Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:11 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज शुक्रवारी, 18 नोव्हेंबर, 2022. श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याची आता नार्को टेस्ट होणार आहे. या हत्याकांड प्रकरणाचं गूढ उकलताना आजही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यताय. तर दुसरीकडे मुंबईत गोवर या आजाराचा कहर वाढू लागलाय. फक्त मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील इतरही भागात गोवरचा संसर्ग होत असल्याची भीती व्यक्त केली जातेय. यासोबत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही आज महत्त्वपूर्ण लक्ष असणार आहे. सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलंय. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांसोबत नितीन गडकरी यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेटही आज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागासह महत्त्वाच्या शहरांमधील मोठ्या बातम्या, ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूजचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Nov 2022 08:38 PM (IST)

    सर्वसामान्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर पडेल महागात

    Marathi News LIVE Update

    सर्वसामान्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर पडेल महागात

    कंपन्यांना 500 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद

    Digital Personal Data Protection Bill आले

    केंद्र सरकारने तयार केला मसुदा, तक्रारी आधारे ठरेल दंड

  • 18 Nov 2022 06:27 PM (IST)

    राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणे टाळले

    Marathi News LIVE Update

    राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणे टाळले

    शेगाव येथील जनसभेत सावरकरांविरोधात एकही शब्द नाही

    भाजपसह केंद्र सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

    देशात भीतीचे वातावरण, द्वेषाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप

  • 18 Nov 2022 06:14 PM (IST)

    भारताची संपत्ती दोन-तीन उद्योगपतींच्या हातात

    Marathi News LIVE Update

    भारताची संपत्ती दोन-तीन उद्योगपतींच्या हातात

    राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

    शेतकरी, तरुणांच्या मनात भीतीचे वातावरण

    भाजप देशात द्वेषाचे राजकारण करत आहे

    आम्ही असे होऊ देणार नाही, असा हिंदुस्थान आम्हाला नको-गांधी

  • 18 Nov 2022 05:36 PM (IST)

    Online Shopping वर भारतीयांच्या उड्या

    Marathi News LIVE Update Online Shopping वर भारतीयांच्या उड्या

    ई-कॉमर्स कंपन्यांचा मोठा व्यवसाय, जोरदार कमाई

    सणासुदीत भारतीयांनी केली 76,000 कोटींहून अधिकची खरेदी

    वर्षभरात कंपन्यांच्या व्यवसायात 25 टक्क्यांची झाली वाढ

  • 18 Nov 2022 05:01 PM (IST)

    परभणीत भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन

    राहुल गांधीच्या प्रतिमेला जोडे मारत दिल्या घोषणा

    राहुल गांधीचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न मात्र पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भाजपकडून राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी

  • 18 Nov 2022 04:29 PM (IST)

    क्रिप्टो करन्सीचा दहशतवादासाठी वापर

    Marathi News LIVE Update

    क्रिप्टो करन्सीचा दहशतवादासाठी वापर

    दहशतवादी ओळख लपविण्यासाठी करत आहेत वापर

    व्हर्चुअल अॅसेटच्या माध्यमातून दहशतवादी कारवाईसाठी उपयोग

    डार्क नेटवरील व्यवहारांवर केंद्र सरकारचं लक्ष

    गृहमंत्रालयाने याविषयीची दिली माहिती

  • 18 Nov 2022 04:23 PM (IST)

    आज रुपया 6 पैशांनी घसरला

    Marathi News LIVE Update आज रुपया 6 पैशांनी घसरला

    डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी

    डॉलरच्या तुलनेत रुपया 81.70

    गेल्या काही दिवसांपासून बाजारात रुपया मजबूत स्थितीत

  • 18 Nov 2022 03:43 PM (IST)

    आधार कार्ड-पॅनकार्ड लिकिंग लवकर करा

    Marathi News LIVE Update आधार कार्ड-पॅनकार्ड लिकिंग लवकर करा

    31 मार्च 2023 पर्यत लिकिंग करण्याची मुदत

    लिकिंग न केल्यास होणार पुढील कारवाई

    प्राप्तिकर अधिनियम 1961 नुसार लिकिंग करणे अनिवार्य

  • 18 Nov 2022 02:50 PM (IST)

    सांबर प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

    कोल्हापूर : चंदगड तालुक्यात सांबर प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना अटक, शिकारीसाठी वापरण्यात आलेली एक रायफल आणि हत्यारेही जप्त

  • 18 Nov 2022 02:28 PM (IST)

    दिल्ली पोलिसांची टीम वसईत दाखल

    वसई : श्रद्धा हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांची टीम वसईत दाखल, दिल्ली टीममधील दोन पोलिसांचा माणिकपूर पोलिसांना सोबत घेऊन तपास सुरु, वसईत श्रद्धाबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती आणि हत्येशी संबंधित धागेदोरे तपासण्यासाठी पोलिसांचा गोपनीय तपास

