Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज दिनांक 21 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी. आजपासून दिपोत्सवास प्रारंभ होत आहे. मात्र दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन दिवाळीत एसटी बस आणि खसगी बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. खासगी बसचे भाडे अडीच ते तीन पटीने वाढले आहे. तर एसटीच्या भाड्यामध्ये देखील दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. एसटीची भाडेवाढ आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता गावी जाणाऱ्या चाकरणमान्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दुरसीकडे राज्याच्या अनेक भागात अद्यापही पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.