महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा

Maharashtra lockdown update : नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे, असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 8:24 PM

इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन (Maharashtra lockdown update) होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे, असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी सांगितलं. ते इंदापुरात बोलत होते. महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना (coronavirus Maharashtra) वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणास्तव आज राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये तातडीने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातल्या उपाय योजना आणि सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. (Maharashtra lockdown update There will be no lockdown again, said Maharashtra minister)

इंदापूर तालुक्यात सध्या 108 जण कोरोना पॉझिटिव रुग्ण आहेत, यामध्ये इंदापूर ग्रामीण मधील 76, तर इंदापूर शहरात सध्या 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सर्वांवरती उपचार सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भिगवण, पळसदेव आणि मदनवाडी तर इंदापूर शहरात आंबेडकरनगर या भागात जास्त रुग्ण आढळत असल्यामुळे या भागात घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी अधिकार्‍यांना दिले.

कोरोनाचे संकट संपलेले नाही

कोरोनाचे संकट संपलेले नाही, कोरोना गेला नाही त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचे दत्ता भरणे यांनी सांगितले. इंदापूर शहर आणि तालुक्यात जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश भरणे यांनी पोलिसांना दिले आहेत. या कारवाईत अनेक जण नाराज होतील, मात्र कोरोना अधिक वाढू नये म्हणून अशी कारवाई करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरा असे आवाहनही यावेळी भरणे यांनी केले.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे भरणे यांनी यावेळी नमूद केले. लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक जण शेतकऱ्यांची पिळवणूक करतात, त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही, पण लोकांनीही कोरोनाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे भरणे म्हणाले.

इंदापूर नगरपालिकेला आमदार फंडातून दिली रुग्णवाहिका

या आढावा बैठकीत भरणे यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इंदापूर नगरपालिकेला रुग्णवाहिका आहे का? असे विचारले असता, नाही असं उत्तर आलं. इंदापूर नगरपालिकेला रुग्णवाहिका नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांचे आणि सध्या कोरोनाग्रस्तांचे हाल होऊ नयेत, यासाठी तात्काळ राज्यमंत्री भरणे यांनी त्यांच्या आमदार फंडातून 20 लाख रुपयांची घोषणा करुन, रुग्णवाहिका देत असल्याचं सांगितले. नगरपालिकेला यासंदर्भात तात्काळ प्रस्ताव द्यावा अशाही सूचना यावेळी भरणे यांनी दिल्या.

संबंधित बातम्या 

Maharashtra Lockdown Updates : …तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.