  • 18 Nov 2022 01:49 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक

    एसटी कामगारांसाठी मोठा निर्णय उद्या होणार

    या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्ने हे उपस्थित

    डीएच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

    डिझेल गाड्या महाराष्ट्रात वाढवण्यासाठी परवानगी अहवाल सादर करणार

    एसटी कामगारांच्या 16 मागण्यावर तोडगा निघण्याची शक्यता

  • 18 Nov 2022 12:38 PM (IST)

    सिंहगड एक्सप्रेस वर दगडफेक, 1 प्रवासी जखमी

    पुणे : मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस वर दगडफेक, दगड लागून एक प्रवासी जखमी, रेल्वे पोलिसांकडून अधिक तपास सुरु

  • 18 Nov 2022 11:21 AM (IST)

    संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका दुबईतील राम मंदिरात ठेवणार

    कार्तिकी एकादशी निमित्त या सोहळ्याचे नियोजन संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडीने केले आहे

    20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत ही दिंडी आळंदी – पुणे – दुबई – राम मंदिर – बरजूमान – अबुदाबी – शारजहा – पुणे – आळंदी अशी भ्रमण करेल

    संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रथमच विदेशात जाण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, असे आयोजांकडून सांगण्यात आले

  • 18 Nov 2022 10:12 AM (IST)

    बुलेटस्वार तरुणांच्या ग्रूपमध्ये एका बाईकचा अपघात

    सिंधुदुर्ग : पुण्याहून गोव्याला जात असलेल्या बुलेटस्वार तरुणांच्या ग्रूपमध्ये एका बाईकचा अपघात, 22 वर्षीय तरुण जागीच ठार, कणकवली-वागदे पेट्रोल पंपजवळील घटना, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, वाचा सविस्तर

  • 18 Nov 2022 10:11 AM (IST)

    आळंदीला पायी निघालेल्या वारकऱ्याला बसने चिरडलं

    आळंदीला पायी निघालेल्या वारकऱ्याला बसने चिरडलं, पुणे-नगर महामार्गावर अपघात, 60 वर्षीय वृद्ध गुलाब शेख यांचा अपघातात मृत्यू, खासही ट्रॅव्हल्सच्या बस चालकाला अटक

  • 18 Nov 2022 09:35 AM (IST)

    पुण्यात सिंहगडावर अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

    आज दिवसभर पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी

    पहाटेपासून वन विभागाकडून सिंहगडावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

    या कारवाईदरम्यान नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांचे शेड जमीनदोस्त करण्यात येणार आहेत

  • 18 Nov 2022 09:11 AM (IST)

    सावरकरांबाबत अवमानकारक विधानाप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

    सावरकरांबाबत अवमानकारक वक्तव्य

    राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

    ठाणे नगर पोलीस ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीकडून तक्रार दाखल

    महाराष्ट्राच्या मातीत महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही- वंदना डोंगरे, महिला आघाडीच्या प्रमुख

  • 18 Nov 2022 08:34 AM (IST)

    कोकण रेल्वे मार्गावर आज रोहा इथं मेगा ब्लॉक

    कोकण रेल्वे मार्गावर आज रोहा इथं मेगा ब्लॉक, रोहा यार्डातील ट्रॅक्शन चेंज ओव्हर कामासाठी मेगा ब्लॉक, सकाळी 10.20 ते दुपारी 4.45 पर्यत मेगा ब्लॉक, 6 रेल्वे गाड्या 20 ते 30 मिनिटे विलंबाने, रत्नागिरी-दिवा पॅसेजर, मंगला एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस आणि दिवा सावंतलवाडी गाड्यांचा समावेश

  • 18 Nov 2022 08:32 AM (IST)

    पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, 5 ठार

    पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, पाच जण ठार, तिघे गंभीर जखमी, खालापूर जवळ झालेल्या अपघातात अर्टिगा कारचा चक्काचूर

  • 18 Nov 2022 07:33 AM (IST)

    राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांविरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात

    नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांविरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात, काँग्रेसच्या जोरदार टीकेनंतर केंद्र सरकारच्या हालचाली, सहा दोषींच्या मुदतपूर्व मुक्तेच्या आदेशावरील पुर्नर्विचारासाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

  • 18 Nov 2022 07:27 AM (IST)

    मागणीनुसार गाड्या चोरणारा चोर पोलिसांच्या ताब्यात

    पुणे : मागणीनुसार गाड्या चोरणारा चोर पोलिसांच्या ताब्यात, हडपसर परिसरात 10 लाख रुपयांहून अधिक किंमतीची दुचाकी चोररणारा अट्टल गुन्हेगाराला बेड्या

  • 18 Nov 2022 07:24 AM (IST)

    पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावले माफीवीरचे फ्लेक्स

    पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर लावले माफीवीरचे फ्लेक्स, राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल पुरावे सादर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पुण्यातील सारसबाग चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर व राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स

Published On - Nov 18,2022 7:22 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.