Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज मंगळवार, 22 नोव्हेंबर, 2022. महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. बहुतांश जिल्ह्यात पारा खाली घसरला आहे. त्यामुळे लोकांना शेकोटी आणि स्वेटरचा आधारा घ्यावा लागतोय. दरम्यान, दुसरीकडे मुंबई गोवरची साथ अधिक चिंता वाढवतेय. आता तरुणांमध्येही गोवरची लक्षण दिसून येत असल्याचं काळजी व्यक्त केली जातेय. अशातच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही आज दिवसभर आपलं लक्ष असणार आहे. तर श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज नेमके काय खुलासे होतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताड्या अपडेट्सचा आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
कर्मचारी कपातीनंतर ट्विटरमध्ये आता भरतीची लाट
Marathi News LIVE Update
Twitter मध्ये नोकरीची जबरदस्त संधी
कर्मचारी कपातीनंतर आता भरतीची लाट
ट्विटरमध्ये कर्मचारी भरतीसाठी एलॉन मस्कची योजना
मार्केटिंग आणि इंजिनिअरिंग पदासाठी भरती प्रक्रिया
-
Pearls मध्ये अडकलेला पैसा मिळणार परत
Marathi News LIVE Update Pearls मध्ये अडकलेला पैसा मिळणार परत
PACL मधील रक्कमेसाठी त्रुटी दूर करण्याचे आवाहन
सेबीने त्रुटी आणि चूका दुरुस्त करण्यासाठी दिली मुदत
31 जानेवारी 2023 पर्यंत दुरुस्ती करता येणार
15,000 रुपयांचा निपटारा सुरु असल्याचा सेबीचा दावा
-
-
दिपाली सय्यद लवकरच शिंदे गटात
Marathi News LIVE Update
लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार
दिपाली सय्यद यांनी केली घोषणा
उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा-सय्यद
प्रवेशाला भाजपचा विरोध नसल्याचा केला दावा
-
राज्यपालांविरोधातील लढाई रस्त्यावरुन हायकोर्टात
Marathi News LIVE Update
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात हायकोर्टात धाव
राज्यपालांविरोधात फौजदारी जनहित याचिका सादर
समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा याचिकेत आरोप
राज्यपालांविरोधातील लढाई रस्त्यावरुन हायकोर्टात
राज्यपालांना पदावरुन हटविण्याची विनंती
याचिकेवर लवकरच सुनावणीची शक्यता
-
पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रति लिटर 5 रुपयांनी कमी होणार ?
Marathi News LIVE Update
पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर घसरले
अनेक कारणांमुळे मागणी घटल्याने दर कमी होण्याची आशा
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रति लिटर 5 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज
-
-
नवले पुलावर पुन्हा अपघाताची मालिका
Marathi News LIVE Update
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात
भरधाव वेगात जाणारा कंटेनर दुभाजकावर धडकला
धडकेत दोन चारचाकी वाहनांचे नुकसान
नवले पुलावर पुन्हा अपघाताची मालिका
-
त्रिवेदी यांनी विरोधकांवर साधला निशाणा
Marathi News LIVE Update
छत्रपती शिवाजी महाराज सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक
आपण महाराजांचा अवमान केला नाही
भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा दावा
स्वतःच्या बुद्धीमतेचा विचार करा
त्रिवेदी यांनी विरोधकांवर साधला निशाणा
-
विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
Marathi News LIVE Update विद्यार्थ्यांना नापास करणार, पण परीक्षा घेणार
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घेषणा
नापास न करणं आणि परीक्षा घेणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी
विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
-
राज्यपालांना तात्काळ राज्याच्या बाहेर पाठवा
Marathi News LIVE Update
राज्यपालांना तात्काळ राज्याच्या बाहेर पाठवा
राज्यपाल सातत्यानं शिवरायांचा अपमान करत आहेत
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साधला निशाणा
राज्यपालांविरोधात विरोधी पक्षांचा हल्लाबोल कायम
-
ऑनलाईन गेम खेळणे पडणार महागात
