12 Nov 2022 10:01 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांना आज कोर्टात हजर करणार

    जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करणार

    आव्हाड यांच्यावर सात कलमं लावण्यात आली आहेत

    आव्हाड यांची कालची रात्र वर्तकनगर पोलीस ठाण्यातच गेली

  • 12 Nov 2022 09:52 AM (IST)

    गजानन कीर्तिकारांची शिंदे गटात गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

    शिवसेनेचे भवितव्य धोक्यात

    राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास शिवसेनेसाठी घातक

    उद्धव ठाकरेंनी माझा अपमान केला

    माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला

  • 12 Nov 2022 09:46 AM (IST)

    साखर कारखान्यांकडून होणाऱ्या काटामारीला लगाम

    वजन काट्यांची फेरतपासणी करून ऑनलाइन करण्याचे आदेश

    साखर कारखाने काटामारी करतात शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा आरोप

    राज्यातील सर्व कारखान्यांनी आपल्या वजनकाट्यांची फेरतपासणी करून घेण्याचे आदेश

    वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकदा टॅग लावल्यानंतर टॅगशी कोणतीही छेडछाड नाकारण्याच्या सूचना

  • 12 Nov 2022 09:46 AM (IST)

    संजय राऊत यांच्या वाढदिवसाची कार्यकर्त्यांकडून तयारी

    राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भांडुप आणि कांजूर मार्ग येथे बॅनरबाजी

    बॅनरवर संजय राऊत यांचा ‘सरकार’ असा उल्लेख

    15 नोव्हेंबरला संजय राऊत यांचा वाढदिवस

  • 12 Nov 2022 09:35 AM (IST)

    पुण्यात डबल मर्डर, नगरसेवकाच्या घरासमोरच खुनी थरार

    पूर्ववैमनस्यातून तलवार व पालघन सारख्या हत्याराने वार करून दोघांची निर्घृण हत्या

    मध्यरात्री घडला नगरसेवकाच्या घरासमोरच खुनाचा थरार

    अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी खून झालेल्या दोघांची नावे

    पांडू लमाण वस्ती येथे रात्री 3 वाजता ही घटना घडली

    येरवडा पोलीस करत आहेत प्रकरणच अधिक तपास

  • 12 Nov 2022 09:31 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुजरातेत, असे आहेत कार्यक्रम

    दुपारी 12.30 : देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण रौप्य महोत्सवी परिषद, दादा भगवान तीर्थक्षेत्र, केलनपुरी, डभोई रोड, वडोदरा, गुजरात

    दुपारी 4.30 : स्व. मातोश्री भानुताई जयरामजी गडकरी स्मृत्यर्थ भजन स्पर्धा, जवाहर विद्यार्थी गृह, नंदनवन, नागपूर

    सायं. 5 : नागपूर-उमरेड राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण, उमरेड बायपास, उमरेड, जिल्हा नागपूर

    सायं. 7.30 : मोठा ताजबाग येथील विविध विकास कामांचे लोकार्पण, मोठा ताजबाग, उमरेड रोड, नागपूर

    रात्री 8 : दक्षिण नागपुरातील ई-लायब्ररीचे लोकार्पण, मानेवाडा, सिमेंट रोड, नागपूर

  • 12 Nov 2022 09:06 AM (IST)

    संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागले नवे बॅनर्स

    संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागले नवे बॅनर्स

    15 नोव्हेंबरला संजय राऊत यांचा वाढदिवस, तीन दिवस आधीच लागले बॅनर

    वाढदिवसाच्या बॅनरवर संजय राऊत यांचा ‘सरकार’ असा उल्लेख

    संपूर्ण भांडुप आणि कांजूर परिसरामध्ये संजय राऊत यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी

  • 12 Nov 2022 09:03 AM (IST)

    मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा फटका कोकण रेल्वेला

    रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा फटका कोकण रेल्वेला

    11 एक्स्प्रेस गाड्यांना बसणार फटका

    19 आणि 20 नोव्हेंबरला पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

    जनशताब्दी, तेजस यांचा प्रवास दादर स्थानकापर्यतच

    19 नोव्हेंबरच्या मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकापर्यत

  • 12 Nov 2022 08:50 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

    जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंन्द्र भोसले यांचे आदेश

    जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी

    शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या वापरण्यास मनाई

    आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

  • 12 Nov 2022 08:47 AM (IST)

    रत्नागिरीत मध्यरेल्वेच्या मेगा ब्लॉकचा फटका कोकण रेल्वेला

    11 एक्स्प्रेस गाड्यांना बसणार फटका

    19 आणि 20 नोव्हेंबरला पूल तोडण्यासाठी मध्यरेल्वेचा मेगा ब्लॉक

    जनशताब्दी, तेजसचा प्रवास दादर स्थानकापर्यंतच

    19 नोव्हेंबर रोजी सुटणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकंन्या एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकापर्यत

  • 12 Nov 2022 08:22 AM (IST)

    ट्विटर कंपनीचा मोठा निर्णय!

    ट्विटर कंपनीचा मोठा निर्णय, वेरिफाईड अकाऊंट्सना दिलासा

    ब्लू टीकच्या अकाऊंटना आत कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत

    पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द

  • 12 Nov 2022 07:59 AM (IST)

    कोल्हापूर : उत्तूर जवळ युवकांकडून हवेत गोळीबार

    कोल्हापूर : उत्तूर जवळ युवकांकडून हवेत गोळीबार

    हालेवाडी फाट्याजवळ मध्यरात्री हुल्लडबाजी करत गोळीबार

    गोळीबार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉटेल मालकाच्या अंगावर गाडी घालण्याचा देखील प्रयत्न

    गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ, संशयित तरुणांना ताब्यात घेतलं

    आजरा पोलिसांकडून गोळीबारप्रकरणी अधिक तपास सुरु

  • 12 Nov 2022 07:56 AM (IST)

    मुख्यमंत्री आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर

    भंडाऱ्यात 200 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करणार

  • 12 Nov 2022 07:54 AM (IST)

    खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचा पलटवार

    खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचा पलटवार

    खडसेंचे कारनामे समोर येतील, गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

    भरपूर वेळ असल्याने एकनाथ खडसे फिरत राहतात- गिरीश महाजन

    काहीतरी करतोय हे दाखवण्याचा एकनाथ खडसेंचा प्रयत्न, गुलाबराव पाटील यांचा टोला

  • 12 Nov 2022 07:24 AM (IST)

    योगगुरू रामदेव बाबा यांना मोठा धक्का

    योगगुरू रामदेव बाबा यांना मोठा धक्का

    पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी

    उत्तराखंड आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाचा उत्पादन बंद करण्याचा आदेश

  • 12 Nov 2022 07:19 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांना आज कोर्टात हजर करणार

    ठाणे : जितेंद्र आव्हाड यांना आज कोर्टात हजर करणार

    शुक्रवारची रात्र पोलीस कोठडीतच

    वर्तक पोलिसांची जितेंद्र आव्हाड यांना अटक

    राष्ट्रवादी काँग्रेस आज अटकेच्या निषेधात आंदोलन करण्याच्या तयारीत

Published On - Nov 12,2022 7:17 AM

Follow us
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.