वडेट्टीवारांचं ‘तत्वत:’ राहुन गेलं आणि महाराष्ट्र संभ्रमात, माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न!

नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याबाबत आता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

वडेट्टीवारांचं 'तत्वत:' राहुन गेलं आणि महाराष्ट्र संभ्रमात, माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न!
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 9:12 PM

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करुन अनलॉकिंगच्या दिशेनं वाटचाल करण्याचा विचार राज्य सरकार करतंय. अशावेळी आज आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील 18 जिल्ह्यात अनलॉक करण्यात येईल अशी घोषणा केली. वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानुसार नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याबाबत आता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं. (Vijay Vadettiwar’s explanation after the announcement of unlocking)

नागपूर विमानतळावर वडेट्टीवार काय म्हणाले?

मुंबईतील पत्रकार परिषद आटोपून वडेट्टीवार नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी गाठलं असता, राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या 5 लेव्हला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एचडीएमएने पाच लेव्हल ठरवल्या, त्याला मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊन लादणे हे सरकारचं काम किंवा जबाबदारी नाही. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले त्या भागातील लॉकडाऊन कमी करायचा हे धोरण ठरवलं. ऑक्सिजन बेड, पॉझिटिव्हिटी रेट यावरुन पाच स्टेप ठरवल्या, टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचं असं ठरलं, तत्वता मान्यता मिळाली आहे. मात्र अंतिम आदेश मुख्यमंत्री घेतील, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.

‘तत्त्वत:  म्हणायचं राहून गेलं’

विमानतळावर वडेट्टीवार आपल्या निवासस्थानी गेले. तिथे यांनी माध्यमांनीच महाराष्ट्र अनलॉक झाला असा प्रसार केल्याचा आरोप केलाय. अशा प्रकारचा निर्णय घेताना जपून घ्यावा लागतो. कोरोना संपला नाही. पण उद्योग व्यवसाय सुरु झाले पाहिजेत. जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत तिथे लॉकडाऊन ठेवावाच लागेल. मी खात्याचा मंत्री असल्यामुळे मी माध्यमांशी संवाद साधला. यात कुठलीही श्रेयवादाची लढाई नाही. त्यावेळी तत्त्वत: म्हणायचं राहून गेलं, असं वडेट्टीवार म्हणाले. पूर्ण महाराष्ट्र अनलॉक नाही. तर काही जिल्ह्यात उद्यापासून सूट मिळेल, अशी माहितीही वडेट्टीवारांनी यावेळी दिलीय.

मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं राज्य सरकारने सांगितलं आहे.

‘अधिकृत निर्णय कळवला जाईल’

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे, ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असंही राज्य सरकारने आपल्या निवदेनात म्हटलंय.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown Update : ठाकरे सरकारचा गोंधळात गोंधळ, निर्बंध अद्याप हटवले नाहीत, CMO चं स्पष्टीकरण

Maharashtra Lockdown Update : राज्यात लॉकडाऊन की अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेत्यांचा हल्लाबोल

Vijay Vadettiwar’s explanation after the announcement of unlocking

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.