Marathi News LIVE Update
ऑनलाईन गेम खेळणे पडणार महागात
ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर अजून द्यावा लागणार कर
रमी, लुडो, कॅरम, क्रिकेट आणि इतर खेळासाठी मोजावा लागेल पैसा
सध्या 18 टक्के द्यावा लागतो ऑनलाईन गेमिंसाठी कर
आता 28 टक्के जीएसटी वसूल करण्याची केली शिफारस
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली जीएसटी वाढीची शिफारस
-
बंदी असलेले साडे चार लाखांचे मांगूर मासे पकडले
शिर्डी : बंदी असलेले साडे चार लाखांचे मांगूर मासे पकडले, आठ जणांविरूद्ध गुन्हा
-
23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
बुलढाणा : 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील घटना, नदीत प्रेत कुणीतरी फेकून दिल्याचा गावातील लोकांना संशय, पोलीस तपास सुरु
-
नवले पुलावर 48 वाहनांना धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकाला अटक
पुणे : नवले पुलावर 48 वाहनांना धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकाला अटक, चाकण येथील नानेकरवाडी येथून घेतलं ताब्यात, आरोपीचं नाव मनिराम यादव
-
ब्रम्हपुरी तालुक्यात ३ जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात ३ जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद, वन विभागाच्या विशेष पथकाने पवनपार परिसरातील जंगलात K-4 वाघाला जेरबंद केलं, प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी वाघाला चंद्रपुरात रवाना केल्याची माहिती
-
रोहित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर
बिडकीन गावात होणार रोहित पवार यांचे जंगी स्वागत
बालानगर येथे होणार शेतकरी मेळावा
रोहित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
-
वृद्धाचा 32 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला
कल्याण : कचऱ्याला आग लावल्याचा जाब विचारला म्हणून 60 वर्षीय वृद्धाचा 32 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला, तरुण गंभीर जखमी, मानपाडा पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा, दोन आरोपी ताब्यात तर इतरांचा शोध सुरू
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचा आज निकाल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचा आज निकाल, मात्र मॉडर्न कॉलेज गणेशखिंड आणि निगडी परीक्षा केंद्रावर गैरवापर झाल्याचा युवा सेनेचा आरोप, कुलसचिवांकडे मतदान केंद्रावरची मतमोजणी न करण्याची मागणी
-
इंडोनेशियातील भूकंपात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू
इंडोनेशियातील भूकंपात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू
सोमवारी राजधानी जकार्तामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
A powerful earthquake killed over 160 people in Indonesia’s West Java province on Monday. The epicentre of the 5.6 magnitude quake was near the town of Cianjur in mountainous West Java, about 75 km (45 miles) southeast of Jakarta
Visuals from Cianjur yesterday
(Source: Reuters) pic.twitter.com/XUaqAAWokC
— ANI (@ANI) November 22, 2022
-
Video : दापोलीतील साई रिसॉर्ट आज पाडलं जाण्याची शक्यता
दापोलीतील साई रिसॉर्ट आज पाडलं जाण्याची शक्यता, किरीट सोमय्या दापोलीत दाखल, अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
पाहा व्हिडीओ :
-
कसारा येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला
कसारा येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला, हातातील काठीने तरुणाकडून बिबट्याचा प्रतिकार, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी
-
औरंगाबाद : जळीत प्रकरणातील तरुणाचा अखेर मृत्यू
औरंगाबाद : जळीत प्रकरणातील तरुणाचा अखेर मृत्यू, रात्री 11 वाजता घाटी रुग्णालयात मृत्यू, स्वतःला पेटवून घेत तरुणीलाही जाळण्याचा केला प्रयत्न, फॉरेन्सिक सायन्स विद्यालयात घडला होता प्रकार, जखमी तरुणीवर अजूनही उपचार सुरु
Published On - Nov 22,2022 8:21 AM