राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?
ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असेल आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले असतील अशा जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या 5 स्तरांच्या नियमावलीत 14 जूनपासून बदल होणार आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन नियमांत बदल केले जातील असं सरकारनं आधीच सांगितलं आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असेल आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले असतील अशा जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील. सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार अशा जिल्ह्यात अनलॉक केलं जाणार आहे. (possibility of unlock In this district’s of Maharashtra)
?पाच लेव्हल कशा आहेत??
?पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
?दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
?तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
?चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
?पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
या जिल्ह्यांमध्ये अनलॉकची शक्यता
अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदूरबार, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग
पहिल्या लेवलमधील जिल्हे
अहमदनगर- पॉझिटिव्हिटी रेट 2.63 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 12.77 टक्के
चंद्रपूर – पॉझिटिव्हिटी रेट 0.87 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-4.95 टक्के
धुळे- पॉझिटिव्हिटी रेट 1.64 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-2.15 टक्के
गोंदिया- पॉझिटिव्हिटी रेट 0.83 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-1.87 टक्के
जळगाव- पॉझिटिव्हिटी रेट 1.82 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण – 13.98 टक्के
जालना- पॉझिटिव्हिटी रेट 1.44 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-5.29 टक्के
लातूर- पॉझिटिव्हिटी रेट 2.43 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-8.66 टक्के
नागपूर – 3.13 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-3.93 टक्के
नांदेड- 1.19 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 2.5 टक्के
यवतमाळ- 2.91 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.01 टक्के
दुसऱ्या लेवल मधून पहिल्या लेवलमध्ये
नंदुरबार- 2.06 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-6.19 टक्के
हिंगोली- पॉझिटिव्हिटी रेट 1.20 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-6.77 टक्के
तिसऱ्या लेवल मधून पहिल्या लेवलमध्ये
अमरावती- पॉझिटिव्हिटी रेट 4.36 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 16.57 टक्के
भंडारा पॉझिटिव्हिटी रेट 1.22 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण- 1.60 टक्के
वाशिम- 2.25 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.01 टक्के
वर्धा- 2.5 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-1.57 टक्के
परभणी- 2.30 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-12.5 टक्के
सोलापूर- 3.43 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-14.66 टक्के
चौथ्या लेवलमधून पहिल्या लेवलमध्ये येण्याची शक्यता
बुलढाणा पॉझिटिव्हिटी रेट 2.37 ऑक्सिजन बेड भरल्याचं प्रमाण-9.03
- दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अकोला 5.37 टक्के ऑक्सिजन बेड व्यापलेले : 19.02 औरंगाबाद 5.35 ऑक्सिजन बेड व्यापलेले 10.86 बीड 5.22 ऑक्सिजन बेड व्यापलेले: 11.35 उस्मानाबाद 5.16 ऑक्सिजन बेड व्यापलेले 8.13 नाशिक : 7.12 ऑक्सिजन बेड व्यापलेले 14.71 ठाणे: 5.92 ऑक्सिजन बेड व्यापलेले 12.78 मुंबई : 4.40 ऑक्सिजन बेड व्यापलेले 27.12
- तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
पुणे 11.11 ऑक्सिजन बेड व्यापलेले 13 रायगड 13.33 ऑक्सिजन बेड व्यापलेले 21.32 रत्नागिरी: 14.12 ऑक्सिजन बेड व्यापलेले 48.75 सातारा 11.30 ऑक्सिजन बेड व्यापलेले 41.06 सिंधुदुर्ग: 11.89 ऑक्सिजन बेड व्यापलेले 51.59
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
कोल्हापूर 15.85 ऑक्सिजन बेड व्यापलेले :67.41
कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks ■ पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच निर्णय लागू होईल ■ सोमवारपासून परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार@MahaDGIPR pic.twitter.com/tuwNBQjvNW
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) June 11, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी
possibility of unlock In this district’s of Maharashtra